Maharashtra

Dhule

CC/12/71

Haris Jagannt Karle Taloda - Complainant(s)

Versus

Sahmartha Shakari Patpede dhule - Opp.Party(s)

D D Shardul

23 Dec 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/12/71
 
1. Haris Jagannt Karle Taloda
At Post talve Taluka Taloda disst Nandurbar
Maharashtra
dhule
...........Complainant(s)
Versus
1. Sahmartha Shakari Patpede dhule
199 svame Samarthe Bavan Nagar patte Dhule
Maharashtra
dhule
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 HON'ABLE MR. S.S. Joshi MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

 


 

                                  ग्राहक तक्रार क्रमांक –    ७१/२०१२


 

                                  तक्रार दाखल दिनांक – २६/०४/२०१२


 

                                 तक्रार निकाली दिनांक – २३/१२/२०१३


 

हरिष जगन्‍नाथ कार्ले


 

उ.व.३७, धंदा - वाईंडर


 

रा. वॉटर सल्‍पाय हायवे,


 

साक्री, ता.साक्री जि.धुळे.


 

ह.मु.मु.पो. तळवे, ता.तळोदा,


 

जि. नंदुरबार.                                    ................ तक्रारदार


 

 


 

        विरुध्‍द


 

 


 

१) श्री समर्थ सहकारी पतपेढी मर्या. धुळे  


 

    पत्‍ता - १९९ श्री स्‍वामी समर्थ भवन,


 

    नगरपट्टी, धुळे.


 

    [नं.१ जाबदेणार यांची नोटीसीची


 

    बजावणी चेअरमन यांचेवर करण्‍यात यावी]


 

२) श्री सचिन सुरेश कुलकर्णी


 

    मुख्‍य कार्यकारी अधिकारी


 

    पत्‍ता - १९९ श्री स्‍वामी समर्थ भवन,


 

    नगरपट्टी, धुळे.                                 ............ जाबदेणार  


 

  


 

 


 

न्‍यायासन  


 

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

 (मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

(मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)


 

 


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड. श्री.डी.डी. शार्दुल)


 

(जाबदेणार तर्फे – एकतर्फा)


 

 


 

निकालपत्र


 


 (द्वाराः मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

 


 

तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍या पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अन्‍वये गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

 


 

१. तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी जाबदेणार श्री समर्थ सहकारी पतपेढी मर्या. धुळे(यापुढे संक्षीप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल) या पतसंस्‍थेत पावती क्र.०५०५१५ नुसार मुदत ठेव रक्‍कम रू.६०,०००/- हे १८१ दिवसा करिता प्रती वर्ष १० टक्‍के प्रमाणे व्‍याज दरावर ठेवलेली होती. सदर मुदत ठेव पावती देय दि.१३/११/२००७ अशी असून सदर मुदत ठेव पावती दि.१७/०१/२००७ रोजी ६१ दिवसांच्‍या कालावधीसाठी ११ टक्‍के व्‍याज रक्‍कम रू.११०३/- एकूण रक्‍कम रूपये ६१,१०३/- अशी संपूर्ण रक्‍कम मुदत ठेव वाढवून दि.१३/११/२००७ ते १३/०१/२००८ पावेतो वाढवलेली असून त्‍यापुढील  आज पर्यन्‍त पतपेढीचे कामकाज बंद असल्‍यामुळे पुढील उक्‍तकालावधीचे व्‍याज आजपर्यंत तक्रारदार यांना वाढवून दिलेली नाही तसेच मुदत ठेव पावतीची मुदत देखील वाढवून दिलेलली नाही.


 

 


 

२.   तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍याकडे वरील देय रक्‍कमेची वेळोवेळी मागणी केली असता जाबदेणार यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍याकडून मुदत ठेव पावतीमधील मुदतीअंती देय रक्‍कम रूपये ६१,१०३/- व त्‍यावर देय तारखेपासून द.सा.द.शे. १२ टक्‍के प्रमाणे व्‍याज. तसेच मानसिक, शारिरिक व आर्थिेक त्रासापोटी रक्‍कम रूपये १०,०००/- आणि अर्जाचा खर्च जाबदेणार यांचेकडून मिळावा, याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्‍यात आला. 


 

 


 

 


 

३.  तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍ठयार्थ मुदत ठेव पावतीची छायांकित प्रत दाखल केली आहे.  


 

 


 

 


 

४.  जाबदेणार  नं.१ व २ यांना नोटीसची बजावणी होवूनही मुदतीत हजर न झालेने त्‍यांचे विरूध्‍द ‘एकतर्फा’ आदेश पारित करण्‍यात आला आहे.


 

 


 

 


 

६.   तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्‍यासाठी दाखल कागदपत्रे पाहता व विद्वान वकीलानी केलेला युक्तिवाद ऐकल्‍यानंतर, आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे  उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.


 

 


 

              मुददे                                   निष्‍कर्ष


 

१.     तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत काय ?             होय


 

२.     जाबदेणार  यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात    


 

कमतरता केली आहे काय ?                                                   होय


 

३.     तक्रारदार हे जाबदेणार  यांच्‍याकडून देय रक्‍कम


 

व त्‍यावरील व्‍याज मिळण्‍यास पात्र आहेत काय ?           होय


 

४.     तक्रारदार हे जाबदेणार  यांच्‍याकडून मानसिक


 

त्रास व तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम वसुल होऊन


 

मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                           होय


 

५.    अंतिम आदेश ?                                 खालीलप्रमाणे विवेचन


 

 


 

७.   मुद्दा क्र.१-  तक्रारदार यांनी मुदत ठेव पावतीची छायांकित प्रत दाखल केली आहे. जाबदेणार यांनी तक्रारदार यांची मुदत ठेव पावतीमधील रक्‍कम नाकारलेली नाही. मुदत ठेवपावतीमधील रक्‍कमेचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे  मत  आहे.  म्‍हणून  मुद्दा क्र.१  चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.



 

८. मुद्दा क्र.२- प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी पतसंस्‍थेत मुदत ठेव पावती अन्‍वये रक्‍कम गुंतविली होती ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी जाबदेणार  यांच्‍याकडे गुंतवलेली रक्‍कम परत करणे हे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतू मागणी करुनही रक्‍कम न देणे ही जाबदेणार यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.२ चे  उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

९. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या मुदतठेव पावतीमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम जाबदेणार  नं.१ व २ यांच्‍याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. जाबदेणार नं.२ हे पतसंस्‍थेचे कर्मचारी असल्‍याने त्‍यांचा प्रत्‍यक्षरित्‍या पतसंस्‍थेच्‍या व्‍यवहारात संबंध नसल्‍याने त्‍यांना वैयक्तिकरित्‍या  जबाबदार ठरविता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे जाबदेणार पतसंस्‍था श्री समर्थ सहकारी पतपेढी मर्या. धुळे यांचेकडून मुदतठेव पावतीमधील मुदती अंती एकूण देय रक्‍कम रूपये ६१,१०३/- सदर आदेश  तारखे  पासून  संपूर्ण रक्‍कम फीटेपर्यंत द.सा.द.शे. ६ टक्‍के दराप्रमाणे व्‍याजासह, अशी एकूण रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र.३ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

१०. मुद्दा क्र.४- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदतठेव पावतीमधील व्‍याजासह होणारी रक्‍कम जाबदेणार यांच्‍याकडुन परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना जाबदेणार पतसंस्‍था श्री समर्थ सहकारी पतपेढी मर्या. धुळे यांच्‍या विरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्‍यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे जाबदेणार यांच्‍या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुदद क्रं.४ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

११. मुद्दा क्र.५-  वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.


 

आ दे श


 

 


 

१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

२. जाबदेणार श्री समर्थ सहकारी पतपेढी मर्या. धुळे यांनी, सदर आदेशाचे     तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत,      तक्रारदारांना खालील प्रमाणे      रक्‍कमा दयाव्‍यात.


 

 


 

(१) मुदतठेव पावतीमधील मुदतीअंती असलेली देय रक्‍कम  रूपये ६१,१०३/- (अक्षरी रूपये एकसष्‍ठ हजार एकशे तीन मात्र) व या रकमेवर देय दिनांकापासुन द.सा.द.शे. ६ टक्‍के दराने संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत व्‍याज दयावे.


 

(२) मानसिक त्रासापोटी रक्‍कम रू.१,०००/- (अक्षरी रूपये एक हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रू.५००/- (अक्षरी रूपये पाचशे मात्र) दयावेत.


 

 


 

३.  वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्‍यक्ष/संचालक/व्‍यवस्‍थापक/अवसायक)      यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्‍थेचा कारभार पाहात असतील त्‍यांनी      करावी.  तसेचक्र.मधीलरकमेपैकीकाहीरक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास, त्‍यावर कर्ज दिले असल्‍यास सदरची रक्‍कम वजावट करुन  उर्वरित रक्‍कम अदा करावी.  


 

 


 

धुळे.


 

दि.२३/१२/२०१३.


 

 


 

         (श्री.एस.एस. जोशी)  (सौ.एस.एस. जैन)  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

                सदस्‍य           सदस्‍या           अध्‍यक्षा


 

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER
 
[HON'ABLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.