Maharashtra

Jalgaon

CC/09/1311

Avantar Medical Arban Co. Society - Complainant(s)

Versus

Sahkar Nagri Co. Society - Opp.Party(s)

Bhangale

27 Apr 2015

ORDER

final order
District Consumer Redressal Forum,Jalgaon
 
Complaint Case No. CC/09/1311
 
1. Avantar Medical Arban Co. Society
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Sahkar Nagri Co. Society
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Nilima Sant PRESIDENT
 HON'BLE MRS. Kavita Jagpati MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निशाणी क्र. 01 वरील आदेश

श्रीमती. नीलिमा संत, अध्‍यक्षा –  तक्रारदार संस्‍थेने प्रस्‍तुत ची तक्रार सामनेवाला पतसंस्‍थेत त्‍यांनी काही ठेवी ठेवल्‍या होत्‍या व मुदत ठेवीची रक्‍कम संपली तरी सामनेवाला पतसंस्‍थेने त्‍यांच्‍या ठेवी व्‍याजासह परत केल्‍या नाहीत म्‍हणुन केलेली आहे.  तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रार अर्जात त्‍यांची संस्‍था सहकार कायदयान्‍वये नोंदलेली संस्‍था आहे.  संस्‍थेचा उदेद्श सभासद, नागरीक व संस्‍था कडुन ठेवी स्विकारणे, सभासदारांना कर्ज वितरण करणे व सभासदांचे हिताचे वेगवेगळे उपक्रम राबवणे व सेवा पुरविणे हे आहे असे म्‍हटले आहे.  त्‍यांनी विरुध्‍द पक्ष सहकार नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या. फैजपुर या संस्‍थेत मुदत ठेवीमध्‍ये तक्रारीत नमूद रक्‍कमा ठेवल्‍या होत्‍या असे म्‍हटले आहे. 

2.    मा.राष्‍ट्रीय आयोग तसेच राज्‍य आयोग, यांनी अनेक न्‍यायीक दृष्‍टांतामध्‍ये सहकारी संस्‍थेने इतर संस्‍थेत केलेली गुंतवणूक ही जादा व्‍याजाच्‍यासाठी केलेली असल्‍याने गुंतवणूक करणारी सहकारी संस्‍था ग्राहक या संज्ञेत येणार नाही व त्‍यामुळे अशा त-हेच्‍या तक्रारी चालविण्‍याचा मंचाला अधिकार नाही, असे मत व्‍यक्‍त केले आहे.  तसेच मा.राज्‍य आयोग, मुंबई यांनी नुकत्‍याच दिलेल्‍या अपील क्र. 711 ते 716/2011 दि. 14/01/2015 च्‍या निकालपत्रात देखील “ The Complainants themselves were credit society engaged in money lending business.  Therefore they would not qualify to be consumers”.  असे नमूद केले आहे. 

3.    सहकारी पतसंस्‍था ही आपला व्‍यवसाय जादा व्‍याज मिळण्‍याकरीता करते व तक्रारदार संस्‍थेचा उदेश हा वाणिज्यिक स्‍वरुपाचा आहे असे आम्‍हास वाटते.  त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2 (1) (डी) मधील तरतुदीचा व उपरोक्‍त न्‍यायनिर्णयाचा विचार करता सदरचा वाद हा ग्राहक वाद होत नाही या मतांस आम्‍ही आलो आहोत. 

4.  वरील विवेचन विचारात घेता प्रस्‍तुत तक्रार या मंचात चालु शकत नाही.  पंरतु आम्‍ही यापुढे असेही स्‍पष्‍ट करीत आहोत की, तक्रारदार संस्‍थेने तक्रारीत उपस्थित केलेला वाद हा त्‍यांनी कायदयानुसार योग्‍य त्‍या न्‍यायमंचाकडे दाखल करावा.  प्रस्‍तुत प्रकरणी व्‍यतीत झालेला कालावधी हा मुदत माफीसाठी ग्राहय धरणेत यावा. 

यास्‍तव मंच खालील आदेश देत आहे.

 

आदेश 

  1. तक्रारदाराची तक्रार अधिकारक्षेत्रा अभावी नामंजूर करण्‍यात येते.
  2. तक्रारदार संस्‍थेने तक्रारीत उपस्थित केलेला वाद हा कायदयानुसार योग्‍य त्‍या न्‍यायालयाकडे दाखल करावा.

 

 

    गा 

दिनांकः-  27/04/2015.     (श्रीमती.कविता जगपती)       (श्रीमती. नीलिमा संत)

                                                   सदस्‍या                                           अध्‍यक्षा

अतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जळगाव   

 

 

 
 
[HON'BLE MRS. Nilima Sant]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kavita Jagpati]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.