Maharashtra

Solapur

CC/14/80

Rakhi Mahaveerkumar Surana - Complainant(s)

Versus

Sahkar Maharshi Shankarao mohite patil nagri gramin sahkari patsanstha & Other 11 - Opp.Party(s)

01 Aug 2014

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum, Solapur.
Behind District Treasury Office, Solapur.
 
Complaint Case No. CC/14/80
 
1. Rakhi Mahaveerkumar Surana
Near prant office Kurduwadi Tal. Madha
Solapur
...........Complainant(s)
Versus
1. Sahkar Maharshi Shankarao mohite patil nagri gramin sahkari patsanstha & Other 11
Madha Dist. Solapur
Solapur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. V.J. Dalbhanjan PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. Onkarsing G. Patil MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

 

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 80/2014.

तक्रार दाखल दिनांक : 24/03/2014.

                                                           तक्रार आदेश दिनांक : 01/08/2014.                                निकाल कालावधी: 00 वर्षे 04 महिने 08 दिवस   

 

 

राखी महावीरकुमार सुराणा, वय 30 वर्षे, व्‍यवसाय : घरकाम,

पद्मावती, पुणे तर्फे कुलमुखत्‍यार : रिकबचंद फुलचंद सोनिमिंडे,

वय 40 वर्षे, व्‍यवसाय : वकिली, रा. प्रांत ऑफीसशेजारी,

कुडूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर.                              तक्रारदार  

                   विरुध्‍द                          

 

(1) सहकारी महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी ग्रामीण सहकारी

    पतसंस्‍था मर्यादीत, बारलोणी तर्फे प्रशासक, सहायक निबंधक,

    सहकारी संस्‍था, माढा, जि. सोलापूर.

(2) यशवंत किसन शिंदे, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

(3) व्‍यंकटेश शिवाजी पाटील, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

(4) पोपट डबरु गुंजाळ, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

(5) दिनकर कृष्‍णा मोरे, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

(6) श्रीरंग संभू मोरे, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

(7) बाबासाहेब सौदागर अवताडे, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

(8) रामलिंग बाबू ठोंबरे, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.                              

(9) सौदागर श्रीपती चव्‍हाण, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.                       विरुध्‍द पक्ष

(10) बाबू भवानजी गुंजाळ, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

     रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

(11) सौ. अहिल्‍यादेवी सदाशिव हनवते, वय सज्ञान,

     व्‍यवसाय : घरकाम, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

(12) मधुकर भाऊराव गपाटे, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

     रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.                              विरुध्‍द पक्ष

 

                        गणपुर्ती  :-   सौ. विद्युलता जे. दलभंजन, प्रभारी अध्‍यक्ष

                        श्री. ओंकारसिंह जी. पाटील, सदस्‍य 

 

 

 

 

                   तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ :  आर.एफ्, सोनिमिंडे

                   विरुध्‍द पक्ष अनुपस्थित / एकतर्फा

 

आदेश

 

 

श्री. ओंकारसिंह जी. पाटील, सदस्‍य यांचे द्वारा :-

 

1.    तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये उपस्थित केलेला विवाद थोडक्‍यात असा आहे की, विरुध्‍द पक्ष क्र.2 चेअरमन व विरुध्‍द पक्ष क्र.3 ते 12 संचालक असलेल्‍या विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेच्‍या कुर्डूवाडी शाखेमध्‍ये दि.3/11/2005 रोजी दामदुप्‍पट ठेव पावती क्र.007242 द्वारे रु.6,000/- रक्‍कम गुंतवणूक केलेली आहे. दि.3/11/2011 रोजी ठेव पावतीची मुदत पूर्ण झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे ठेव रक्‍कम मिळण्‍याकरिता सातत्‍याने पाठपुरावा व मागणी करुनही तक्रारदार यांना ठेव रक्‍कम परत करण्‍यात आलेली नाही. त्‍यांनी विरुध्‍द पक्ष यांना विधिज्ञांमार्फत दि.14/8/2013 रोजी नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविल्‍या असता त्‍या स्‍वीकारल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रारीद्वारे ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यासह मानसिक त्रास व तक्रार खर्च असे एकूण रु.23,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.

 

2.    विरुध्‍द पक्ष यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी झालेली आहे. उचित संधी देऊनही त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍याविरुध्‍द एकतर्फी चौकशीचे आदेश करण्‍यात येऊन तक्रारीमध्‍ये सुनावणी पूर्ण करण्‍यात आली.

 

3.    तक्रारदार यांची तक्रार व त्‍यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच तक्रारदार यांचे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्‍यानंतर तक्रारीमध्‍ये उपस्थित विवादाचे निवारनार्थ व निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत.

 

 

 

मुद्दे                                    उत्‍तर

 

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                         होय. 

2. तक्रारदार ठेव रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?             होय. 

3. काय आदेश ?                                        शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

कारणमिमांसा

 

4.    मुद्दा क्र. 1 व 2 :-   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी नागरी ग्रामीण सहकारी पतसंस्‍था मर्यादीत, बारलोणी या पतसंस्‍थेच्‍या कुर्डूवाडी शाखेमध्‍ये दामदुप्‍पट ठेव पावती क्र.007242 अन्‍वये रक्‍कम गुंतविल्‍याचे अभिलेखावर दाखल ठेव पावतीवरुन निदर्शनास येते. प्रामुख्‍याने, ठेव पावतीची मुदत पूर्ण झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे ठेव रकमेची मागणी केली असता ठेव परत करण्‍यास टाळाटाळ केल्‍याची तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे.

 

 

5.    विरुध्‍द पक्ष यांना मंचामार्फत नोटीस बजावणी झालेली आहे. परंतु उचित संधी असतानाही त्‍यांनी अभिलेखावर लेखी म्‍हणणे दाखल केलेले नाही. वास्‍तविक पाहता, तक्रारदार यांच्‍या तक्रारीचे खंडण करण्‍यासाठी लेखी म्‍हणणे व पुराव्‍याची कागदपत्रे दाखल करण्‍यासाठी त्‍यांना उचित संधी उपलब्‍ध होती. परंतु तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्रांचे उचित पुराव्‍याद्वारे त्‍यांनी खंडन केलेले नाही. त्‍यामुळे एका अर्थाने तक्रारदार यांची तक्रार, त्‍यातील कथने व दाखल कागदपत्रे विरुध्‍द पक्ष यांना मान्‍य असल्‍याचे अनुमान काढण्‍याकरिता मंचाला कोणतीही हरकत नाही.

 

 

 

6.    निर्विवादपणे, तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे दामदुप्‍पट ठेव पावतीद्वारे रक्‍कम गुंतवणूक करुन वित्‍तीय सेवा घेतलेली आहे. विनंती व मागणी करुनही तक्रारदार यांना प्रस्‍तुत ठेव रक्‍कम परत करण्‍यात आलेली नाही. तक्रारदार हे ठेवीदार असल्‍यामुळे जमा ठेव रक्‍कम व्‍याजासह परत करणे, ही विरुध्‍द पक्ष यांची करारात्‍मक जबाबदारी व कर्तव्‍य आहे. असे असताना, तक्रारदार यांना विरुध्‍द पक्ष यांनी ठेव रक्‍कम परत न करुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. सबब, तक्रारदार हे तक्रारीमध्‍ये नमूद केलेली ठेव रक्‍कम व्‍याजासह परत मिळविण्‍यास पात्र आहेत, या निष्‍कर्षाप्रत आम्‍ही आलो आहोत.

 

7.    निर्विवादपणे, विरुध्‍द पक्ष क्र.1 सहकारी महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी नागरी ग्रामीण सहकारी पतसंस्‍था मर्यादीत, बारलोणी ही पतसंस्‍था सहकार कायद्याखाली नोंदणी होऊन तिचे स्‍वत:चे कायदेशीर अस्तित्‍व निर्माण झालेले आहे. त्‍यामुळे पतसंस्‍थेकडे ‘कायदेशीर व्‍यक्‍ती’ म्‍हणून पाहता येईल. तसेच तक्रारदार यांनी प्रस्‍तुत पतसंस्‍थेचे चेअरमन व संचालक मंडळ यांना ‘विरुध्‍द पक्षकार’ म्‍हणून तक्रारीमध्‍ये समाविष्‍ठ केले आहे. विरुध्‍द पक्ष क्र.1 यांचे चेअरमन व संचालक मंडळाने तक्रारदार यांची ठेव रक्‍कम परत का केली नाही ? याचा खुलासा करण्‍याचा कोणताही प्रयत्‍न केलेला नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेच्‍या संचालक मंडळाने आपली जबाबदारी पूर्ण केलेली नाही, असे अनुमान काढण्‍यास आम्‍हाला कोणतीही हरकत नाही. विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍था तक्रारदार यांची ठेव रक्‍कम परत करण्‍यास सर्वस्‍वी जबाबदारी असली तरी मा. बॉम्‍बे उच्‍च न्‍यायालयाने रीट पिटीशन नं. 117/2011 मंदाताई संभाजी पवार /विरुध्‍द/ स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र या निर्णयामध्‍ये नमूद केलेल्‍या lifting the corporate veil संकल्‍पनेचा विचार करता, आम्‍ही उपरोक्‍त नमूद केल्‍याप्रमाणे व संचालक नात्‍याने ठेव रक्‍कम परत करण्‍याबाबत जबाबदारी स्‍पष्‍ट न केल्‍यामुळे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादीत, बारलोणी या पतसंस्‍थेसह संचालक मंडळ यांना व्‍यक्तिश: जबाबदार ठरवत आहोत.   

 

8.    आम्‍ही मा. राष्‍ट्रीय आयोगाने अशिष रमेशचंद्र बिर्ला व इतर /विरुध्‍द/ मुरलीधर राजधर पाटील व इतर, 2009 सी.टी.जे. 20 (सी.पी.)(एनसीडीआरसी) या निवाडयाचा संदर्भ आम्‍ही घेत असून त्‍यामध्‍ये मा. आयोगाने खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदविलेले आहे.

 

      We are also aware that a large number of Cooperative Societies have been superseded because of the mismanagement and misappropriation of funds by the Chairman and the Directors of the Society. They even run the Society as if it is their personal fiefdom. We would like to remove the Corporate/Cooperative veil and hold that Directors are responsible for the deficiency in service by the Society.

 

9.    अंतिमत: विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेसह विरुध्‍द पक्ष क्र.2 ते 12 हे संचालक मंडळ तक्रारदार यांची ठेव रक्‍कम परत करण्‍यास जबाबदार ठरते आणि त्‍यांचे कृत्‍य सेवेतील त्रुटी असल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारदार हे ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळविण्‍यास पात्र आहेत. तक्रारदार यांनी द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याज दराने ठेव रकमेची मागणी केलेली आहे. वास्‍तविक पाहता, सध्‍या वित्‍तीय संस्‍था ठेवीदारांच्‍या ठेवीवर देत असलेला व्‍याज दर पाहता मुदतीनंतर देय ठेव रकमेवर तक्रारदार हे द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याज दर मिळविणस पात्र आहेत. वरील विवेचनावरुन आम्‍ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले असून शेवटी खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

1. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना तक्रारीमध्‍ये नमूद दामदुप्‍पट ठेव पावती क्र.007242 प्रमाणे देय रक्‍कम रु.12,000/- द्यावी. प्रस्‍तुत रकमेवर दि.4/11/2011 पासून संपूर्ण रक्‍कम परतफेड होईपर्यंत द.सा. द.शे. 12 टक्‍के प्रमाणे व्‍याज द्यावे.

2. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 12 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.2,000/- द्यावेत. 

ग्राहक तक्रार क्र.80/2014 आदेश पुढे चालू....

 

3. उपरोक्‍त आदेशांची अंमलबजावणी विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 12 यांनी आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत करावी आणि अंमलबजावणी अहवाल 45 दिवसाचे आत मंचाकडे सादर करावा.  

4. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्‍क पुरविण्‍यात यावी.

 

 

                                                                               

(श्री. ओंकारसिंह जी. पाटील)                         (सौ. विद्युलता जे. दलभंजन)  

       सदस्‍य                                          प्रभारी अध्‍यक्ष

       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                           -00-

 (संविक/स्‍व/1814)

 

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. V.J. Dalbhanjan]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MR. Onkarsing G. Patil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.