SAHKAR AWAS INDIA LIMITED V/S SAU. CHANDRAKALA DEVRAO PIMPALAPURE
SAU. CHANDRAKALA DEVRAO PIMPALAPURE filed a consumer case on 07 Feb 2015 against SAHKAR AWAS INDIA LIMITED in the Wardha Consumer Court. The case no is CC/90/2012 and the judgment uploaded on 13 Apr 2015.
(मा. प्रभारी अध्यक्ष, श्री मिलींद आर.केदार यांच्या आदेशान्वये).)
तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द दाखल केली असून, तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे आहे.
तक्रारकर्त्या हया वर्धा येथील रहिवासी असून वि.प. हे लोकांकडून ठेवी स्विकारणाचे व कर्ज वितरण करण्याचे काम करतात असे तक्रारीत नमूद केले आहे. त.क.यांनी वि.प.यांच्याकडे रक्कम गुंतविली. सदर रक्कम दैनदिन बचत खात्यात जमा करीत होते. त.क. यानी वि.प.यांच्याकडे जमा केलेल्या रक्कमेची मागणी केली असता सदर रक्कम देण्यास वि.प. टाळाटाळ करीत होते. याकरिता त.क. यांना वि.प. यांच्या कार्यालयात वारंवांर जावे लागले. वि.प. कडे वारंवांर रक्कमेची मागणी केल्यानंतर त्यांनी तक्रारकर्ती क्रं.1 हिला तिच्या जमा रक्कमेची परतफेडी करिता
1. बँक ऑफ बडोदा,नागपूर धनादेश क्रं.024427, रु. 10,808/-
2 दि कॉसमॉस को.ऑ.बँक.लि.नागपूर. धनोदश क्रं.198654,
दिनांक24.01.2009, रुपये 10,000/- असे एकूण रुपये 31,743/-
चा धनादेश त.क. 1 ला दिले. त.क. क्रं. 2 हिला सुध्दा तिच्या रक्कमेच्या परतफेडीकरिता निर्मल अर्बन कॉ-ऑप. बँक नागपूरचे धनादेश क्रं. 252024, दिनांक 25.05.2009, रुपये10,000/-चा धनादेश देण्यात आला. सदर धनादेश त.क. क्रं. 1 व 2 यांनी वटविण्याकरिता टाकले असता सदरचे धनादेश वि.प. यांच्या खात्यात निधी नाही या शे-याखाली अनादरीत झाले, म्हणून वि.प. 1 ते 3 यांना दिनांक 14.02.2009 रोजी सदर बाब रजिस्टर पोस्टाने पत्र पाठवून कळविली. तेव्हा वि.प. यांनी सदर रक्कम ही परत 1 वर्षाकरिता फिक्स डिपॉझिटमध्ये जमा केल्याचे कळविले व संपूर्ण रक्कम 1 वर्षानंतर त.क.ला परत करण्यात येईल असे कळविले. त.क.यांना सदर जमा रक्कम व त्यावरील व्याज न मिळाल्यामुळे दि.18.08.2011 रोजी वि.प. यांना नोटीस पाठवून सदरची संपूर्ण रक्कम 7 दिवसाचे आंत व्याजासह परत करावी अशी मागणी केली. सदर नोटीस मिळूनही वि.प.यांनी ती स्विकारली नाही.
त.क.यांनी वि.प.यांच्याकडे जमा असलेल्या रक्कमेची मागणी केली असता वि.प. 3 यांनी त.क. यांना रक्कम जमा केल्याबाबतचे संपूर्ण दस्ताऐवज जमा करण्याकरिता सांगितले होते. त्यानुसार संपूर्ण दस्ताऐवज वि.प. यांच्याकडे जमा केले. त्यानंतर त्यांनी त.क. यांना धनादेश दिले होते. परंतु सदर धनादेश हे अनादरीत झाल्यानंतर व वि.प. यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून अद्यापपावेतो त.क.यांना वि.प.यांनी रक्कम दिली नाही व त्यावरील व्याजही दिले नाही. त्यामुळे त.क. यांनी सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली असून वि.प.कडे जमा केलेली रक्कम व्याजासह मिळावी, शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल प्रत्येकी 20,000/-रुपये नुकसान भरपाई मिळावी. तसेच वि.प. 1 ते 3 यांनी दोषपूर्ण सेवा दिली याकरिता सदर तक्रार दाखल केली आहे.
सदर तक्रारीची नोटीस वि.प. यांना मंचामार्फत बजाविण्यात आली. मंचाची नोटीस असल्याची माहिती देऊन ही वि.प. 1 यांनी ती स्विकारली नाही असा पोस्टाच्या शे-यासह परत आली.तसेच वि.प. 2 यांनी सुध्दा सदर नोटीस घेण्यास नकार दिला या शे-यासह नोटीस परत आली. वि.प. 3 यांना सुध्दा माहिती दिल्यानंतर त्यांनी सुध्दा सदर नोटीस घेतली नसल्याच्या शे-यासह परत आली. त्यामुळे मंचाने दि. 17.04.2013 व 21.11.2013 रोजी वि.प. विरुध्द एकतर्फा प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारित केला.
तक्रारकर्त्या यांनी दाखल केलेले दस्ताऐवज , त.क.चे कथन, युक्तिवाद याचा मंचाने अवलोकन केले असता, खालील बाबी विचारार्थ उपस्थित झाल्या.
कारणे व निष्कर्ष
त.क.यांनी वि.प. यांच्याकडे रक्कम गुंतविली होती असे त.क.ने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. परंतु त.क.ने वि.प. यांच्याकडे रक्कम गुंतविल्याचा स्पष्ट प्राथमिक कोणताही पुरावा उपलब्ध नसल्यामुळे त.क.ने आपले कथन सिध्द करण्याकरिता नि.क्रं. 4(1) वर वि.प. यांना पाठविलेल्या नोटीसची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. त्यामध्ये त.क.यांनी वि.प. यांच्याकडे रक्कमेची मागणी केली होती हे स्पष्ट होते व वि.प. यांनी त.क. क्रं. 1 यांना धनादेश क्रं. 024427,198654, 198653, तसेच धनादेश क्र. 252024 हा त.क. क्रं. 2 ला दिले होते हे स्पष्ट होते. सदर नोटीस वि.प. यांना पाठविली याबाबत पोष्टाच्या पावत्या त.क. यांनी नि.क्रं. 4(2) वर दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. नि.क्रं. 4(3) वरील दस्ताऐवजावरुन सदर नोटीस वि.प. यांनी स्विकारली नाही ही बाब स्पष्ट होते.
वि.प. यांनी त.क. यांना धनादेश दिला होता ही बाब नि.क्रं. 4(7), नि.क्रं. 4(8), 4(9) व 4(10) वरुन स्पष्ट होते. तसेच धनादेश हे खात्यात पर्याप्त रक्कम नसल्यामुळे वटविल्या गेला नाही हे सुध्दा त.क.ने दाखल केलेल्या दस्ताऐवज पान क्रं.21, पान क्रं.22, पान क्रं. 24, पान क्रं. 25, 26, 27 व 28 वरुन स्पष्ट होते. जर वि.प. यांच्याकडे त.क. यांनी रक्कम गुंतविली नसती तर वि.प. यांनी धनादेश दिला नसता, परंतु वि.प. यांनी धनादेश दिला होता व पर्याप्त रक्कम नसल्यामुळे धनादेश अनादरीत झाले. यावरुन त.क. यांनी वि.प.कडे रक्कम गुंतविली होती असा निष्कर्ष घेता येतो. तसेच सदर धनादेश अनादरीत झाल्याने त.क. यांनी वि.प.यांना नोटीस द्वारे सूचित केले ही बाब सुध्दा नोटीसवरुन स्पष्ट होते. त.क.ने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्ताऐवज क्रं. 4(4) पान क्रं. 30 वरुन ही बाब स्पष्ट होते.
त.क. यांनी सदर प्रकरणाची नोटीस वि.प. यांना पाठविली असता ती स्विकारली नाही व सदर प्रकरणात मंचामार्फत पाठविलेली नोटीस सुध्दा वि.प. यांना सूचना देऊन ही त्यांनी घेण्यास नकार दिल्याच्या पोस्टाच्या शे-या वरुन स्पष्ट होते. वि.प. नोटीस स्विकारण्यास टाळाटाळ करीत असून आपले म्हणणे मांडत नाही, त्यामुळे त.क.यांनी वि.प. यांच्याकडे रक्कम गुंतविली होती ही बाब स्पष्ट होत असल्यामुळे त.क. 1 व 2 हे वि.प. यांचे ग्राहक ठरतात.
त.क. यांनी वारंवारं विनंती करुन ही वि.प. यांनी सदर रक्कम देण्यास टाळाटाळ केली ही वि.प. यांची दोषपूर्ण सेवा असल्यामुळे मंचाचे मत आहे की, वि.प.1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या त.क. यांनी वि.प. 1 ते 3 यांच्याकडे गुंतविलेली रक्कम त.क. क्रं. 1 रुपये 31,743/- व त.क. क्रं. 2 चे रुपये 10,000/- ही रक्कम आदेश प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत त.क. 1 व 2 यांना अदा करावी. अन्यथा या रक्कमेवर द.सा.द.श्े. 6 टक्के दराने व्याजसह रक्कम प्रत्यक्ष रक्कम त.क. यांना प्राप्त होईपर्यंत अदा करण्यास देय राहील. तसेच त.क. यांनी शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी 20,000/-रुपयाची मागणी केली ती अवाजवी असल्यामुळे त.क. ही प्रत्येकी 2000/-रुपये याप्रमाणे एकूण 4000/-रुपये मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. तसेच वि.प.1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या त.क. यांना तक्रारीचा खर्च म्हणून 2000/-रुपये द्यावे असे मंचाचे मत आहे.
सदर प्रकरणातील तक्रार ही प्रतिज्ञालेखावर असल्यामुळे व तक्रारकर्ती यांनी दाखल केलेले दस्ताऐवज व तक्रारीत नमूद केलेले कथन हे ग्राहय धरण्यात येते.
वरील निष्कर्षाच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
1) तक्रारकर्तींची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते .
2) विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्ती क्रं. 1 ला 31,743/-रुपये व तक्रारकर्ती क्रं. 2 ला 10,000/-रुपये आदेश प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत द्यावे.
3) विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल प्रत्येकी रुपये 2,000/- याप्रमाणे एकूण 4000/- रुपये द्यावे व तक्रारीचा खर्च म्हणून रु.2000/- द्यावे.
4) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात.
निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.