निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 02/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 02/12/2011
तक्रार निकाल दिनांकः- 17/12/2013
कालावधी 02 वर्ष. 15 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
गजानन भिवाजी वाघमारे. अर्जदार
वय 65 वर्षे,धंदा. मजुरी. अॅड.जितेंद्र एन.घुगे.
रा.धर्मापुरी ता.जि.परभणी.
विरुध्द
सहाय्यक अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विज वितरण कं.लि. अॅड.एस.एस.देशपांडे.
(महावितरण परभणी ) ग्रामीण उपविभाग,
विद्युत भवन,जिंतूर रोड, परभणी.ता.जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास चुकीचे लाईट बिले देऊन सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा गैरअर्जदार विद्युत कंपनीकडून ग्राहक क्र. 534270407476 व मिटर क्रं 7600599730 अन्वये विद्युत पुरवठा घेवून गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत.
अर्जदाराचे म्हणणे आहे की, अर्जदारास गैरअर्जदार गेल्या दोन वर्षापासुन चुकीचे व अवाजवी लाईट बिले देत आहेत. अर्जदारास प्रतीवादीकडुन Oct.11, Sept.11, July 11, June.11, May.11, Apr.11, March. 11, Feb.11, Jan.11, Dec.10, Nov.10, Oct. 10, आदी महीन्या मध्ये अनुक्रमे 35 Unit, 61 Unit, 34Unit, 33 Unit, 38 Unit, 43 Unit, 40 Unit, 44 Unit, 39 Unit, 48 Unit, 41 Unit, 44 Unit, 38 Unit चे विद्युत बिले आलेली आहेत. सदरची बिले ही अवाजवी व चुकीच्या पध्दतीने आलेली आहेत. अर्जदार हा वयोवध्द असुन घरात केवळ एकच झिरोच्या बल्बचा वापर आहे. त्यामुळे केवळ 5 युनिटचे बिल येणे अपेक्षित होते. त्याबद्दल अर्जदाराने वेळोवळी गैरअर्जदाराकडे लेखी तक्रार दाखल केली ,परंतु त्याचा काहीही एक उपयोग झाला नाही, म्हणुन सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व अर्जदाराने मंचात विनंती केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले ऑक्टो. 2010 पासून ते ऑक्टोबर 2011 पर्यन्तचे विद्युत देयके रद्द करण्यात यावेत व तसेच मानसीक त्रासापोटी 90,000/- व दाव्याच्या खर्चापोटी 10,000 असे एकूण 1 लाख रुपये गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि. क्र. 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने नि.क्र. 8 वर 3 कागदपत्राच्या यादीसह तिन कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये सप्टे 11चे लाईट बिल, ऑक्टो 2011 चे लाईट बिल, अर्जदाराने गैरअर्जदारास दि. 18.11.2011 रोजी विद्युत देयके दुरुस्त करुन देणे बाबत केलेला अर्ज प्रतच्या कागदपत्रे दाखल केले आहेत.
मंचातर्फे तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आल्या.
गैरअर्जदार वकीला मार्फत मंचासमोर हजर गैरअर्जदारास लेखी निवेदन सादर करण्यासाठी अनेक संधी देवुनही गैरअर्जदाराने मुदतीत लेखी जबाब सादर न केलेमुळे त्यांचे विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदाराच्या तक्रारी वरुन व दाखल केलेल्या कागदपत्रावरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने माहे ऑक्टोबर 2010 पासून ते
ऑक्टोबर 2011 पर्यंतची दिलेली वादग्रस्त बिले
चुकीची देवुन अर्जदारास अनुचित व्यापारी प्रथेचा
अवलंब करुन सेवात्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घरगुती वापराचे ग्राहक क्रमांक 534270407476 अन्वये विद्युत पुरवठा घेतले आहे, ही अॅडमिटेड फॅक्ट आहे. अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने अर्जदारास ऑक्टोबर 2010 ते ऑक्टोबर 2011 पर्यंतचे चुकीचे व अवाजवी दिले, याबाबत अर्जदाराने पुरावा म्हणून फक्त नि.क्रमांक 8/1 वर सप्टेंबर 2011 चे 6160/- रु. चे बिल, नि.क्रमांक 8/2 वर, ऑक्टोबर 2011 चे 6400/- रु.चे बिल दाखल केले आहे व अर्जदाराने इतर दुसरा कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केला नाही.
सदर नि.क्रमांक 8/1 वरील व 8/2 वरील लाईट बिलाचे अवलोकन केले असता सप्टेंबर 2011 ला 61 युनिटचे बिल ऑक्टोबर 2011 ला 35 युनिटचे बिल दिसून येते व अर्जदाराने मागील लाईट बिला पोटी 20/01/2010 रोजी गैरअर्जदाराकडे रक्कम भरल्याचे आढळून येते. अर्जदाराचे म्हणणे की, त्याने तो नियमित विज बिल भरणा करतो हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराने या बाबत कोणताही पुरावा मागील बिले भरल्याबाबत अर्जदाराने मंचासमोर आणले नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, ऑक्टोबर 2010 ते ऑक्टोबर 2011 पर्यंतचे लाईट बिले चुकीची आहेत हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. कारण अर्जदाराने पुरावा म्हणून केवळ सप्टेंबर 2011 चे लाईट बिल व ऑक्टोबर 2011 चे लाईट बिल मंचासमोर आणले आहे. दुसरा कोणताही सबळ व ठोस पुरावा मंचासमोर आणली नाहीत, म्हणून सदरची लाईट बिले योग्यच आहेत, असे मंचास वाटते. व सर्वात महत्वाची बाब म्हणजे अर्जदाराच्या संपूर्ण तक्रारीचे अवलोकन केले असता अर्जदाराने विनंती सदरा मध्ये केवळ ऑक्टोबर 2010 ते ऑक्टोबर 2011 चे विद्युत देयके फक्त रद्द करण्यात यावीत. असे म्हंटले आहे. जे की, नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरोधात आहे. कारण लाईट बिले फक्त रद्द करा म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याचे कोठेही निष्पन्न होत नाही.
अर्जदार आपली तक्रार सिध्द करण्यात पूर्णपणे असमर्थ ठरला आहे, मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.