Maharashtra

Chandrapur

CC/21/108

Madhukar Laxman Kodape - Complainant(s)

Versus

Sahayak Up Abhiyanta, Maharashtra Rajya Vidyut Vitaran Company Bangali Camp Branch - Opp.Party(s)

Self

11 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/21/108
( Date of Filing : 22 Jul 2021 )
 
1. Madhukar Laxman Kodape
C/o Sudhanshu Radhagovind Sharya Sahkar nagar Water Tank Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sahayak Up Abhiyanta, Maharashtra Rajya Vidyut Vitaran Company Bangali Camp Branch
Bangali camp,Chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 11 Jan 2023
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

(आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्‍पना जांगडे (कुटे), मा. सदस्‍या,)

                    (पारीत दिनांक ११/०१/२०२३)

 

                       

  1. प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे  कलम ३५ अन्‍वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालिलप्रमाणे. 
  2. तक्रारकर्ता हे नेरी, तालुका चिमूर, जिल्‍हा चंद्रपूर येथील रहिवासी असून सध्‍या ते श्री सुधाकर आर. शर्मा, सहकार नगर, चंद्रपूर यांचे घरी भाड्याने राहत आहे. त्‍यांचे घरी ०५३७४६५१४३१ क्रमांकाचे वीज मीटर आहे. तक्रारकर्त्‍यास एप्रिल, मे आणि जुन २०२१ चे वीज देयकापैकी एप्रिल २०२१ चे वीज देयकामध्‍ये २३१ युनीट जोडून आले आहे. मे २०२१ चे देयकामध्‍ये  चालू रिडिंग उपलब्‍ध नाही आणि जुन २०२१ च्‍या वीज देयकामध्‍ये चालू रिडिंग ७५२३, एकूण वापर १०४७ दाखविलेले आहे. विरुध्‍द पक्षाने माहे एप्रिल २०२१ मध्‍ये ज्‍या पध्‍दतीने मागील रिडिंगमध्‍ये एकूण वापर जोडून  चालू रिडिंग दाखविले त्‍या पध्‍दतीने न घेता मे महिण्‍याचे वीज देयकामध्‍ये चालू रिडिंग उपलब्‍ध नाही असे दाखविले. २९० युनिट जोडल्‍यामुळे युनिटचे स्‍लॅबमध्‍ये बदल होऊन जास्‍तीचे युनिट वाढले व युनिट वाढल्‍याने वीज देयकाची रक्‍कम वाढली. विरुध्‍द पक्ष यांनी माहे जुन २०२१ चे वीज देयकात २९० युनिट वजा करुन ७५७ युनिट चे वीज देयक द्यावयास पाहिजे होते परंतु तसे न करता अवाजवी वीज देयक देऊन तक्रारकर्त्‍याकडून जास्‍तीची रक्‍कम वसूल करत आहेत. युनिट दाखविणे अनिवार्य असतांना युनिट न दाखविता जास्‍तीचे वीज देयक तक्रारकर्त्‍यास दिले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेकडे दिनांक १५/७/२०२१ रोजी लेखी व दिनांक १६/७/२०२१ रोजी विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात प्रत्‍यक्ष भेटून तोंडी तक्रार दिली परंतु विरुध्‍द पक्षाने कोणतीही कार्यवाही केली नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास माहे जून २०२१ च्‍या वीज देयकामधून २९० युनिट वजा करुन द्यावे अशी प्रार्थना केली आहे.
  3. तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्ष यांना नोटीस काढण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष यांना नोटीस तामील झाल्‍यावर ते आयोगासमक्ष हजर होऊन त्‍यांनी आपले लेखी उत्‍तर दाखल करुन त्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील कथन अमान्‍य करुन पुढे आपले विशेष कथनामध्‍ये नमूद केले की, वादग्रस्‍त वीज पुरवठा क्रमांक ४५००१०३०८३५१ हा एस. आर. शर्मा यांचे नावाने आहे व ते विद्युत पुरवठाधारक असल्‍याने फक्‍त त्‍यांनाच वादग्रस्‍त वीज पुरवठा संबंधी तक्रार दाखल करण्‍याचा अधिकार आहे. तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांच्‍यामध्‍ये विद्युत पुरवण्‍यासंबंधी कोणताही करार झालेला नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास वादग्रस्‍त वीज पुरवठ्याबाबत तक्रार दाखल करण्‍याचा अधिकार नाही. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार खर्चासहीत खारीज होण्‍यास पाञ आहे. दिनांक २४/३/२०२० मध्‍ये काविड-१९ च्‍या प्रादुर्भावामुळे व २०२१ मध्‍ये कोविड-१९ ची दुसरी लाट आल्‍यामुळे केंद्र सरकारने संचारबंदी लागू केली व त्‍या परिस्थितीत विद्युत मिटरचे रिडिंग घेणे शक्‍य झाले नाही त्‍यामुळे माहे २०२१ चे वीज देयक हे सरासरीचे देण्‍यात आले. त्‍यानंतर २०२१ चे वीज देयक हे दोन महिण्‍यांकरिता देण्‍यात आले. विरुध्‍द पक्ष यांनी वीज वापरानुसारच वादग्रस्‍त वीज पुरवठ्याची वीज आकारणी केलेली असून कोणतीही अतिरिक्‍त आकारणी केलेली नाही तसेच माहे जून २०२१ नंतरचे सुध्‍दा बरोबर वीज देयक देण्‍यात आले व सर्व नोंदी सीपीएल मध्‍ये आहेत. विरुध्‍द पक्ष यांनी वादग्रस्‍त विद्युत पुरवठाबाबत योग्‍य ती सेवा दिलेली असून कोणत्‍याही अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केलेला नाही तसेच तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष यांचा ग्राहक नाही. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार खर्चासह खारीज होण्‍यास पाञ आहे.
  4. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार, दस्‍तावेज, शपथपञ, लेखी युक्तिवाद आणि विरुध्‍द पक्ष यांचे लेखी उत्‍तर, शपथपञ, लेखी युक्तिवाद तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद आणि परस्‍पर विरोधी कथनावरुन खालिल मुद्दे आयोगाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले व त्‍याबाबतची कारणमीमांसा आणि निष्‍कर्ष पुढीलप्रमाणे.

 

कारणमीमांसा

 

  1. प्रकरणात दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, विरुध्‍द पक्ष यांनी श्री एस.आर. शर्मा यांच्‍या नावाने दिनांक १०/०२/१९९५ रोजी वीज पुरवठा दिला असून त्‍याचा वीज मीटर क्रमांक ०५३७४६५१४३१ हा आहे, याबाबत उभयपक्षात वाद नाही. तक्रारकर्त्‍याचे कथनानुसार तक्रारकर्ता हा श्री सुधाकर आर. शर्मा यांचे घरी भाड्याने राहतो व उपरोक्‍त वीज मीटरवरुन वीज वापर करतो परंतु विरुध्‍द पक्ष यांनी  जुन २०२१ चे वीज देयकामध्‍ये २९० युनिट जोडून जास्‍तीचे वीज देयक दिले, याबाबत तक्रारकर्त्‍यास आक्षेप आहे परंतु तक्रारकर्ता हा श्री एस.आर.शर्मा यांचे घरी भाड्याने राहतो वा त्‍यांच्‍या संमतीने वर नमूद वीज मीटरवरुन वीजेचा वापर करतो, ही बाब  तक्रारकर्त्‍याने कोणताही करारनामा, दस्‍तावेज वा पुरावा दाखल करुन सिध्‍द केलेली नाही. विरुध्‍द  पक्ष यांनी श्री एस.आर.शर्मा यांना वादग्रस्‍त वीज पुरवठा दिला आहे व ते विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक आहेत. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास वादग्रस्त वीज पुरवठा दिलेला नाही तसेच कोणतीही सेवा दिली नाही आणि तक्रारकर्ता हा लाभार्थी म्‍हणून श्री शर्मा यांचे संमतीने सुध्‍दा वीज वापर करत नसल्‍याने तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम २(७) अंतर्गत विरुध्‍द पक्षाचा ग्राहक नाही. तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांचा कोणताही संबंध नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास विरुध्‍द पक्ष यांचे विरुध्‍द   आयोगासमक्ष प्रस्‍तुत तक्रार दाखल करण्‍याचा अधिकार नाही, या निष्‍कर्षाप्रत आयोग आलेले आहे. सबब आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.  

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. १०८/२०२१ खारीज करण्‍यात येते.
  2. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.
  3. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.