जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक –160/2011 तक्रार दाखल तारीख –02/11/2011
पठाण अजमतुल्ला पि. अब्दुल्लाखान
वय, 40 वर्षे, धंदा नौकरी .तक्रारदार
रा. 8/3 विसावा बिल्डींग समोर, फॉलोअर्स लाईन,
अंबाजोगाई ता.अंबाजोगाई जि.बीड
विरुध्द
1. सहायक निदेशक,
डाकसेवा विभाग, औरंगाबाद. .
2. वरिष्ठ अधिक्षक,
मुख्य, डाकघर, जालना.
3. पोस्टमन बीट क्र.10,
हेड पोस्ट ऑफिस, ता.जि. जालना व इतर ..सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- स्वतः
सामनेवाले क्र.1 तर्फे :- स्वतः
सामनेवाले क्र.2 तर्फे ः- कोणीही हजर नाही.
सामनेवाले क्र.3 तर्फे ः-कोणीही हजर नाही.
निकालपत्र
तक्रारदारांनी टपाल खात्याच्या विरुध्द औरंगाबाद जालना येथील कार्यालयाचे विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे. सदर तक्रारीत दि.02.11.2011 रोजी अधिकार क्षेत्राचा प्राथमिक मुददया बाबत यूक्तीवादासाठी दि.29.11.2011 रोजी नेमण्यात आली. त्यानंतर दि.30.11.2011, 14.12.2011, 05.01.2012, 12.01.2012 या दिनांकाना तक्रारदार गैरहजर.
तक्रारदाराच्या तक्रारीचे काळजीपूर्वक वाचन केले असता तक्रारदारांनी अंबाजोगाई येथून जालना येथे पाठविलेले पार्सल परत आल्याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब तक्रारदाराच्या तक्रारीत आहे. ज्या कार्यालयामार्फत सेवेत कसूर झाला त्या कार्यालयाला पार्टी केलेले आहे परंतु सदरची कार्यालय ही जिल्हा मंचाचे अधिकार कक्षात नसल्याने सदरची तक्रार या जिल्हा मंचात चालू शकत नाही असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची अधिकारक्षेत्रात येत नसल्यामुळे बंद करण्यात येते.
2. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड.