जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नंदेड प्रकरण क्र.131/2008. प्रकरण दाखल दिनांक – 02/04/2008. प्रकरण निकाल दिनांक – 25/06/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे अध्यक्ष मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा.श्री.सतीश सामते सदस्य. श्री.गुणवंत पि.बळीराम उमाटे, अर्जदार. वय वर्षे 55, व्यवसाय शेती, रा.मांजरी,ता.मुखेड जि.नांदेड. विरुध्द. 1. सहायक अभियंता, गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, मुखेड जि.नांदेड. 2. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, विभाग देगलुर ता.देगलुर जि.नांदेड. 3. अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, मंडळ कार्यालय नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.रघुविर कुलकर्णी. गैरअर्जदार क्र.1 ते 3 तर्फे - अड.व्हि.व्हि.नांदेडकर. निकालपत्र (द्वारा,मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार श्री. गुणवंत पि.बळीराम उमाटे यांची थोडक्यात तक्रार अशी की, त्यांची मालकी शेत जमीन गट क्र. 148 क्षेत्रफळ 0.93 आर मध्ये सन 2007-08 या वर्षात ऊसाचे पिक घेतले. त्यांनी पंपासाठी गैरअर्जदार क्र. 1 कडुन विज पुरवठा घेतला आहे आणि त्यांचे ग्राहक झाले. अर्जदाराच्या शेतात गैरअर्जदाराचे रोहीत्र व डि.पी.आहे. दि.04/01/2008 रोजी दुपारी 12.00 वाजता डि.पी.मधील किटकॅटमधुन फुलंगी उडुन ऊसाला आग लागुन ऊस जळाला. सदरील घटना घडण्यापुर्वी अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांना रोहीत्रामध्ये स्पार्किंग होत असल्याची माहीती दिली होती. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. गैरअर्जदारांचे डि.पी. व खांब, वायर तांत्रिकदृष्टया चांगले आहे किंवा नाही हे पाहण्याची त्यांची जाबाबदारी आहे. सदरील ऊसापासुन अर्जदारास 100 टन उत्पन्न अपेक्षीत होते. सन 2007-08 या गळीत हंगामात ऊसाचा दर प्रती टन रु.700/- ते 750/- एवढा होता. सदरील ऊस लागवडीसाठी अर्जदारांना रु.20,000/- एवढा खर्च लागला. सदरील ऊसापासुन अर्जदारास रु.70,000/- एवढया उत्पन्न अपेक्षित होते. उस जळाल्यामुळे त्यांचे रु.90,000/- चे नुकसान झाले. सदरील घटनेचे दि.05/01/2008 रोजी अर्जदाराने तहसिलदार मुखेड यांचेकडे अर्ज देऊन पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची विनंती केली होती. सदरील जळालेल्या ऊसाचा पंचनामा गैरअर्जदार क्र. 1 व 2 तसेच महसुल खात्याने केलेला आहे. अर्जदाराच्या शेतातील ऊस गैरअर्जदारांच्या निष्काळजीपणामुळे जळाला अशाप्रकारे गैरअर्जदाराने सदोष सेवा दिली म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, नुकसान भरपाई म्हणुन रु.70,000/- ऊस लागवडीचा खर्च रु.20,000/- मानसिक व शारीरिक त्रासाबद्यल रु.8,000/- आणि दावा खर्चाबद्यल रु.2,000/- गैरअर्जदार यांच्याकडुन मिळावेत. यात गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली. त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की,अर्जदाराने सदरील तक्रार कायदेशिर दाखल केलेली नाही. सदरील अर्जाद्वारे अर्जदारास कोणतीही मागणी मागण्याचा अधिकार नाही. गैरअर्जदारांनी कोणतीही सेवेत कमतरता दिलेली नाही. अर्जदाराचा तक्रारअर्ज हा काल्पनिक मुद्यांवर अवास्तव रक्कमेची खोटी मागणी केलेली आहे. विज वितरण कंपनीच्या विजेचे वाहीन्यांची मांडणी टेलिग्राफ अक्ट 1885 अन्वये केलेले असते त्यामुळे अशा स्वरुपाची तक्रार अर्जदारास करता येत नाही. सन 2007-08 मध्ये अर्जदाराने त्यांचे शेतात ऊसाचे पिक घेतले हे गैरअर्जदारास मान्य नाही. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक नाहीत. अर्जदाराचे शेतातील ऊस डी.पी.मधुन फुलंगी पडुन ऊस जाळाल्याची बाब गैरअर्जदार नाकारतात. अर्जदाराने डि.पी.मध्ये स्पार्कींग होत असल्याची माहीती दिली हे अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे. अर्जदारास सदरील ऊसापासुन 100 टन ऊसाचे उत्पनन अपेक्षित होते हे चुकीचे व खोटे आहे. ऊसाच्या लागवडीसाठी रु.20,000/- आणि रु.70,000/- आणि ऊस जळाल्यामुळे रु.90,000/- नुकसान झाले हे सर्वस्वी खोटे व चुकीचे आहे ते त्यांना मान्य नाही. दि.05/01/2008 रोजी अर्जदाराने तहसिलदार मुखेड यांच्याकडे अर्ज देऊन पंचनामा केला व नुकसान भरपाईची मागणी केली आणि गैरअर्जदारांचे कनिष्ठ अभियंता तसेच महसुल खात्याने पंचनामा केला हे म्हणणे चुकीचे आहे. सदरील प्रकरणांत गैरअर्जदारांचा कोणताही दोष नसल्यामुळे अर्जदार कोणत्याही प्रकारची मावेजाची रक्कम मिळण्यास पात्र नाहीत. अर्जदाराच्या शेतातील ऊस गैरअर्जदार यांच्या निष्काळजीपणामुळे जळाला हे अर्जदाराचे म्हणणे सर्वस्वी खोटे आहे. गैरअर्जदार यांचेकडुन मावेजा मागण्यासाठी अर्जदाराने खोटे प्रकरण दाखल केले आहे. साखर कारखान्यांनी न नेलेल्या ऊसाला स्वतःच्या हाताने जाळुन टाकुन खोटी बनावट तक्रार तयार केलेले आहे ते गैरअर्जदारांना मान्य नाही. गैरअर्जदारांनी कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी केलेली नाही त्यामुळे अर्जदाराचा तक्रारअर्ज खर्चासह खारीज करावा असा उजर घेतला. अर्जदार यांनी आपल्या तक्रारीसोबत यादीप्रमाणे दस्तऐवज आणि शपथपत्र दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबासोबत कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाही त्यांनी शपथपत्र दाखल केलेले आहे. अर्जदारा तर्फे वकील श्री.रघुविर कुलकर्णी आणि गैरअर्जदार यांच्या तर्फे वकील श्री.व्हि.व्हि.नांदेडकर यांनी युक्तीवाद केला. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय? होय. 2. गैरअर्जदारांनी अर्जदाराला सेवा देण्यातमध्ये कमतरता केलेली आहे काय? नाही. 3. काय आदेश? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 - अर्जदार यांनी अर्जासोबत दि.19/06/2008 रोजीचे विद्युत पुरवठा कोटेशन व पैसे भरल्याची पावती दाखल केलेली आहे. सदरील कागदपत्रांचा विचार करता अर्जदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 - अर्जदार यांनी अर्जासोबत 7/12 चा उतारा दाखल केलेला आहे, त्यामध्ये उस पिकाची नोंद आहे. अर्जदारांनी अर्जासोबत दि.05/01/2008 रोजीचा घटनास्थ पंचनामा दाखल केलेला आहे, त्याचे अवलोकन केले असता सदरचा पंचनामा हा कनिष्ठ अभियंता श्री.काजळेकर आर.व्ही. यांच्या विनंतीनुसार केल्याचे दिसुन येत आहे. त्यानंतर अर्जदारांनी दि.05/01/2008 रोजीचा पंचनामा दाखल केलेला आहे. सदरचा पंचनामा पंच लोकांना बोलावल्यावरुन हजर होऊन केल्याचे पंचनामामध्ये म्हटलेले आहे. सदर पंचनामा महसुल खात्यमार्फत केले असल्याचे अर्जदार यांनी अर्जात म्हटले आहे. परंतु महसुलखाते यांचे तर्फे कोणत्याही अधिकृत अधिका-याची सदर पंचनामावर सही व शिक्का असल्याचे दिसुन येत नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या दि.023/06/2008 रोजीचे फोटोवरुन अर्जदार यांचा ऊस गैरअर्जदार यांच्या डि.पी.ला बसविलेल्या किटकॅट मधुन जमीनवर फुलंगी पडल्याने डि.पी.च्या खाली वाळलेले गवत आहे त्या गवताने लाग पकडुन अर्जदाराच्या ऊसाला आग लागली ही बाब शाबीत होऊ शकत नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदाराचा अर्ज त्यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले असता, अर्जदार यांच्या शेतातील ऊस गैरअर्जदारांचा किटकॅटमधुन जमीनीवर फुलंगी पडुन त्या फुलंगीमुळे डि.पी.खाली वाळलेले गवत पेट घेऊन ती आग अर्जदाराच्या शेतातील ऊसाला लागली ही बाब शाबीत होऊ शकली नाही. अर्जदाराने दाखल केलेले दोन्ही पंचनामांचे अवलोकन केले असता, दि.05/01/2008 रोजी श्री.काजळेकर आर.व्ही.कनिष्ठ अभियंता यांच्या विनंतीनुसार केलेल्या पंचनाम्याचे अवलोकन केले असता, अर्जदार यांचे नुकसान गैरअर्जदारांच्या चुकीमुळे झाले आहे व त्यास गैरअर्जदार हे जबाबदार आहेत अगर अर्जदार त्यांचे झालेले नुकसान भरपाई गैरअर्जदाराकडुन वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे कुठेही नमुद केलेले नाही. अर्जदारांनी दाखल केलेल्या दि.05/01/2008 रोजीचा पंचनामा पाहीले असता, त्यामध्ये सुध्दा पंचानी अर्जदार यांचे सांगण्यावरुन पंचनामा केल्याचे दिसुन येत आहे. त्यातील रक्कम रु.65,000/- ची नुकसान कशाचे आधारे लिहीले आहे याबाबत कोणताही खुलासा होत नाही. अर्जदारांनी दाखल केलेले दोन्ही पंचनाम्याची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. अर्जदारांनी पंचनाम्याची मुळ प्रत अगर सांक्षाकिंत प्रत मे.मंचामध्ये हजर केले नाही. अर्जदार यांनी पंचनामा करणारे कोणाही व्यक्तीचे शपथपत्र याकामी पुराव्याकामी दाखल केले नाही. त्यामुळे अर्जदार यांनी दाखल केलेले दोन्ही पंचनामे पुराव्याच्या दृष्टीने या कामी वाचता येणार नाही, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी अर्जात नमुद केलेप्रमाणे त्यांच्या शेतातील ऊस हा गैरअर्जदार यांच्या निष्काळजीपणामुळे जळाला आहे त्यामुळे अशा प्रकारे गैरअर्जदार यांनी सेवा देण्यात निष्काळजीपणा केला आहे ही बाब अर्जदार यांनी शाबीत करु शकले नाहीत. अर्जदारांनी दाखल केलेल्या फोटोचे अवलोकन केले असता,किटकॅटमधुन फुलंगी पडल्यामुळे डि.पी.खालील गवताने पेट घेतल्यामुळे अर्जदाराचा ऊस जळाला आहे, असे अर्जदाराचे म्हणणे निरर्थक आहे कारण प्रत्यक्षात अर्जदार यांनी दाखल केलेल्या फोटोवरुन डि.पी.व त्यावरील गैरअर्जदार यांचे वायरिंग सुस्थितीत असल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्वांचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे चुकीमुळे अर्जदाराच्या ऊसाला आग लागुन अर्जदाराचे नुकसान झाले ही बाब शाबीत करु शकले नाहीत, असे या मंचाचे मत आहे. सदरील घटना घडनेपुर्वी अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांना रोहीत्रामध्ये स्पार्किंग होत असल्याची माहीती दिली असे नमुद केले आहे. परंतु त्याबद्यल कोणताही पुरावा या मं.मंचा समोर दाखल केलेला नाही. अर्जदार यांचा अर्ज त्यांनी दाखल केलेले कागदपत्र,शपथपत्र, अर्जदाराचा युक्तीवाद, गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र या सर्वांचा विचार होता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार नामंजुर करण्यात येते. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीतांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे)(श्रीमती.सुजाता पाटणकर)(श्री.सतीशसामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघुलेखक. |