Maharashtra

Wardha

CC/3/2012

SMT.ARUNA SHYAM SOMANI - Complainant(s)

Versus

SAHARA INDIA PARIWAR THRU.BR.MGR. - Opp.Party(s)

ADV.P.B.Taori /R.R.RATHI

28 Feb 2017

ORDER

                                               

                                                                                                       निकालपत्र

 (पारित दिनांक 28 फेब्रुवारी 2017)

                                                                              (मा. सदस्‍या, स्मिता एन. चांदेकर यांच्‍या आदेशान्‍वये) 

 

  1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा आशय असा की, त.क. क्रं. 1 ही त.क. क्रं. 2 ते 4 ची आई असून त.क. 2 ते 4 हे वर्धा येथे आपल्‍या आई सोबत राहत असून शिक्षण घेत आहे. वि.प. क्रं. 1 ही कायद्यान्‍वये प्रस्‍थापित झालेली सहारा इंडिया परिवार नावांची व्‍यापार पेठ आहे. वि.प. 1 च्‍या भारतात अनेक शाखा असून वर्धा येथे ही वि.प. 1 ची शाखा आहे. वि.प. 1 हे वेळोवेळी नवनविन योजना काढून लोकांना त्‍यामध्‍ये गुंतवणूक करण्‍यास सांगतात व त्‍या रक्‍कमेवर ते व्‍याज किंवा इतर लाभांश देत असतात. वि.प.1 च्‍या विविध योजने अंतर्गत रक्‍कम गुंतवणूक करणा-या व्‍यक्तिचा जीवन विमा उतरविला जातो. वि.प. क्रं 3 ही देखील वि.प. 1 ची शाखा आहे.  वि.प.2 ही विमा कंपनी असून वि.प. 1, 2 व 3 यांचे आपसात समन्‍वय आहे. त्‍यामुळे वि.प. 1 व 3 कडे गुंतवणूक केलेल्‍या व्‍यक्तिचा अपघाती मृत्‍यु झाल्‍यास वि.प. 2 हे विम्‍या अंतर्गत नुकसान भरपाई देतात. त.क.चे पती मयत शाम सोमाणी यांनी त्‍यांचे हयातीत वि.प. 1 व 3 यांच्‍याकडे सहारा सुवर्ण/रजत योजनेत खालीलप्रमाणे रक्‍कमा गुंतविल्‍या होत्‍या.
  2.  

पावती क्रं.

रुपये

तारीख

13832001200

  1. ,000/-

30.06.2007

13832001201

  1. ,000/-

30.06.2007

13832001202

  1. ,226/-

30.06.2007

13832001203

  1. ,000/-

30.06.2007

 

  1.      त.क. ने पुढे असे नमूद केले आहे की, त.क. 1 चे पती मयत श्‍याम सोमाणी यांचा दि. 16.04.2010 रोजी जी.टी.रोड, कालन पोलिस ठाणे खोत, जि. खन्‍ना (पंजाब) येथे अपघात होऊन मृत्‍यु झाला. मयत श्‍याम सोमाणी यांच्‍या मृत्‍यु संबंधाने सर्व कागदपत्रे जसे की, शवविच्‍छेदन अहवाल, प्रथम खबरी, पंचनामा इत्‍यादी ही पंजाबी भाषेत होती. त्‍यामुळे सदर कागदपत्रे मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत वाचणे सोयीचे असल्‍यामुळे अनुवाद करुन सदर कागदपत्रांच्‍या प्रति वि.प.ला पुरविण्‍यात आल्‍या. त.क. 1 चे पतीने वरीलप्रमाणे रक्‍कम वि.प. 1 व 3 कडे गुंतविली होती. त्‍यामुळे मयत श्‍याम सोमाणी याचा अपघाती विमा वि.प. 1 व 3 यांनी वि.प. 2 कडे काढला होता. त्‍यामुळे मयत श्‍याम सोमाणीच्‍या मृत्‍यु पश्‍चात विमा रक्‍कम त.क. ला मिळणे आवश्‍यक आहे. त.क.ने वि.प. 1 व 3 कडे ऑगस्‍ट 2010 मध्‍ये विमा दाव्‍याकरिता आवश्‍यक असलेली संपूर्ण कागदपत्रे दिलेली होती व त्‍याबाबत त.क. 1 स्‍वतः वर्धा व नागपूर येथील कार्यालयामध्‍ये वेळोवेळी चौकशी करीत होते. वि.प. 1 ते 3 यांनी त.क.ला विमा दाव्‍याची रक्‍कम ताबडतोब मिळेल असे आश्‍वासन दिले होते. त्‍याकरिता वि.प. 1 व 3 चे अधिका-यांनी त.क.च्‍या घरी येऊन संपूर्ण चौकशी सुध्‍दा केली होती. वारंवांर विनंती करुन ही वि.प.ने मयत श्‍याम सोमाणीच्‍या मृत्‍यु पश्‍चात विमा दाव्‍याची रक्‍कम त.क.यांना दिली नाही. म्‍हणून त.क.ने 20.03.2011 रोजी वि.प.ला पत्र पाठविले असता, वि.प. 1 ने दि.20.05.2011 रोजी पत्राद्वारे वि.प. 2 कंपनीने दि. 19.04.2011 चे पत्रानुसार त्‍यांना विमा दाव्‍यासंबंधी कागदपत्र उशिरा मिळाल्‍यामुळे दावा खारीज केलेला आहे असे कळविले.
  2.      त.क.ने पुढे असे नमूद केले आहे की, त.क.ने ऑगस्‍ट 2010 मध्‍ये वि.प. 1 यांच्‍याकडे विमा दाव्‍याची संपूर्ण कागदपत्रे दिली होती परंतु वि.प. 1 ने सदर कागदपत्र वि.प. 2 कडे एप्रिल 2011 मध्‍ये पाठविले. त्‍यामुळे वि.प. 2 यांनी विमा पॉलिसीच्‍या अटींनुसार मृत्‍युची बातमी मुदतीत न दि�ल्‍यामुळे त.क.चा विमा दावा नामंजूर केला. वि.प. क्रं. 1 ते 3 यांनी मयत शाम सोमानी किंवा त.क.नां कधीही विमा पॉलिसीची प्रत पाठविली नाही. त्‍यामुळे त.क.ला विमा पॉलिसीच्‍या अटींमधील मुदतीबाबत माहिती नव्‍हती. तसेच मयत श्‍याम सोमानी यांचा अपघात पंजाब प्रातांत झाला व तेथून संबंधित कागदपत्रे उशिरा मिळाले. कागदपत्र पंजाबी भाषेत असल्‍यामुळे त्‍याचा इंग्रजी भाषेत अनुवाद करुन कागदपत्रे सादर करावयास त.क.ला वेळ लागला. तरी ही त.क.ने वि.प.1 व 3 यांच्‍याकडे ऑगस्‍ट 2010 मध्‍ये संपूर्ण कागदपत्रे देऊन नुकसान भरपाई देण्‍याची विनंती केली होती. तसेच वि.प. 1 ते 3 च्‍या अधिका-यांनी त.क.ला मृत्‍युची बातमी विशिष्‍ट कालावधीत वि.प.ला कळवावी लागते याबद्दल कधीही माहिती पुरविली नव्‍हती. या उलट वि.प. 1 ते 3 च्‍या अधिका-यांनी त.क. ला लवकरात लवकर विमा दाव्‍याची रक्‍कम मिळेल असे आश्‍वासन दिले� होते. तसेच त.क.च्‍या रक्‍कमा वि.प. 1 ते 3 कडे गुंतविल्‍या असल्‍यामुळे त्‍यांनी श्‍याम सोमानीच्‍या मृत्‍युनंतर काही दि�वसांनी याबाबतची माहिती वि.प.कडे दिली  होती. त्‍यामुळे मृत्‍युची बातमी मुदतीत दिली नाही म्‍हणून विमा दावा रद्द करणे हे गैरकायदेशीर असून नैसर्गिक न्‍यायतत्‍वाच्‍या प्रणाली विरुध्‍द आहे. त्‍यामुळे त.क.चा विमा दावा उशीर झाल्‍याच्‍या कारणावरुन रद्द करणे ही वि.प.क्रं. 1 ते 3 च्‍या सेवेतील त्रुटी आहे असे त.क.ने आपल्‍या तक्रारीत नमूद केले आहे. त.क.ने वि.प. 1 व 3 यांचे 20.05.2011. रोजीचे पत्र मिळाल्‍यावर दि.17.06.2011. रोजी परत वि.प.क्रं. 1 व 2 ला वकिला मार्फत नोटीस पाठवून त.क.च्‍या विमा दाव्‍याची रक्‍कम मंजूर करण्‍याची विनंती केली. परंतु वि.प. 1 ते 3 ला नोटीस मिळून ही त्‍यांनी सदर नोटीसला उत्‍तर दिले नाही व त.क.ला नुकसान भरपाईची रक्‍कम ही दिली नाही. म्‍हणून त.क.ने मंचासमक्ष सदर तक्रार दाखल केली आहे व विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये2,00,000,/- माहे ऑगस्‍ट-2010 पासून ते तक्रार दाखल करेपर्यंत 18 टक्‍के व्‍याजाने रुपये42,000/- व शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये50,000/-असे एकूण रुपये2,92,000/- वि.प. कडून मिळण्‍याची मागणी केलेली आहे.
  3.      वि.प. 1 ने त्‍याचे लेखी उत्‍तर नि.क्रं. 13 वर इंग्रजीत दाखल केले असून त्‍याच्‍या मराठी अनुवादाची प्रत नि.क्रं. 21 वर दाखल केली असून तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. वि.प. 1 ने त्‍यांच्‍या लेखी उत्‍तरात सहारा इंडिया परिवार ही विधी शास्‍त्रीय व्‍यक्‍ती नसून तिला विधीक अस्तित्‍व नसल्‍यामुळे वि.प. वर कोणतीही तक्रार दाखल होऊ शकत नाही. तसेच तक्रार अर्जामध्‍ये योग्‍य पार्टीला न जोडता चुकिची पार्टी जोडल्‍यामुळे  तक्रार अर्ज खारीज होण्‍यास पात्र आहे असा आक्षेप घेतला आहे. वि.प.ने पुढे असे नमूद केले आहे की, सहारा इंडिया क‍मर्शिअल कॉर्पोरेशन लि. (वि.प.3) यांनी सहारा स्‍वर्ण/रजत योजना एच्छिक अ योजना सुरु केली होती. त्‍यामध्‍ये मयत सोमानी यांनी पैसे गुंतविले होते. त.क. ने सहारा इंडिया कमर्शिअल कॉर्पोरेशनला पार्टी म्‍हणून जोडलेले नसल्‍यामुळे तक्रार अर्ज खारीज करण्‍यात यावा. वि.प. 1 ने पुढे असे नमूद केले आहे की, मयत श्‍याम सोमाणी यांनी सुरुवातीला दि.23.12.2003 रोजी सिल्‍व्‍हर ईयर लाभ योजना वर्धा शाखेत रुपये27,000/- गुंतविले होते. दि.30.07.2007 रोजी मयत श्‍याम सोमानी यांनी अर्ज करुन सिल्‍व्‍हर ईयर लाभ योजनेची रक्‍कम काढून ती रक्‍कम व्‍याजासहीत सहारा स्‍वर्ण/रजत योजना एच्छिक अ योजनेत गुंतविले. वि.प. 3 एस.आय.सी.सी.एल. यांनी अॅक्‍सीडेंटल डेथ क्‍लेमचा लाभ सिल्‍व्‍हर ईयर लाभ योजनेच्‍या खातेदारांना मिळावा करिता वि.प. 2 कडून गट विमा पॉलिसी विकत घेतली होती. सहारा स्‍वर्ण/रजत योजना एच्छिक ए मध्‍ये अॅक्सिडेंटल डेथ क्‍लेमच्‍या सवलतीची कोणतीही तरतुद नाही. तसेच वि.प. 1 ने सदर योजने मध्‍ये अॅक्‍सीडेंटल सवलतबाबतचा कोणताही करार कोणा सोबत ही केलेला नाही असे वि.प. 1 ने नमूद केले आहे. वि.प. 1 ने पुढे असे ही नमूद केले आहे की, त.क. किंवा मयत श्‍याम सोमानी यांनी सहारा स्‍वर्ण/रजत योजना मध्‍ये अॅक्‍सीडेंटल क्‍लेम पोटी कोणती ही रक्‍कम भरली नाही. म्‍हणून ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2(1)(डी)(2) प्रमाणे त.क. ग्राहक ठरु शकत नाही. त्‍यामुळे त.क. सदर तक्रार ग्राहक मंचासमोर दाखल करु शकत नाही असा आक्षेप वि.प. 1 ने आपल्‍या लेखी उत्‍तरात नोंदविला आहे.
  4.      वि.प. 1 ने आपल्‍या लेखी बयानात असे ही नमूद केले आहे की, मयत श्‍याम सोमाणी यांचा अपघाती मृत्‍यु 16.04.2010रोजी झाला त्‍यावेळेस ते सहारा स्‍वर्ण/रजत योजना ऑप्‍शन अ चे सदस्‍य होते. सहारा स्‍वर्ण/रजत योजनेत ऑपशन अ एच्छिक हे इन्‍श्‍युरन्‍स पॉलिसीची योजना नाही. परंतु या योजनेमध्‍ये गुंतविलेल्‍या रक्‍कमेवर व्‍याज अर्जित केले जाते. तसेच स्‍थावर मालमत्‍ता खरेदी होऊ शकते. अपघाती मृत्‍युच्‍या वेळेस श्‍याम सोमानी सिल्‍व्‍हर ईयर लाभ योजनेचे सदस्‍य नव्‍हते. त्‍यामुळे त.क. हे वि.प. 1 यांच्‍याकडून शर्ती व नियमानुसार आकस्मिक मृत्‍यु क्षतिपूर्तीचा लाभ घेण्‍यास पात्र नाही. कारण या योजनेमध्‍ये मयत सोमानी व वि.प. क्रं. 1 यांच्‍यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा करार झाला नव्‍हता.त्‍यामुळे वि.प. 1 ने सेवेत कोणतीही त्रुटी केली नसून त्‍यांच्‍या विरुध्‍द तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली आहे.
  5.      वि.प. 2 ने त्‍याचे लेखी उत्‍तर नि.क्रं. 19 वर दाखल केले असून त.क. च्‍या तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. वि.प. 2 ने पुढे असे कथन केले आहे की, वि.प. 2  ही विविध प्रकारे विमा काढते व त्‍या संबंधात जर नियमात बसेल तर नुकसान भरपाईची रक्‍कम संबंधीत व्‍यक्‍तीस देते. वि.प. 1 कडे त्‍यांच्‍या योजनेत जे लोक गुंतवणूक करतात त्‍या संबंधीत व्‍यक्‍तीचा अपघाती विमा वि.प. 1 ही गुंतवणूकदारांच्‍या नावे काढतात. विमा प्रिमियम स्‍वीकार झाल्‍यानंतर वि.प. 2 विमा पॉलिसी वि.प. 1 च्‍या नांवे देते. वि.प. 1 च्‍या गुंतवणूकदारां सोबत वि.प. 2 चा प्रत्‍यक्ष संबंध येत नाही. पॉलिसीच्‍या अवधीमध्‍ये जर गुंतवणूकदाराचा मृत्‍यु झाला तर वि.प. 1 यांनी वि.प. 2 यांना त्‍याबाबत लेखी सूचित करावयाचे असते. त्‍यानुसार विमा पॉलिसीमधील नमूद अटी व शर्ती प्रमाणे वि.प. 2 हे नुकसानभरपाईची रक्‍कम वि.प.1 ला संबंधीत गुंतवणूकदाराकरिता देतात. परंतु ठरलेल्‍या कालावधीमध्‍ये व विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार वि.प. 1 ने त्‍यांना कळविले नाही तर त्‍यांच्‍यावर नुकसान भरपाई करण्‍याचे दायित्‍व राहत नाही. वि.प. 2 ने पुढे असे ही नमूद केले आहे की, त.क. 1 च्‍या पतीचा मृत्‍यु कुठे, केव्‍हा व कशाप्रकारे झाला हयाची दि沧ࠀ.20.05.2011पर्यंत माहिती नव्‍हती. मयत श्‍याम सोमाणी यांनी वि.प. 1 कडे किती रक्‍कम गुं‍तविली होती याबद्दल वि.प. 2 यांना काहीही माहिती नाही. त्‍याचप्रमाणे जी.पी.ए.संबंधी सर्व नुकसान भरपाईचे दायित्‍व वि.प. 1 द्वारे केल्‍या जाते. सदर वि.प.ने वि.प. 1 च्‍या नांवे दिलेल्‍या विमा पॉलिसीमधील संपूर्ण अटी व शर्तीची जाणीव वि.प. 1 ला होती. त्‍यामुळे वि.प. 1 ने मयत श्‍याम सोमानी हयांची अपघाती मृत्‍युची बातमी 30 दिवसाच्‍या आंत त्‍यांना द्यायला हवी होती व विशिष्‍ट परिस्थितीमध्‍ये सदर माहिती पुरविण्‍याची कालमर्यादा ही 45 दिवसांची असते. मयत श्‍याम सोमाणी यांचा अपघाती मृत्‍यु 16.04.2010 रोजी झाला होता. परंतु वि.प. 1 ने त्‍या मृत्‍युसंबंधी लेखीसूचना व अपघाता संबंधीची कागदपत्रे 18.04.2011 रोजी वि.प. कडे पाठविले होते. ते वि.प. 2 यांना 19.04.2011 रोजी लखनऊ येथील कार्यालयात प्राप्‍त झाले व त्‍याच दिवशी त्‍यांनी वि.प. 1 ला लेखी सूचित केले होते की, संबंधीत व्‍यक्‍तीच्‍या मृत्‍युची सूचना किंवा पॉलिसीमधील अटी नुसार वि.प. 2 यांना मिळाली नाही म्‍हणून वि.प. 1 ने पाठविलेला दावा अर्ज दाखल करुन घेता येत नाही व स्‍वीकारही करीत नाही असे पत्र पाठवून वि.प. 1 ला संपूर्ण कागदपत्रे परत केले असे वि.प. 2 ने आपल्‍या लेखी उत्‍तरात नमूद केले आहे.
  6.       वि.प. 2 ने पुढे असे नमूद केले आहे की, वि.प. 1 यांनी ऑगस्‍ट 2010 मध्‍ये कागदपत्र मिळाल्‍यानंतर 18.04.2011 पर्यंत त्‍यांना कां सूचित केले नाही, याबद्दल कुठलाही खुलासा दिला नाही. वि.प. 2 यांनी मान्‍य केले की त्‍यांना त.क.च्‍या वकिलामार्फत 17.06.2011 रोजी नोटीस पाठवून विमा दाव्‍याच्‍या रक्‍कमेची मागणी केली होती व सदर नोटीसचे उत्‍तर त्‍यांनी दि.28.06.2011 रोजी त.क.चे अधिवक्‍ता श्री.पी.बी.टावरी यांना पाठविले होते. त्‍यामुळे पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार वि.प. 1 ने उशिरा दाखल केलेला विमा दावा वि.प. 2 यांनी स्विकार न करता परत पाठविले. त्‍यामुळे वि.प. 2 यांनी त.क.च्‍या सेवेत कुठलाही कसूर केला नाही. म्‍हणून वि.प. 2 हा त.क.ला नुकसानभरपाई देण्‍यास जबाबदार नाही. करिता सदर तक्रार ही त्‍यांच्‍या विरुध्‍द खारीज करण्‍यात यावी अशी विनंती त्‍याच्‍या लेखी बयानात केली आहे.
  7.            सदर तक्रारीमध्‍ये दि.08.03.2016 च्‍या आदेशानुसार वि.प. 3 हयांना पक्ष करण्‍यात आले. वि.प. 3 यांनी वि.प. 1 ने दाखल केलेले लेखी बयान हेच त्‍यांचे लेखी बयाण समजण्‍यात यावे अशी पुरसीस नि.क्रं. 44 वर दाखल केली आहे.
  8.      तक्रारकर्त्‍याने वर्णनयादी नि.क्रं.3 नुसार 4 कागदपत्रे दाखल केली आहे. त.क.ने वर्णनयादी नि.क्रं. 39 नुसार सहारा स्‍वर्ण/रजत योजना (A) चा 4 पावत्‍यांच्‍या छायांकित प्रति दाखल केल्‍या आहे. तसेच पुरावा दाखल करावयाचे नाही असे सांगितल्‍याचे 12 जुन 2012 च्‍या रोजनाम्‍यावरुन दिसून येते. वि.प. क्रं. 1 ने वर्णनयादी नि.क्रं. 14 नुसार एकूण दोन कागदपत्र दाखल केले आहे. तसेच वर्णनयादी नि.क्रं. 16 नुसार 2 कागदपत्र दाखल केले आहे. वि.प. क्रं.2 ने नि.क्रं. 22 वर पुरसीस दाखल करुन लेखी बयाण हेच त्‍यांचे पुराव्‍याचे शपथपत्र समजण्‍यात यावे असे कळविले. वि.प.क्रं. 2 ने वर्णनयादी नि.क्रं. 18 नुसार त्‍यांनी वि.प.क्रं. 1 च्‍या नांवे दिलेल्‍या पॉलिसीची प्रत, वि.प. क्रं.1 ने वि.प. 2 ला पाठविलेल्‍या दि.18.04.2011 च्‍या पत्राची छायांकित प्रत व वि.प. 2 ने वि.प.क्रं. 1 ला पाठविलेल्‍या दि.19.04.2011 च्‍या पत्राची छायांकित प्रत दाखल केली आहे. वि.प. 1 ने त्‍याचा लेखी युक्तिवाद नि.क्रं.25 वर दाखल केला आहे. विरुध्‍द पक्ष 2 ने लेखी युक्तिवाद दाखल केला नाही. उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेण्‍यात आला. 
  9.      वरीलप्रमाणे उभय पक्षांचे तक्रारीतील कथन, दाखल केलेले दस्‍ताऐवज, पुरावा व युक्तिवाद यांचे   अवलोकन केले असता खालील मुद्दे मंचासमक्ष उपस्थित झाले असून त्‍यावरील कारणे व निष्‍कर्ष खालीलप्रमाणे आहे.
  10.  

अ.क्र.

मुद्ददे

उत्‍तर

  1.  

 त.क. हा वि.प. क्रं. 1,2 व 3 चा ग्राहक आहे     

 काय  ?

होय

  1.  

 त.क. चा विमा दावा नाकारुन वि.प. 1 ते 3 ने  

 सेवेत त्रुटीपूर्ण व्‍यवहार केला आहे काय ? 

होय

  1.  

 त.क.मागणीप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्‍यास

 पात्र आहे काय ? 

होय, अंशतः

  1.  

 अंतिम आदेश काय ?

तक्रार अंशतः मंजूर 

 

-: कारणमिमांसा :-

 

  1. मुद्दा क्रमांक 1 - विरुध्‍द पक्ष 1 ने आपल्‍या लेखी बयाणात असे कथन केले आहे की, सहारा इंडिया परिवार ही विधीशास्‍त्रीय व्‍यक्‍ती नसून तिला विधीक अस्तित्‍व नाही. त्‍यामुळे वि.प.क्रं. 1 वर कोणतीही तक्रार दाखल होऊ शकत नाही. सबब सदर तक्रार दखलपात्र नसल्‍यामुळे खारीज होण्‍यास पात्र आहे. तसेच मृतक श्‍याम सोमाणी यांनी सहारा इंडिया कमर्शियल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्‍या सहारा स्‍वर्ण/रजत योजना एच्छिक अ मध्‍ये रक्‍कम गुंतविली होती. त्‍यामुळे त्‍या कंपनीस तक्रारीत पक्ष करावयास हवे होते, तसे केले नाही. म्‍हणून त.क.ने तक्रार अर्जात योग्‍य पार्टीला न जोडता सहारा इंडिया परिवार (वि.प.क्रं.1) संस्‍थेला पक्षकार केले असल्‍यामुळे सदर तक्रार योग्‍य पार्टी अभावी खारीज होण्‍यास पात्र आहे. त्‍याचप्रमाणे त.क. हे वि.प.चे ग्राहक होत नाही असा आक्षेप देखील वि.प. 1 ने त्‍याचे लेखी बयानात केलेला आहे.
  2.      अभिलेखावरील कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की,  वि.प.क्रं. 1 ही अनेक कंपनीचा समुह आहे. सहारा इंडिया संस्‍थेच्‍या अधिपत्‍याखालीच इतर कंपन्‍या विविध योजना राबवितात. वि.प.क्रं. 1 ने त्‍यांचे लेखी बयाणात नमूद केल्‍यानुसार विविध योजनेमध्‍ये गुंतविलेल्‍या रक्‍कमेवर व्‍याज अर्जित केल्‍या जाऊ शकते. तसेच कंपनीची स्‍थावर मालमत्‍ता खरेदी करता येते. त्‍यामुळे वि.प.क्रं. 1 संस्‍थेच्‍या व्‍यवसायाचे स्‍वरुप बघता वि.प.क्रं. 1 व त्‍यांच्‍या इतर संस्‍थेमध्‍ये गुंतवणूक करणारे व्‍यक्‍ती हे निश्चिपणे त्‍यांचे ग्राहक ठरतात. मय्यत श्‍याम सोमाणी यांनी सहारा इंडिया कमर्शिअल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्‍या सहारा स्‍वर्ण/रजत योजना ऐच्छिक अ मध्‍ये रक्‍कम गुंतविली होती हे वादातीत नाही. त्‍यामुळे सहारा इंडिया कमर्शिअल कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी सदर तक्रारीत आवश्‍यक पार्टी आहे. तक्रारकर्त्‍यांनी सदर कंपनीस मंचाच्‍या परवानगीने वि.प.क्रं. 3 म्‍हणून प्रकरणात पक्ष केले आहे. वि.प.क्रं. 3ही वि.प.क्रं. 1 ची कंपनी आहे. म्‍हणून वि.प. क्रं. 1 व 3 यांच्‍या सोबत त्‍यांच्‍या गुंतवणूकदारांमध्‍ये उपस्थित होणार वाद हा ग्राहक वाद सदरात मोडतो. त्‍यामुळे सदर प्रकरण दखल पात्र नाही असा वि.प.क्रं. 1 ने उपस्थित केलेला प्रारंभिक आक्षेप हा तथ्‍यहिन आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍याचप्रमाणे मयत श्‍याम सोमाणी कडून सहारा स्‍वर्ण/रजत योजनेमध्‍ये अपघाती मृत्‍यु दावा करिता प्रिमियमची कोणतीही रक्‍कम स्विकारली नसल्‍यामुळे त.क. हे ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2 (1) (डी) (2) प्रमाणे ग्राहक ठरु शकत नाही असे वि.प.क्रं. 1 ने लेखी बयानात कथन केलेआहे. मयत श्‍याम सोमाणी यांनी सहारा स्‍वर्ण/रजत योजना एच्छिक अ मध्‍ये रक्‍कम गुंतविली हे वादातीत नाही. वि.प.क्रं. 2 यांनी वर्णनयादी नि.क्रं. 18 नुसार वि.प.क्रं. 1 ला दिलेल्‍या विमा पॉलिसीची प्रत अभिलेखावर दाखल केली आहे. त्‍याचे अवलोकन केले असता सहारा इंडिया कमर्शिअल कॉर्पोरेशन लिमिटेड (वि.प.क्रं. 3) ही कंपनी तसेच तिचे गुंतवणूकदार हे विमाकृत करण्‍यात आले आहे असे स्‍पष्‍ट नमूद केलेले आहे. वि.प.क्रं. 1 व 3 यांनी त.क. तसेच इतर गुंतवणूकदाराकरिता वि.प.क्रं. 2 कडे विम्‍याची रक्‍कम भरुन विमा पॉलिसी काढली आहे हे देखील अभिलेखावरील कागदपत्रावरुन सिध्‍द होते. त्‍यामुळे वि.प.क्रं. 1 व 3 चा त.क. हे त्‍यांचे ग्राहक नाही. करिता सदर तक्रार दखल पात्र नाही असा आक्षेप हा तथ्‍यहिन असून निरस्‍त ठरतो, म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते..
  3. मुद्दा क्रमांक  2 -  त.क. 1 चे पती मय्यत श्‍याम सोमाणीयांनी वि.प.क्रं. 1 व 3 कडे दि. 30.06.2007 रोजी खालीलप्रमाणे सहारा स्‍वर्ण/रजत योजनेमध्‍ये रक्‍कमा गुंतविल्‍या होत्‍या हे देखील वादातीत नाही.

 

पावती क्रं.

रुपये

तारीख

13832001200

10,000/-

30.06.2007

13832001201

10,000/-

30.06.2007

13832001202

13,226/-

30.06.2007

13832001203

10,000/-

30.06.2007

 

त.क.क्रं. 1 चे पती श्री.श्‍याम सोमाणी यांचा दि.16.04.2010 रोजी अपघाती मृत्‍यु झाला हे देखील वादातीत नाही.

  1.      त.क. च्‍या म्‍हणण्‍यानुसार मयत श्‍याम सोमाणीचे मृत्‍यु पश्‍चात त्‍या संबंधीचे संपूर्ण कागदपत्र त्‍यांनी वि.प.क्रं. 1 व 3 कडे विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍याकरिता माहे ऑगस्‍ट 2010 मध्‍ये दिली. परंतु वि.प. क्रं. 1 व 3 ने सदर कागदपत्र वि.प.क्रं. 2 कडे माहे एप्रिल 2011 मध्‍ये पाठविली. त्‍यामुळे दि. 19.04.2011 चे पत्रानुसार वि.प. क्रं. 2 ने मयताचे मृत्‍युची बातमी ही विमा मध्‍ये दिलेल्‍या मुदतीत न दिल्‍यामुळे त.क.ची विमा दाव्‍याची मागणी गैरकायदेशीरपणे नामंजूर करण्‍यात आली. त.क.च्‍या म्‍हणण्‍यानुसार श्‍याम सोमाणी यांचा मृत्‍यु पंजाबमध्‍ये झाल्‍यामुळे त्‍यासंबंधीची कागदपत्रे प्राप्‍त करुन त्‍याचा इंग्रजी अनुवाद करण्‍यात उशीर झाला. परंतु त्‍यांनी ऑगस्‍ट 2010 मध्‍येच वि.प. क्रं. 1 व 2 यांना सदर कागदपत्र पुरविली होती. त्‍यामुळे वि.प. क्रं. 1 व 3 यांच्‍या चुकीमुळे त.क.च्‍या विमा दाव्‍याची माहिती देण्‍यास उशीर झाला असल्‍याने त.क. वि.प.क्रं. 1, 2 व 3 कडून विमा दाव्‍याची रक्‍कम तसेच नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे त.क.चे म्‍हणणे आहे.
  2.      अभिलेखावरील कागदपत्रांचे अवलोकन केले असता वि.प.क्रं. 2 ने त्‍याचे लेखी बयानात वि.प.क्रं. 1 ने त्‍यांना मयत श्‍याम सोमाणी यांचे मृत्‍युसंबंधी विमा दाव्‍याची कागदपत्रे दि�. 18.04.2011 रोजी पहिल्‍यांदा पाठविली असे नमूद केले आहे. तसेच सदर कागदपत्र त्‍यांना दि.19.04.2011 रोजी मिळाले व त्‍याच दिवशी विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार विमा दावा मुदतीत न मिळाल्‍यामुळे वि.प.क्रं. 2 ने तो स्‍वीकार ही न करता वि.प.क्रं. 1 कडे परत केला असे म्‍हटले आहे. वर्णनयादी नि.क्रं.3(3) नुसार अभिलेखावर दाखल वि.प.क्रं.2 चे दि. 28.06.2011 चे पत्र तसेच वर्णनयादी नि.क्रं. 18 दस्‍त क्रं. 3 वि.प.क्रं. 2 चे दि.19.04.2011 चे पत्रावरुन देखील सदर बाब स्‍पष्‍ट होते.
  3.      त.क.चे म्‍हणण्‍यानुसार त्‍यांनी वि.प.क्रं. 1 कडे माहे ऑगस्‍ट 2010 रोजी कागदपत्रे दिले होते. परंतु सदर कागदपत्र वि.प.क्रं. 2 ला वि.प.क्रं. 1 कडून दि.18.04.2011 रोजी प्राप्‍त झाले. वि.प.क्रं.2 चे म्‍हणण्‍यानुसार विमा दावा दाखल करण्‍यास उशिराचे कारण वि.प.क्रं. 1 ने त्‍यांना विदित केले नाही. युक्तिवादा दरम्‍यान वि.प.क्रं. 1 चे वकिलांनी असे प्रतिपादन केले की, त्‍यांना त.क.कडून कागदपत्र प्राप्‍त होताच त्‍यांनी वि.प.क्रं. 2 कडे विमा दावा मिळण्‍याकरिता पाठविली. मात्र सदर बाब सिध्‍द करण्‍यास त्‍यांनी कुठलाही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तसेच त.क.ने विरुध्‍द पक्षांना दि.17.06.2011 ला त्‍यांचे वकिलामार्फत पाठविलेल्‍या नोटीसला उत्‍तर देऊन त.क.ने त्‍यांचेकडे कागदपत्र ऑगस्‍ट 2010 मध्‍ये दिले ही बाब खोडून काढली नाही. यावरुन वि.प. क्रं. 1 ने त.क.चा विमा दाव्‍यासंबंधी कागदपत्र ऑगस्‍ट 2010 मध्‍ये प्राप्‍त होऊन देखील वि.प.क्रं. 2 कडे दि.18.04.2011 ला पाठविले हे स्‍पष्‍ट होते.
  4.      वि.प.क्रं. 1 व 3 ने विमा दाव्‍याचे कागदपत्र उशिरा पाठविल्‍याबाबतचा खुलासा मंचासमक्ष दाखल तक्रारीत देखील दिलेला नाही. या उलट वि.प.क्रं. 1 व 3 ने त्‍यांचे लेखी बयाणात असे नमूद केले आहे की, मयत श्‍याम सोमाणी यांनी सुरुवातीला दि. 23.12.2003 रोजी सिल्‍व्‍हर ईयर लाभ योजना वर्धा शाखेत रुपये 27,000/- गुंतविले होते. त्‍याचा पावती क्रं. 13839202555 आहे. सदर योजनेच्‍या अर्जाची प्रत वि.प.क्रं. 1 ने दाखल केली आहे. परंतु दि.30.07.2007 रोजी मयत श्‍याम सोमाणी यांनी सिल्‍व्‍हर लाभ योजनेची रक्‍कम काढून त्‍यावर आलेल्‍या व्‍याजासहीत सहारा स्‍वर्ण/रजत योजना एच्छिक ए मध्‍ये गुंतविली. वि.प.क्रं. 3 यांनी अपघाती मृत्‍यु विम्‍याचा लाभ सिल्‍व्‍हर लाभ योजनेतील खातेधारकांना मिळावा या करिता वि.प.क्रं. 2 कडून गट विमा पॉलिसी घेतली होती. परंतु सहारा स्‍वर्ण/रजत योजनेमध्‍ये अश्‍या प्रकारचा कोणताही करार वि.प.क्रं.2 सोबत झाला नाही. मयत श्‍याम सोमाणी सिल्‍व्‍हर लाभ योजनेचे सदस्‍य नसल्‍यामुळे त.क. ही अपघाती मृत्‍यु क्षतिपूर्तीच्‍या लाभास पात्र नाही. वि.प. क्रं.1 ने वर्णनयादी नि.क्रं.39 नुसार सहारा स्‍वर्ण/रजत योजना अ च्‍या मयत श्‍याम सोमाणी यांच्‍या नांवे असलेल्‍या चार पावत्‍या दाखल केल्‍या आहेत. तसेच सिल्‍व्‍हर  लाभ योजनेचे पासबुक नियम व शर्ती आणि सहारा स्‍वर्ण/रजत योजना ए च्‍या अर्जाच्‍या प्रती दाखल केल्‍या आहेत. त्‍याचे अवलोकन केले असता मयत श्‍याम सोमाणी यांनी सिल्‍व्‍हर लाभ योजनेतून रक्‍कम दि. 30.06.2007 ला काढून मिळालेली संपूर्ण रक्‍कम सहारा स्‍वर्ण/रजत योजना अ मध्‍ये गुंतविल्‍याचे स्‍पष्‍ट होते.
  5.      विरुध्‍द पक्ष क्रं. 1 च्‍या म्‍हणण्‍यानुसार जर मयत श्‍याम सोमाणी हे मृत्‍युसमयी सिल्‍व्‍हर लाभ योजनेचे सदस्‍य नव्‍हते, त्‍यामुळे तक्रारकर्ती अपघाती मृत्‍यु विमा दाव्‍याचा लाभ मिळण्‍यास पात्र नाही, तर सदर बाब विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ने तक्रारकर्ती क्रं. 1 कडून विमा दाव्‍या संबंधाने कागदपत्र प्राप्‍त झाल्‍यावर त.क.ला तसे कळविणे आवश्‍यक होते. परंतु वि.प. 1 ने त.क.ला तसे न कळविता, वि.प. 2 कडे विम्‍याची रक्‍कम मिळण्‍याकरिता कागदपत्रे उशिराने पाठविले अभिलेखावरुन स्‍पष्‍ट होते.

      वि.प.क्रं. 1 च्‍या वरील प्रतिपादनावरुन प्रतिउत्‍तरा दाखल त.क.च्‍या वकिलांनी मंचाचे लक्ष वि.प. क्रं. 2 यांनी वि.प.क्रं. 1 ला दिलेल्‍या विमा पॉलिसीवर लक्ष केंद्रीत केले. सदर विमा पॉलिसीचे अवलोकन केले असता, प्रकरणातील पृष्‍ठ क्रं. 82 वर वि.प. क्रं. 1 च्‍या पॉलिसीत अंतर्भूत विविध कंपनीची यादी दिलेली असून अनुक्रमे 9 वर वि.प. क्रं. 3 कंपनीचे नाव  नमूद केले असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे वि.प. क्रं. 3 हे पॉलिसीत अंतर्भूत असल्‍याने सदर वि.प.क्रं. 3 मधील योजनेस गुंतवणूकधारक विमा लाभास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

     त्‍याचप्रमाणे विमा पॉलिसीचा लाभ सिल्‍व्‍हर ईयर लाभ योजना, सहारा स्‍वर्ण/रजत योजना व सहारा रजत योजना करिता विमा पॉलिसी लागू असल्‍याचे प्रकरणातील पृष्‍ठ क्रं. 78 वरील विमा पॉलिसी मुद्दा क्रं. 2 (A), व  (B) वरुन सिध्‍द होते. त्‍यामुळे वि.प. क्रं. 1 व 3 ने केलेले कथन की, मयत श्‍याम सोमाणी हे मृत्‍यु समयी सिल्‍व्‍हर लाभ योजनेचे सदस्‍य नसल्‍यामुळे विमा लाभास पात्र नाही हे तथ्‍यहिन व दिशाभूल करणारे आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे वि.प. क्रं. 1 ने त्‍यांचे गुंतवणूकदारांचे हित न जोपासता त्‍यांचा विमा दाव्‍याचा हक्‍क डावलने ही वि.प.क्रं. 1 च्‍या सेवेतील त्रुटी आहे.

     तसेच मुद्दा क्रं. 2 च्‍या अनुषंगाने विचार करता वि.प. 2 यांनी वि.प. 1 ने त्‍यांच्‍याकडे पाठविलेला विमा दावा हा उशिराने मिळाल्‍याच्‍या कारणावरुन दाखल न करताच परत पाठविला आहे. विरुध्‍द पक्ष क्रं.2 यांनी विरुध्‍द पक्ष क्रं. 1 कडून उशिरा विमा प्रस्‍ताव पाठविण्‍याबाबतचे कारण जाणून घेण्‍याचा कुठलाही प्रयत्‍न केल्‍याचे दिसून येत नाही. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या तक्रारीच्‍या पृष्‍ठर्थ छत्‍तीसगड राज्‍य आयोगाच्‍या न्‍यायनिवाडयाची प्रत, तसेच हैद्राबाद, हिरयाणा व झारखंड राज्‍य आयोगाच्‍या न्‍याय निवाडयाच्‍या प्रत, तसेच मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने (1979) 4 Supreme Court Cases 176 व मा.राज्‍य आयोग, मुंबई यांचे 2005 (2)CPR 24, मधील न्‍यायनिवाडयाची प्रत प्रकरणात दाखल केली आहे. वरीलप्रमाणे दाखल न्‍यायनिवाडयात मा. सर्वोच्‍च न्‍यायालय  तसेच मा. राज्‍य आयोगाने असे नमूद केले आहे की, विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार मृतकाच्‍या मृत्‍युची माहिती 30 दिवसात देणे तसेच विशेष कारण असल्‍यास 45 दिवसा पर्यंत विमा कंपनीला देणे हे जरी पॉलिसीच्‍या अटीत नमूद असले तरी सदरची बाब ही तांत्रिक असून केवळ विमा कंपनीला योग्‍य चौकशी करण्‍याकरिता व पडताळणीस वेळ मिळण्‍याबाबतच सदर अट नमूद केलेली आहे. त्‍यामुळे सदरची अट ही अनिवार्य (Mandatory) नसून निर्देशिका(Directory)स्‍वरुपाची आहे, त्‍यामुळे विमा कंपनी द्वारे केवळ उशीर झाल्‍याच्‍या तांत्रिक कारणावरुन तक्रारकर्त्‍याचा विमा दावा त.क.चे हित न जोपासता नाकारणे ही निश्चितपणे विमा कंपनीच्‍या सेवेतील त्रुटी आहे.

  1.      हातातील प्रकरणात विमा कंपनी विरुध्‍द पक्ष 2 ने विमा प्रस्‍ताव पाठविण्‍यास झालेल्‍या उशिराबाबतची शहानिशा न करता प्रस्‍तुत विमा दावा हा दाखल करुन न घेता व न स्विकारता विरुध्‍द पक्ष 1 कडे परत पाठविला आहे, ही निश्चितपणे विरुध्‍द पक्ष 2 च्‍या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. विरुध्‍द पक्ष 2 यांना तक्रारकर्त्‍याच्‍या पतीचा अपघाती मृत्‍यु झाला याबद्दल दि. 20.05.2011 पर्यंत वि.प. ला कुठलीही माहिती नव्‍हती असे वि.प. 2 ने आपल्‍या लेखी बयानात नमूद केलेले आहे. वि.प. 2 कडून दावा नामंजूर झाल्‍याचे कळविल्‍यानंतर त.क.ने वि.प. 1 व 2 यांना दि. 17.06.2011 रोजी त्‍यांच्‍या वकिलामार्फत नोटीस पाठवून तक्रारकर्तीच्‍या दाव्‍याचा पुनर्विचार करण्‍याबाबत कळविले होते. त्‍यानंतर ही सदर विमा कंपनीने त.क.च्‍या विमा दाव्‍याचा पुनर्विचार केलेला दिसून येत नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 कंपनीने पाठविलेल्‍या कागदपत्राचे अवलोकन न करता केवळ कागदपत्र मुदतीत पाठविली नाही, या तांत्रिक कारणावरुन कागदपत्राची पडताळणी न करता विरुध्‍द पक्ष 2 कंपनीने विमा दावा परत करणे ही विरुध्‍द पक्ष 2 च्‍या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
  2.           हे सत्‍य आहे की, विमा दाव्‍याची रक्‍कम अदा करणे ही विरुध्‍द      पक्ष 2 विमा कंपनीची जबाबदारी आहे. तक्रारकर्तीचा योग्‍य तो विमा प्रस्‍ताव  असतांना त्‍यावर निर्णय न घेऊन चुकिच्‍या पध्‍दतीने बचाव घेऊन स्‍वतःची  जबाबदारी टाळण्‍याचा विरुध्‍द पक्ष 2 ने प्रयत्‍न केलेला आहे. म्‍हणून तक्रारकर्ती विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 2,00,000/-वर तक्रार दाखल तारखेपासून  द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज मिळण्‍यास हक्‍कदार आहे.
  3.      तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल विचार करावयाचा झाल्‍यास सर्व कागदपत्रासह विमा प्रस्‍ताव दाखल करुन सुध्‍दा विरुध्‍द पक्ष कंपनीने तक्रारकर्तीच्‍या विमा प्रस्‍तावावर कुठलाही निर्णय न घेतल्‍यामुळे तक्रारकर्तीला मंचासमोर यावे लागले. त्‍याचप्रमाणे विरुध्‍द पक्ष 1 कंपनीने तक्रारकर्तीकडून कागदपत्रे प्राप्‍त झाल्‍यावर सदर कागदपत्रे विरुध्‍द पक्ष 2 विमा कंपनीला उशिराने पाठविली ही देखील विरुध्‍द पक्ष 1 च्‍या सेवेतील त्रुटी आहे. जर वि.प. क्रं. 1 ने योग्‍य प्रकारे व उचित वेळेस तसेच प्रस्‍ताव उशिरा पाठविल्‍याचे सबळ कारणासह वि.प. 2 कडे विमा प्रस्‍ताव पाठविला असता तर त.क.चा विमा दावा नामंजूर झाला नसता. वि.प. 1 ने केलेल्‍या उशिरामुळे तक्रारकर्तीस सदर मंचासमोर तक्रार दाखल करावी लागली, त्‍यामुळे तक्रारकर्तीला निश्चितच शारीरिक, मानसिक त्रास  झालेला आहे. त्‍याचे स्‍वरुप पाहता या सदराखाली तक्रारकर्तीला शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 6,000/-मंजूर करणे मंचाला योग्‍य वाटते.

     वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

आदेश

1      तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2    विरुध्‍द पक्ष 2 ने अपघात विमा योजने अंतर्गत मिळणा-या लाभाची रक्‍कम रु.2,00,000/- व त्‍यावर तक्रार दाखल तारखेपासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम तक्रारकर्त्‍यांच्‍या हातात पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याजासह द्यावी. 

3    विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 ने वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्तीस झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.6,000/- द्यावेत.

4    मा.सदस्‍यांसाठीच्‍या ‘ब’ व ‘क’ फाईल्‍स संबंधितांनी परत घेवून जाव्‍यात.

5   निकालपत्राच्‍या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्‍तव व उचित कार्यवाही करिता पाठविण्‍यात याव्‍यात.

      

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.