::: आदेश निशाणी क्र.1 वर ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 11.10.2011) 1. अर्जदाराने सदर दरखास्त, आममुखत्यार श्री शेख शरीफ शेख रफीक मार्फत, ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत कलम 27 अन्वये दाखल करुन, गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्द जास्तीत-जास्त शिक्षा ठोकावण्यात यावी व प्रत्येकी रुपये 10,000/- दंड ठोकावण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
2. अर्जदार हिने सदर दरखास्त ही पॉवर ऑफ अटर्नी मार्फत सादर केलेली आहे. परंतु, मुळ तक्रार क्र.42/2010 आदेश दि.4.11.2010 मध्ये कुठलाही आममुखत्यार नाही. अर्जदाराचे नावाने आदेश झालेला आहे. परंतु, प्रस्तुत दरखास्त ही आममुखत्यारा मार्फत ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 27 नुसार दाखल केलेली आहे. फौजदारी स्वरुपाची दरखास्त आममुखत्यार मार्फत दाखल केली असल्याने तांञीक अडचण येईल म्हणून ही दरखास्त परत घेवून, नवीन दरखास्त दाखल करु इच्छित असल्यामुळे मामला परत घेण्यास परवानगी मिळण्याचा अर्ज नि.6 सादर केला. सदर दरखास्त व अर्ज हा आममुखत्यारामार्फत सादर केलेला असल्याने अर्जदारास ही तक्रार परत घेण्याची परवानगी देणे न्यायोचीत होईल. 3. अर्जदार यांनी नि.6 चे अर्जात सदस्य संच व गै.अ.च्या संचाची प्रत ची मागणी केलेली आहे. अर्जदाराने दरखास्त ही परत घेतली असल्याने सदस्य संच आणि गै.अ.चा संच परत करणे न्यायसंगत होईल, सबब अर्जदाराची दरखास्त परत घेतल्यामुळे अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची दरखास्त परत घेतल्यामुळे खारीज. (By way of withdrawal ) (2) अर्जदारास आदेशाची प्रत देण्यात यावी. (3) अर्जदारास सदस्य संच आणि गैरअर्जदाराचे संच परत करण्यांत यावे. चंद्रपूर, दिनांक : 11/10/2011. |