Maharashtra

Bhandara

CC/19/10

SHRI. MANOJ YASHWANT CHINDHALORE - Complainant(s)

Versus

SAHARA CREDIT CO-OPERATIVE SOCIETY LTD - Opp.Party(s)

ADV SOURABH C GUPTA

04 Apr 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/10
( Date of Filing : 15 Jan 2019 )
 
1. SHRI. MANOJ YASHWANT CHINDHALORE
R/O MANOJ MEDICALS AT VILLAGE AND PO THANA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SAHARA CREDIT CO-OPERATIVE SOCIETY LTD
OPPOSITE RANGARI NURSING HOME NEAR ASRA SERVICE CENTRE RAJIV GANDHI CHOWK BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
2. SAHARA Q OLD MART LTD
REGD.OFFICE SAHARA INDIA BHAWEAN 1 KAPOORTHALA COMPLEX ALIGANJ LUCKNOW
LUCKNOW
UTTER PRADESH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 04 Apr 2022
Final Order / Judgement

                           (पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी.योगी, मा.अध्‍यक्ष)

                                                                                      (पारीत दिनांक-04 एप्रिल, 2022)

 

01.  तक्रारकर्ता यांनी प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं 1  व 2 अनु्क्रमे सहारा क्रेडीट को-आपॅरेटीव्‍ह सोसायटी आणि सहारा क्‍यू गोल्‍ड मार्ट लिमिटेड यांचे विरुध्‍द  विरुध्‍दपक्ष क्रं 2 कंपनीचे गोल्‍ड परचेसिंग योजने मध्‍ये जमा केलेली रक्‍कम व्‍याजासह परत मिळावी व इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी  जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.

 

02.   तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

 

     तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे त्‍योन विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांचे भंडारा येथील शाखेत पावती क्रं-912003949526 अन्‍वये दिनांक-04.01.2013 रोजी रक्‍कम जमा केली आणि त्‍याची परिपक्‍वता तिथी दिनांक-04.01.2018 असून परिपक्‍व तिथीस त्‍याला रुपये-59,200/- मिळणार होते. परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांचेकडे वारंवार भेटी देऊन मागणी केल्‍या नंतरही त्‍यांनी आश्‍वासित केल्‍या प्रमाणे परिपक्‍व रक्‍कम दिली नाही. तक्रारकर्त्‍याने दिनांक-06.08.2018 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांचे शाखा कार्यालयात भेट दिली असता त्‍यांनी मूळ प्रमाणपत्र ठेऊन घेतले आणि रेव्‍हेन्‍यू स्‍टॅम्‍प पेपरवर तक्रारकर्त्‍याची सही घेतली तसेच दोन फोटो आणि आधार कार्डची झेरॉक्‍स घेतली परंतु रक्‍कम परत केली नाही. विरुध्‍दपक्ष यांनी लेखी स्‍वरुपात दिनांक-06.12.2018 नंतर रक्‍कम घेऊन जावी असे कळविले., त्‍या नुसार तक्रारकर्त्‍याने दिनांक-07.12.2018 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांचे कार्यालयात भेट दिली परंतु रक्‍कम दिली नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला. तक्रारकर्त्‍याचा औषधी विक्रीचा व्‍यवसाय आहे. विरुध्‍दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे त्‍याला आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला दिनांक-08.12.2018 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून रकमेची व खर्चाची मागणी केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारकर्त्‍याने परिपक्‍व दिनांक-04.01.2018 रोजी देय रक्‍कम रुपये-59,200/- अधिक दिनांक-04.01.2018 पासून  एक वर्षा करीता मासिक 24 टक्‍के दराने चक्रवाढ व्‍याज रुपये-15,879.91 पैसे अधिक मानसिक त्रास आणि नोटीस खर्च रुपये-2,25,000/- अधिक तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- असे मिळून एकूण रुपये-3,10,079.91 पैसे नुकसान भरपाईची मागणी केली असून सदर एकूण नुकसान भरपाईचे रकमेवर तक्रार दाखल दिनांका पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेाते मासिक 24 टक्‍के दराने चक्रवाढ व्‍याजाची मागणी केली. म्‍हणून शेवटी तक्रारकर्त्‍याने जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षां विरुध्‍द खालील प्रकारे मागण्‍या केल्‍यात-

 

अ.     विरुध्‍दपक्ष यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्त्‍यास रुपये-3,10,079.91 पैसे एवढी रक्‍कम आणि सदर रकमेवर तक्रार दाखल दिनांका  पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष  अदायगी पावेतो मासिक 24 टक्‍के दराने चक्रवाढ व्‍याज विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्त्‍यास देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

ब.    सदर तक्रारीचा खर्च विरुध्‍दपक्ष यांचे वर बसविण्‍यात यावा.

 

क    या शिवाय परिस्थितीजन्‍य योग्‍य ती दाद त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

03.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट सोसायटी लिमिटेड शाखा भंडारा यांनी लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं 1 यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्‍याने क्‍यु गोल्‍ड बॅंक योजनेत सहारा क्‍यु गोल्‍ड मार्ट लिमिटेड कंपनी मध्‍ये जमा केले होते परंतु त्‍याने चुकीने विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट सोसायटी मध्‍ये पैसे जमा केल्‍याचे  नमुद केलेले आहे. वस्‍तुतः विरुध्‍दपक्ष क्रं 1 सोसायटी आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा क्‍यु गोल्‍ड मार्ट लिमिटेड कंपनी यांचा एकमेकांशी कोणताही  कायदेशीर संबध नसून विरुध्‍दपक्ष क्रं 1 ला सोसायटीचा वैध दर्जा आहे, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विरुध्‍द चालू शकत नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 क्रेडीट सोसायटी मध्‍ये कोण्‍तीही रक्‍कम जमा केलेली नाही त्‍यामुळे त्‍यांची रक्‍कम परत करण्‍याची कोणतीही जबाबदारी येत नाही वा तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 सोसायटी मध्‍ये रक्‍कम जमा केल्‍या बाबत कोणतेही दस्‍तऐवज दाखल केलेले नाहीत. तक्रारकर्त्‍याची  संपूर्ण तक्रार ही चुकीची व तथ्‍यहिन आहे. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार खर्चासह खारीज व्‍हावी अशी विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट सोसायटीव्‍दारे करण्‍यात आली.

 

04.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा क्‍यू गोल्‍ड मार्ट लिमिटेड कंपनी तर्फे लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करण्‍यात आले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा क्‍यू गोल्‍ड बॅंकेत रक्‍कम जमा केली असतना विनाकारण विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट सोसायटीला तक्रारीत प्रतिपक्ष केलेले आहे, सबब तक्रार या कारणास्‍तव खारीज व्‍हावी. विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनीचे कार्यालय लखनऊ येथे असल्‍याने जिल्‍हा ग्राहक आयोग भंडारा यांना सदर तक्रार चालविण्‍याचे कार्यक्षेत्र येत नाही. तक्रारकर्त्‍याने सहारा गोल्‍ड योजने मध्‍ये रक्‍कम गुंतवणूक करताना त्‍यास योजनेच्‍या संपूर्ण अटी व शर्ती समजावून सांगितल्‍या होत्‍या आणि त्‍यानंतर त्‍याने कंपनीशी करार केला होता. सदर करारा प्रमाणे कलम 16 प्रमाणे काही विवाद उदभवल्‍यास लवादाची सोय करण्‍यात आलेली आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाच्‍या क्‍यू गोल्‍ड बॅंक योजने मध्‍ये 20 ग्रॅम सोन्‍याची नोंदणी केली होती. तक्रारकर्त्‍याने मुदती ठेवी मध्‍ये कुठलीही रक्‍कम जमा केली नव्‍हती वा जमा केलेल्‍या रकमेची परिपक्‍व तारीख ठरलेली नव्‍हती ही बाब पावती वरुन दिसून येते. त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही तसेच अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तक्रारकर्ता हा व्‍याजाची रक्‍कम तसेच तक्रारीचा खर्च आणि नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाही. तक्रारकर्त्‍यास योजनेच्‍या अटी व शर्ती प्रमाणे फक्‍त रुपये-56,980/- एवढी रक्‍कम देय आहे, या शिवाय ईतर कोणतीही नुकसान भरपाईची रक्‍कम, तक्रारीचा खर्च व्‍याजाची रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाही.  विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी क्‍यू गोल्‍ड बॅंक योजना सुरु केली होती, सदर योजने प्रमाणे मुदत पाच वर्षाची होती आणि पाच वर्षा नंतर नोंदणी केलेले सोने मिळणार होते. सदर योजने मध्‍ये नोंदणीचे वेळी डिस्‍काऊंटचा लाभ  संबधितास मिळणार होती. तसेच पाच वर्षाचे मुदती नंतर सोन्‍याचे नाणे अथवा सोन्‍याचे दागीने मिळणार होते.  तक्रारकर्त्‍याने नोंदणी केल्‍याने सोन्‍या संबधात बाजार भावा प्रमाणे 62.5 टक्‍के रक्‍कम देण्‍याचे मान्‍य केले होते आणि त्‍याला नोंदणी केलेल्‍या सोन्‍याचे बाजारभावावर 37.5 टक्‍के डिस्‍काऊंट देय होता. सदर योजने  प्रमाणे  पाच वर्षाचे मुदती नंतर ग्राहकास सोन्‍याचे नाणे अथवा सोन्‍याचे दागीने मिळणार होते. तक्रारकर्त्‍याने दिनांक-04.01.2013 रोजीच्‍या पावती प्रमाणे विरुध्‍दपक्षाचे योजने मध्‍ये 20 ग्रॅम सोन्‍याची नोंदणी केली होती आणि नोंदणीचे वेळी सदर
नोंदणी केलेल्‍या सोन्‍याची किम्‍मत रुपये-59,200/- होती आणि सदर रुपये-59,200/- सोन्‍याच्‍या किमतीवर 37.5 टक्‍के डिस्‍काऊंट तक्रारकर्त्‍याला मिळणार होता त्‍याप्रमाणे 37.5 टक्‍के डिस्‍काऊंटची रक्‍कम रुपये-22,200/- येते. सदर डिस्‍काउंट रकमेची वजावट केल्‍या नंतर तक्रारकर्त्‍याने प्रत्‍यक्षा विरुध्‍दपक्षाचे क्‍यू गोल्‍ड बॅंक योजने मध्‍ये फक्‍त रुपये-37,000/- एवढीच रक्‍कम जमा केली होती. योजने प्रमाणे तक्रारकर्त्‍यास पाच वर्षाचे मुदती नंतर जी रुपये-59,200/- रक्‍कम मिळणार होती त्‍यावर भारतीय आयकर कायदया नुसार रुपये-22,200/- व्‍याजाचे रकमेवर रुपये-2220/- आयकर भरावा लागत होता परंतु तक्रारकर्त्‍याने आयकराची रककम हिशोबात न घेता संपूर्ण रक्‍कम रुपये-59,200/- ची मागणी केली., जेंव्‍हा की आयकराची रक्‍कम वजावट केल्‍या नंतर तक्रारकर्ता हा रुपये-56,980/- एवढी रक्‍कम मिळण्‍यास पात्र होता. या रकमे शिवाय तक्रारकर्ता ईतर कोणतीही व्‍याजाची रककम, नुकसान भरपाईची रक्‍कम आणि व्‍याजाची रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाही. तक्रारकर्त्‍याची तक्रार चालू शकत नाही सबब ती खर्चासह खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा क्‍यू गोल्‍ड मार्ट  कंपनी तर्फे करण्‍यात आली.

 

05.  प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये त.क. तर्फे वकील श्री सौरभ गुप्‍ता तर विरुध्‍दपक्षा तर्फे वकील श्री आर.ए.गुप्‍ते यांनी मौखीक युक्‍तीवादा बाबत पुरसिस दाखल केली. उभय पक्षां तर्फे दाखल दस्‍तऐवज, साक्षी पुरावे ईत्‍यादीचे अवलोकन जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे करण्‍यात आले त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष न्‍याय निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

 

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

01

तक्रारकर्ता हे  विरुदपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट सोसायटी आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनीचे  ग्राहक होतात  काय?

-होय-

 

 

 

 

 

 

 

02

तक्रारकर्ता  यांना योजने प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट सोसायटीचे मार्फतीने मागणी करुनही विरुध्‍दपक्ष क्रं 2  सहारा कंपनीने रक्‍कम  परत न केल्‍याने  दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

03

काय आदेश

अंतीम आदेशा नुसार

 

                                                                                       -कारणे व मिमांसा-

मुद्दा क्रं 1

 

06.   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा क्‍यू गोल्‍ड मार्ट लिमिटेड, लखनऊ, उत्‍तरप्रदेश यांचे  गोल्‍ड खरेदी योजने मध्‍ये सोने खरेदी बाबत नोंदणी केली होती आणि सदर नोंदणी ही विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा क्रेडीट सोसायटी, शाखा भंडारा यांचे मार्फतीने केली होती ही बाब सिध्‍द होते याचे कारण असे आहे की, तक्रारकर्त्‍याने शाखा मॅनेजर, सहारा इंडीया परिवार शाखा भंडारा यांना योजने प्रमाणे रकमेची मागणी करणारे जे पत्र दिनांक-06.08.2018 रोजीचे दिले त्‍या पत्रावर ते मिळाल्‍या बाबत पाराशर पी. पांडे, सेक्‍टर वर्कर कोड क्र-121100140 भंडारा सेक्‍टर असा शिक्‍का असून स्‍वाक्षरी आहे आणि सदर पत्रावर यह पेमेंट चार माह बाद दिनांक-06.12.2018 असे सुध्‍दा नमुद केलेले आहे, याचाच अर्थ असा आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनी लखनऊ उत्‍तरप्रदेश या कंपनीचे कामकाज हे विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा क्रेडीट सोसायटी, भंडारा यांचे मार्फतीने होत होते. थोडक्‍यात तक्रारकर्त्‍याने जरी विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनीचे सोने खरेदी योजने मध्‍ये रकमेची गुंतवणूक केली तरी सदरचा व्‍यवहार हा विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट सोसायटी भंडारा या स्‍थानिक सोसायटीचे मार्फतीने केलेला असल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 सोसायटीने सेवा दिलेली आहे आणि त्‍यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा सोसायटी  व  विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनी  यांचे “ग्राहक”होत असल्‍याने आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

 

07.   “Arbitration Clause” &  “Consumer Disputesया संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे खालील मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडयांचा आधार घेण्‍यात येतो-

 

         Hon’ble State Consumer Disputes Redressal    Commssion, Chandigarh- CC/1116/2019 “RAKESH SINGH-VERSUS-SAHARA CREDIT CO OPERATIVE SOCIETY LTD”  Decided on 30th June, 2021सदर प्रकरणा मध्‍ये मा. राज्‍य ग्राहक आयोगाने विविध मा.सर्वोच्‍च न्‍यायालय आणि मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयांचा आधार घेऊन सहकारी सोसायटीने दोषपूर्ण सेवा दिली असल्‍यास असे प्रकरण हे “ग्राहक वादात अंर्तभूत होते” असा निर्वाळा दिलेला आहे.

      त्‍याच बरोबर सदर निवाडया मध्‍ये पुढील मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचा आधार घेतलेला आहे- Hon’ble National Commission                         CC-701/2015 “SINGH-VERSUS- EMAAR MGF LAND LTD” Decided on 13/07/2017 सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडया मध्‍ये पुढील प्रमाणे नमुद आहे- An Arbitration clause in the Agreement between the parties cannot circumscribe the Jurisdiction of a Consumer For a which has been upheld by the Hon’ble  Supreme Court in “EMAAR MFG LAND LTD.-VERSUS- AFTAB SINGH” Vide order dated-13/02/2018 in Civil Appeal Bearing No.-23512-23513 of 2017

 

मुद्दा क्रं 2 व क्रं 3 बाबत-

08   विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट सोसायटी, भंडारा यांनी लेखी उत्‍तरात असा आक्षेप घेतला की, त्‍यांचा विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा क्‍यू गोल्‍ड मार्ट कंपनी लिमिटेड, लखनऊ या कंपनीशी कोणताही संबध नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 1 क्रेडीट  सोसायटी भंडारा यांना कायदया नुसार  वैध दर्जा आहे. परंतु वर नमुद केल्‍या प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनी ही जरी लखनऊ उत्‍तर प्रदेशची असली तरी तिचे भंडारा जिल्‍हयातील स्‍थानिक स्‍तरावरील काम हे विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट सोसायटीचे मार्फतीने चालत आहे ही बाब वर नमुद केल्‍या प्रमाणे दस्‍तऐवजी पुराव्‍या वरुन सिध्‍द झालेली आहे त्‍यामुळे विरुध्‍दपक्षाचे याही आक्षेपात कोणतेही तथ्‍य जिल्‍हा ग्राहक आयोगास दिसून येत नाही.  

 

09   विरुध्‍दपक्ष क्रं-2 सहारा क्‍यू गोल्‍ट मार्ट कंपनीने आपले लेखी उत्‍तरात असे नमुद केले की तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाच्‍या क्‍यू गोल्‍ड बॅंक योजने मध्‍ये 20 ग्रॅम सोन्‍याची नोंदणी केली होती. तक्रारकर्त्‍याने जमा केलेली रक्‍कम मुदती ठेवी मध्‍ये जमा केली नव्‍हती वा जमा केलेल्‍या रकमेची परिपक्‍व तारीख ठरलेली नव्‍हती ही बाब पावती वरुन दिसून येते, विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनीचे सदरचे म्‍हणण्‍यात जिल्‍हा ग्राहक आयोगास तथ्‍य दिसून येते. याचे कारण असे आहे की, तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनीचे गोल्‍ड खरेदी योजने मध्‍ये दिनांक-04.11.2013 जी रक्‍कम जमा केलेली आहे त्‍या बाबतची पावती अभिलेखावर दाखल केली, त्‍यावरुन असे दिसून येते की, सदर पावतीचा क्रं-912003949526 असा नमुद असून PARTICULAR ADVANCE BOOK/PURCHASE ON GOLD BANK  असे पावतीवर नमुद आहे. याचाच अर्थ असा आहे की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनीचे गोल्‍ड योजने मध्‍ये सोने खरेदी करीता रक्‍कम जमा केली होती. सदर पावती मध्‍ये 22 कॅरेटचे 20.00 ग्रॅम सोने खरेदी करीता तक्रारकर्त्‍याने नोंदणी केली होती आणि नोंदणीचे वेळी 20.00 ग्रॅम सोन्‍याची किम्‍मत ही रुपये-59,200/- दर्शविलेली असून पावतीवर डिस्‍काऊंट अमाऊंटची रक्‍कम रुपये-22,200/- दर्शविलेली असून सदर डिस्‍काऊंट रकमेची सोन्‍याचे किमती मधून वजावट केल्‍या नंतर उर्वरीत रक्‍कम रुपये-37,000/- तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षा कडे जमा केल्‍याचे पावतीवर नमुद आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनीचे लेखी उत्‍तरा प्रमाणे सहारा गोल्‍ड योजनेचा लॉकींग पिरियेड हा पाच वर्षासाठीचा होता आणि तक्रारकर्त्‍यास  योजनेच्‍या सर्व अटी व शर्ती समजावून सांगितल्‍या होत्‍या. तक्रारकर्त्‍याने जमा केलेल्‍या रकमेची सर्वप्रथम लेखी मागणी ही दिनांक-06.08.2018 रोजी केलेली आहे, याचाच अर्थ पाच वर्षाचे लॉकींग पिरियेडची माहिती तक्रारकर्त्‍याला होती. विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनीचे लेखी उत्‍तरा प्रमाणे नोंदणी केलेल्‍या सोन्‍याच्‍या किमतीवर 37.5 टक्‍के डिस्‍काऊंट तक्रारकर्त्‍याला मिळणार होता ही बाब पावती वरुन सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याने
विरुध्‍दपक्ष क्रं 2  सहारा गोल्‍ड कंपनीचे सोने खरेदी मध्‍ये दिनांक-04.01.2013 रोजी नोंदणी केली होती, योजनेचा पाच वर्षाचा लॉकींग पिरियेड लक्षात घेतल्‍यास सदर नोंदणी केलेल्‍या सोन्‍याची रक्‍कम गोल्‍ड क्‍वाईनचे स्‍वरुपात 04.01.2018 रोजी मिळणार होती. तक्रारकर्त्‍याने योजने मध्‍ये गुंतवणूक केलेल्‍या रकमेची सर्वप्रथम मागणी विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट सोसायटीचे मार्फतीने दिनांक-06.08.2018 रोजी लेखी अर्जाव्‍दारे केली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने अधिवक्‍ता यांचे मार्फतीने दिनांक-08.12.2018 रोजी कायदेशीर नोटीस रजिस्‍टर पोस्‍टाने दोन्‍ही विरुध्‍दपक्षांना पाठविल्‍या बाबत पुराव्‍या दाखल नोटीसची प्रत आणि रजि. पोस्‍टाच्‍या पावत्‍यांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत परंतु आज पर्यंत जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल करुन सुध्‍दा विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा गोल्‍ड कंपनीने तक्रारकर्त्‍यास योजने प्रमाणे लाभ दिलेला नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा प्रमाणे सोन्‍याच्‍या किमतीवर 37.5 टक्‍के डिस्‍काऊंट तक्रारकर्त्‍याला मिळणार होता त्‍याप्रमाणे 37.5 टक्‍के डिस्‍काऊंटची रक्‍कम रुपये-22,200/- येते. योजने प्रमाणे तक्रारकर्त्‍यास पाच वर्षाचे मुदती नंतर जी रुपये-59,200/- रक्‍कम मिळणार होती त्‍यावर भारतीय आयकर कायदया नुसार रुपये-22,200/- व्‍याजाचे रकमेवर रुपये-2220/- आयकर भरावा लागत होता परंतु तक्रारकर्त्‍याने आयकराची रककम हिशोबात न घेता संपूर्ण रक्‍कम रुपये-59,200/- ची मागणी केली., जेंव्‍हा की आयकराची रक्‍कम वजावट केल्‍या नंतर तक्रारकर्ता हा रुपये-56,980/- एवढी रक्‍कम मिळण्‍यास पात्र होता, विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा गोल्‍ड कंपनीचे उत्‍तरात जिल्‍हा ग्राहक आयोगास तथ्‍य दिसून येत नाही याचे  कारण असे आहे की, जी काही रक्‍कम मिळणार आहे ती तक्रारकर्त्‍याला मिळणार आहे आणि मिळालेल्‍या रकमेवर आयकर भरण्‍याची जबाबदारी ही तक्रारकर्त्‍याची आहे. योजनेची पावती, योजनेच्‍या अटी व शर्ती दस्‍तऐवजाचे अवलोकन केल्‍या नंतर सोने खरेदी योजने प्रमाणे पाच वर्षाच्‍या लॉकींग पिरियेड नंतर तक्रारकर्त्‍याला दिनांक-04.01.2018 रोजी रुपये-59,200/- एवढी रक्‍कम  विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनी कडून देय होती परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट सोसायटीचे मार्फतीने तसेच रजि. कायदेशीर नोटीसव्‍दारे मागणी करुनही आणि प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुनही तक्रारकर्त्‍याला त्‍याने सोने खरेदी योजने मध्‍ये गुंतवणूक केलेली रक्‍कम देय लाभांसह मिळालेली नाही, त्‍यामुळे विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याची बाब सिध्‍द होते. या सर्व प्रकारा मध्‍ये तक्रारकर्त्‍यास निश्‍चीतच आर्थिक, शारिरीक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी आल्‍याने मुद्दा क्रं 3 अनुसार   विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा सोसायटी आणि  विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनी कडून तक्रारकर्त्‍याला सोने खरेदी योजने प्रमाणे दिनांक-04.01.2018 रोजी देय रक्‍कम रुपये-59,200/- मंजूर करणे आणि सदर रकमेवर तक्रारकर्त्‍याने अर्जाव्‍दारे सर्व प्रथम केलेली मागणी दिनांक-06.08.2018 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्‍याच बरोबर विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला जो शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला त्‍या बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,000/- आणि कायदेशीर नोटीस व तक्रार खर्च म्‍हणून रुपये-7000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा सोसायटी आणि  विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनी कडून देण्‍याचे आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनी लखनऊ  यांचे  सोने खरेदीचे योजने मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट सोसायटी, भंडारा यांचे मार्फतीने रक्‍कम गुंतवणूक केली होती आणि त्‍यामुळे  विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कंपनी आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा सोसायटी भंडारा यांनी आदेशाचे अनुपालन करणे आवश्‍यक आहे, कारण या प्रकरणात विरुघ्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांची सारखीच जबाबदारी येते असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

10.     या ठिकाणी जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, या प्रकरणात  विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा कयू गोल्‍ड मार्ट लिमिटेड, लखनऊ उत्‍तरप्रदेश हे मुख्‍य कार्यालय असून  विरुध्‍दपक्ष क्रं 1  हे तिचेशी संलग्‍न  भंडारा येथील सहारा क्रेडीट को ऑपरेटीव्‍ह सोसायटीचे भंडारा येथील शाखा कार्यालय आहे आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड, भंडारा येथील रिजनल मॅनेजर, रिजनल ऑफीस, भंडारा हे काम पाहत आहेत आणि ते पगारी कर्मचारी असून त्‍यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट सोसायटी भंडारा तर्फे या प्रकरणात लेखी उत्‍तर दाखल केलेले आहे.  सदर अंतीम आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा सोसायटी आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा क्‍यू गोल्‍ड मार्ट लिमिटेड, लखनऊ उत्‍तरप्रदेश मुख्‍य कार्यालय  यांचे कडून होणे आवश्‍यक आहे आणि या प्रकरणात दोन्‍ही कार्यालयांची जबाबदारी येते कारण दोन्‍ही कार्यालये ही सहारा यांची आहेत.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 व विरुध्‍दपक्ष क्रं 2  अनुक्रमे शाखा कार्यालय व मुख्‍य कार्यालय यांचे कडून सदर अंतीम आदेशाची पुर्तता होण्‍याचे दृष्‍टीने आम्‍ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड, भंडारा येथील रिजनल मॅनेजर, रिजनल ऑफीस, भंडारा यांचे मार्फतीने अंतीम आदेशाची पुर्तता होण्‍यासाठी तेवढी मर्यादित जबाबदारी रिजनल मॅनेजर यांचेवर टाकीत आहोत त्‍यांनी जिल्‍हा  ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित होऊन त्‍यांचे सहीने सदर प्रकरणात  विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट सोसायटीचे वतीने लेखी उत्‍तर दाखल केलेले आहे तसेच  ते विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे वतीने भंडारा जिल्‍हयाचे भौगोलीक क्षेत्रात नौकरी करीत आहेत.

 

11.  वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-   

 

                                                                     ::अंतिम आदेश::

 

  1. तक्रारकर्ता श्री मनोजर यशवंत चिंधालोरे यांची तक्रार  विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट को ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड, भंडारा ही सोसायटी आणि सदर सोसायटीचे तेंव्‍हाचे आणि आताचे मालक/संचालक  तसेच  विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा क्‍यू गोल्‍ड मार्ट लिमिटेड, लखनऊ, उत्‍तर प्रदेश ही कंपनी आणि सदर कंपनीचे तेंव्‍हाचे आणि आताचे मालक/संचालक यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते. सदर अंतीम आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड, भंडारा येथील रिजनल मॅनेजर/सक्षम अधिकारी,  रिजनल ऑफीस, भंडारा यांचे मार्फतीने करावे.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट को ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड, भंडारा ही सोसायटी आणि सदर सोसायटीचे तेंव्‍हाचे आणि आताचे मालक/संचालक त्‍याच बरोबर विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा क्‍यू गोल्‍ड मार्ट लिमिटेड, लखनऊ, उत्‍तर प्रदेश ही कंपनी आणि सदर कंपनीचे तेंव्‍हाचे आणि आताचे मालक/संचालक यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या विरुध्‍दपक्ष क्रं 2 कंपनीचे सोने खरेदी योजने प्रमाणे तक्रारकर्त्‍यास  दिनांक-04.01.2018 रोजी देय रक्‍कम रुपये-59,200/- (अक्षरी रुपये एकोणसाठ हजार दोनशे फक्‍त) परत करावी आणि सदर रकमेवर तक्रारकर्त्‍याने रक्‍कम मागण्‍यासाठी सर्वप्रथम केलेला अर्ज दिनांक-06.08.2018 पासून ते रकमेच्‍या  प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने येणारी व्‍याजाची रक्‍कम तक्रारकर्त्‍यास दयावी.

 

  1. तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि कायदेशीर नोटीस व तक्रारीचा खर्च रुपये-7000/- (अक्षरी रुपये सात  हजार फक्‍त) अशा नुकसान भरपाईच्‍या रकमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट को ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड, भंडारा ही सोसायटी आणि सदर सोसायटीचे तेंव्‍हाचे आणि आताचे मालक/संचालक त्‍याच बरोबर विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा क्‍यू गोल्‍ड मार्ट लिमिटेड, लखनऊ, उत्‍तर प्रदेश ही कंपनी आणि सदर कंपनीचे तेंव्‍हाचे आणि आताचे मालक/संचालक यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या तक्रारकर्त्‍यास  दयाव्‍यात.

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट को ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड, भंडारा ही सोसायटी आणि सदर सोसायटीचे तेंव्‍हाचे आणि आताचे मालक/संचालक त्‍याच बरोबर विरुध्‍दपक्ष क्रं 2 सहारा क्‍यू गोल्‍ड मार्ट लिमिटेड, लखनऊ, उत्‍तर प्रदेश ही कंपनी आणि सदर कंपनीचे तेंव्‍हाचे आणि आताचे मालक/संचालक यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. सदर अंतीम आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या विरुध्‍दपक्ष क्रं 1 सहारा क्रेडीट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी लिमिटेड, भंडारा येथील रिजनल मॅनेजर/सक्षम अधिकारी,  रिजनल ऑफीस, भंडारा यांचे मार्फतीने करावे.

 

  1. निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध  करुन देण्‍यात याव्‍यात.

 

  1.  सर्व पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त फाईल्‍स त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्‍यात.

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.