जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 175/2012
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 27/06/2012
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 02/04/2014
1. बळवंत वामन नाईक व इतर,
उ.व.सज्ञान, धंदाः सी.ए.
दोघे रा.हरेश्वनगर, 11 रिंगरोड, महेश प्रगती मंडळ जवळ,
जळगांव, ता.जि.जळगांव. ........ तक्रारदार
विरुध्द
1. सहकार मित्र श्री.चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को ऑप क्रेडीट
सोसायटी लि, वरणगांव,जि.जळगांव. ..... विरुध्द पक्ष.
कोरम –
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष.
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
--------------------------------------------------
नि.क्र.1 वरीलआदेशव्दाराःश्री.चंद्रकांत मो.येशीराव, सदस्यः उपरोक्त तक्रार अर्जाचे कामी तक्रारदार व त्यांचे वकील माहे सप्टेंबर,2012 पासुन नेमलेल्या पुढील तारखांना सतत गैरहजर. तक्रारदाराने माहे सप्टेंबर,2012 पासुन तक्रार अर्जाचे कामी कोणत्याही स्टेप्स घेतलेल्या नाहीत. आज रोजी देखील नेमलेल्या तारखेस तक्रारदार व त्यांचे विधिज्ञांचा पुकारा केला असता ते आजही गैरहजर आहेत. तक्रारदाराची व त्यांचे वकीलांची प्रस्तुत कामी सततची गैरहजेरी पाहता तक्रारदारास त्याची तक्रार पुढे चालविण्यात काहीएक स्वारस्य राहीले नसल्याचे स्पष्ट होते. परिणामी तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,1986 च्या कलम 13(2)(सी) अन्वये त्याच्या अधिकारास बाधा न येता फेटाळण्यास पात्र आहे. यास्तव आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज तक्रारदाराच्या हक्कास बाधा न येता अंतिमरित्या निकाली
काढण्यात येतो.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 02/04/2014.
( श्री.चंद्रकांत मो.येशीराव) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.