जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २७/२०१२
तक्रार दाखल दिनांक – १७/०२/२०१२
तक्रार निकाली दिनांक – ३०/१०/२०१२
१. श्री. प्रभाकर वेडू पाटील ............ तक्रारदार
उ.वय-६८ वर्षे, धंदा – निवृत्त
२. सौ.शालीनी प्रभाकर पाटील
उ.वय-६२ वर्षे, धंदा – घरकाम
३. श्री. उमेश प्रभाकर पाटील
उ.वय-४२ वर्षे, धंदा – नोकरी
४. श्री. शैलेश प्रभाकर पाटील
उ.वय-३८ वर्षे, धंदा – नोकरी
५. सौ. मनिषा उमेश पाटील
उ.वय-३७ वर्षे, धंदा – घरकाम
६. सौ. मृणालिनी शैलेश पाटील
उ.वय-३२ वर्षे, धंदा – घरकाम
७. कु. ऐश्वर्या उमेश पाटील
उ.वय-१० वर्षे, धंदा – शिक्षण
वरील सर्व रा. देवकीनंदन कॉलनी, देवपूर, धुळे.
विरुध्द
सहकार मित्र श्री.चंद्रकांत हरी बढे सर ...........विरुध्द पक्ष अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि., वरणगांव,
जि. जळगांव शाखा-धुळे
(नोटीस ची बजावणी मॅनेजर यांच्यावर व्हावी)
१. श्री. विनोद कांदीले
रा. दत्तमंदिर चौक, देवपुर धुळे.
कोरम
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.एस.वाय. शिंपी)
(विरुध्दपक्ष तर्फे – अॅड.सौ.आर.आर. निकुंभ)
निकालपत्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम व बचत खात्यातील रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष सहकार मित्र श्री.चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अन्वये रक्कम गुंतविली होती त्याचा तपशील खालील प्रमाणे.
अ.क्र. |
ठेव पावती क्र. |
ठेव दिनांक |
ठेव रक्कम |
देय दिनांक |
व्याज दर |
देय रक्कम |
१ |
५२९४ |
११/०२/०६ |
२०,०००/- |
११/०२/१२ |
११.७५% |
रू.४०,००० |
२ |
५३८१ |
१०/०२/०६ |
२०,०००/- |
१०/०२/१२ |
११.७५% |
रू.४०,००० |
३ |
५३२५ |
१८/०१/०५ |
१०,०००/- |
१८/०१/१२ |
११% |
रू.२०,००० |
बचत खाते नं.
अ.क्र. |
बचत खाते क्रं. |
ठेव दिनांक |
व्याज दर |
देय रक्कम |
१ |
१२/१३१ |
०९/०८/१० |
६% |
रू.२,०५,९८३ |
२ |
११२२ |
३०/०८/१० |
६% |
रू.४०,३०५ |
३ |
१३/३७ |
३०/०८/१० |
६% |
रू.३५,३०५ |
४ |
११/२३ |
३०/०८/१० |
६% |
रू.४०,३०५ |
५ |
११/३४ |
३०/०८/१० |
६% |
रू.४०,३१२ |
६ |
११/९७ |
३०/०८/१० |
६% |
रू.३५,००० |
३. तक्रारदार यांनी मुदत ठेव व बचत खात्यात गुंतवलेल्या रकमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता पतसंस्थेने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडून मुदत ठेव पावती व बचत खाते यांवरील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
४. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद याचा विचार होता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय? होय.
२. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
४. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
५. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी मुदत ठेव पावत्या व बचत खाते यांच्या झेरॉक्स प्रती सादर केलेल्या आहेत. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावती व बचत खात्याची रक्कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावती व बचत खाते यातील रक्कम यांचा विचार होता तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
६. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते मध्ये रकमा गुंतवल्या होत्या ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावती व बचत खात्यातील गुंतवलेली रक्कम परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही विरुध्द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावती व बचत खाते यांची व्याजासह होणारी रक्कम श्री.चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. व विरूध्द पक्ष यांच्याकडून मिळावी अशी विनंती केली आहे. तक्रारदार श्री.चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. यांच्याकडुन रक्कम मिळण्यास पात्र आहे. तसेच रक्कम परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना श्री.चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. श्री.चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. यांच्या कडून अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- व मानसिक त्रासापोटी रु.१०००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
८. मुद्दा क्र.४ - सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. श्री.चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. यांनी तक्रारदार यांना खालील तपशीलात नमुद असलेल्या मुदत ठेव पावती व बचत खाते मधील मुदतअंती देय रक्कम ठरलेल्या व्याजदरानुसार व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत. मुदत ठेव पावतींचा व बचत खात्यांचा तपशील खालील प्रमाणे.
अ.क्र. |
ठेव पावती क्र. |
ठेव दिनांक |
ठेव रक्कम |
देय दिनांक |
व्याज दर |
देय रक्कम |
१ |
५२९४ |
११/०२/०६ |
२०,०००/- |
११/०२/१२ |
११.७५% |
रू.४०,००० |
२ |
५३८१ |
१०/०२/०६ |
२०,०००/- |
१०/०२/१२ |
११.७५% |
रू.४०,००० |
३ |
५३२५ |
१८/०१/०५ |
१०,०००/- |
१८/०१/१२ |
११% |
रू.२०,००० |
बचत खाते नं.
अ.क्र. |
बचत खाते क्रं. |
ठेव दिनांक |
व्याज दर |
देय रक्कम |
१ |
१२/१३१ |
०९/०८/१० |
६% |
रू.२,०५,९८३ |
२ |
११२२ |
३०/०८/१० |
६% |
रू.४०,३०५ |
३ |
१३/३७ |
३०/०८/१० |
६% |
रू.३५,३०५ |
४ |
११/२३ |
३०/०८/१० |
६% |
रू.४०,३०५ |
५ |
११/३४ |
३०/०८/१० |
६% |
रू.४०,३१२ |
६ |
११/९७ |
३०/०८/१० |
६% |
रू.३५,००० |
३. श्री.चंद्रकांत हरी बढे सर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.१०००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.
४. वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस. जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.