Maharashtra

Nagpur

CC/158/2019

ABHIJEET RAMESH MALOKAR - Complainant(s)

Versus

SAHAKAR AWAS INDIA LIMITED - Opp.Party(s)

ADV S. V. BHUTAADA

23 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/158/2019
( Date of Filing : 27 Feb 2019 )
 
1. ABHIJEET RAMESH MALOKAR
B1 302, THE CREST, SHIV SAI LANE, PIMPLE SAUDAGAR PUNE
PUNE
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SAHAKAR AWAS INDIA LIMITED
S.NO F/3, SHIVALIK APARTMENT, LUMBINI NAGAR, HINGNA ROAD, NAGPUR 440016 THROUGH ITS DIRECTOR SHRI RAMSHANKAR TULSIRAM DIWTE
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 23 Aug 2021
Final Order / Judgement

आदेश

(आदेश पारीत व्‍दारा- श्री सुभाष रा. आजने , मा. सदस्‍य)

  1.     विरुध्‍द पक्ष सहकार आवास इंडिया लिमी. या नावाने व्‍यवसाय करते. विरुध्‍द पक्षाने वर्तमान पञामध्‍ये प्‍लॉट चे वाटपाबाबत सन २००५ मध्‍ये जाहिरात दिली होती. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून त्‍याने तयार केलेल्‍या मौजा मांगली, तहसील हिंगना, जिल्‍हा नागपूर, खसरा क्रमांक १०७, पटवारी हलका क्रमांक ६१ येथील एकूण ८.६७ हेक्‍टर आर जागेवर पाडलेल्‍या लेआऊट मधील प्‍लॉट क्रमांक ३४८, एकूण क्षेञफळ १२५० चौरस फुट, प्रति चौरस फुट 18 प्रमाणे एकूण रुपये २२५००/- इतक्‍या रकमेत विकत घेण्‍याचा करार दिनांक २४/०४/२००५ रोजी विरुध्‍द पक्षाशी केला. करारानुसार तक्रारकर्त्‍याने कराराचे दिवशी विरुध्‍द पक्षाला अनामत रक्‍कम रुपये २२५००/- दिनांक २४/४/२००५ रोजी अदा केले. करारानुसार प्‍लॉटच्‍या विकसनाची रक्‍कम नगर रचना, नागपूर सुधार प्रन्‍यास किंवा शासकीय नियमानुसार संस्‍था ठरवेल त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याला मान्‍य करावी लागेल.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला माहिती पुरविली की, तो खसरा क्रमांक १०७, मौजा मांगली, तहसील हिंगना, जिल्‍हा नागपूर या जमिनीचा मालक आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला आश्‍वासीत केले की, नकाशाला मंजुरी मिळाल्‍यानंतर आणि इतर आवश्‍यक नगर रचना नागपूर सुधार प्रन्‍यास यांचे कडून मंजुरी मिळाल्‍यानंतर आणि जमीनीचे विकसन झाल्‍यानंतर त्‍यांची कंपनी सं‍बंधित प्‍लॉटधारकाला त्‍यांचे नावे विक्रीपञ करुन देईल. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला माहिती दिली की, सदरचे लेआऊट हे प्रस्‍तावित लेआऊट आहे आणि नियमाप्रमाणे ते मंजूर झाले नाही. त्‍यामुळे प्‍लॉटचे डायमेंशन मध्‍ये काही मायनर बदल होऊ शकतात.
  3. तक्रारकर्त्‍याने नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून प्‍लॉट खरेदी केला त्‍यावेळी विरुध्‍द पक्ष सहकार फायनांन्‍स अॅन्‍ड ईनवेस्‍टमेंट कंपनी या नावाने कार्यरत होती. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने सहकार फायनान्‍स अॅन्‍ड ईनवेस्‍टमेंट कंपनी चे नावात बदल करुन सहकार आवास इंडिया लिमी. या नावाने केला. कंपनीचे नावात बदल बाबतची सूचना दिनांक २७/९/२००७ चे वर्तमानपञात देण्‍यात आली.
  4. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला पञ दिनांक ०१/०४/२०१५ निर्गमित केले. त्‍यामध्‍ये विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून रक्‍कम मिळाल्‍याचे कबूल केले व सदर पञामध्‍ये विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला खसरा क्रमांक १०७/२ मध्‍ये प्‍लॉट क्रमांक ९३, एकूण क्षेञफळ ९६९ चौरस फुटाचे वाटप केल्‍याचे नमूद केले व विरुध्‍दपक्षाने प्‍लॉटचे विकसनापोटी एकूण रुपये १४६९०/- ची मागणी केली आणि प्‍लॉटचा ताबा देण्‍याचे नमुद केले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक धक्‍का बसला. विरुध्‍द पक्षाने प्‍लॉटचे जागेमध्‍ये सुध्‍दा बदल केला. (लोकेशन) तक्रारकर्त्‍याने करारनामा दि. 24.04.2005 प्रमाणे खसरा क्रं. 107 मधील प्‍लॉट क्रं. 348, एकूण क्षेत्रफळ 1250 चौ.फु. ची संपूर्ण किंमत रुपये 22,600/- दिली आहे. तक्रारकर्त्‍याने कराराचे पालन करुन ही विरुध्‍द पक्षाने करारातील शर्ती व अटीचे पालन केले नाही.
  5. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचे कार्यालयाला गेला व त्‍याने नवीन प्‍लॉटचे वाटपाचे व्‍यवहाराला (Transaction) आक्षेप घेतला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला आश्‍वासीत केले की, जर तक्रारकर्त्‍याला नव्‍याने वाटप करण्‍यात आलेला प्‍लॉट क्रमांक ९३ स्‍वीकृत नसेल तर तक्रारकर्ता  विरुध्‍द पक्षाच्‍या दुस-या लेआऊट स्‍कीममधील तेवढयाच क्षेञफळाचा प्‍लॉट घेवू शकतो. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सांगितले की, विरुध्‍द पक्ष त्‍यांचे दुस-या स्‍कीम मधील उपलब्‍ध असलेला दुसरा प्‍लॉट तपासेल व त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याला कळवेल. तक्रारकर्त्‍याने त्‍यानंतर अनेकदा प्‍लॉटचे वाटप करण्‍याबाबत विरुध्‍द पक्षाकडे फे-या केल्‍या परंतु प्रत्‍येक वेळेस विरुध्‍द पक्षाने लवकरात लवकर प्‍लॉट देण्‍याचे आश्‍वासीत केले. त्‍यानंतर तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात माहे  जुन २०१७ मध्‍ये गेला,  त्‍यावेळी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍यांचे दुसरे लेआऊट मधील प्‍लॉट एकूण क्षेञफळ १२५० चौरस फुट उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत असमर्थता दर्शविली व खसरा क्रमांक १०७/२ मधील प्‍लॉट क्रमांक ९३ करिता   अधिकची रक्‍कम जमा करुन स्‍वीकृत करण्‍यास इंसिस्‍ट केले. परंतु तक्रारकर्त्‍याने तसे करण्‍यास नकार दिला त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कोणताही प्‍लॉट वाटप करण्‍यास नकार दिला. तक्रारकर्त्‍याने आजच्‍या बाजारभावाप्रमाणे प्‍लॉटची किंमती मागितली व विरुध्‍द पक्षाने देण्‍यास नकार दिला.
  6.  त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍या सोबत केलेल्‍या धोखाखडीमुळे माहिती घेण्‍यास सुरवात केली. त्‍यावेळी त्‍याच्‍या लक्षात आले की, ज्‍यावेळी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाशी मौजा मांगली, खसरा क्रमांक १०७ येथील खरेदीबाबत दिनांक 24/05/2005 रोजी करारनामा केला त्‍यावेळी मौजा मांगली येथील खसरा क्रमांक १०७ चा विरुध्‍द पक्ष मालक नव्‍हता. विक्रीपञ करारनाम्‍यानंतर खसरा क्रमांक १०७ वर्ग २ मधून वर्ग क्रमांक १ मध्‍ये बदल करण्‍यात आले. (Conversion) आणि त्‍यांचे दोन खस-यामध्‍ये १०७/१, १०७/२ रुपांतर करण्‍यात आले. त्‍यापैकी विरुध्‍द पक्षाने खसरा क्रमांक १०७/२, एकूण क्षेञफळ ४.६२ हेक्‍टर आर सन २००९ मध्‍ये विकत घेतला व उर्वरीत जमीन खसरा क्रमांक १०७/१, एकूण क्षेञफळ ४.०५ हेक्‍टर आर इतर दुस-या व्‍यक्तिने माहे २०१० मध्‍ये विकत घेतली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला ञुटीपूर्ण सेवा दिल्‍यामुळे त्‍याने  मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला ञुटीपूर्ण सेवा दिल्‍याचे घोषित करावे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मौजा मांगली, प्‍लॉट क्रमांक ३४८, एकूण क्षेञफळ १२५० चौरस फुट चे विक्रीपञ करुन द्यावे व प्‍लॉटचा ताबा द्यावा किंवा तक्रारकर्त्‍याला प्‍लॉटची किंमत रुपये १०,००,०००/- देण्‍याचे आदेशीत करावे व मानसिक व शारीरिक ञासाकरिता व तक्रारीचा खर्च अदा करावा.

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार मा. मंचासमोर दिनांक २१/०२/२०१९ रोजी दाखल केली. सदरचे प्रकरण मा. मंचासमोर दाखल सुनावणीकरिता दिनांक ७/३/२०१९,   05.04.2019,  25.04.2019, २९/६/२०१९, १०/७/२०१९, ६/८/२०१९, ९/९/२०१९, २३/९/२०१९, १८/१०/२०१९, २०/११/२०१९, १०/१२/२०१९ ला ठेवण्‍यात आले होते. त्‍यानंतर दिनांक १६/१/२०२० रोजी तक्रारकर्त्‍याचे वकील श्री भुरे यांनी वकालतनामा मागे घेण्‍याचा परवानगीचा अर्ज मा. मंचासमोर सादर केला व सदरचा अर्ज मंचाने मंजूर केला. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याला मंचामार्फत दिनांक २१/१/२०२० रोजी नोटीस काढण्‍यात आली व त्‍याव्‍दारे तक्रारकर्त्‍याला दिनांक २५/२/२०२० रोजी ठिक ११.०० वाजता मंचात हजर राहण्‍याबाबत सूचित करण्‍यात आले. परंतु तक्रारकर्ता  किंवा त्‍याचे प्रतिनिधी मंचात दिनांक  २५/२/२०२० रोजी हजर झाले नाही. त्‍यानंतर तक्रारकर्ता सलग दिनांक १३/११/२०२०, १/३/२०२०, १/४/२०२१, २९/४/२०२१, ९/६/२०२१, २६/७/२०२१, १०/८/२०२१ ला सतत मंचात गैरहजर राहिले. तक्रारकर्ता  प्रकरण चालविण्‍यास उत्‍सुक नसल्‍याचे दिसून आले. ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३८(३)(c) नुसार  तक्रारकर्तीचे प्रकरणाचा गुणवत्‍तेवर निकाल देणे गरजेचे होते., परंतु तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला नोटीस बजाविली नाही व त्‍यांच्‍या विरुध्‍द कार्यवाही कली नाही, त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाला संधी मिळाली नाही.

           सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत आदेश नाही.
  3. उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.