Maharashtra

Sangli

CC/11/46

YASHWANT CHIMAJI MANE - Complainant(s)

Versus

SAGARESHWAR G B S S P S LTD,DEVRASHTRE - Opp.Party(s)

AD MAINDARGI

30 Sep 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/11/46
 
1. YASHWANT CHIMAJI MANE
A/P KASEGAON,TAL-WALWA
SANGLI
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SAGARESHWAR G B S S P S LTD,DEVRASHTRE
DEVRASHTRE,TAL-KADEGAON
SANGLI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:AD MAINDARGI, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

 
                                           नि.नं. ३१
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
 
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
 
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ४६/२०११
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख      २१/२/२०११
तक्रार दाखल तारीखः  २३/२/२०११                 
निकाल तारीखः      - ३०/०९/२०११
----------------------------------------------
 
श्री यशवंत चिमाजी माने
वय वर्षे ७५, धंदा सेवानिवृत्‍त
रा.मु.पो. कासेगाव ता.वाळवा जि.सांगली                        .... तक्रारदार
विरुध्‍द
 
१. सागरेश्‍वर ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्‍था मर्या. देवराष्‍ट्रे
    रजि.नं. SAN/MVA/RSR/CR/1253
    ता. कडेगाव जि. सांगली
 
२. श्री अशोकराव भाऊसो महिंद, चेअरमन
    वय-सज्ञान, धंदा-नोकरी
    रा.देवराष्‍ट्रे, ता.कडेगाव जि. सांगली
 
३. श्री बबन तुकाराम शेजवळे, व्‍हा.चेअरमन
    वय-सज्ञान, धंदा-नोकरी
    रा.रिंग रोड, इस्‍लामपूर ता.वाळवा जि. सांगली
 
४. श्री धनाजी तुकाराम पाटील, संचालक
    वय-सज्ञान, धंदा-नोकरी
    रा.देवराष्‍ट्रे, ता.कडेगाव जि. सांगली
 
५. श्री सुभाश परशराम महिंद, संचालक
    वय-सज्ञान, धंदा-नोकरी
    रा.देवराष्‍ट्रे, ता.कडेगाव जि. सांगली
 
६. श्री मुकुंद पोपट कारंडे, संचालक
    वय-सज्ञान, धंदा-नोकरी
    रा.देवराष्‍ट्रे, ता.कडेगाव जि. सांगली
 
७. श्री गोपाळराव तानाजी होनमाने, संचालक
    वय-सज्ञान, धंदा-नोकरी
    रा.देवराष्‍ट्रे, ता.कडेगाव जि. सांगली
 
८. श्री जयवंत राजाराम महिंद, संचालक
    वय-सज्ञान, धंदा-नोकरी
    रा.देवराष्‍ट्रे, ता.कडेगाव जि. सांगली
 
९. श्री हणमंत शिवाजी महिंद, संचालक
    वय-सज्ञान, धंदा-शेती
    रा.देवराष्‍ट्रे, ता.कडेगाव जि. सांगली
 
१०. श्री वसंत शंकर काळे, संचालक
    वय-सज्ञान, धंदा-नोकरी
    रा.मोहिते वडगाव ता.कडेगाव जि. सांगली
 
११. श्री विठ्ठल दगडू धुकटे, संचालक
    वय-सज्ञान, धंदा-नोकरी
    रा.देवराष्‍ट्रे, ता.कडेगाव जि. सांगली
 
१२. श्री शिवाजी उत्‍तम नवाळे
    वय-सज्ञान, धंदा-शेती
    रा.देवराष्‍ट्रे, ता.कडेगाव जि. सांगली
    (मंचाच्‍या दि.२९/९/२०११ चे आदेशान्‍वये वगळले.)
 
१३. श्री संजय रामचंद्र मोहिते,
    वय-सज्ञान, धंदा-नोकरी
    रा.मोहिते वडगाव ता.कडेगाव जि. सांगली
    ता.वाळवा जि. सांगली
 
१४. सौ मंदाकिनी संजय महिंद
    वय-सज्ञान, धंदा-नोकरी
    रा.देवराष्‍ट्रे, ता.कडेगाव जि. सांगली                        ..... जाबदार
 
 
                      तक्रारदार तर्फे            - +ìb÷. श्री पी.एम.मैंदर्गी
                      जाबदार क्र.६ ते ११ व १३, १४ एकतर्फा
                      जाबदार क्र. १,,,,, १५ नो से
                      जाबदार क्र. १२ वगळले.
    जाबदार क्र.३  स्‍वत:
 
 
   नि का ल प त्र
 
द्वारा- मा. सदस्‍या- गीता घाटगे
 
१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने दामदुप्‍पट ठेवी अन्‍वये गुंतविलेल्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार श्री सागरेश्‍वर ग्रामीण बिगरशेती सहकारी सहकारी पतसंस्‍था मर्या. देवराष्‍ट्रे (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्‍या होत्‍या. यातील सर्व ठेवींची मुदत पूर्ण झाली आहे.  तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रकमांची पतसंस्‍थेकडे मागणी केली असता पतसंस्‍थेने ती देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्‍याला रकमा देवविण्‍यात याव्‍यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्‍वये एकूण ११ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
२.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र. ६ ते ११ व १३, १४ यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी होऊनसुध्‍दा ते प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्‍यांचेविरुध्‍द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्‍यात आले. जाबदार क्र.१२ यांना मंचाचे दि. चे आदेशान्‍वये प्रस्‍तुत प्रकरणा‍तून वगळण्‍यात आले.
 
३.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र. ६ ते ११ व १३, १४ यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी झालेनंतर ते प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले परंतु त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले नाही. सबब त्‍यांचेविरुध्‍द नि.१ वर नो से चा आदेश करण्‍यात आला.
 
४.    जाबदार क्र.३ यांनी मंचाच्‍या नोटीसीची बजावणी त्‍यांचेवर झालेवर हजर होवून त्‍यांचे म्‍हणणे प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केले. त्‍यांचे म्‍हणण्‍यात त्‍यांनी तक्रारदारांच्‍या सर्व तक्रारी अमान्‍य केल्‍या आहेत. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये त्‍यांनी सदरहू जाबदार हे दि.१७/२/२०१० पासून संचालक मंडळामध्‍ये कार्यरत नाहीत. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत जी संचालक मंडळाची यादी दाखल केली आहे, ती सन २००९ मधील आहे त्‍यानंतर या पतसंस्‍थेच्‍या संचालक मंडळाच्‍या निवडणूका होवून त्‍यानुसार सदरहू जाबदार हे या संस्‍थेमध्‍ये संचालक म्‍हणून कार्यरत नाहीत आणि म्‍हणून तक्रारदारांच्‍या ठेवींतील रकमांची जबाबदारी या जाबदारांचे वरती येत नाही असे म्‍हणणे या जाबदारांनी मांडलेले आहे. जाबदार पुढे असेही कथन करतात की, या जाबदारांविरुध्‍द कलम ८८ प्रमाणे कोणतीही कारवाई झालेली नाही. आणि म्‍हणून देखील त्‍यांना तक्रारदारांच्‍या ठेवीतील रकमेबाबत जबाबदार धरता येणार नाही. याचा विचार करुन जाबदारांना या तक्रारअर्जातून वगळण्‍यात यावे व कोणतीही जबाबदारी त्‍यांचेवर निश्चित करण्‍यात येवू नये अशी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये विनंती केली आहे. जाबदारांनी त्‍यांचे म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ नि.२६ अन्‍वये प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. 
 
५.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार पतसंस्‍थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र. २ ते ११ व १३, १४ यांना  पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने ज्‍या पतसंस्‍थेमध्‍ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्‍थाच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो.
     
६.    तक्रारदारांनी सदरहू पतसंस्‍थेमध्‍ये दामदुप्‍पट ठेवीअन्‍वये रकमा गुंतविलेल्‍या होत्‍या हे नि.२९/१ अन्‍वये दाखल करण्‍यात आलेल्‍या मूळ ठेवपावत्‍यांच्‍या पावत्‍यांवरुन दिसून येते. या सर्व ठेवींच्‍या मुदती पूर्ण झालेल्‍या आहेत. तक्रारदारांना या ठेवींवरती आजतागायत व्‍याज प्राप्‍त झालेले नाही हे नि.२८ अन्‍वये दाखल करण्‍यात आलेल्‍या व्‍याजनिवेदनावरुन समजून येते. सबब ठेवींतील मुदतीनंतर मिळणा-या रकमा मुदत पूर्ण झाल्‍याच्‍या दुसरे दिवशीपासून १० टक्‍के व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहेत. हे व्‍याजदर मंजूर करीत असताना जाबदार यांनी तक्रारदारांना दूषित सेवा दिली ही बाब विचारात घेण्‍यात आली आहे.
 
सबब, मंचाचा आदेश की,
 
दे
 
१. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावत्‍या क्र.२१६८, २१६९ व २१७० मधील मुदतीनंतर मिळणारी प्रत्‍येकी रक्‍कम रु.१६,०००/- (अक्षरी रुपये सोळा हजार फक्‍त) दि.३०/९/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
२. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र.२१७५ मधील मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम रु.२४,०००/- (अक्षरी रुपये चोवीस हजार फक्‍त) दि.१३/१०/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
३. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र.२१८३ मधील मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम रु.२०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्‍त) दि.१६/१०/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
४. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावत्‍या क्र.२१९३ व २१९४ मधील मुदतीनंतर मिळणारी प्रत्‍येकी रक्‍कम रु.२४,०००/- (अक्षरी रुपये चोवीस हजार फक्‍त) दि.२९/१०/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
५. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावत्‍या क्र.२१९५ व २१९६ मधील मुदतीनंतर मिळणारी प्रत्‍येकी रक्‍कम रु.३०,०००/- (अक्षरी रुपये तीस हजार फक्‍त) दि.३०/१०/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
६. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र.२१३२ मधील मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम रु.४०,०००/- (अक्षरी रुपये चाळीस हजार फक्‍त) दि.१/०७/२००९ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
७. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त) अदा करावेत.
 
८. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.१५/११/२०११ पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
 
सांगली
दिनांकò: ३०/०९/२०११    
 
 
                 (गीता सु.घाटगे)                   (अनिल य.गोडसे÷)
                 सदस्‍या                                   अध्‍यक्ष            
               जिल्‍हा मंच, सांगली                   जिल्‍हा मंच, सांगली.  
 
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /   /२०११
      VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /    /२०११
 
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.