View 1119 Cases Against Furniture
Vivek Vasantrao Badwaik filed a consumer case on 30 Jan 2014 against Safar Furniture in the Nagpur Consumer Court. The case no is CC/12/446 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
(मंचाचा निर्णय : श्रीमती मंजुश्री खनके - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांकः 30 /01/2014)
प्रस्तुत केस मधील तक्रारकर्त्याने घरगुती व स्वतःच्या उपयोगासाठी म्हणून विरुध्द पक्षांचा फर्निचर विक्रीचा व्यवसाय असल्याने दि.13.10.2010 रोजी खुर्च्या खरेदी केलेल्या होत्या. विरुध्द पक्षाकडून तक्रारकर्त्याने फर्निचर खरेदी केले ते येणेप्रमाणे..
1) एक हाय फोरटेबल करिश्मा खुर्ची रु. 2,050/-
2) तीन चारपायी खुर्च्या रु. 2,325/-
3) तीन फोल्डींग खुर्च्या रु. 1,500/-
वाहतुकीचा खर्च रु. 50/-
2. प्रस्तुत फर्निचर विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला वाहतुकीव्दारे पोहोचवायचे असे ठरलेले होते. त्याप्रमाणे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास 1 व 3 क्रमांकाच्या वर्णनातील खुर्च्या पोहोचविल्या परंतु तीन चारपायी खुर्च्या आजतागायत तक्रारकर्त्यास मिळालेल्या नाही. म्हणून तक्रारकर्त्यास प्रस्तुतची केस मंचासमोर दाखल करावी लागली.
3. उपरोक्त खुर्च्या न मिळाल्यामुळे वारंवार तोंडी विचारणा केल्यानंतर दि.31.05.2011 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला लेखी पत्राव्दारे कळविले. परंतु तरीही खुर्च्या न मिळाल्याने विरुध्द पक्षाला दि.21.11.2011 रोजी कायदेशिर नोटीस बजावली. सदरची नोटीस विरुध्द पक्षाला मिळाली परंतु तरीही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास खुर्च्या दिलेल्या नाहीत. तसेच उपरोक्त वर्णनातील सर्व खुर्च्याचे तसेच वाहतुकीचा खर्च विरुध्द पक्षाने घेतलेला असुन त्याची पावती देखिल तक्रारकर्त्यास दिलेली आहे. तसेच क्र.1 व 3 च्या खुर्च्या मिळाल्याची पोच तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिलेली आहे. त्यामुळे विरुध्द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा व सेवेचा अवलंब केला आहे आणि त्यामुळेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला खरेदी केलेल्या तीन चारपायी खुर्च्या द्याव्यात तसेच देऊ शकत नसेल तर रु.2,325/- व्याजासहीत परत करावेत. तसेच झालेल्या आर्थीक शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई मिळण्यांत यावी अशी प्रार्थना केलेली आहे.
4. तक्रार दाखल झाल्यानंतर मंचामार्फत विरुध्द पक्षाला नोटीस पाठविण्यांत आला त्यानुसार दि.12.09.2012 रोजी विरुध्द पक्षाला नोटीस प्राप्त झाल्याचे दिसुन येते. तसेच अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याने खुर्च्यांचे बिल व नोटीस दाखल केल्याचे दिसुन येत आहे. तसेच विरुध्द पक्ष मंचासमोर हजर झाले नाही आणि लेखी व तोंडी स्वरुपात आपले म्हणणे मांडले नाही, यावरुन मंचाचे निष्कर्षार्थ मुद्दे खालिल प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षाने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार किंवा
अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे काय ? होय.
2) तक्रारकर्ता रक्कम परत मिळण्यांस तसेच झालेल्या
मानसिक शारीरिक त्रासाची भरपाई घेण्यांस
पात्र आहे काय ? अंशतः
3) अंतिम आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
5. मुद्दा क्र.1 नुसार अभिलेखावर दाखल असलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे स्पष्ट दिसुन येत आहे की, तक्रारकर्त्याने तीन प्रकारच्या खुर्च्यांचे पैसे दिलेले होते. परंतु प्रत्यक्षात दोन प्रकारच्या खुर्च्या मिळाल्या आहेत, तसेच ज्या तिन चार पायी खुर्च्या मिळालेल्या नाहीत. त्यासाठी तक्रारकर्त्याने वारंवार तोंडी तसेच लेखी स्वरुपात मागणी केलेली आहे. तसेच पत्र व नोटीस पाठवुनही विरुध्द पक्षाने त्याची दखल घेतलेली नाही. तसेच अजूनपर्यंत तक्रारकर्त्याचे पैसेही परत केलेले नाही. मंचामार्फत नोटीस पाठवूनही मंचासमोर विरुध्द पक्ष हजर झालेले नाही, तसेच त्यांचे फर्निचरचे दुकान असल्यामुळे ते व्यापार करतात हे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत आहे त्यामुळे हे मंच ह्या निष्कर्षाप्रत पोहचले आहे की, विरुध्द पक्षाने अनुचित सेवेचा व व्यापारी प्रथेचा अवलंब केलला आहे. आणि त्यामुळे मुद्दा क्र.2 नुसार तक्रारकर्ता झालेल्या आर्थीक, शारीरिक, मानसिक त्रासाची भरपाई मिळण्यांस पात्र आहे. तयासाठी मंच खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- // आदेश //-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2) विरुध्द पक्षाला निर्देश देण्यांत येते की, तक्रारकर्त्याने भरणा केलेली खुर्च्यांची किंमत रु.2,325/- दि.13.10.2010 पासून प्रत्यक्ष अदायगीच्या तारखेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजासहीत परत करण्यांत यावी.
3) विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबाबत रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- द्यावा.
4) विरुध्द पक्षाने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत मिळाल्याचे तारखेपासून 30 दिवसांचे आंत करावी.
5) उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
6) तक्रारकर्त्यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.