Maharashtra

Nagpur

CC/314/2022

SANGEETA SUDHIR TELPANDE - Complainant(s)

Versus

SAFAL LAND DEVELOPERS & PROMOTERS, THROUGH ITS PROPRIETOR MR. PRAKASH SANTOSHRAO MOHOD - Opp.Party(s)

ADV. ANURADHA DESHPANDE

20 Dec 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/314/2022
( Date of Filing : 19 Apr 2022 )
 
1. SANGEETA SUDHIR TELPANDE
R/O. NEAR SANGH BUILDING, GARUD KHAMB ROAD, MAHAL, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SAFAL LAND DEVELOPERS & PROMOTERS, THROUGH ITS PROPRIETOR MR. PRAKASH SANTOSHRAO MOHOD
C/O. CHHOTE QUARTERS, SUNDARBAN LAYOUT, NAGPUR VISHAKHA MOHAD NAGARSEVIKA
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. ANURADHA DESHPANDE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 20 Dec 2022
Final Order / Judgement

Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

  1. तक्रारदाराने वि.प.चे मौजा-इसासनी, प.ह.न.46, ख.नं.44 या शेतजमिनीवर पाडलेल्या ले-आऊटमधील भुखंड क्रं.119 चे खरेदीपोटी वि.प.ला दिनांक 4.7.1994 ते 4.3.1997 पर्यत वेळोवेळी एकुण रुपये 12,000/- अदा केले. त्यानंतर वि.प.ने तक्रारदाराला सब-रजिस्टार-हिंगणा यांचे समोर नोंदणी क्रं.1263, दिनांक 29.12.2001 नुसार भुखंडाचे विक्रीपत्र नोंदणी करुन दिले. विक्रीपत्रात वि.प.ने नमुद केले की, सदर मालमत्ता ही त्यांचे स्वतःचे मालकीची असुन त्यावर कोणताही बोझा नाही. परंतु वि.प.ने तक्रारदाराला भुखंडाचा ताबा दिला नव्हता म्हणुन तक्रारदाराने वि.प.ला ताबा देण्‍याबाबत विनंती केली परंतु वि.प.ताबा देण्‍यात अपयशी ठरला.
  2. सन 2005 मध्‍ये तक्रारदाराचे असे निर्देशनास आले की, ले-आऊट मधील तक्रारदाराचे भुखंडाचा ताबा महाराष्‍ट्र शासनाने कार्गो हब योजनेकरिता घेतला आहे व लॅंन्ड अॅक्वीझेशन कायदयातील कलम 30 अंतर्गत जमिन मालकांनी सफल लॅन्ड डेव्हलपर्स व प्रमोटर सोबत दावा दाखल केला आहे. सदर प्रकरणात तक्रारकर्ता लॅन्ड अॅक्वीझीशन प्रकरण क्रं. 2007 मध्‍ये प्रतीवादी नव्हता. सदर प्रकरण दिनांक 1.4.2015 निकाली काढण्‍यात आले. तक्रारदाराने सदर निकालाची प्रत प्राप्त केली त्यावेळी तक्रारदाराचे निर्देशनास आले की, वि.प.ने तक्रारदाराला विकलेला भुखंड वादात आहे व तक्रारदाराचे लॅन्ड सर्व्‍हे क्रं. 44 मौजा-इसासनी एकुण क्षेत्रफळ 6.56 हे.आर. ही जमीन शेख जब्बार मिया उमर मिया आणि कुब्रा बेगम हमीद खान पठान यांच्या मालकीचा असुन त्यांच्या ताब्यात आहे. सर्व्‍हे क्रं.44 एकुण जमीन 6.55 हे.आर.पैकी 2.18 हे.आर. या शेतजमिनीची विक्री सफल लॅन्ड डेव्हलपर्स अॅन्ड प्रमोटर, श्री  प्रकाश संतोषराव मोहोड यांचे नावाने विक्रीपत्राव्दारे करण्‍यात आली.  सुरुवातीला संपूर्ण जमीन 6.55 हे.आर या जमिनीचा विक्री करारनामा जमीन मालक आणि श्री प्रकाश मोहोड यांचे मध्‍ये करण्‍यात आला होता. परंतु सदर करारनामा प्रत्यक्षात अस्तीत्वात आला नाही. त्यामूळे 4.37 हे.आर शेतजमीन मूळ मालकाजवळ राहीली आणि सर्व्‍हे क्रं. 44 ची विभागणी झाली. विक्रीपत्राची तपासणी केल्यानंतर मा. न्यायालयाचे निर्देशनास आहे की, सफल लॅन्ड डेव्हलपर्स यांनी सर्व्‍हे क्रं. 44 या संपूर्ण शेतजमीन 6.55 हे. आर. मध्‍ये भुखंड पाडुन अनेक भुखंडाची विक्री केली आहे. सदर जमीनीचे अॅक्वीझीशन केल्यानंतर नुकसान भरपाईचे वाटप करण्‍यात आले परंतु वि.प. तक्रारदाराला त्याचा हिस्सा परत करण्‍यात अपयशी ठरला ही वि.प.ची त्रुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती आहे. तक्रारदाराने वि.प. ला दुरध्‍वनीव्दारे त्याचे मालकीच्या दुस-या ले-आऊट मधील भुखंड देण्‍याची मागणी केली परंतु वि.प. अपयशी ठरला म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन वि.प. ने तक्रारदाराला त्याचे मालकीचे दुसरे ले-आऊट मधील भुखंडांचे विक्रीपत्र करुन द्यावे व विक्रीपत्राचा खर्च वि.प.ने सोसावा. वि.प.ला विक्रीपत्र करुन देणे शक्य नसल्यास भुखंडाचे आजचे बाजारभावाप्रमाणे भुखंडाची किंमत दयावी तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी व नुकसानीपोटी खर्च मिळावा अशी मागणी केली आहे
  3. तक्रारदाराची तक्रार दाखल करुन वि.प. यांना आयोगा मार्फत नोटीस काढण्‍यात आली. वि.प. दिनांक 14.5.2022 रोजी नोटीस मिळुनही मंचासमक्ष हजर  झाले नाही म्हणुन दिनांक 11.7.2022 रोजी तक्रार त्यांचे विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. 
  4.  तक्रारदाराने अभिलेखावर दाखल केलेल्या दस्तवेजांचे व पुरसिसचे अवलोकन केले असता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

मुद्दे                                   उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                  होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?          होय          
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी

पध्‍दतीचा  अवलंब केला आहे काय ?                           होय

  1. काय आदेश                                                    अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1.   तक्रारदाराने वि.प.कडुन मौजा-इसासनी, प.ह.न.46, ख.क्रं.44 या शेतजमिनीवर पाडलेल्या ले-आऊटमधील भुखंड क्रं.119 खरेदी केला असल्याचे व दस्तऐवज नोंदणी क्रं. नोंदणी क्रं.1263, दिनांक 29.12.2001 नुसार भुखंडाचे विक्रीपत्र नोंदणी करुन दिल्याचे व संपूर्ण रक्कम रुपये 12,000/- वि.प.ला मिळाल्याचे नि.क्रं.2 वर दाखल दस्तऐवजांवरुन दिसुन येते. तसेच विक्रीपत्रामध्‍ये सदर शेतजमीन ही वि.प.चे मालकीची असुन त्यावर कुणाचाही बोझा व गहाण नसल्याचे विक्रीपत्रात नमुद आहे.
  2. महाराष्‍ट्र शासनाने सदरची शेतजमीन सर्व्‍हे क्रं.44 कार्गोहब योजनेअंतर्गत जमीनीचे अधीग्रहण केल्यामूळे मूळ मालक शेख जब्बार मिया उमर मिया आणि कुब्रा बेगम हमीद खान पठान आणि सफल लॅन्ड डेव्हलपर्स अॅन्ड प्रमोटर, श्री  प्रकाश संतोषराव मोहोड यांना अनुक्रमे रुपये 11,56,879/- व रुपये 5,77,012/- मिळाल्याचे मा. जिल्हा न्यायाधिश -8 एएसजे यांनी दिनांक 1.4.2015 रोजी लॅन्ड अॅक्वीझेशन कायदा 1894 चे कलम 30 अंतर्गत दाखल प्रकरण क्रं.102/2007 या प्रकरणातील आदेशावरुन ही बाब स्पष्‍ट होते. वि.प. ने त्यांचे नावाने शेतजमीन नसतांना शेतजमिनीवर भुखंड पाडुन त्याची विक्री केली व वि.प.ला त्या जमीनीपोटी महाराष्‍ट्र शासना कडुन  प्राप्त झालेल्या नुकसान भरपाईचे तक्रारदाराचे हिस्स्याची रक्कम अदा केली नाही ही वि.प.ची तक्रारदाराचे प्रती सेवेतील त्रुटी असुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब आहे असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे.

अंतीम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प. ने तक्रारदाराकडुन भुखंडाचे विक्रीपोटी स्व‍िकारलेली रक्कम रुपये 12,000/- व विक्रीपत्राचा आलेला खर्च रुपये 1,105/- असे एकुण रुपये  13,105/-,दिनांक 29.12.2001 पासुन द.सा.द.शे.१२ टक्के दराने व्याज द्यावे.
  3.  वि.प ने तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी, नुकसान भरपाईपोटी रुपये 50,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 20,000/- अदा करावे.
  4. विरुध्‍द पक्ष यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून ४५  दिवसाचे आत  करावी.
  5. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.