Maharashtra

Ratnagiri

CC/58/2021

Amruta Anand Shirdhankar - Complainant(s)

Versus

Sachin Shashikant Nerlekar - Opp.Party(s)

S.K.Ghag, A.T.Dalvi, G.R.Mandvakar, K.J.Raut

04 Mar 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, RATNAGIRI
Collector Office Compound, Ratnagiri
Phone No.02352 223745
 
Complaint Case No. CC/58/2021
( Date of Filing : 13 Aug 2021 )
 
1. Amruta Anand Shirdhankar
C/o Dipali Divakar Shivlkar, 1523, Pitruchaya, Kakasaheb Surve Road, Mandvi, Tal.Ratnagiri
Ratnagiri
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sachin Shashikant Nerlekar
2823/3 Mahalaxmi Nagar, Kolhapur 416006
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ARUN R GAIKWAD PRESIDENT
 HON'BLE MR. SWAPNIL D MEDHE MEMBER
 HON'BLE MRS. AMRUTA N BHOSALE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 04 Mar 2024
Final Order / Judgement

- नि का ल प त्र -

(दि.04-03-2024)

 

व्‍दारा : श्री. स्वप्निल द.मेढे, सदस्य,

 

1)  सामनेवाला यांनी तक्रारदार यांचेकडून सदनिकेची विक्री मोबदला रक्कम स्विकारुनही, सदनिका अथवा स्विकृत रक्कम, तक्रारदार यांना परत न केल्यामुळे, तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार अर्ज आयोगात दाखल केला आहे.

 

2)  तक्रार अर्जाचा सारांश तक्रारदार यांचे कथनाप्रमाणे थोडक्‍यात असा-

    

तक्रारदार हया त्यांचे पती व 2 मुलांसह तक्रारीत नमुद पत्त्यावर महिना रक्कम रु.6,000/- भाडे देऊन भाडयाचे घरात राहतात. सामनेवाला हे महालक्ष्मी डेव्हलपर्स या नावाने कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात. गाव मौजे रहाटाघर ता.जि.रत्नागिरी येथील अ.क्र.1-भुमापन क्र.86अ1अ1 हि.नं.6ब क्षेत्र0-02-30 आकार 0.29रु.पै. अ.क्र.2-भूमापन क्र.86अ-1अ-1हि.नं.6अ,क्षेत्र0-02-2आकार0.30रु.पै. या मिळकती ज्यांचे सि.स.नं.2101, 2100/1, 2100, 2100/1 अशा आहेत. सदरच्या मिळकती या गुरुकृपा मंगल कार्यालय, प-याची आळी, ता.जि.रत्नागिरी येथील आहेत. सदरच्या मिळकती या श्रीमती नयना पाडाळकर तसेच अन्य 54 यांच्या मालकी वहिवाटीच्या होत्या. सदर मिळकती सामनेवाला यांनी दि.20/09/2013 रोजीचे रजि.दस्त अ.क्र.4959/2013 आणि दि.24/09/2013 रोजीचे रजि.दस्त अ.क्र.5014/2013 विकसन करारपत्राने, जमिन मालक श्रीमती नयना श्रीपाद पाडाळकर वगैरे-55 यांचे रजि. मुखत्यारपत्र करुन विकसनासाठी घेतल्या आहेत. सदरचे मुखत्यारपत्र हे दस्त क्र.4960/2013 आणि 5015/2013 दुय्यम निबंधक रत्नागिरी येथे नोंदविण्यात आलेले आहे. सामनेवालाने महाराष्ट्र रियल इस्टेट रेग्युलॅटॉरी ॲथोरिटी (रेरा) यांचेकडे प्रकल्पाची नोंदणी केली असून त्याचा क्र.पी52800009999 असा आहे. तक्रारदार हिला रहिवासाकरिता रत्नागिरी शहरामध्ये सदनिकेची आवश्यकता असलेने, तक्रारदार व तिचे पती आणि सामनेवाला यांच्यामध्ये सामनेवाला यांचे ऑफिसमध्ये चर्चा होऊन सामनेवाला हे बांधत असलेल्या नियोजीत महालक्ष्मी आर्केड या इमारतीमधील पार्किंगचे वरील पहिला मजल्यावरील निवासी सदनिका क्र.102, चटई क्षेत्र 329 चौ.फु. ही रक्कम रु.13,69,600/- इतक्या मोबदल्यास तक्रारदाराने खरेदी करण्याचे ठरविले. तसेच सदनिकेचे स्टॅम्प डयुटी, नोंदणी, व्हॅट, सर्व्हीस टॅक्स इत्यादीची होणारी अतिरिक्त रक्कम रु.1,47,232/- अशी एकूण रक्कम रु.15,16,832/- सामनेवालास देणेचे ठरले होते. त्याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाला यांचेदरम्यान दि.07/09/2017 रोजी रजिस्टर साठेकरार झाला त्याचा नोंदणी क्र.5054/2017 असा आहे. सदर साठेकरारापूर्वी तक्रारदार यांनी सामनेवाला यांना एन.ई.एफ.टी व चेक व्दारे एकूण रक्कम रु.4,21,152/- अदा केलेले आहेत. सदर साठेकरार जेव्हा तक्रारदाराने वाचला तेव्हा त्यावर सदनिकेच्या मोबदल्याची ठरलेली रक्कम रु.13,69,600/- ऐवजी रक्कम रु.14,80,880/- म्हणजे रक्कम रु.1,11,280/- जास्त नमुद केली होती. सदरची बाब तक्रारदार यांनी सामनेवाला यांचे निदर्शनास आणली असता सामनेवाला यांनी जादाची स्विकारलेली रक्कम रु.1,11,280/- धनादेशाव्दारे परत करतो असे सांगून दि.26/10/17 रोजी अ.क्र.4917 ने नोटरी पब्लिक ऑफिसर श्री प्रसाद जडयार यांचेकडे करारपत्रनोटराईज्ड करुन दिले व पंजाब नॅशनल बँक,शाखा मारुती मंदिर रत्नागिरी या बँकेचा धनादेश क्र.000284, रक्कम रु.1,11,280/- तक्रारदाराचे नांवे दिला. सदरचा धनादेश वटण्यासाठी तक्रारदाराने बँकेत भरला असता, तो पुरेशी रक्कम खात्यात नाही या कारणाने अनादर होऊन परत आला. त्याबाबत तक्रारदाराने सामनेवाला यांना विचारणा केली असता, सामनेवाला यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तक्रारदार हिने सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा रत्नागिरी यांचेकडे कर्ज प्रकरण करुन, सामनेवाला यांना दि.31/01/2018 रोजी, रक्कम रु.6,00,000/- अदा केले. तक्रारदार यांनी सदर सदनिकेच्या खरेदीपोटी सामनेवालास वेळोवेळी चेक, एन.ई.एफ.टी. बँक ट्रान्झॅक्शन आणि लोन करुन रक्कम रु.10,21,152/- अदा केलेले आहेत. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेल्या दि.07/09/2017 रोजीच्या साठेकराराप्रमाणे, सामनेवाला यांनी तक्रारदारास सदनिकेचा ताबा दि.30/09/2018 पूर्वी देणेचा होता. साठेकरारामधील वाढीव रक्कम वगळून उर्वरित रक्कम तक्रारदार सामनेवाला यांना दयावयास तयार आहेत. तसेच तक्रारदार यांनी वारंवार सामनेवाला यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सामनेवाला यांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही. सामनेवाला यांचे बेजबाबदार वागण्यामुळे सदर इमारतीचे व पर्यायाने सदर सदनिकेचे बांधकाम अदयाप अपूर्ण अवस्थेत राहिलेले आहे व ते बांधकाम पूर्ण करण्याचे कोणतेही संकेत तक्रारदाराला दिसून येत नाही. तक्रारदाराने बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा मासिक हप्ता रक्कम रु.12,000/- चा होता. सदर कर्जाचे व्याजच सुमारे रक्कम रु.70,149/- आजअखेर तक्रारदाराने भरलेले आहे. त्यामुळे तक्रारदार हिने त्यांचे आईकडून आर्थिक मदत घेऊन दि.15/09/2020 रोजी कर्जाची रक्कम भरली. सामनेवाला हे वादातील मिळकतीमध्ये सुमारे वर्षभर फिरकलेला सुध्दा नाही. तसेच तक्रारदाराचा फोनही सामनेवाला घेत नाही. त्यामुळे शेवटी तक्रारदार यांनी त्यांचे वकील अर्चना साळवी यांचेमार्फत दि.26/04/2019 रोजी सामनेवालास कायदेशीर नोटीस पाठविली. सामनेवाला यांना सदर नोटीस मिळूनदेखील त्यांनी आजअखेर कोणतेही उत्तर दिलेले नाही. सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलं‍ब करुन, तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब सामनेवाला यांना तक्रारदार यांनी सदनिकेच्या मोबदल्यापोटी दिलेली एकूण रक्कम रु.10,21,152/- व त्यावरील दि.01/10/2018 पासून द.सा.द.शे.18 % दराने तक्रार दाखल तारखेपर्यंत होणारी व्याजाची रक्कम रु.5,36,107/- अशी एकूण रक्कम रु.15,57,259/-, तसेच तक्रारदाराने कर्जप्रकरणी भरलेले व्याजाची रक्कम रु.70,149/-, तसेच सामनेवाला यांनी सदनिकेचा ताबा न दिलेने तक्रारदारास भरावे लागलेले दरमहा भाडयाची रक्क्म रु.6,000/- प्रमाणे होणारी रक्कम रु.2,10,000/-, तसेच नुकसान भरपाईची रक्कम रु.3,00,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चाची रक्कम रु.50,000/- अशी एकूण रक्कम रु.21,87,408/- सामनेवालांनी तक्रारदारास देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर आयोगास केली आहे. 

  1. तक्रारदार यांनी तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.6 कडे एकूण 11कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये दि.07/09/17 रोजी झालेला रजि.साठेकरार क्र.5054/2017 ची प्रत, सामनेवाला व जमीन मालक यांचेमध्ये झालेले विकास करारपत्र दस्त क्र.4959/2013 ची प्रत, सामनेवाला व जमीनमालक यांचेमध्ये झालेला मुखत्यारपत्र दस्त क्र.4960/2013 ची प्रत, सामनेवाला व जमीन मालक यांचेमध्ये झालेले विकास करारपत्र दस्त क्र.5014/2013 ची प्रत, सामनेवाला व जमीनमालक यांचेमध्ये झालेला मुखत्यारपत्र दस्त क्र.5015/2013 ची प्रत, तक्रारदाराचे सेंट्रल बँकेचे अकौन्ट स्टेटमेंट, तक्रारदाराचे सेंट्रल बँकेचे लोन अकौन्टची प्रत, तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेला दि.26/10/17 रोजीच्या नोटराईज्ड कराराची प्रत, सामनेवालाने तक्रारदारास दिलेला चेक व रिटर्न मेमो, तक्रारदाराने सामनेवालास वकीलामार्फत पाठविलेली कायदेशीर नोटीस व पोच पावती, तक्रारदार भाडयाच्या घरात रहात असलेबाबतचा भाडे कराराची प्रत, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.21 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.22 कडे साक्षीदार आनंद सुरेश शिरधनकर यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.23 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.39 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. तसेच नि.46 कडे केस लॉ दाखल केले आहेत.

 

  1. )   प्रस्तुत कामी सामनेवाला यांना आयोगामार्फत नोटीस पाठविली असता सामनेवाला  त्यांचे वकीलामार्फत हजर होऊन म्हणणे दाखल केले. सामनेवाला यांनी नि.11 कडे त्यांचे लेखी म्हणणे दाखल करुन तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारुन तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावी अशी विनंती केली आहे. सामनेवाला त्यांचे म्हणणेत पुढे कथन करतात की, तक्रारदार यांचेशी केलेल्या दि.07/09/2017 रोजीच्या साठेखतामधील मुददा क्र.2 मध्ये नमुद केल्याप्रमाणे वेळोवेळी मागणी करुनही तक्रारदाराने वेळेत रक्कमा दिलेल्या नाहीत. तक्रारदाराकडून एकूण रक्कम रु.10,21,152/- सामनेवालास प्राप्त झाल्या आहेत. उर्व‍रित रक्कम रु.5,95,680/- सामनेवालास अदा करुन सदनिकेचा ताबा घ्यावा असे तक्रारदारास सामनेवाला यांनी दि.15/09/2021 रोजी कळविले होते. तसेच तक्रारदार यांनी साठेखतामध्ये मोबदल्याहून ज्यादा लिहीलेल्या रक्क्म रु.1,11,280/- रकमेचा फरकाचा चेक सामनेवालाकडून लिहून घेतला. मार्च-2020 पासून कोविड-19 मुळे भारत बंद आदेश झालेमुळे सामनेवालाचे साईटवरील काम ठप्प झाले. कोविड बंदी आणि कच्चा मालाचा तुटवडा व कामगारांची गैरहजेरी तसेच सामनेवाला कोरोनाग्रस्त होते. या सर्व कारणाने बांधकाम करणेस सुमारे दिड पावणेदोन वर्षे वाढीव कालावधी  लागला. त्याकारणाने इमारतीचे बांधकामास विलंब झाला. तक्रारदार यांनी उर्वरित रक्कम देऊन सदनिकेचा ताबा घ्यावा. तसेच उर्वरित रक्कमेचा व्यवहार पूर्ण झाल्यास दि.15/10/2021 पर्यंत अंतिम खरेदीखत लिहून देणार आहेत. सामनेवाला हे तक्रारदाराशी कराराप्रमाणे वागणेस तयार असलेने सामनेवाला यांनी कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही. सबब सामनेवालाविरुध्दची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.

 

  1.  

 

6) तसेच दि.24/06/2022 रोजीचा नि.27/1 कडील उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र.1 रत्नागिरी यांनी प्रबंधक, जिल्हा ग्राहक आयोग, रत्नागिरी यांना ग्राहक तक्रार क्र.58/2021 मध्ये कोर्ट कमिशन करुन अहवाल सादर केला आहे.

    

6)  तक्रारदाराची तक्रार, तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे व पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, सरतपासाचे प्रतिज्ञापत्र, दाखल केलेली कागदपत्रे (फोटो),नि.27/1 कडील कोर्ट कमिशन अहवाल व लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन करता या आयोगाच्या विचारार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यावर कारणमिमांसेसहीत नमूद निष्‍कर्ष खालीलप्रमाणे-

 

.क्र

              मुद्दे

    निष्‍कर्ष

1

तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व विक्रेता असे संबंध निर्माण होतात काय ?

 

होय

2

सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून सदनिका विक्री मोबदला स्विकारुनही, अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सदनिकेची तक्रारदारास विक्री न केल्याने, तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?

होय

3

सदनिकेच्या मोबदल्यापोटीची रक्कम रु. 10,21,152/- व्याजासह व इतर खर्च सामनेवालाकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत काय? तक्रारदार शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय

4

आदेश काय ?

अंतिम आदेशाप्रमाणे

 

- कारणमिमांसा -

मुद्दा क्रमांकः 1

 

7)  तक्रारदाराने सामनेवाला यांनी विकसीत केलेल्या गाव मौजे रहाटाघर ता.जि.रत्नागिरी येथील अ.क्र.1-भुमापन क्र.86अ1अ1 हि.नं.6ब क्षेत्र0-02-30 आकार 0.29रु.पै. अ.क्र.2-भूमापन क्र.86अ-1अ-1हि.नं.6अ,क्षेत्र0-02-2आकार0.30रु.पै. या मिळकती ज्यांचे सि.स.नं.2101, 2100/1, 2100, 2100/1 या मिळकतीमध्ये निवासी सदनिकेतील सदनिका क्र.102, चटई क्षेत्र 329 चौ.फु. ही रक्कम रु.13,69,600/- या मोबदल्यात खरेदी घेणेचे ठरविले व त्यानुसार तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये दि.07/09/2017 रोजी दुय्यम निबंधक रत्नागिरी येथे नोंदणी साठेखत झाले असून त्यांचा क्र.5054/2017 असा आहे. सदरचे साठेखत तक्रारदाराने नि.6/1 कडे दाखल केलेले आहे. त्याचप्रमाणे सामनेवाला यांनी नि.11 कडे दाखल केलेल्या लेखी म्हणणेमध्येही तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये वाद मिळकतीबाबतचे नोंदणीकृत साठेखत झालेचे मान्य केलेले आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे सिध्द होते तसेच तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असलेचे स्पष्ट होते. सबब मुददा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्रमांक 2 :

 

  1. यांनी सामनेवालाकडून, तक्रारीत नमुद वाद मिळकत सदनिका घेणेसाठी सदर मिळकतीबाबतचे नोंद साठेकरारपत्र दि.07/09/2017 रोजी केले असून, त्याचा रजि.नोंद क्र.5054/2017 असा आहे. तक्रारदार यांनी सदर सदनिकेच्या खरेदीपोटी सामनेवालास वेळोवेळी चेक, एन.ई.एफ.टी. बँक ट्रान्झॅक्शन आणि लोन करुन रक्कम रु.10,21,152/- (अक्षरी रक्कम रुपये दहा लाख एकवीस हजार एकशेबावन्न मात्र)अदा केलेले आहेत. सदर रक्कमा मिळालेचे सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये मान्य केलेले आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये झालेल्या नोंद साठेकराराप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदारास सदनिकेचा ताबा दि.30/09/2018 पूर्वी देणेचा होता. परंतु तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वेळोवेळी विचारणा करुनदेखील सामनेवाला यांनी सदर वाद मिळकतीचे बांधकाम पूर्ण न केलेने, तक्रारदार यांना सदर वाद मिळकत सदनिकेचा ताबा मिळालेला नाही.

 

  1. “ इमारतीचे बांधकाम सन2018 पासून अपूर्ण अवस्थेत आहे. त्याचप्रमाणे सदनिकेचे कामही अपूर्ण आहे. बांधकाम साहित्य निकृष्ठ दर्जाचे आढळून आले. तसेच इमारतीसाठी विदयुत ट्रान्सफॉर्मर घेतलेला आढळून आला नाही. सदनिकांना स्वतंत्र मिटर असल्याचे आढळून येत नाही. इमारतीचा जिना, लिफ्ट, पॅसेज, सेप्टीक टँक, ड्रेनेज व प्लंबींग ही कामे अपूर्ण आहेत ” असे कथन केले आहे. तसेच सदर अहवालासोबत फोटोग्राफ दाखल केले आहेत. यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारास दयावयाच्या सदनिकेचे व इमारतीचे बांधकाम अपूर्ण असलेचे व राहण्यास असुरक्षित असलेचे सिध्द होते. तसेच सामनेवाला यांनी सदर इमारतीचे बांधकाम कोविड-19 मुळे बंद पडलेने वेळेत पूर्ण होऊन शकले नाही असे त्यांचे लेखी म्हणणेत कथन केले आहे. परंतु तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये साठेकरार हा सन-2017 मध्ये झालेला असून तक्रारदारास वाद मिळकत सदनिका ही सप्टेंबर-2018 पर्यंत ताब्यात देणेची होती व कोविड-19 चा कालावधी हा मार्च-2020 पासून चालू झाला होता. तसेच तक्रारदार यांनी नि.41 कडे जिल्हाधिक्षक भुमी अभिलेख यांचे कार्यालयातील भूमापन /अपिल/ एसआर.780/2023 ची सुनावणी नोटीस दाखल केली आहे. सदर नोटीसीचे अवलोकन केले असता अपिलकार, दि कोल्हापूर अर्बन को.ऑप.बँक, लिमिटेड तर्फे विशेष वसुली अधिकारी (महाराष्ट्र शासन प्राधिकृत) श्री धनाजी मारुती कांबळे विरुध्द श्रीम. शितल विजय पाडाळकर वगैरे-52, तसेच जिल्हा अधिक्षक, भुमी अभिलेख रत्नागिरी यांचे न्यायालयात दि कोल्हापूर अर्बन को.ऑप.बँक, लिमिटेड यांनी दाखल केलेले अपील याचे अवलोकन करता, सामनेवाला यांनी सदर वाद मिळकत विकसनाकरिता सदर बँकेकडून रक्कम रु.1,50,00,000/- (रक्कम रुपये एक कोटी पन्नास लाख फक्त) चे कर्जापोटी सदर बँकेस दस्त क्र.5293/2015 दि.18/01/2015 अन्वये तारण गहाण ठेवलेली असलेचे दिसून येते.

 

10)  सामनेवाला यांनी वादमिळकत सदनिकेसाठी रक्कम स्विकारुनसुध्दा सदनिकेबद्दल कोणतीही पूर्तता केलेली नाही. तसेच सामनेवाला यांचेकडे वारंवार संपर्क साधूनदेखील सामनेवाला सेवा देण्यास कुचराई करीत असल्याने तक्रारदार हिने दि.26/04/2019 रोजी त्यांचे वकील अर्चना साळवी यांच्यामार्फत सामनेवाला यास कायदेशीर नोटीस पाठूवन सदनिकेचे राहिलेले अपूर्ण कामे व इमारतीचे समाईकातील सेवा-सुविधांचे काम, भोगवटा प्रमाणपत्र, विदयुत मिटर, नळपाणी कनेक्शन प्राप्त करुन दयावे अशी मागणी केली. परंतु सामनेवाला यांनी सदर नोटीसला आजमितीपर्यंत उत्तर दिलेले नाही.

 

11)      प्रस्तुत प्रकरणात सामनेवाला यांनी सदनिकेचा ताबा दि.30/09/2018 पर्यंत देणार असल्याचे मान्य केलेले होते. परंतु आजमितीपर्यंत सामनेवाला यांना भोगवटा प्रमाणपत्र / इमारत पूर्णताचे पत्र मिळालेले दिसून येत नाही. तसेच संपूर्ण मागण्या पूर्ण करुन ताबादेखील दिलेला नाही. सामनेवाला यांनी नि.11 कडे दाखल केलेल्या त्यांच्या म्हणणेमध्ये सामनेवाला यांना सदनिकेच्या मोबदल्यापोटी रक्कम रु.10,21,152/- तक्रारदार यांच्याकडून प्राप्त झाले असल्याबाबत कथन केलेले आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.15/09/2021 रोजी पत्र पाठवून सदनिकेची रहिलेली उर्वरित रक्कम भरुन 15/10/2021 पर्यंत नोंद खरेदीखत करुन देत असलेचे कथन केले आहे. सदरचे पत्र तक्रारदारास मिळालेबाबतचा कोणताही पुरावा सामनेवाला यांनी सदर कामी दाखल केलेला नाही. तसेच सामनेवाला यांना सदर वाद मिळकत इमारतीचे अदयाप भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही किंवा सदर भोगवटा प्रमाणपत्र याकामी सामनेवाला यांनी दाखल केलेले नाही. याचाच अर्थ सदर वाद मिळकतीचे बांधकाम अदयाप अपूर्ण आहे. सदनिकेचे काम पूर्ण होत आलेवर सामनेवाला यांनी कराराची पूर्तता करणे आवश्यक होते त्याबाबत काय कार्यवाही करावयची हे तक्रारदारास कळविणे गरजेचे होते, त्यामुळे तक्रारदाराने कराराचे पालन केले नाही अथवा त्यांनी अटी व शर्ती चे पालन केलेले नाही हे शाबी‍त होत नाही.

      

12)  सबब सामनेवाला यांनी तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये दि.07/09/2017 रोजी झालेल्या नोंद साठेखताच्या अटी व शर्तीचे पालन केले नाही. सदनिकेच्या मोबदल्यासाठी रक्कम स्विकारुनही सदनिका किंवा स्विकारलेली रक्कमही सामनेवाला यांनी तक्रारदारास परत केली नाही. सबब सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवल्या आहेत. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्रमांक 3 :

   

13)  वरील सर्व विवेचनांचा विचार करता हे आयोग या निष्कर्षाप्रत आले आहे की, तक्रारदारांनी सदनिकेसाठी सामनेवाला यांना एकूण रक्कम रु.10,21,152/- दिले आहेत व सामनेवाला यांनी ते मान्य केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सदनिका देण्यासाठी कोणतीही पूर्तता केलेली नाही. तक्रारदारांच्या मागणीनुसार रक्कमसुध्दा परत केलेली नाही म्हणून तक्रारदार यांनी सामनेवालास सदनिकेच्या मोबदल्यापोटी दिलेली रक्कम रु.10,21,152/- मिळणेस पात्र असून सदर रक्कमेवर तक्रारदार हे तक्रार दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 % दराने व्याज मिळणेस पात्र आहेत.

 

त्यासाठी हे आयोग खालील मा. सर्वोच्च न्यायालयाचा खालील न्यायनिवाडा विचारात घेत आहे.

Hon’ble Supreme Court in Kolkata West International City Pvt. Ltd., V/s Devasis Rudra Civil Appeal Nos.3182 of 2019 and 6303 of 2019 (decided on 25.03.2019) wherein it held that

 

 “ it would be manifestly unreasonable to construe the contract between the parties as requiring the buyer to wait indefinitely for posseiion. By 2016, nearly seven years had elapsed from the date of the agreement. Even according to the developer, the completion certificate was received on 29 March 2016. This was nearly seven years after the extended date for the handing over of possession prescribed by the agreement. A buyer can be expected to wait for possession for a reasonable. Hence, it would have been manifestly unfair to non-suit the buyer merely on the basis of the first prayer in the reliefs sought before the SCDRC. There was in any event a prayer for refund.”

 

तसेच हे आयोगाने खालील वरिष्ठ न्यायालयाच्या  न्यायनिवाडयाचा आधार घेत आहे.

 

     2024-NCJ 22 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSSION, NEW DELHI-aMIT Gupta & Anr. V/s M/s BPTP Ltd. & Anr. Decided on 01.01.2024-

 

In a housing process if builder is found deficient in service is entitled to refund the total amount received with cost of litigation.

 

तसेच तक्रारदार यांनी सदनिकेच्या खरेदीपोटी काढलेल्या कर्जाची व्याजाची रक्कम रु.70,149/- ची मागणी केली आहे. परंतु त्याबाबत कोणताही पुरावा तक्रारदाराने याकामी दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराची सदरची कर्जाच्या व्याजाची मागणी हे आयोग नामंजूर करत आहे. तसेच तक्रारदाराने सन-2018 पासून रक्क्म रु.6,000/-प्रमाणे घरभाडयाची मागणी केली आहे व नि.6 कडील कागदयादीमध्ये सदर भाडेकरारपत्र दाखल केले आहे. सदर भाडे करारपत्राचे अवलोकन करता त्यामध्ये सदरचा भाडे करार हा तक्रारदाराचे मुलाच्या आधार कार्ड, रेशनकार्ड यासाठी पत्त्याची नोंद करणेकामी केला असलेचे कथन केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांची भाडेकरारापोटीच्या रक्कमेची मागणी हे आयोग फेटाळत आहे. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारास सदनिकेच्या मोबदल्यापोटी रक्कम स्विकारुनही वेळेत सदनिका न दिलेने तक्रारदारास साहजिकच मानसिक व शारिरीक व आर्थिक त्रास झालेला आहे. त्यामुळे तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- सामनेवालाकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. त्यामुळे मुद्दा क्र.4 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मु्दृा क्र.5:-

 

14)  वरील विवचेनास व कारणमिमांसेस अनुसरुन हे आयोग खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

- आ दे श -

 

(1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

 

(2) सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून वाद मिळकत सदनिकेच्या मोबदल्यापोटी वेळोवेळी घेतलेली एकूण रक्कम रु.10,21,152/- (रक्कम रुपये दहा लाख एकवीस हजार एकशे बावन्न मात्र) तक्रारदारास अदा करावी. तसेच सदर रक्कमेवर तक्रार अर्ज दाखल तारखेपासून ते संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याज अदा करावे.

 

(3) तक्रारदार यांना झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- (र.रुपये वीस हजार मात्र) तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/-(र.रुपये पाच हजार मात्र) सामनेवाला यांनी अदा करावेत.

 

(4) वरील आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी सदरहू आदेश पारीत झालेच्‍या दिनांकापासून 45 दिवसांचे आत करणेची आहे.

 

(5) सदर आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी वरील मुदतीत न केल्‍यास तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 71 व 72 प्रमाणे सामनेवाला विरुध्‍द दाद मागू शकेल.

 

(6) उभय पक्षकारांना निकालपत्राच्‍या सत्‍यप्रती विनामुल्‍य पुरवाव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. ARUN R GAIKWAD]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. SWAPNIL D MEDHE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. AMRUTA N BHOSALE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.