Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/16/50

Shri Ghanshyam kashiram Sawarkar - Complainant(s)

Versus

Sacchitanand Sahakari Pat Sanstha Maryadit Umred & Others - Opp.Party(s)

Shri Shrikant Saoji

24 Oct 2016

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/16/50
 
1. Shri Ghanshyam kashiram Sawarkar
R/o W C L Colony Umred Tah Umred
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sacchitanand Sahakari Pat Sanstha Maryadit Umred & Others
Mangalwaripeth Umred Tah Umred
Nagpur
Maharashtra
2. Sacchitanand Sahakari Pat Sanstha Maryadit Umred Through its President
Mangalwaripeth Umred Tah Umred
Nagpur
Maharashtra
3. Sacchitanand Sahakari Pat Sanstha Maryadit Umred Through its Secretary
Mangalwaripeth Umred Tah Umred
Nagpur
Maharashtra
4. Sacchitanand Sahakari Pat Sanstha Maryadit Umred Through its Administrative Officer
Mangalwaripeth Umred Tah Umred
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. JUSTICE Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 24 Oct 2016
Final Order / Judgement

                             -निकालपत्र

           (पारित व्‍दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्‍या.)

                  ( पारित दिनांक-24 ऑक्‍टोंबर, 2016)

 

01.   तक्रारकर्त्‍याने  ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली  विरुध्‍दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था मर्यादित, उमरेड मध्‍ये मुदती ठेवी मध्‍ये गुंतविलेली रक्‍कम व्‍याजासह परत मिळण्‍यासाठी तसेच अन्‍य अनुषंगिक मागण्‍यांसाठी दाखल केली आहे.

 

 

 

02.    तक्रारीचे स्‍वरुप थोडक्‍यात खालील प्रमाणे-    

       विरुध्‍दपक्ष क्रं-1) ही सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी संस्‍था असून विरुध्‍दपक्ष क्रं-2) हे संस्‍थेचे अध्‍यक्ष तर विरुध्‍दपक्ष क्रं-3) हे संस्‍थेचे सचिव  आहेत आणि विरुध्‍दपक्ष क्रं-4) यांची संस्‍थेवर आता प्रशासक म्‍हणून नियुक्‍ती झालेली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

    तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था मर्यादित, उमरेड  (नोंदणी क्रं-1152)या सहकारी पतसंस्‍थे मध्‍ये  मुदतठेवी मध्‍येपरिशिष्‍ट-अ मध्‍ये दर्शविल्‍या प्रमाणे रक्‍कम गुंतविली-

 

परिशिष्‍ट-अ

अक्रं

पावती क्रंमाक

पावती दिनांक

मुदत ठेवी मध्‍ये गुंतविलेली रक्‍कम

परिपक्‍वता तिथी

व्‍याजाचा वार्षिक दर

परिपक्‍वता तिथीला देय रक्‍कम

1

2

3

4

5

6

7

1

121

25/11/2010

1,00,000/-

25/11/2015

11%

2,00,000/-

 

 

 

 

05 Years

 

 

 

 

 

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष संस्‍थेच्‍या कारभारातील अनियमिततेमुळे संस्‍थेवर प्रशासकाची नियुक्‍ती करण्‍यात आली. तक्रारकर्त्‍याची मुख्‍य तक्रार अशी आहे की, त्‍याने विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍थे मध्‍ये मुदतठेवी मध्‍ये गुंतवलेली रक्‍कम त्‍यातील देयलाभांसह परत मिळण्‍यासाठी वारंवार मागणी करुनही ति रक्‍कम परत करण्‍यात आली नाही. विरुध्‍दपक्षानीं त्‍याला मुदतीठेवीची रक्‍कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. म्‍हणून  शेवटी त्‍याने विरुध्‍दपक्ष संस्‍था आणि तिचे पदाधिकारी यांना दिनांक-29/12/2015 रोजीची कायदेशीर नोटीस सुध्‍दा पाठविली परंतु त्‍यांनी नोटीसचे उत्‍तरही दिले नाही म्‍हणून त्‍याने विरुध्‍दपक्ष यांचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली व खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

      विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍था आणि तिचे तर्फे तिचे पदाधिकारी यांना आदेशीत करण्‍यात यावे की, तक्रारकर्त्‍याला मुदतीठेव मध्‍ये गुंतविलेली आणि परिवक्‍वता तिथी-25.11.2015 ला देय रक्‍कम रुपये-2,00,000/- दिनांक-25.11.2015 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्‍याजासह परत करावी तसेच शारिरीक, मानसिक त्रास बद्दल रुपये-50,000/- व तक्रारखर्च व नोटीस खर्च म्‍हणून रुपये-50,000/- देण्‍याचे विरुध्‍दपक्षानां आदेशित व्‍हावे.                                

 

 

 

 

 

 

 

 

 

03. विरुध्‍दपक्ष क्रं-(1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था                               मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) आणि तिचे तर्फे विरुध्‍दपक्ष क्रं-(2) ते (4) अनुक्रमे अध्‍यक्ष, सचीव आणि प्रशासक यांनी एकत्रित लेखी उत्‍तर मंचा समक्ष सादर केले. त्‍यांचे लेखी उत्‍तरा नुसार ते तक्रारकर्त्‍यास मुदतीठेवी मधील रक्‍कम देण्‍यास तयार आहेत परंतु काही कर्ज प्रकरणांमध्‍ये रकमेची वसुली होणे बाकी आहे, कर्ज रकमेची वसुली संबधाने प्रक्रिया सुरु आहे, सक्षम यंत्रणे कडून काही कर्ज प्रकरणां मध्‍ये अवॉर्ड सुध्‍दा पास झालेला आहे. कर्ज रकमेची वसुली झाल्‍या नंतर ते मुदतीठेवीची रक्‍कम संस्‍थेच्‍या नियमा नुसार परत करण्‍यास तयार आहेत परंतु तक्रारकर्त्‍याने विनाकारण त्‍यांचे विरुध्‍द ही तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्‍याला या संबधीची त्‍यांनी कल्‍पना दिलेली आहे परंतु तक्रारकर्ता जास्‍त रकमेची मागणी त्‍यांचे कडून करीत आहेत. तक्रारकर्त्‍याने त्‍यांना विनाकारण कायदेशीर नोटीस दिली. सबब त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज व्‍हावी, अशी विनंती केली.

 

 

 

04.   तक्रारकर्त्‍याची  सत्‍यापनावरील तक्रार, तक्रारकर्त्‍याचा शपथेवरील पुरावा, दाखल दस्‍तऐवजाच्‍या प्रती आणि उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन मंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे देण्‍यात येतो-

 

 

::निष्‍कर्ष ::

 

05. विरुध्‍दपक्ष क्रं-(1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था                               मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्‍था आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍थेत परिशिष्‍ट-अ मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे मुदतीठेव मध्‍ये  रक्‍कम गुंतविल्‍या संबधाने मुदतीठेव पावती प्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे, सदर मुदतीठेवीची पावती विरुध्‍दपक्ष संस्‍थे तर्फे निर्गमित केलेली असून पावतीवर विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍था ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत असल्‍याचे त्‍यावरील संस्‍थेच्‍या नोंदणी क्रमांका वरुन सिध्‍द होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

      तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पतपुरवठा संस्‍था  मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) या सहकारी संस्‍थेत परिशिष्‍ट- अ प्रमाणे रक्‍कम मुदतठेवी मध्‍ये गुंतवली

 

 

परिशिष्‍ट-अ

अक्रं

पावती क्रंमाक

पावती दिनांक

मुदत ठेवी मध्‍ये गुंतविलेली रक्‍कम

परिपक्‍वता तिथी

व्‍याजाचा वार्षिक दर

परिपक्‍वता तिथीला देय रक्‍कम

1

2

3

4

5

6

7

1

121

25/11/2010

1,00,000/-

25/11/2015

11%

2,00,000/-

 

 

 

 

05 Years

 

 

 

 

 

06.   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍था आणि तिचे संचालक यांना दिनांक-29/12/2015 रोजी रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेल्‍या नोटीसची प्रत पुराव्‍या दाखल अभिलेखावर दाखल केलेली आहे.  तसेच पतसंस्‍थेचे अध्‍यक्षा व सचिवानीं त्‍यांचे स्‍वाक्षरी सह दिनांक-30/09/2015 रोजीचे आमसभे प्रमाणे सर्व ठेवीदारांच्‍या ठेवी परत करण्‍याची दिलेली लेखी ग्‍वाही दिल्‍या संबधाने दस्‍तऐवजाची प्रत दाखल केली. परंतु विरुध्‍दपक्ष संस्‍थेनी त्‍याला मुदतीठेवीची रक्‍कम त्‍यातील देयलाभांसह परत केलेली नाही ही त्‍यांची दोषपूर्ण सेवा आहे आणि यामुळे तक्रारकर्त्‍याला निश्‍चीतच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

 

 

 

07.   सर्वसाधारणपणे सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्‍थेच्‍या व्‍यवहारात काही अनिय‍मितता आढळल्‍यास राज्‍य शासनाचे वतीने प्रशासकाची नियुक्‍ती संस्‍थेचा दैनंदिन कारभार पाहण्‍यासाठी केल्‍या जाते परंतु संस्‍थेच्‍या अनियमितते बद्दल वा गैरव्‍यवहारा बद्दल प्रशासकाची जबाबदारी येते असे होत नाही. संस्‍थेवर प्रशासक नेमला म्‍हणून संस्‍थेची दायीत्‍वाची जबाबदारी संपली असे म्‍हणता येणार नाही, संस्‍थेच्‍या दायीत्‍वाची  जबाबदारी ही   संस्‍था आणि  तिचे पदाधिकारी  यांचेवरच  आहे.  आम्‍ही

 

मंचाचे आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष संस्‍थे कडून होण्‍यासाठी प्रशासकाने योग्‍य ते सहकार्य करावे एवढया पुरतीच प्रशासकाची जबाबदारी निश्‍चीत करतो असे आदेशित करतो. मंचाचे आदेशाचे अनुपालनाची सर्वस्‍वी जबाबदारी ही विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍था आणि तिचे तर्फे तिचे पदाधिकारी यांचीच येते.

 

 

08.   वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

 

                               ::आदेश::

(01)  तक्रारकर्त्‍याची, विरुध्‍दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152)  ही संस्‍था आणि तिच्‍या तर्फे कार्यरत पदाधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं-2) व क्रं-3) अनुक्रमे अध्‍यक्ष व सचिव यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिक स्‍वरुपात (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02)  विरुध्‍दपक्ष क्रं-(4) प्रशासक, सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था मर्यादित, उमरेड यांचे विरुध्‍दची तक्रार ही औपचारीकरित्‍या (Formal) म्‍हणजे विरुध्‍दपक्ष सहकारी पत संस्‍थे कडून मंचाचे आदेशाचे अनुपालन, विरुध्‍दपक्ष क्रं-(1) सहकारी पतसंस्‍था आणि तिचे पदाधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं-(2) आणि विरुध्‍दपक्ष  क्रं-(3) मार्फतीने होईल एवढया मुद्दा पुरती मंजूर करण्‍यात येते.

(03)  विरुध्‍दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152)  ही संस्‍था आणि तिच्‍या तर्फे कार्यरत पदाधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं-2) व क्रं-3) अनुक्रमे अध्‍यक्ष व सचिव यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी या निकालपत्रातील परिशिष्‍ट-अ मध्‍ये दर्शविल्‍या प्रमाणे तक्रारकर्त्‍याने मुदतीठेवी मध्‍ये मुंतवलेली रक्‍कम परिवक्‍वता तिथी (Due Amount on First Maturity Date) दिनांक-25/11/2015 रोजी देय रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) दिनांक-25/11/2015 पासून ते  रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्‍याजासह येणारी रक्‍कम प्रस्‍तुत निकालाची प्रमाणित प्रत मिळाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे तक्रारकर्त्‍यास परत करावी.

 (04)  तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष  क्रं (1) ते (3) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्‍वरुपात (Jointly & Severally) तक्रारकर्त्‍याला द्दावेत.

(05)   सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था मर्यादित, उमरेड, ही संस्‍था आणि तिच्‍या तर्फे कार्यरत पदाधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं-(2) व क्रं-(3) अनुक्रमे अध्‍यक्ष व सचिव यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्‍वरुपात (Jointly & Severally) निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसांचे आत करावे. विरुध्‍दपक्ष   क्रं-(4) प्रशासकाने मंचाचे आदेशाचे अनुपालन त्‍यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था मर्यादित, उमरेड, ही संस्‍था आणि तिच्‍या तर्फे कार्यरत पदाधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं-2) व क्रं-3) अनुक्रमे अध्‍यक्ष व सचिव यांचे कडून होईल असे पहावे.

(06)   प्रस्‍तुत निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.      

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. JUSTICE Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.