Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/16/302

Shri. Shripad Dattatray Khond & other 1 - Complainant(s)

Versus

Sacchidanand Sahkari Pat Purawatha Sanstha Maryadit Umred Through President & other 3 - Opp.Party(s)

Adv. A.R.Narad

23 Aug 2017

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/16/302
 
1. Shri. Shripad Dattatray Khond & other 1
Mangalwaripeth Umred, Ta-Umred
Nagpur
Maharashtra
2. Kedar Shripad Khond
Mangalwari Peth Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sacchidanand Sahkari Pat Purawatha Sanstha Maryadit Umred Through President & other 3
R/o Umred, Ta-Umred
Nagpur
Maharashtra
2. President, Sacchidanand Sahkari Pat Purawatha Sanstha Maryadit Umred
R/o Umred, Ta-Umred
Nagpur
Maharashtra
3. Secretary Sacchidanand Sahkari Pat Purawatha Sanstha Maryadit Umred
R/o Umred Ta-Umred
Nagpur
Maharashtra
4. Manager Sacchidanand Sahkari Pat Purawatha Sanstha Maryadit Umred
R/o Umred, Ta-Umred
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 23 Aug 2017
Final Order / Judgement

                   -निकालपत्र

       (पारित व्‍दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्‍या.)

              ( पारित दिनांक-23 ऑगस्‍ट, 2017)

 

01.   तक्रारदारानीं  ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली  विरुध्‍दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था मर्यादित, उमरेड या पतसंस्‍थे मध्‍ये तक्रारकर्ता क्रं-2) याचे नावे, त्‍याचे वडील तक्रारकर्ता   क्रं-1) यांनी मुदती ठेव तसेच आर.डी. खात्‍या मध्‍ये गुंतविलेली रक्‍कम व्‍याजासह परत मिळण्‍यासाठी तसेच अन्‍य अनुषंगिक मागण्‍यांसाठी दाखल केली आहे.

 

02.    तक्रारीचे स्‍वरुप थोडक्‍यात खालील प्रमाणे-    

       विरुध्‍दपक्ष क्रं-1) ही एक सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी संस्‍था असून विरुध्‍दपक्ष क्रं-2) हे संस्‍थेचे अध्‍यक्ष तर विरुध्‍दपक्ष क्रं-3) हे संस्‍थेचे सचिव आहेत आणि विरुध्‍दपक्ष क्रं-4) हे संस्‍थेचे व्‍यवस्‍थापक आहेत. तक्रारकर्ता क्रं-2) याचे नावाने, त्‍याचे वडील तक्रारकर्ता क्रं-1) यांनी  विरुध्‍दपक्ष क्रं-1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था मर्यादित, उमरेड (नोंदणी क्रं-1152)या सहकारी पतसंस्‍थे मध्‍ये काही रक्‍कम मुदतीठेवी मध्‍ये आणि काही रक्‍कम आर.डी.खात्‍यात विरुध्‍दपक्ष संस्‍थेचे प्रतिनिधी सौ.मृणाल महेश शडांगुळे  यांचे मार्फतीने  जमा केलेली आहे.     

    तक्रारदारांची मुख्‍य तक्रार अशी आहे की, त्‍यांनी विरुध्‍दपक्ष क्रं-1) सहकारी पतसंस्‍थे मध्‍ये मुदतठेव व आर.डी.खात्‍या मध्‍ये गुंतविलेल्‍या रकमा त्‍यातील देयलाभांसह परत मिळण्‍यासाठी वारंवार मागणी करुनही त्‍या रकमा परत करण्‍यात आल्‍या नाहीत. तसेच आर.डी. खात्‍यात किस्‍त जमा करणा-या एजंट सौ. मृणाल शडांगुळे यांनी दिनांक-29/11/2014 नंतर तक्रारकर्त्‍या कडे येणे बंद केले. तक्रारदारांचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी मुदतठेव अंतर्गत          दिनांक-25/05/2015 नंतर देय रक्‍कम रुपये-5031/- त्‍यावरील व्‍याजासह  मिळण्‍यासाठी विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये  मागणी केली असता ती देण्‍यास टाळाटाळ करण्‍यात आली तसेच तक्रारकर्ता क्रं-2) याचे नावे दिनांक-29/11/2014 पर्यंत आर.डी. खात्‍यात रुपये-1800/- एवढी रक्‍कम जमा असून आर.डी.ची मुदत ही दिनांक-23/06/2016 ला पूर्ण झालेली आहे परंतु आज पर्यंत एकही पैसा मिळालेला नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षानीं त्‍यांना देय मुदतीठेवीची तसेच आर.डी.खात्‍यात जमा केलेली रक्‍कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे.

         म्‍हणून शेवटी त्‍यांनी विरुध्‍दपक्ष संस्‍था आणि तिचे पदाधिकारी यांचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली व खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

    विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍था आणि तिचे तर्फे तिचे पदाधिकारी यांना आदेशीत करण्‍यात यावे की, त्‍यांनी  मुदतीठेव आणि आर.डी.खात्‍या मध्‍ये गुंतवणूक केलेल्‍या रक्‍कमा अंतिम परिपक्‍वता तिथी पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-24% दराने व्‍याजासह परत कराव्‍यात तसेच शारिरीक, मानसिक त्रास बद्दल रुपये-25,000/- विरुध्‍दपक्षानां देण्‍याचे आदेशित व्‍हावे.                                

 

03. विरुध्‍दपक्ष क्रं-1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था    मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) आणि तिचे तर्फे विरुध्‍दपक्ष क्रं-(2) ते (4) अनुक्रमे अध्‍यक्ष, सचिव आणि व्‍यवस्‍थापक यांनी एकत्रित लेखी उत्‍तर मंचा समक्ष सादर केले. त्‍यांचे लेखी उत्‍तरा नुसार त्‍यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की,  तक्रारकर्ते हे  विरुध्‍दपक्ष  संस्‍थेचे सभासद  आहेत आणि सहकारी संस्‍था व तिचे सभासदां मधील वाद सोडविण्‍याचे अधिकार हे सहकारी न्‍यायालयासच आहेत त्‍यामुळे ग्राहक मंचाला तक्रार चालविण्‍या संबधी अधिकार क्षेत्र येत नाही. ते तक्रारकर्त्‍याची मुदतीठेव व आर.डी. खात्‍या मधील रक्‍कम देण्‍यास तयार आहेत परंतु काही कर्ज प्रकरणांमध्‍ये रकमेची वसुली होणे बाकी आहे, कर्ज रकमेची वसुली संबधाने प्रक्रिया सुरु आहे, सक्षम यंत्रणे कडून काही कर्ज प्रकरणां मध्‍ये अवॉर्ड सुध्‍दा पास झालेला आहे. कर्ज रकमेची वसुली झाल्‍या नंतर ते मुदतीठेवीची रक्‍कम संस्‍थेच्‍या नियमा नुसार परत करण्‍यास तयार आहेत परंतु तक्रारकर्त्‍याने विनाकारण त्‍यांचे विरुध्‍द ही तक्रार दाखल केलेली आहे. त्‍याला या संबधीची त्‍यांनी कल्‍पना दिलेली आहे, सबब त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज व्‍हावी, अशी विनंती केली.

 

 

04.   तक्रारकर्त्‍याची सत्‍यापनावरील तक्रार, तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये रक्‍कम परत मिळण्‍या संबधी दिलेले निवेदन, मुदतीठेव आर.डी. पासबुक इत्‍यादी दस्‍तऐवजाच्‍या प्रती तसेच विरुध्‍दपक्षांचे लेखी उत्‍तर आणि लेखी युक्‍तीवाद आणि उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन मंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे देण्‍यात येतो-

 

::निष्‍कर्ष ::

 

 

05.  विरुध्‍दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था    मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्‍था आहे. तक्रारकर्ता क्रं-1) याने, त्‍याचा मुलगा तक्रारकर्ता क्रं-2) याचे  नावे विरुध्‍दपक्ष सहकारी संस्‍थेत परिशिष्‍ट-अतसेच परिशिष्‍ट-ब  मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे  अनुक्रमे मुदत ठेवी मध्‍ये रक्‍कम गुंतविल्‍या संबधाने पुराव्‍या दाखल मुदती ठेव पावती प्रत तसेच आर.डी. खात्‍याची प्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे. तक्रारकर्ता क्रं-1) याने, त्‍याचा मुलगा तक्रारकर्ता  क्रं-2) केदार श्रीपाद उर्फ विनोद खोंड याचे  नावे मुदती ठेव

 

आणि आर.डी.पासबुक मध्‍ये गुंतविलेल्‍या रकमेचा तपशिल परिशिष्‍ट-अ आणि परिशिष्‍ट-ब मध्‍ये नमुद केल्‍या नुसार खालील प्रमाणे आहे-

 

     परिशिष्‍ट-अ

 

 

अक्रं

पावती क्रंमाक

पावती दिनांक

मुदत ठेवी मध्‍ये गुंतविलेली रक्‍कम

परिपक्‍वता तिथी

व्‍याजाचा वार्षिक दर

मुदतीअंती देय रक्‍कम

1

2

3

4

5

6

7

1

1843

25/06/2013

4200/-

25/09/2013

9.5%

4300/-

 

 

After Maturity date this F.D.  was renewed from time to time & description of  last renewal is given below

 

 

 

 

25/10/2014

 

25/05/2015

9.75%

5031/-

 

 

परिशिष्‍ट-ब

 

      या व्‍यतिरिक्‍त तक्रारकर्ता क्रं-2) केदार श्रीपाद खोंड याचे नावे विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये आर.डी.खाते उघडलेले असून पासबुकाच्‍या प्रतीवरुन त्‍या खात्‍याचा क्रमांक-1979 असा असून त्‍याचा कालावधी हा दिनांक-23/06/2013 ते दिनांक-23/06/2016 असा असल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्ता क्रं-2) याचे नावे दिनांक-23/06/2013 ते दिनांक-29/11/2014 पर्यंतचे कालावधीत प्रतीमाह रुपये-100/- प्रमाणे एकूण रुपये-1800/- (अक्षरी रुपये एक हजार आठशे फक्‍त) एवढी रक्‍कम जमा केल्‍याचे दिसून येते. सदर आर.डी. खात्‍यावर किती टक्‍के व्‍याजाची रक्‍कम विरुध्‍दपक्ष पतसंस्‍था देणार होती याचा उल्‍लेख पासबुका मध्‍ये केलेला नाही.

 

06.  सदर मुदत ठेव पावती व आर.डी.पासबुक हे विरुध्‍दपक्ष संस्‍थे तर्फे निर्गमित केलेले असून पावत्‍यांवर विरुध्‍दपक्ष सहकारी पत संस्‍था ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत असल्‍याचे त्‍यावरील संस्‍थेच्‍या नोंदणी क्रमांका वरुन सिध्‍द होते. तसेच परिशिष्‍ट- अ मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे मुदतठेव तसेच  परिशिष्‍ट- ब मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे आर.डी खात्‍यात तक्रारकर्ता क्रं-2) याचे नावे रक्‍कम गुंतवणूक केल्‍याची बाब सुध्‍दा पुराव्‍या दाखल मुदती ठेव पावती प्रत तसेच आर.डी.पासबुकाची प्रत या वरुन सिध्‍द होते.

 

             

07.   तक्रारकर्त्‍याने त्‍याची गुंतवणूक केलेली रक्‍कम परत मिळण्‍यासाठी दिनांक-08/08/2016 रोजी विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये लेखी पत्र दिले होते, त्‍या प्रतीवर ते मिळाल्‍या बाबत विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेचा शिक्‍का व सही आहे.  विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेने मुदतीठेवीच्‍या देय दिनांकास देय रक्‍कम तसेच आर.डी.खात्‍यातील जमा रक्‍कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सुध्‍दा सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याला त्‍याने विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये गुंतवणूक केलेल्‍या देय रकमा वेळेवर न मिळाल्‍यामुळे साहजिकच  शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्‍याची बाब प्रकर्षाने  दिसून येते. उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ता हा त्‍याने विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे    मध्‍ये परिशिष्‍ट- अ मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे मुदतीठेवीची रक्‍कम अंतिम परिपक्‍वता तिथीच्‍या देय दिनांका पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्ष पतसंस्‍था आणि तिचे पदाधिकारी यांचे कडून मिळण्‍यास पात्र आहे. त्‍याच बरोबर आर.डी.खात्‍यात दिनांक-29/11/2014 पर्यंत जमा केलेली रक्‍कम रुपये-1800/- दिनांक-29/11/2014 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 9% दराने व्‍याजासह  तसेच शारिरीक व मानसिक त्रास व तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-3000/- विरुध्‍दपक्ष पतसंस्‍था आणि तिचे पदाधिकारी यांचे कडून मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

08.   या ठिकाणी आणखी एका महत्‍वाच्‍या बाबीचा उल्‍लेख करणे आवश्‍यक आहे की, यातील तक्रारदारानीं विरुध्‍दपक्ष क्रं-4) म्‍हणून पतसंस्‍थेच्‍या व्‍यवस्‍थापकानां तक्रारीत प्रतिपक्ष केलेले आहे परंतु व्‍यवस्‍थापक हे पद संस्‍थेचे पदाधिकारी या मध्‍ये मोडत नसून ते पगारी कर्मचा-याचे पद असल्‍याने त्‍याची या प्रकरणी कोणतीही जबाबदारी येत नाही म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं-4) ला या तक्रारीतून मुक्‍त करण्‍यात येते.

 

09.   विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍थे तर्फे दाखल उत्‍तरा मध्‍ये असाही प्राथमिक आक्षेप घेण्‍यात आला की, तक्रारकर्ते हे विरुध्‍दपक्ष संस्‍थेचे सभासद आहेत आणि सहकारी संस्‍था व तिचे सभासदां मधील वाद सोडविण्‍याचे अधिकार हे सहकारी न्‍यायालयासच आहेत त्‍यामुळे ग्राहक मंचाला तक्रार चालविण्‍या संबधी अधिकार क्षेत्र येत नाही. या आक्षेपा संदर्भात ग्राहक मंचा तर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तक्रारकर्त्‍यानीं विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेच्‍या मुदती ठेवी मध्‍ये रकमा गुंतविलेल्‍या असल्‍याने ते विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थेचे “ग्राहक” होतात आणि विरुध्‍दपक्ष सहकारी पतसंस्‍थेनी त्‍यांना देय असलेल्‍या रकमा परत न करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍यामुळे तक्रारकर्ते हे विरुध्‍दपक्षाचे ग्राहक होतात आणि त्‍यामुळे ग्राहक न्‍यायमंचाला प्रस्‍तुत तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र येते अशा आशयाचे अनेक निकालपत्र मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, न्‍यु दिल्‍ली यांनी वेळोवेळी दिलेले असल्‍याने विरुध्‍दपक्षाचे सदर आक्षेपात ग्राहक मंचास कोणतेही तथ्‍य दिसून येत नाही.

     

10.  वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

 

::आदेश::

 

(01)  तक्रारकर्ता क्रं-1) श्रीपाद उर्फ विनोद दत्‍तात्रय खोंड आणि  त्‍यांचा मुलगा तक्रारकर्ता क्रं-2) केदार श्रीपाद उर्फ विनोद खोंड यांची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं-1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152)  ही संस्‍था आणि तिच्‍या तर्फे पदाधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं-2) अध्‍यक्ष व विरुध्‍दपक्ष क्रं-3) सचिव यांचे विरुध्‍द  वैयक्तिक आणि संयुक्तिक स्‍वरुपात (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

(02)  विरुध्‍दपक्ष क्रं-(4) व्‍यवस्‍थापक, सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था मर्यादित, उमरेड हे पद पगारी कर्मचा-याचे पद असून ते पदाधिकारी मध्‍ये मोडत नसल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं-4) याला या तक्रारीतून मुक्‍त करण्‍यात येते.

 

(03)  विरुध्‍दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152)  ही संस्‍था आणि तिच्‍या तर्फे पदाधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं-2) व क्रं-3) अनुक्रमे अध्‍यक्ष व सचिव यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी या निकालपत्रातील परिशिष्‍ट-अ मध्‍ये दर्शविल्‍या प्रमाणे तक्रारकर्ता क्रं-2) याचे नावे विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये मुदत ठेव मध्‍ये गुंतवणूक केलेली रक्‍कम अंतिम  देय परिपक्‍वता तिथी पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो  द.सा.द.शे.-12% दराने व्‍याजासह येणारी रक्‍कम प्रस्‍तुत निकालाची प्रमाणित प्रत मिळाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्त्‍याला  परत करावी.

 

(04)  विरुध्‍दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152)  ही संस्‍था आणि तिच्‍या तर्फे पदाधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं-2) व क्रं-3) अनुक्रमे अध्‍यक्ष व सचिव यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी या निकालपत्रातील परिशिष्‍ट-ब मध्‍ये दर्शविल्‍या प्रमाणे तक्रारकर्ता क्रं-2) याचे नावे विरुध्‍दपक्ष पतसंस्‍थे मध्‍ये आर.डी. खात्‍यात जमा केलेली एकूण रक्‍कम  रुपये-1800/-(अक्षरी रुपये एक हजार आठशे फक्‍त) दिनांक-29/11/2014 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह येणारी रक्‍कम प्रस्‍तुत निकालाची प्रमाणित प्रत मिळाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्त्‍याला  परत करावी.

 

(05) तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रास तसेच तक्रारखर्च म्‍हणून रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष  क्रं (1) पतसंस्‍थे तर्फे तिचे पदाधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं-(2) व क्रं-(3) अनुक्रमे अध्‍यक्ष व  सचिव यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्‍वरुपात (Jointly & Severally) तक्रारकर्त्‍याला द्दावेत.

 

(06)   सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्‍था मर्यादित, उमरेड, ही संस्‍था आणि तिच्‍या     तर्फे पदाधिकारी विरुध्‍दपक्ष क्रं-(2) व क्रं-(3) अनुक्रमे अध्‍यक्ष व सचिव      यांनी वैयक्तिक  आणि  संयुक्तिक  स्‍वरुपात (Jointly & Severally)          निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

(07)  प्रस्‍तुत निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.      

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.