-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्या.)
( पारित दिनांक-23 जुन, 2017)
01. तक्रारकर्तीने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड मध्ये मुदती ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी तसेच अन्य अनुषंगिक मागण्यांसाठी दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-1) ही सहकार कायद्दा खालील नोंदणीकृत सहकारी संस्था असून विरुध्दपक्ष क्रं-2) हे संस्थेचे अध्यक्ष तर विरुध्दपक्ष क्रं-3) हे संस्थेचे सचिव आहेत आणि विरुध्दपक्ष क्रं-4) यांची संस्थेवर आता प्रशासक म्हणून नियुक्ती झालेली आहे. तक्रारकर्ती हिने तिचे नावे विरुध्दपक्ष सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड (नोंदणी क्रं-1152)या सहकारी पतसंस्थे मध्ये मुदतीठेवी मध्ये “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे रकमा गुंतविल्यात-
“परिशिष्ट-अ”
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
1 | 182 | 15/02/2014 | 50,000/- | 15/06/2014 | 9.50% | 51,583/- |
| | After Maturity date this F.D. was renewed for the further period i.e.from | | |
| | 15/06/2014 | | 15/01/2015 | 9.75% | 54,517/- |
“परिशिष्ट-अ”
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
2 | 1265 | 17/08/2009 | 1,13,000/- | 17/02//2015 | 11% | 2,26,000/- |
“परिशिष्ट-अ”
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
3 | 142 | 19/01/2014 | 1,26,000/- | 19/04/2014 | 9.50% | 1,28,993/- |
| | After Maturity date this F.D. was renewed for the further period i.e.from | | |
| | 19/04/2014 | | 19/07/2014 | 9.50% | 1,32,057/- |
| | 19/07/2014 | | 19/08/2015 | 10.25% | 1,46,721/- |
“परिशिष्ट-अ”
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
4 | 22 | 19/10/2013 | 50,000/- | 19/01/2014 | 9.25% | 51,156/- |
| | After Maturity date this F.D. was renewed for the further period i.e.from | | |
| | 19/01/2014 | | 19/04/2014 | 9.50% | 52,371/- |
| | 19/04/2014 | | 19/07/2014 | 9.50% | 53,615/- |
| | 19/07/2014 | | 19/08/2015 | 10.25% | 59,568/- |
“परिशिष्ट-अ”
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
5 | 13 | 03/10/2010 | 82,267/- | 03/10/2015 | 11% | 1,64,534/- |
“परिशिष्ट-अ”
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
6 | 557 | 16/06/2011 | 50,000/- | 16/06/2016 | 11% | 1,00,000/- |
“परिशिष्ट-अ”
अक्रं | पावती क्रंमाक | पावती दिनांक | मुदत ठेवी मध्ये गुंतविलेली रक्कम | परिपक्वता तिथी | व्याजाचा वार्षिक दर | मुदतीअंती देय रक्कम |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
7 | 1281 | 04/08/2012 | 81,267/- | 04/11/2018 | 11% | 1,62,534/- |
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिने स्वकष्टार्जीत कमाविलेले उत्पन्न हे विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मुदती ठेवी मध्ये गुंतविलेले आहे. विरुध्दपक्ष पत संस्थेच्या कारभारातील अनियमिततेमुळे संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.
तक्रारकर्तीची मुख्य तक्रार अशी आहे की, तिने विरुध्दपक्ष सहकारी संस्थे मध्ये मुदतीठेवी मध्ये गुंतविलेल्या रकमा त्यातील देयलाभांसह परत मिळण्यासाठी वारंवार मागणी करुनही त्या रकमा परत करण्यात आल्या नाहीत. विरुध्दपक्षानीं तिला देय मुदतीठेवीची रक्कम परत न करुन दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
म्हणून शेवटी तिने विरुध्दपक्ष संस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली व खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
विरुध्दपक्ष सहकारी पतसंस्था आणि तिचे तर्फे तिचे पदाधिकारी यांना आदेशीत करण्यात यावे की, तिने मुदतीठेवी मध्ये गुंतवणूक केलेल्या रक्कमा परिपक्वता परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह परत कराव्यात तसेच शारिरीक, मानसिक त्रास बद्दल रुपये-50,000/- व तक्रारखर्च व नोटीस खर्च म्हणून रुपये-50,000/- देण्याचे विरुध्दपक्षानां आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-(1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) आणि तिचे तर्फे विरुध्दपक्ष क्रं-(2) ते (4) अनुक्रमे अध्यक्ष, सचीव आणि प्रशासक यांनी एकत्रित लेखी उत्तर मंचा समक्ष सादर केले. त्यांचे लेखी उत्तरा नुसार ते तक्रारकर्तीची मुदतीठेवी मधील रक्कम देण्यास तयार आहेत परंतु काही कर्ज प्रकरणांमध्ये रकमेची वसुली होणे बाकी आहे, कर्ज रकमेची वसुली संबधाने प्रक्रिया सुरु आहे, सक्षम यंत्रणे कडून काही कर्ज प्रकरणां मध्ये अवॉर्ड सुध्दा पास झालेला आहे. कर्ज रकमेची वसुली झाल्या नंतर ते मुदतीठेवीची रक्कम संस्थेच्या नियमा नुसार परत करण्यास तयार आहेत परंतु तक्रारकर्तीने विनाकारण त्यांचे विरुध्द ही तक्रार दाखल केलेली आहे. तिला या संबधीची त्यांनी कल्पना दिलेली आहे , सबब त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज व्हावी, अशी विनंती केली.
04. तक्रारकर्तीची सत्यापनावरील तक्रार, तसेच तिचा शपथेवरील पुरावा, दाखल दस्तऐवजाच्या प्रती तसेच विरुध्दपक्षांचे लेखी उत्तर आणि लेखी युक्तीवाद आणि उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
05. विरुध्दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्था आहे. तक्रारकर्ती हिने तिचे नावे विरुध्दपक्ष सहकारी संस्थेत “परिशिष्ट-अ” मध्ये नमुद केल्या प्रमाणे मुदती ठेवी मध्ये रकमा गुंतविल्या संबधाने पुराव्या दाखल मुदती ठेवी पावत्यांच्या प्रती अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत, सदर मुदतीठेवीच्या पावत्या या विरुध्दपक्ष संस्थे तर्फे
निर्गमित केलेल्या असून पावत्यांवर विरुध्दपक्ष सहकारी पत संस्था ही सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत असल्याचे त्यावरील संस्थेच्या नोंदणी क्रमांका वरुन सिध्द होते. तसेच परिशिष्ट- अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे अक्रं-(1) ते (7) प्रमाणे मुदतीठेवीं मध्ये रकमा गुंतवणूक केल्याची बाब सुध्दा पुराव्या दाखल मुदती ठेवी पावत्यांच्या प्रतीं वरुन सिध्द होते.
06. विरुध्दपक्ष पतसंस्थेने मुदतीठेवीच्या देय दिनांकास तक्रारकर्तीच्या मुदतीठेवीच्या देय रकमा परत न करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सुध्दा सिध्द होते. तक्रारकर्तीला तिने विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये गुंतवणूक केलेल्या देय रकमा वेळेवर न मिळाल्यामुळे साहजिकच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब प्रकर्षाने दिसून येते. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्ती ही तिने विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये परिशिष्ट- अ मध्ये नमुद केल्या प्रमाणे मुदतीठेवीच्या रकमा परिपक्वता तिथीच्या देय दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो तसेच पुर्नगुंतवणूक केली असल्यास अंतिम देय परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्याजासह विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे कडून मिळण्यास पात्र आहे. तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्ष पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी यांचे कडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
07. सर्वसाधारणपणे सहकार कायद्दाखालील नोंदणीकृत संस्थेच्या व्यवहारात काही अनियमितता आढळल्यास राज्य शासनाचे वतीने प्रशासकाची नियुक्ती संस्थेचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी केल्या जाते परंतु संस्थेच्या अनियमितते बद्दल वा गैरव्यवहारा बद्दल प्रशासकाची जबाबदारी येते असे होत नाही. संस्थेवर प्रशासक नेमला म्हणून संस्थेची दायीत्वाची जबाबदारी संपली असे म्हणता येणार नाही, संस्थेच्या दायीत्वाची जबाबदारी ही संस्था आणि तिचे पदाधिकारी यांचेवरच आहे. आम्ही मंचाचे आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष
पत संस्थे कडून होण्यासाठी प्रशासकाने योग्य ते सहकार्य करावे एवढया पुरतीच प्रशासकाची जबाबदारी निश्चीत करतो असे आदेशित करतो. मंचाचे आदेशाचे अनुपालनाची सर्वस्वी जबाबदारी ही विरुध्दपक्ष सहकारी संस्था आणि तिचे तर्फे तिचे पदाधिकारी यांचीच येते. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्ती सौ.धनेश्वरी प्रकाश लिचडे हयांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही संस्था आणि तिच्या तर्फे कार्यरत पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) अनुक्रमे अध्यक्ष व सचिव यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं-(4) प्रशासक, सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड यांचे विरुध्दची तक्रार ही औपचारीकरित्या (Formal) म्हणजे विरुध्दपक्ष सहकारी पत संस्थे कडून मंचाचे आदेशाचे अनुपालन, विरुध्दपक्ष क्रं-(1) सहकारी पतसंस्था आणि तिचे पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(2) आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) मार्फतीने होईल एवढया मुद्दा पुरती मंजूर करण्यात येते.
(03) विरुध्दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, तालुका उमरेड (नोंदणी क्रं-1152) ही संस्था आणि तिच्या तर्फे कार्यरत पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) अनुक्रमे अध्यक्ष व सचिव यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी या निकालपत्रातील “परिशिष्ट-अ” मध्ये दर्शविल्या प्रमाणे तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये मुदती ठेवी मध्ये गुंतवणूक केलेल्या रकमा त्या-त्या देय परिपक्वता तिथी पासून तसेच पुर्नगुंतवणूक केली असल्यास
अंतिम देय परिपक्वता तिथी पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह येणा-या रकमा प्रस्तुत निकालाची प्रमाणित प्रत मिळाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत तक्रारकर्तीला परत कराव्यात.
(04) तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं (1) ते (3) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) तक्रारदारांना द्दावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, ही संस्था आणि तिच्या तर्फे कार्यरत पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-(2) व क्रं-(3) अनुक्रमे अध्यक्ष व सचिव यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात (Jointly & Severally) निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे. विरुध्दपक्ष क्रं-(4) प्रशासकाने मंचाचे आदेशाचे अनुपालन त्यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं- (1) सच्चिदानंद सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित, उमरेड, ही संस्था आणि तिच्या तर्फे कार्यरत पदाधिकारी विरुध्दपक्ष क्रं-2) व क्रं-3) अनुक्रमे अध्यक्ष व सचिव यांचे कडून होईल असे पहावे.
(06) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.