Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/504/2018

SHRI. AMAN KHAN ISMAIL KHAN - Complainant(s)

Versus

S.N.D.L. LTD. THROUGH THE VIGILANCE HEAD - Opp.Party(s)

ADV. R. K. ROKADE

18 Jan 2022

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/504/2018
 
1. SHRI. AMAN KHAN ISMAIL KHAN
R/O. PLOT NO. 03, ADARSH NAGAR, BEHIND PANCHVATI ASHRAM, UMRED ROAD, NAGPUR
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. S.N.D.L. LTD. THROUGH THE VIGILANCE HEAD
CHHAPRU NAGAR, NAGPUR
NAGPUR
Maharashtra
2. S.N.D.L. LTD. THROUGH THE ENGINEER, SUBSTATION
SUTGIRANI, UMRED ROAD, NAGPUR
NAGPUR
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR MEMBER
 HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 18 Jan 2022
Final Order / Judgement

 आदेश पारीत व्‍दाराः श्री. अविनाश वि. प्रभुणे, मा. सदस्‍य.

      सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये विरुध्‍द पक्षांच्‍या सेवेतील त्रुटिबाबत दाखल केलेली आहे. सदर तक्रारीतील तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे.

  1.       तक्रारकर्ता हा प्‍लॉट नं. 03, आदर्ष नगर, पंचवटी आश्रमच्‍या मागे, उमरेड रोड, नागपूर येथील रहीवासी असुन त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून विज जोडणी घेतली असुन त्‍याचा ग्राहक क्रमांक 410012644888 आहे. विरुध्‍द पक्षाने जुन-2014 मध्‍ये जुने मिटर काढून नविन मिटर लावल्‍यानंतर नियमीतपणे विज बिल दिले नाही. तसेच तक्रारकर्त्‍याची विज जोडणी ही त्‍याचे वडीलांचे नावाने असुन त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याची माहीती विरुध्‍द पक्षास देण्‍यांत आली होती. विरुध्‍द पक्षाने दि.14.10.2016 रोजी डिमांड नोट पाठवुन रु.29,000/- ची केलेली मागणी चुकीची असल्‍याचा आक्षेप घेत सन 2014 पासुन नियमीत बिल देण्‍याचे निर्देश देण्‍याचे मागणीसह प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्‍याने मानसिक व शारीरिक त्रासाकरीता रु.1,00,000/- व तक्रारीचा खर्च रु.20,000/- मिळण्‍याची मागणी केलेली आहे.

2.          दि.29, मे-2019 रोजी तक्रार स्विकृत करुन विरुध्‍द पक्षांना नोटीस काढण्‍याचा आदेश पारीत करण्‍यांत आला. त्‍यानंतर तक्रारकर्ता व त्‍याचे वकील सतत गैरहजर आहेत. दरम्‍यानचे कालावधीत एस.एन.डी.एल आणि एम.एस.ई.डि.सी.एल. यांचेतील करार संपल्‍यामुळे एम.एस.ई.डि.सी.एल. यांना विरुध्‍द पक्ष म्‍हणून समाविष्‍ट करण्‍याबाबत कुठलीही कार्यवाही केल्‍याचे दिसत नाही.नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास तक्रार चालविण्‍यास स्‍वारस्‍य नसल्‍याचे दिसते. नैसर्गिक न्‍याय तत्‍वानुसार विरुध्‍द पक्षांना नोटीसची बजावणी झाल्‍या शिवाय प्रस्‍तुत प्रकरणी त्‍यांचे विरुध्‍द आदेश पारीत करणे न्‍यायोचित ठरणार नाही. सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यांत येते.

  • //  अंतिम आदेश  // -

(1)   तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(2)   खर्चाबद्दल कुठलाही आदेश नाही.

(3)   उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्‍क पाठविण्‍यात यावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. SMITA N. CHANDEKAR]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.