Maharashtra

Solapur

CC/10/416

Pradip Madhukar Vibhute R/o.Mohal Dist.Solapur - Complainant(s)

Versus

S.M.Shankarrao mohite patil nagri sh.patsansta Ltd Barloni 2. Yashwant Kisan shinde 3. Vyankesh Shiv - Opp.Party(s)

adv.Sonminde

27 Apr 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/10/416
1. Pradip Madhukar Vibhute R/o.Mohal Dist.SolapurPO- Mohol Tal Mohol Dist solapurSolapurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. S.M.Shankarrao mohite patil nagri sh.patsansta Ltd Barloni 2. Yashwant Kisan shinde 3. Vyankesh Shivaji Patil 4. Popat Babru Gunjal 5. Dinkar Srishna More 6. Shrirang Shambu More 7. Babaso Soudagar AvSM Shankarrao Mohite Patil Nagari Pat Sansaha Barloni Dist SolapurSolapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Sanjeevani S. Shah ,MEMBER
PRESENT :adv.Sonminde, Advocate for Complainant
Bagal, Advocate for Opp.Party

Dated : 27 Apr 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 416/2010.

 

                                                                तक्रार दाखल दिनांक : 12/07/2010.    

                                                                तक्रार आदेश दिनांक : 27/04/2010.   

 

प्रदीप मधुकर विभुते, वय 45 वर्षे, व्‍यवसाय : नोकर,

रा. मोहोळ, ता. माढा, जि. सोलापूर.                                     तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

1. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी ग्रामीण सह. पतसंस्‍था

   मर्यादीत, बारलोणी तर्फे प्रशासक, कार्या. अधि. (2) जिल्‍हा उपनिबंधक,

   सहकारी संस्‍था, सोलापूर, जि. सोलापूर.

2. श्री. यशवंत किसन शिंदे, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 

3. श्री. व्‍यंकटेश शिवाजी पाटील, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.  

4. श्री. पोपट डबरु गुंजाळ, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

5. श्री. दिनकर कृष्‍णा मोरे, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.  

6. श्री. श्रीरंग संभू मोरे, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.  

7. श्री. बाबासाहेब सौदागर आवताडे,  वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

8. श्री. रामलिंग बाबू ठोबरे, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.   

9. श्री. सौदागर श्रीपती चव्‍हाण, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

10. श्री. बाबू भवानजी गुंजाळ, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.  

11. सौ. अहिल्‍यादेवी सदाशिव हनवते, वय सज्ञान, व्‍यवसाय : घरकाम,

    रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.

12. श्री. मधुकर भाऊराव गपाटे, वय सज्ञान, व्‍यवसाय : शेती/व्‍यापार,

   रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.                          विरुध्‍द पक्ष

 

                        कोरम          :-  सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                     सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य

 

                   तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ :  आर.एफ. सोनिमिंडे

                   विरुध्‍द पक्ष क्र.12 तर्फे विधिज्ञ : डी.पी. बागल

 

आदेश

 

 

सौ. संगिता एस. धायगुडे, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.     तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेमध्‍ये लखपती ठेव पावती, मुदत ठेव पावती व दामदुप्‍पट ठेव पावतीद्वारे खालीलप्रमाणे रक्‍कम गुंतवणूक केलेली आहे.

 

ठेव तपशील

रक्‍कम

पावती क्रमांक

गुंतवणूक तारीख

मुदत संपण्‍याची तारीख

व्‍याज दर

लखपती ठेव

18,000

0000502

3/9/2003

13/12/2009

16.5

दामदुप्‍पट ठेव

30,000

004528

12/6/2004

13/12/2009

--

दामदुप्‍पट ठेव

10,000

010645

21/11/2006

21/11/2012

--

मुदत ठेव

20,000

020929

11/12/2007

11/1।2009

14 टक्‍के

मुदत ठेव

28,000

020939

15/12/2007

15/1/2009

14 टक्‍के

मुदत ठेव

70,000

0026791

14/7/2008

14/8/2009

15 टक्‍के

मुदत ठेव

30,000

0026120

7/10/2008

7/11/2009

15 टक्‍के

मुदत ठेव

30,000

0026385

4/11/2008

4/12/2009

15 टक्‍के

मुदत ठेव

30,000

0026191

6/12/2008

6/1/2009

15 टक्‍के

 

2.    मुदत पूर्ण झाल्‍यानंतर तक्रारदार यांना ठेव रक्‍कम परत करण्‍यास विरुध्‍द पक्ष यांनी टाळाटाळ केली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी अनुक्रमे रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.

 

3.    विरुध्‍द पक्ष क्र.12 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार ते विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेचे सचिव असून पगारी नोकरदार आहेत. ठेव पावत्‍यांवर त्‍यांच्‍या स्‍वाक्ष-या नाहीत आणि ठेव रक्‍कम परत करण्‍याची त्‍यांची जबाबदारी नाही. शेवटी त्‍यांनी तक्रार रद्द करण्‍याची विनंती केली आहे.

 

 

4.    विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 11 यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी होऊनही ते गैरहजर राहिले आहेत आणि त्‍यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फी चौकशीचे आदेश करण्‍यात आले.

 

5.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष क्र.12 यांचे म्‍हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत.

           

मुद्दे                                उत्‍तर

 

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                         होय. 

2. तक्रारदार ठेव रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?             होय. 

3. काय आदेश ?                                        शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

निष्‍कर्ष

 

6.    मुद्दा क्र. 1 ते 3 :-   तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्र.1 पतसंस्‍थेच्‍या करमाळा शाखेमध्‍ये लखपती ठेव पावती, मुदत ठेव पावती व दामदुप्‍पट ठेव पावतीद्वारे रक्‍कम गुंतविल्‍याचे दिसून येते. प्रामुख्‍याने, ठेवीची मुदत संपल्‍यानंतर रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करण्‍यात येत आहे, अशी तक्रारदार यांची तक्रार आहे.

 

 

7.    तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादीत, बारलोणी या पतसंस्‍थेच्‍या संचालकांची यादी रेकॉर्डवर दाखल केलेली आहे आणि त्‍याप्रमाणे संचालकांना प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये विरुध्‍द पक्ष म्‍हणून समाविष्‍ठ करण्‍यात आलेले आहे. मंचाने विरुध्‍द पक्ष यांना मंचाची नोटीस बजावल्‍यानंतरही ते मंचासमोर हजर झाले नाहीत किंवा म्‍हणणे दाखल केलेले नाही. विरुध्‍द पक्ष यांनी मंचासमोर हजर होऊन म्‍हणणे दाखल केले नसल्‍यामुळे एका अर्थाने तक्रारदार यांची तक्रार त्‍यांना मान्‍य आहे, यास पुष्‍ठी मिळते.

 

8.    तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे लखपती ठेव, दामदुप्‍पट ठेव व मुदत ठेवीमध्‍ये रक्‍कम गुंतवणूक करुन वित्‍तीय सेवा घेतलेली आहे. ठेव पावतीची मुदतपूर्व व मुदत पूर्ण झाल्‍यानंतर वेळोवेळी मागणी करुनही त्‍यांना ठेव रक्‍कम देण्‍यात आलेली नाही. ठेवीच्‍या मुदतपुर्तीनंतर किंवा मुदतपूर्व रक्‍कम परत करणे, ही विरुध्‍द पक्ष यांची करारात्‍मक जबाबदारी व कर्तव्‍य आहे. असे असताना, तक्रारदार यांना विरुध्‍द पक्ष यांनी ठेव रक्‍कम परत न करुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. त्‍यामुळे ठेव रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास ते पात्र ठरतात. तक्रारदार यांनी दामदुप्‍पट ठेव पावती क्र.010645 ची मुदतपूर्व मागणी केलेली आहे. त्‍यामुळे त्‍या ठेवीचे व्‍याज द.सा.द.शे. 13 टक्‍के दराप्रमाणे मिळणे उचित ठरते.

 

9.    विरुध्‍द पक्ष क्र.12 हे पतसंस्‍थेचे सचिव असल्‍यामुळे ठेव रक्‍कम परत करण्‍याची त्‍यांची जबाबदारी सिध्‍द झाल्‍याशिवाय त्‍यांना जबाबदार धरता येत नाही.

 

10.   शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

 

 

 

      1. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्‍कम या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

     

ठेवीचा तपशील

पावती क्रमांक

ठेव रक्‍कम

(रुपयामध्‍ये)

खालील तारखेपासून व्‍याज द्यावयाचे

देय व्‍याज दर (द.सा.द.शे.)

लखपती ठेव

0000502

18,000

3/9/2003

16.5 टक्‍के

दामदुप्‍पट ठेव

004528

60,000

13/12/2009

13 टक्‍के

दामदुप्‍पट ठेव

010645

10,000

21/11/2006

13 टक्‍के

मुदत ठेव

020929

20,000

11/12/2007

14 टक्‍के

मुदत ठेव

020939

28,000

15/12/2007

14 टक्‍के

मुदत ठेव

0026791

70,000

14/7/2008

15 टक्‍के

मुदत ठेव

0026120

30,000

7/10/2008

15 टक्‍के

मुदत ठेव

0026385

30,000

4/11/2008

15 टक्‍के

मुदत ठेव

0026191

30,000

6/12/2008

15 टक्‍के

 

      2. विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

 

 

 

(सौ. संजीवनी एस. शहा)                                (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

सदस्‍य                                            अध्‍यक्ष

     जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                          ----00----

 (संविक/स्‍व/26411)

 


[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT