जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. तक्रार दाखल दिनांक : 18/01/2011. तक्रार आदेश दिनांक : 27/04/2011. ग्राहक तक्रार क्रमांक : 719/2010. श्री. अमोल अजिनाथ देशमुख, वय 30 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. वांगी नं.1, ता. करमाळा, जि. सोलापूर. तक्रारदार ग्राहक तक्रार क्रमांक : 720/2010. 1. श्रीमती कांचन हरिशचंद्र देशमुख, वय 55 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. मु.पो. वांगी नं.1, ता. करमाळा, जि. सोलापूर. 2. श्री. दत्तात्रय हरिशचंद्र देशमुख, वय 30 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. वरीलप्रमाणे. 3. श्री. दिपक हरिशचंद्र देशमुख, वय 28 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. वरीलप्रमाणे. तक्रारदार विरुध्द 1. स.म. शंकरराव मोहिते-पाटील ना. सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, शाखा : जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापूर. 2. यशवंत किसन शिंदे, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. (चेअरमन, स.म. शंकरराव मोहिते-पाटील ना. सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, शाखा : जेऊर.) 3. व्यंकटेश (नाना) शिवाजी पाटील, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 4. पोपट डबरु गुंजाळ, वय सज्ञान, व्यवसाय : व्हाईस चेअरमन, (स.म. शंकरराव मोहिते-पाटील ना. सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी.) रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 5. श्री. दिनकर कृष्णा मोरे, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 6. श्री. बाबासाहेब सौदागर आवताडे, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष 7. श्री. बाबू भवानजी गुंजाळ, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 8. श्री. श्रीरंग संभू मोरे, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 9. श्री. सौदागर श्रीपती चव्हाण, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 10. श्री. रामलिंग बाबू ठोबरे, वय सज्ञान, व्यवसाय : व्यापार, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 11. सौ. अहिल्यादेवी सदाशिव हनवते, वय सज्ञान, व्यवसाय : घरकाम, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 12. मॅनेजर, स.म. शंकरराव मोहिते-पाटील ना. सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, शाखा : जेऊर, बार्शी, ता. करमाळा, जि. सोलापूर. 13. प्रशासक मंडळ, स.म. शंकरराव मोहिते-पाटील ना. सह. पतसंस्था मर्यादीत, बारलोणी, शाखा : जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष गैरहजर / एकतर्फा आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेमध्ये खालीलप्रमाणे रक्कम गुंतवणूक केली असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. ग्राहक तक्रार क्र. 719/2010 मध्ये :- ठेवीदाराचे नांव | ठेव रक्कम | पावती क्रमांक | गुंतवणूक तारीख | मुदत संपण्याची तारीख | व्याज दर | अमोल अजिनाथ देशमुख | 50,000 | 028172 | 29/11/08 | 29/12/2009 | 16 टक्के | अमोल अजिनाथ देशमुख | 1,00,000 | 028048 | 27/10/08 | 27/10/2009 | 16 टक्के |
ग्राहक तक्रार क्र. 720/2010 मध्ये :- ठेवीदाराचे नांव | ठेव रक्कम | पावती क्रमांक | गुंतवणूक तारीख | मुदत संपण्याची तारीख | व्याज दर | कांचन हरिश्चंद्र देशमुख | 50,000 | 022438 | 23/7/07 | 23/8/2008 | 13 टक्के | कांचन हरिश्चंद्र देशमुख | 20,000 | 022394 | 27/5/08 | 27/6/2009 | 15 टक्के | दत्तात्रय हरिश्चंद्र देशमुख | 50,000 | 001478 | 27/6/08 | 27/7/2009 | 16 टक्के | दत्तात्रय हरिश्चंद्र देशमुख | 75,000 | 022549 | 10/1/08 | 10/2/2009 | 15 टक्के | दत्तात्रय हरिश्चंद्र देशमुख | 50,000 | 022437 | 23/7/07 | 23/8/2008 | 13 टक्के | दिपक हरिश्चंद्र देशमख | 1,00,000 | 022398 | 4/5/08 | 4/6/2009 | 15 टक्के |
2. तक्रारदार यांनी मुदत ठेव पावतीद्वारे व मासिक व्याज प्राप्ती ठेव योजनेद्वारे वरीलप्रमाणे नमूद रक्कम गुंतवणूक केलेली आहे. तकारदार यांना कौटुंबिक कारणास्तव व औषधोपचारासाठी ठेव रकमेची आवश्यकता होती आणि त्यांनी ठेव रकमेची मागणी केली असता, ठेव रक्कम व त्यावरील व्याज देण्यास विरुध्द पक्ष यांनी टाळाटाळ केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी ठेव रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी अनुक्रमे प्रत्येकी रु.10,000/- व रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र.1 ते 13 यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले. 4. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष सहकार महर्षी शकंरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, बारलोणी या पतसंस्थेच्या जेऊर शाखेमध्ये मुदत ठेव पावती व मासिक व्याज प्राप्ती योजनेद्वारे रक्कम गुंतविल्याचे रेकॉर्डवर दाखल पावत्यांवरुन निदर्शनास येते. ठेवीच्या मुदतपुर्तीनंतर तक्रारदार यांनी व्याजासह ठेव रकमेची मागणी केली असता, विरुध्द पक्ष यांच्याकडून रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची त्यांची प्रमुख तक्रार आहे. 6. तक्रारदार यांनी पतसंस्थेच्या संचालकांची यादी रेकॉर्डवर दाखल केली असून त्याप्रमाणे त्यांना तक्रारीमध्ये विरुध्द पक्ष म्हणून समाविष्ठ करण्यात आलेले आहे. निर्विवादपणे, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष सहकार महर्षी शकंरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, बारलोणी या पतसंस्थेच्या जेऊर शाखेमध्ये मुदत ठेव पावती व मासिक व्याज प्राप्ती योजनेद्वारे रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांनी ठेवीच्या मुदतपुर्तीनंतर वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम व्याजासह परत करण्यात आलेली नाही. ठेवीदारांच्या मागणीनुसार ठेवीची रक्कम मुदत संपल्यानंतर परत करणे, ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल न केल्यामुळे त्यांना तक्रारदार यांची तक्रार मान्य आहे, या अनुमानास आम्ही येत आहोत. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे ठेव पावतीची रक्कम व्याजासह मिळविण्यास तक्रारदार हक्कदार ठरतात. 7. विरुध्द पक्ष क्र.12 हे पतसंस्थेचे मॅनेजर आहेत. ठेव रक्कम परत करण्याची त्यांची वैयक्तिक जबाबदारी सिध्द झाल्याशिवाय त्यांना तक्रारदार यांची ठेव रक्कम परत करण्याविषयी जबाबदार धरता येणार नाही. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 ते 11 व 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्कम या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. ग्राहक तक्रार क्र. 719/2010 मध्ये :- ठेवीदार/ तक्रारदारांचे नांव | पावती क्रमांक | देय ठेव रक्कम (रुपयामध्ये) | खालील तारखेपासून व्याज द्यावयाचे | देय व्याज दर (द.सा.द.शे.) | अमोल अजिनाथ देशमुख | 028172 | 50,000 | 29/11/08 | 16 टक्के | अमोल अजिनाथ देशमुख | 028048 | 1,00,000 | 27/10/08 | 16 टक्के |
ग्राहक तक्रार क्र. 720/2010 मध्ये :- ठेवीदार/ तक्रारदारांचे नांव | पावती क्रमांक | देय ठेव रक्कम (रुपयामध्ये) | खालील तारखेपासून व्याज द्यावयाचे | देय व्याज दर (द.सा.द.शे.) | कांचन हरिश्चंद्र देशमुख | 022438 | 50,000 | 23/7/07 | 13 टक्के | कांचन हरिश्चंद्र देशमुख | 022394 | 20,000 | 27/5/08 | 15 टक्के | दत्तात्रय हरिश्चंद्र देशमुख | 001478 | 50,000 | 27/6/08 | 16 टक्के | दत्तात्रय हरिश्चंद्र देशमुख | 022549 | 75,000 | 10/1/08 | 15 टक्के | दत्तात्रय हरिश्चंद्र देशमुख | 022437 | 50,000 | 23/7/07 | 13 टक्के | दिपक हरिश्चंद्र देशमख | 022398 | 1,00,000 | 4/5/08 | 15 टक्के |
2. विरुध्द पक्ष क्र.1 ते 11 व 13 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी प्रत्येकी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/27411)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |