Maharashtra

Osmanabad

cc/04/2013

Surobh Dilip mashadkar - Complainant(s)

Versus

s.m.ali os post officer - Opp.Party(s)

k.k.kulkarni

06 Dec 2014

ORDER

Heading1
Heading2
 
Complaint Case No. cc/04/2013
 
1. Surobh Dilip mashadkar
R/0 Lohara Tq,Lohara Dist Osmanabad
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.V. Kulkarni. PRESIDENT
 HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN MEMBER
 HON'BLE MR. M.B. Saste MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

  ग्राहक तक्रार  क्र.  04/2013

                                                                                      अर्ज दाखल तारीख : 10/01/2013

                                                                                      अर्ज निकाल तारीख: 06/12/2014

                                                                                 कालावधी: 01 वर्षे 11 महिने 27 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, स्‍मानाबाद

1.    सौरभ पि. दिलीप माशाळकर,

     वय-20 वर्षे, धंदा – शिक्षण,

     रा.लोहारा ता. लोहारा, जि. उस्‍मानाबाद.              ....तक्रारदार

                              

वि  रु  ध्‍द

1.    एस.एम. अली,

अधिक्षक,

पोष्‍ट अधिकारी, राम नगर,

मुख्‍य पोष्‍ट ऑफीस उस्‍मानाबाद,

ता.जि. उस्मानाबाद.

 

2.    टी. मुर्ती,

      पोस्‍ट मास्‍तर जनरल(पी.एल.आय.)

      औरंगाबाद विभाग, औरंगाबाद,

      ता.जि. औरंगाबाद.                              ....विरुध्‍द  पक्षकार

 

कोरम :       1)  मा.श्री.एम.व्‍ही.कुलकर्णी, अध्यक्ष.

                                    2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्‍य.

                  3)  मा.श्री.मुकुंद बी.सस्‍ते, सदस्‍..

                                           तक्रारदारातर्फे विधीज्ञ       :  श्री.के.के.कुलकर्णी.

                               विरुध्‍द पक्षकारांतर्फे विधीज्ञ : श्री. दि.वा.पाटील.                                           

                      न्‍यायनिर्णय

मा.सदस्‍या श्रीमती विदयुलता जे. दलभंजन यांचे व्‍दारा :

1)    तक्रारदाराच्‍या तक्रारी अर्जाचे थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे :

      अर्जदार हे मयत रागिणी भ्र. दिलीप माशाळकर यांचा मुलगा असून तो मौज लोहारा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी असून तो सध्‍या शिक्षण घेत आहे. तक्रारदार याचे आईने माहेरच्‍या नावाने विपकडे जीवन विमा पॉलीसी काढलेली होती. तीचा क्र.एम.एच.553276 सी.एस. हा आहे. सदर पॉलीसी ही रक्‍कम रु.10,00,000/- ची असून मासिक हप्‍ता रु.4,950/- एवढा होता व सदरची पॉलिसी ही ऑक्‍टोबर 2027 मध्‍ये समाप्‍त होणार होती. सदर विमा पॉलिसीचे हप्‍ते अर्जदाराच्‍या आईने म्‍हणजे रागिणी भ्र. दिलीप माशाळकर यांनी वेळोवेळी भरलेले आहे. व नॉमिनी म्‍हणुन अर्जदारचे नांव त्‍यामध्‍ये दर्शविलेले होते. दि.30/03/2011 रोजी अंगावर रॉकेल पडून पेटल्‍याने तीचा मृत्‍यू झाला याची लोहारा पो.स्‍टे. यांनी भा.द.वि.354, 306 प्रमाणे माधव नागप्‍पा हनमशेटटी याने विनयभंग करुन आत्‍महत्‍येस प्रवृत्‍त केले अशी नोंद झाली. मात्र तशी नोंद फिर्याद पोलीस स्‍टेशन लोहारा येथे दिलेली नाही. मृत्‍यूपूर्व जबाब दि.30/03/2011 रोजी स्‍वयंपाक करीत असतांना अपघाताने पणती अंगावर पडून पेट घेतला उपचारादरम्‍यान सोलापूर येथील दवाखान्‍यामध्‍ये मृत्‍यू झाला. मृत्‍यूपुर्व जबाब रागीणीने दिलेला आहे. त्‍यानंतर अर्जदाराने विप क्र.1 यांच्‍याकडे मृत्यू संबंधी क्लेम दाखल केला त्‍यावर विप यांनी अर्जदाराचे नाव सौरभ असतांनासुध्‍दा सुभाष या नावाने पत्रव्‍यवहार केला. विपने मागणी केलेल्‍या सर्व कागदपत्राची पुर्तता करण्‍यात आली. विमा धारकाचा मृत्‍यू  पॉलिसी घेतल्या तारखेपासून दोन वर्षाच्‍या आत मृत्‍य झाल्‍याने पॉलिसी धारकाचा मृत्‍यू हा अपघाती नसून तो आत्‍महत्‍या आहे असे सांगून सदरचा क्‍लेम नामंजूर केलेला आहे. सदर फौजदारी केसही मा.सत्र न्‍यायालय, उमरगा येथे अद्याप पावेतो निकाली निघालेली नाही. या कारणास्‍तव विपने, अर्जदाराचा विमा क्लेम दि.02/07/2012 रोजी पत्र पाठवून बेकायदेशीरपणे नामंजूर केला. म्‍हणुन विपस दि.02/08/2012 रोजी नोटीस बजावून क्‍लेम मंजूर करण्‍यासंबंधी विनंती केली आहे. मात्र विपने त्‍यास उत्‍तर दिले नाही म्‍हणून सदर दावा दाखल केला आहे. विप यांनी नुकसान भरपाई पोटी तक्रारदारास रु.10,00,000/- अर्ज दाखल केल्‍या पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अर्जदाराच्‍या हाता मिळेपावेतो 15 टक्‍के व्‍याज दराने, मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.  

 

      तक्रारदाराने तक्रारीसोबत विपचे विमा दावा नाकारल्‍याचे पत्र, विपने कागदपत्रांच्‍या पुर्ततेसंबंधी पाठविलेले पत्र, मुख्‍याध्‍यापकाने विपस पाठविलेले पत्र, पो.मा. अधिकारी उस्‍मानाबाद यांनी पो. मा. जनरल यांना पाठविलेले पत्र, पावती, प्रमियम पावती पुस्‍तक,  प्रमियम पावती, पी.एल.आयचे प्रपोजल मान्‍यता, तीन शेडयूल पॉलिसी, पॉलिसीच्‍या अटी व शर्ती, डी.डी, एफ.आय.आर. पंचनामा, सिव्‍हील सर्जन यांचा रिपोर्ट, डी.एल.आय. ची नोटीस, नोटीस मिळाल्‍याची पावती, विपने मुख्‍याध्‍यपकास पाठविलेले पत्र, विमा दावा अर्ज, इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.

 

2)     सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्‍द पक्षकार यांना नोटीस मिळाल्यानंतर त्‍यांनी दि.03/01/2014 रोजी आपले म्‍हणणे दाखल केलेले असून ते पुढीलप्रमाणे....  

     

      मयत रागीणी चनबसप्‍पा आष्‍ठगे यांनी विपकडे रु.10,00,000/- चा विमा काढला होता हे मान्‍य केले असून अर्जदाराने दि.30/12/2011 रोजी लेखी जबाब चौकशी अधिकारी एम.एम. पाटील निरीक्षक, टपाल खाते, उमरगा यांचे समोर दिला. वत्याबाबत अहवाल अणि पंचनामा चौकशी अधिका-यांनी दि.10/05/2011 रोजी दाखल केला. मयताबाबत प्राथमिक माहिती अहवाल दिलीप शिवलींगअप्‍पा माशाळकर (मयताचे पती) यांनी दि.11/05/2011 रोजी दिला आणि माधव हनमशेटी जो लोहारा उच्‍च माध्‍यमिक विदयालयाच्‍या अध्‍यक्षाचा मुलगा असून त्‍यांनी मयत रागिणी हिचा छळ केल्यामुळे तिने स्‍वत: पेटवून घेवून आत्‍महत्‍या केली असे नमूद केले आहे. दि.30/03/2011 रोजी मयत रागिणी हीने दिलेला जबाब तक्रारदाराने विमा दाव्‍यासोबत जोडला नाही.

 

    विमा नियम 2011 नुसार मयताने फेब्रुवारी 2011 ते मार्च 2011 दरम्‍यानची विम्‍याची रक्‍कम दि.19/04/2011 रोजी म्‍हणजेच जादा वेळेत भरल्‍यामुळे त्‍याबाबत वैदयकिय प्रमाणपत्र सादर न केल्‍यामुळे नियम क्र.56(3) आणि मयताने आत्‍महत्‍या केल्यामुळे सदरील विम्याची रक्‍कम अर्जदारास मिळू शकणार नाही.

 

     विमाधारकाने विमा स्विकृत झालेनंतर आत्‍महत्‍या केल्यास, विम्‍याचा पहिला हप्‍ता पुर्ण भरल्‍यास परंतु विमा स्विकृत केल्यानंतर दोन वर्षाच्‍या आत जो कालावधी लवकर येतो असा विमा बेकायदेशीर असून त्‍या विम्‍याबाबत कुठलाही हक्‍क विमाधारकास सांगता येत नाही. विमा दावा नाकारल्याचे अर्जदारास कळविण्‍यात आले होते.

 

3)   तक्रारदाराची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्‍हणणे, त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्ति‍वाद इत्‍यादींचा विचार करता आम्‍ही निष्‍कर्षासाठी खालील मुददे उपस्थित करीत आहोत. त्‍यांचे निष्‍कर्ष खाली दिलेल्‍या कारणांसाठी देतो.

मुददे                                उत्‍तर

1)    विरुध्‍द पक्षकार यांनी सेवेत त्रूटी केली आहे काय ?               ­ होय.

2)    तक्रारदार नुकसान भरपाई रक्‍कम

      मिळण्‍यास पात्र आहे काय ?                                   होय.

3)    काय आदेश ?                                                                     शेवटी दिल्‍याप्रमाणे.

                            निष्‍कर्ष

4)    मुददे क्र.1 व 2 चे उत्‍तर:

      विप यांना पॉलिसी काढलेली मान्‍य केलेली आहे. परंतू अर्जदाराच्‍या आईचा मृत्‍यू कसा झाला हा प्रश्‍न आहे. पण विप यांनी अर्जदाराच्‍या आईने आत्‍महत्‍या केलेली आहे म्‍हणून पैसे देण्‍यास नकार दिलेला आहे. परंतू अर्जदाराच्‍या आईने मृत्‍यूपुर्व जबाबात असे सांगितले आहे की रॉकेलचा कॅन रिकामा करतांना चमच्‍याने त्‍याचे टोपण काढतांना टोपण एकदम उघडले गेल्याने त्‍यातले रॉकेल अंगावर सांडले व नंतर चमचा देवघरावर ठेवताना देवाजवळ लागलेली पणती माझे हाताचे धक्‍याने खाली माझे अंगावर पडल्याने माझ्या अंगास आग लागली असे सांगून मी शूध्‍दीवर आहे माझा औषधोपचार चालू आहे. माझा कोणावर संशय नाही. कसली तक्रार नाही त्‍यातील मजकूर मला समजला माझ्या सांगणेप्रमाणे बरोबर लिहीला आहे. असे स्‍पष्‍ट सांगितले आहे सदर मृत्‍यूपूर्व जबाब हा पो.हे.कॉ.पो. ठाणे सोलापूर यांनी लिहून घेतलेले आहे व त्‍यावर पोलिस निरीक्षक पो.स्‍टे लोहारा यांची स्‍वाक्षरी आहे.

 

5)   विप यांनी अर्जदाराच्‍या आईने आत्‍महत्‍या केली असे दर्शविणारा कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही फक्‍त म्‍हंटलेले आहे, हे विप विमा रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करण्‍यासाठी वापरलेले तांत्रिक कारण आहे. कारण जर विपच्‍या म्‍हणण्‍यानुसार जर आत्‍महत्‍या आहे असे त्‍यांना वाटते तर त्‍यांनी शेजारी-पाजारी राहणा-या लोकांचे जबाब घेणे जरुरीचे होते. पण तसे काही अभिलेखावर दिसून येत नाही. विप यांनी सिध्‍द केलेले नाही. तसेच विप यांच्‍या दि.02/07/2012 च्‍या पत्रात म्‍हंटले आहे की तक्रारदाराची आई श्रीमती अष्‍टागे रागीणी चनबसप्‍पा यांचे दि.19/04/2012 रोजी पर्यंत ग्रेस पिरेड गुड हेल्‍थ सर्ट्रि‍फीकेट दाखल केलेले नाही. परंतु तक्रारदाराची आई दि.30/03/2011 रोजी मयत झाली असल्‍यामुळे दि.30/04/2011 रोजी तक्रारदार गूड हेल्‍थ सट्रीफीकेटस कसे काय दाखल करु शकतो म्‍हणून ही विपची ही मागणी चुकीची आहे.

 

6)  विप यांचे म्हणणे असे आहे की, अर्जदार सौरभ माशाळकर याच्‍या आईने आत्‍महत्‍या केली म्‍हणून क्‍लेम देता येत नाही. पण आत्‍महत्‍या केला असे दर्शविणारा एकही पूरावा अभिलेखावर दाखल केला नाही. फक्‍त पत्र देऊन क्लेम नाकारल्‍याने क्लेम धारकाचा हक्‍क, अधिकार संपूष्‍टात येत नाही त्‍यासाठी पुरावा तेवढाच महत्‍वाचा आहे. विप यांनी अर्जदाराला क्लेम न देऊन त्याला रक्‍कमेपासून वंचित ठेवलेले आहे ही सेवेतील गंभीर त्रुटी केलेली आहे.

 

7)  दि.11/05/2011 रोजी दिलीप शिवलींगअप्‍पा माशाळकर (पती) यांनी माधव हनमशेटटी हा माध्‍यमिक विदयालयाच्‍या अध्‍यक्षाचा मुलगा असून त्‍यांनी मयत रागिनी हिचा छळ केल्‍यामुळे तिने स्वत: पेटवून घेऊन आत्‍महत्‍या केली असे सांगितल्‍याचे विपने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये नमूद केले आहे व त्‍यामुळेच विपने अर्जदाराचा क्‍लेम नाकारला आहे. पंरतू त्‍या पुष्‍ठयार्थ कोणताही पुरावा दिलेला नाही. त्‍यामुळे अर्जदाराच्‍या आईने आत्‍महत्‍या केली असे ग्राहय धरता येणार नाही. अध्‍यक्षाचा मुलगा त्रास देत होता असे लैंगिक छळ करत होता असा सांगणारा कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल नाही. विपने ते सिध्‍द केलेले नाही.

 

8)  अर्जदार यांने Himachal Pradesh state consumer Disputes Redressal Commission, Simla येथील United India Insurance company limited V/s Nisha Devi and Others  या न्‍याय निवाडयाचा आधार घेतलेला आहे. त्‍यामध्‍ये असे तत्‍व विषद केलेले आहे की, insurance (life)  suicide – claim repudiated alleged deficiency in service District forum allowed complaint- Hence appeal – no evidence on record to prove that deceased committed suicide. Repudiation not valid Deficiency in service proved- order of para below uphold.

 

9)      मयताने आत्‍महत्‍या केलेली आहे हे पोष्‍ट खात्‍याने सिध्‍द केलेले नाही त्‍यामुळे सदर न्‍यायनिवाडा अर्जदाराने दाखल केलेल्य तक्रारीशी तंतोतंत मिळता जुळता आहे. हे तत्‍व सदर प्रकरणस लागू होते. पुरावा नसल्याने अपिल कर्त्‍याचे अपिल खारीज केलेले आहे.  तसेच

11(2011) सीपीजे (एनसी)

National consumer Disputes Redressal commission New Delhi. Oriental Insurance co. ltd. V/s Gangubai and another  सदर रिव्‍हीजन पिटिशनमध्‍ये आत्‍महत्‍या केली अश्‍या पुराव्‍या अभावी Revision Petition बचाव खारीज करण्‍यात आलेले आहे हे तत्‍व सदर अर्जदाराच्‍या प्रकरणात लागू पडते. तसेच अर्जदाराच्‍या आईने दवाखान्‍यात औषधोपचार चालू असतांना जबाब नोंदविला सदर जबाब हा मृत्‍यूपुर्व जबाब असल्‍याचे ग्राहय धरावे लागेल. कारण भारतीय पुरावा कायदा 1872 च्‍या कलम 32 नुसार Case in which statement of relevant fact by person who is dead or cannot be found is relevant – त्‍याrelevancy साठी. Reliability of dying declaration it must be found as a fact that dying declaration is reliable. it does have endorsements of doctor certifying that the patient was conscious and in position to give state. The main test of reliability of the dying declaration as observed by the Supreme Court is mental and physical fitness and capability to make statement at that point of time.

 

     वरील प्रकारचे विषद केलेले तत्‍व पाहता असे निदर्शनास येते की जळालेला पेशंट हा दंडाधिकारी यांच्‍या समोर किंवा पोलिसांच्‍या समोर जबाब देताना रुग्‍ण हा पुर्णपणे शुध्‍दीवर असला पाहिजे नेमके सदर प्रकरणात ही अर्जदाराच्‍या आईने पोलिसांसमोर जो जबाब दिलेला आहे तो पुर्णपणे शुध्‍दीवर असतांना दिलेला आहे त्‍यामुळे सदर अर्जदाराच्‍या आईचा मृत्यूपुर्व जबाब हा सदर प्रकरणाशी relevant  आहे.

 

10)  वरील सर्व विवेंचनावरुन आम्‍ही या निष्‍कर्षापर्यंत आलो आहोत कि, पोष्‍टाने अर्जदारास देण्‍यात येणा-या सेवेत त्रुटी केली. सदरहू पॉलिसी ही रु.10,00,000/- होती याबददल वाद नाही. पासबुकचे अवलोकन करता असे दिसते की डिसेंबर 2010,  जानेवारी 2011 चे हप्‍ते एकाच वेळी जानेवारीमध्‍ये भरण्‍यात आले व ते 29 जानेवारी रोजी भरण्‍यात आले असावे असे पोष्‍टाच्‍या अस्‍पष्‍ट शिक्‍यावरुन दिसते. पुढे फेब्रुवारीचा हप्‍ता फेब्रूवारीमध्‍ये भरला गेला नाही तसेच मार्चचा हप्‍ता मार्चमध्‍ये भरला गेला नाही. रागीणी ही दि.30/03/2011 रोजी मयत झाली याबददलही वाद नाही. विपने आपल्या सेमध्‍ये म्‍हंटलेले आहे की फेब्रूवारी व मार्चचा हप्‍ता दि.19/04/2011 रोजी भरला गेला पास बुकाप्रमाणे अधिक रु.100/- दंडही भरल्‍याचे दिसते. विपने से च्‍या कलम 5 मध्‍ये म्‍हंटलेले आहे की हप्‍त्‍या सोबत वैदयकीय प्रमाणपत्र सादर करण्‍यात आलेले नव्‍हते. मार्च अखेर हप्‍ता भरतांना वैदयकीय प्रमाणपत्र दाखल करणे नियम 56 (3) प्रमाणे आवश्‍यक आहे. असा नियम 56 (3) विपने हजर केलेला नाही. हे खरे आहे की रागीणी मयत झाल्‍यानंतर फेब्रूवारी मार्चे 2011 चे हप्‍ते तीच्‍या तर्फे बहूतेक तक्रारदाराने भरले असावे तथापि विपने ते हप्‍ते स्विकारले. रागीणी मयत झाली हे माहीत नसतांना आपण हप्‍ते स्विकारले व आपली फसवणूक करण्‍यात आली असे विपने आपल्‍या सेमध्‍ये अगर शपथपत्रामध्‍ये म्‍हंटलेले नाही. ही अशी फसवणूक करुन हप्‍ते भरण्‍यात आले असते तर ती पॉलिसी रदद बातल म्‍हणता आली असती परंतू आता पॉलिसी रदद बातल झाली असे म्‍हणता येणार नाही. परंतू पोष्‍टल लाईफ इंन्‍शूरन्‍स टर्मस अॅण्‍ड कंडीशन कलम 15 प्रमाणे नॉन मेडीकल पॉलिसीज मध्‍ये जर 1 वर्षामध्‍ये मृत्‍यू आला तर 35 टक्‍के सम अश्‍यूअर्ड व बोनसही देण्‍यात यावा असे म्‍हंटलेले आहे. हे खरे आहे की मार्चअखेर पोष्‍टामार्फत बोनस जाहीर करण्‍यात येतो परंतु कि‍ती बोनस जाहीर झाला हे सांगण्‍यात आलेले नाही. त्‍यामुळे विमा रक्‍कमेचे 35 टक्‍के म्‍हणजेच रु.3,50,000/- व बोनस मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहे असे आमचे मत आहे. म्‍हणून आम्‍ही मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.

                            आदेश

1)    तक्रारदाराची तक्रार  मंजूर करण्‍यात येते.

2)   विरुध्‍द पक्षकार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास पोष्‍टल लाईफची रक्‍कम रु.3,50,000/- (रुपये तीन लक्ष पंन्‍नास हजार फक्‍त) दि.10/01/2013 पासून 9 टक्‍के व्‍याजासह व बोनस आदेश दिल्‍या तारखेपासून 30 दिवसात दयावेत.

 

3)  विरुध्‍द पक्षकार क्र.1 व 2 यांनी तक्रार खर्चापोटी रक्‍कम रु.5000/- (रुपये पाच हजार फक्‍त) आदेश दिल्‍या तारखेपासून 30 दिवसात दयावेत.  

 

4)  उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्ष यांनी आदेश दिल्‍या तारखेपासुन तीस

    दिवसात करुन विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,

    सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न

    केल्‍यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.

 

5)  उभय पक्षकारांना आदेशाच्‍या प्रमाणित प्रती निशु:ल्‍क देण्‍यात याव्‍यात.

 

 

 

 

   (श्री. एम.व्‍ही. कुलकर्णी)

         अध्‍यक्ष

 

  (श्री.मुकूंद.बी.सस्‍ते)                                 (सौ.विद्युलता जे.दलभंजन)

      सदस्‍य                                                       सदस्‍या 

               जिल्‍हा  ग्राहक  तक्रार  निवारण  मंच,  उस्‍मानाबाद.  

 
 
[HON'BLE MR. M.V. Kulkarni.]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VIDYULATA J.DALBHANJAN]
MEMBER
 
[HON'BLE MR. M.B. Saste]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.