ग्राहक तक्रार क्र. : 162/2014
दाखल तारीख : 19/07/2014.
निकाल तारीख : 11/08/2015
कालावधी: 01 वर्षे 0 महिने 23 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. प्रकाश रामलिंग मोरे,
वय - 61 वर्षे, धंदा – शेती व पेन्शनर.
रा. लक्ष्मी कॉलनी, राम नगर, उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. एस के. वेल्डींग वर्क्स,
प्रोप्रा. सलिम सय्यद,
सेंट्रल बिल्डींग, आयसीआयसीआय बँकेशेजारी,
बार्शी बायपास रोड, उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.डी.पी.वडगावकर.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.भाऊसाहेब बेलूरे.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा:
अ) 1. अर्जदार हा उस्मानाबाद येथील रहिवाशी असून उस्मानाबाद येथिल जमीन गट क्र.343/2 मध्ये शेळी पालनाचा व्यवसाय करण्याच्या हेतूने त्यासाठी आवश्यक असणारे पूर्व –पश्चिम 75 फुट व क्षिणोत्तर 44 फुटाचे चांगले मटेरियल वापरुन पूर्ण शेड दोन महिन्यात उभारण्यासाठी विप यांच्यात रु.55 किलो या दराने तसेच फिटींग रु.250/- ब्रास याप्रमाणे व जाळी वेल्डींगसाठीचा खर्च आवश्यकतेनुसार करण्याचे उभयतांनी मान्य करण्याचे ठरले. त्याप्रमाणे अर्जदार यांच्या शेतात विप यांना शेड उभारण्यासाठी काम देण्यात आले. ठरावा नुसार तक यांनी दि.14/10/2013 रोजी विप यांना रु.1,00,000/- धनादेशाव्दारे दिले. विप यांना तक यांनी वेळोवेळी रक्कम दिली त्याची रु.2,06,605/- मिळाल्याबाबत विप यांनी अर्जदार यांना कॅश मेमो पावती दि.24/02/2014 रोजीची दिलेली आहे. अर्जदार हे विप याचे कोणत्याही प्रकारची रक्कम देणे लागत नाही. अर्जदार यांनी वेळोवेळी नटबोल्ट वापरण्याच्या सुचना दिल्या मात्र विप यांनी वेल्डींगचे काम नटबोल्टपेक्षा चांगल होईल मात्र उन्हाळयात झालेल्या वावटळीमध्ये आणि अवकाळी पावसामध्ये वादळ वावदनात वेल्डींग तुटून शेड नादुरुस्त झाले. मोजमाप घेताना झालेल्या चुकांमुळे नट बोल्ट बसत नव्हता म्हणून विप यांनी वेल्डींग केलेली आहे. तसेच विप यांनी ठरल्याप्रमाणे दोन महिन्यात शेड उभारुन दिले नाही, सुमारे दोन महिने उशिराने काम पुर्ण केले. शेड कोणत्याही क्षणी उडून जाण्याची भिती निर्माण झाली त्यामुळे शेळी पालन करणे शक्य झाले नाही. पत्रे उडून गेल्याने जिवीत व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. विप यांनी शेड उभारणी करतेवेळी मुलभुत स्वरुपाच्या उणिवा ठेऊन अर्जदार यांना सेवा देताना त्रुटी केली आहे. या त्रुटी दुर करण्यासाठी तक यांना रु.70,000/- चा खर्च येणार आहे. सदर खर्च विप यांच्याकडून मिळणे आवश्यक आहे. अर्जदार यांनी विप यांच्याकडे संपर्क करुन त्यांना शेड दुरुस्त करण्याबाबत वारंवार विनंती केली पंरतु विप यांनी प्रतिसाद दिला नाही. उलट काय करायचे ते करा वगैर उध्दत वर्तन केले. म्हणून सदर तक्रार दाखल करणे भाग पडले. म्हणून अर्जदार यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व तक्रारीचा खर्च रु.10,000/- तसेच शेड दुरस्त करण्यासाठी रु.70,000/- विप यांच्याकडून देवविण्यात यावे अशी विनंती तक यांनी केलेली आहे.
2. तक यांनी तक्रारीसोबत विप यांनी तक यांना दिलेला कॅश मेमो दि.24/02/2014 रोजीचा दाखल केला आहे.
ब) सदर तक्रारीबाबत विप यांना या मंचाने नोटीस पाठवली असता त्यांनी दि.10/10/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केले असून ते पुढीलप्रमाणे.
1. सदर शेड उभारणी व्यापारी हेतू करीता असून तक यांची तक्रार मे.मंचास चालविण्याचा अधिकार नाही.
2. विप यांनी तक यांना कामाबद्दल व कामाच्या आयुष्याबद्दल कुठल्याही प्रकारची खात्री दिलेली नाही किवा कुठल्याही प्रकारचा दावा केलेला नाही. विप हे वेल्डींग वर्क्स हे करतात त्यांच्या कामाचे स्वरुप अभियंता किंवा सिव्हील इंजिनिअर किंवा आर्किटेक अशा प्रकारच्या कुशल व्यक्तिकडून कामाची रुपरेखा आराखडा नकाशा त्यामध्ये पाईप अॅगल, सी चॅनल नट बोल्ड व प्लेट किती इंचाचे साईजचे वापरावे याचे मार्गदर्शन असलेला नकाशा व डिझाईन प्लॅन ची पुर्तता अर्जदार यांनी विप यांना केल्यानंतर सदरील प्लॅन प्रमाणे काम करुन देणे अशा स्वरुप आहे. परंतु अर्जदार यांनी मी इंजिनिअर चा बाप आहे माझे एवढे इंजिनिअरला काय कळते म्हणून आपल्या मर्जिप्रमाणे काम करुन घेतले व विप यांना काम करण्यास भाग पाडत होते. विप यांनी तक च्या सांगण्या प्रमाणे सर्व काम तक यांच्या हजेरीत केले आहे. सदर शेडच्या नियोजनात तक यांनी वेळोवेळी बदल केले त्यामुळे सदरील काम मोडतोड पध्दतीचे आहे. दि.24/20/2014 रोजी बिल काढण्यासाठी कॅशमेमो नेलेला आहे मात्र अद्याप पर्यंत विप यांना रु.1,70,000/- दिलेले असून रु.39,805/- येणे बाकी आहे. विप यांना त्यांच्या कामाचा मोबदला दिलला नाही म्हणून तक यांच्याकडून रु.30,000/- देण्याचा हुकूम करावा असे एकूण रु.83,805/- येणे बाकी आहे. सदरील येणे बुडविण्याच्या दृष्टीने सदर तक्रार दाखल केली आहे. असे विप यांनी नमूद केले आहे.
क) तक्रारदार यांची तक्रार व सोबत दाखल कागदपत्रे तसेच विप यांचे म्हणणे व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले. उभयतांचा लेखी युक्तिवाद वाचला तोंडी युक्तिवाद ऐकला असता सदर प्रकरणात आमच्या विचारार्थ खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये निष्कर्ष
1) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? नाही.
2) अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
ड) कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
1. तक्रारदाराची तक्रार ही विप ने केलेल्या कामाच्या दर्जाबाबत असून त्यासाठी त्याने मुख्यत: मुद्दा क्र. 4 मध्ये सांगितले आहे. जिथे नटबोल्टची आवश्यकता आहे तिथे वेल्टींग कोठे आहे व त्यामुळे कामाचा दर्जा चांगला झाला नाही तसेच वेळेवर काम करुन दिले नाही हे आक्षेप नोंदवले आहेत. सदर आक्षेपाच्या अनुषंगाने व कमीशनला पाठवून मागितलेल्या रिपोर्टच्या अनुषंगाने माहिती मिळून आली त्यानुसार सदरचे काम तक ला करुन दिले आहे हे स्पष्ट होते. सदरचे काम हे मुदतीत आहे किंवा नाही हे स्पष्ट करतांना तक व विप मध्ये कच्या कागदावरचा करार जो तक ने दाखल केला आहे त्यामध्ये कुठेही हा व्यवहार काम किती मुदतीत पुर्ण करण्याचे आहे हे नमुद नाही व ही बाब विप ने स्पष्ट नाकारली असल्याने मुदतीचा मुद्द मान्य केला येणार नाही. इतर तक्रारी जसे तर बोल्ट ऐवजी वेल्डींग करणे किंवा स्ट्रक्चरमध्ये बदल करणे हया बाबींसाठी विप ला दोषी यासाठी धरत येणार नाही यासाठी की त्यानेसदरचे काम हे स्वत:च्या निरीक्षणाखाली करुन घेतले आहे तक च्या म्हणण्यानुसार तो नटबोल्टचा वापराबाबत व वेल्डींग न केल्याबाबत सुध्दा तो विप ला सुचना देत होता व तरीही विप ने त्यांना चुकीचे मार्गदर्शन केले, हया निवेदनाने हे स्पष्ट होते की कामाच्या ठिकाणी तक हजर असे व तो कामाबाबत सुचना करत असे तथापि अशी सुचना स्विकारत नसल्यास काम बंद करण्याबाबत ती विप ला सांगू शकत होता परंतु त्याने तसे केले नाही. कारण विप च्या आश्वासनावर त्याचा त्यावेळी विश्वास होता हया बाबी तार्किंक व न्यायीक अंगाने तक च्या तक्रारीस पुष्टी देऊ शकत नाहीत. सदरचे काम हे तांत्रिक असल्याने दोघापैकी एक जणास तांत्रीक ज्ञान असल्याने त्यांच्या स्वत:च्या उपलब्ध ज्ञानाने काम केले हे स्पष्ट होणे तथापि असे काम हे तंत्रज्ञानीकडून Design करुन घेतले व तंत्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली झाले असते व जर काही तांत्रिक चुका राहिल्या असल्या तर वेळीच दुरुस्ती झाली असती. वेल्डींगने जोडणी किंवा नट बोल्टाने जोडणी या दोन्ही पध्दती हया दोन वस्तू एकत्र बांधून ठेवल्याच्या पध्दती आहेत त्यातील एक चांगली व एक वाईट असा प्रकार नसून किंवा एक स्टॅन्डर्ड व दुसरी नॉन स्टॅन्डर्ड असे नसून ते बसच्या स्थितीबाबत वस्तुच्या व कामाच्या परिस्थितीवर अवलंबून असते त्यामुळे See 2 (f) 2(g) नुसार हे design approved असले पाहिजे होते व त्या Design नुसार हे काम झाले नसल्यास त्याला तक्रार करता आली असती किंवा तसे कायद्यातील तरतुदीनुसार दोघांमध्ये करार तरी असला पाहिजे होता. या संदर्भात ग्राहक कायदा कलम 2 (f) व 2 (g) असे सांगतो की, (f) ‘defect’ means any fault, imperfection or shortcoming in the quality, quantity, potency, purity or standard which is required to be maintained by or under any law for the time being in force or [under any contract express or implied orals is claimed by the trader in any manner what over in relation to any goods;
(g) ‘deficiency’ means any fault, imperfection, shortcoming or inadequacy in the quality, nature and manner of performance which is required to be maintained by or under any law for the time being in force or has been undertaken to be performed any a person in pursuance of a contract or otherwise in relation to any service:
तथापि तक्रारदार स्वत:च स्वत:च्या मर्जीने काम करुन घेतो आहे व अर्थात हे कामही क्षेत्रफळावर नसून kg नुसार असल्याने हलक्या दर्जाचे मटेरियल वापरल्याचे व किंवा कमी वजनाचे मटेरीयल वापरण्याचे विप चे काहीच कारण नाही त्यामुळे तक्रारदार हा स्वच्छ हाताने आला नाही असे आमचे मत आहे जर त्याचे देखरेखीखाली काम होत असेल व सुचनेनुसार होत असेल तर No one can take benefit for his own wrong या न्यायीक तत्वानुसार स्वत: केलेल्या चुकाचा फायदा घेता येणार नाही व स्वत:च्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कामात नंतर स्वत:ला चुका काढता येणार नाहीत.
2. कमीशनने अहवाल दिला आहे त्यात त्याने विप ला नोटीस दिलेली आहे किंवा नाही हे स्पष्ट होत नाही तसेच कमीशनर ते जागेवर जाऊन काढलेले फाटो पाहिले असता शेड व्यवस्थित दिसतो आतील कामाचे फेरफार हे फेरफार तेव्हाच म्हणता येईल जेव्हा approved नकाशा समोर असेल त्यामुळे तक ची तक्रार फेटाळण्यात येते.
3. तक च्या म्हणण्यानुसार त्याची काही रक्कम येणे बाकी तक कडे आहे याचा खुलासा हिशोबासहीत तक ने युक्तिवादाच्या वेळेस किंवा त्याआगोदर म्हणजे से दाखल झाल्यानंतर केव्हाही करता आला असता परंतु विप ने तोही केला नाही याचा अर्थ विप चे व तक चे अंतिम देण्यासंदर्भात हा वाद असू शकतो हया विप च्या म्हणण्याला पुष्टी मिळते. त्यामुळे जर काही विप चे देणे तक कडे आले असेल तर ते तक ने हिशोब करुन द्यावे अन्यथा त्याला हया रकमेबाबत वसूलीसाठी योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याचा हक्क कायम राहिल. हे न्यायमंच विपच्या हया मागणीसाठी सक्षम नाही.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
3. उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (मा.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.