नि. 21 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 21/2011 नोंदणी तारीख - 29/1/2011 निकाल तारीख - 20/4/2011 निकाल कालावधी - 81 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री नंदकुमार बाळकृष्ण अरगडे रा.फलॅट नं.6, सरस्वती चेंबर्स, 194, प्रतापगंज पेठ, सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री आर.आर.सांगलीकर) विरुध्द 1. मे. एस.जी.सेठ आणि कंपनी तर्फे प्रोप्रा. श्री सुनिल गोवर्धन सेठ रा.निलगंध, 23/6, प्रेमनगर, पुणे-37 2. श्री सुहास लक्ष्मण कान्हेरे रा.531ब, सावली बंगला, सदर बझार, कॅम्प, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री एस.व्ही.कुलकर्णी) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. जाबदार यांनी विकसीत केलेल्या सरस्वती चेंबर्स अपार्टमेंटमधील फलॅट नं.6 खरेदी करण्याचे अर्जदार यांनी ठरविले. त्यानुसार अर्जदार व जाबदार यांचेमध्ये बोलणी होवून खरेदीची किंमत रु.1,90,000/- इतकी ठरली. प्राप्तीकर कायदयानुसार प्रमाण उपलब्ध झालेनंतर अधिकृत खरेदीपत्राचा व्यवहार पूर्ण करणेचे उभयतांमध्ये ठरले. जाबदार यांनी अर्जदार यांचेकडून दि.2/11/1999 रोजी संपूर्ण रक्कम स्वीकारुन अर्जदार यांना साठेखत करुन दिले व त्याचदिवशी फलॅटचा ताबा अर्जदार यांना दिला. परंतु बिल्डींगचे काम पूर्ण होवूनही जाबदार यांनी अर्जदार यांना फलॅटचे खरेदीपत्र करुन दिलेले नाही. त्यानंतर जाबदार यांना जिल्हा नयायाधीश यांचे कोर्टाची नोटीस आली त्यावेळी अर्जदार यांनी सदरचे फलॅट नं.6 बाबत जाबदार व सौ बागेश्री विजय कुलकर्णी यांचेमध्ये दिवाणी दावा चालू असल्याचे समजले. साठेखत करारनाम्यानुसार फलॅटचे संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास ती जाबदार यांचे स्वखर्चाने दूर करुन द्यावी असे नमूद आहे. परंतु जाबदार यांनी ती जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे अर्जदार यांना त्रास सहन करावा लागला. सबब अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस पाठविली परंतु जाबदार यांनी त्यास खोटया मजकुराचे उत्तर पाठविले. सबब, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.1,50,000/- मिळावेत व अर्जाचा खर्च मिळावा यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार क्र.1 यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 11 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार यांची मागणी कालबाहय आहे. अर्जदार यांनी मिळकतीचे मूळ कालग सरस्वती शेकदार यांना याकामी सामील केलेले नाही. जाबदार क्र.2 यांना विनाकारण याकामी सामील केलेले आहे. अर्जदार त्यांचे फलॅटचा वापर व्यापारी कारणासाठी करीत असलेने ते ग्राहक होत नाहीत. जाबदार हे खरेदीपत्र करुन देणेस तयार होते. जाबदारने त्याबाबत विचारणा केली असता करारातील भाषेचा हवाला देवून खरेदीपत्र आवश्यक नाही असे अर्जदारानेच जाबदारना सांगितले. खरेदीपत्र करुन देणेस जाबदार तयार आहेत, परंतु जाबदारास येणे असलेल्या रकमांची जबाबदारी अर्जदारने घेणे आवश्यक आहे असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. जाबदार क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.13 ला दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. अर्जदार व जाबदार क्र.1 यांचेमध्ये झालेल्या साठेखतावर जाबदार क्र.2 यांची साक्षीदार म्हणून सही आहे. सदरचे व्यवहाराशी जाबदार क्र.2 यांचा काहीही संबंध नाही, जाबदार क्र.2 यांना याकामी अनावश्यक पक्षकार म्हणून सामील केले आहे. सबब जाबदार क्र.2 यांचेविरुध्द तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.2 यांनी कथन केले आहे. 4. अर्जदारतर्फे दाखल पुरसिस नि. 18 ला पाहिली. जाबदार क्र.1 व 2 तर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि.19 व 20 ला पाहिला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 5. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 6. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जातील कथनांचे समर्थनार्थ दाखल केलेली नि.5 सोबतची कागदपत्रे प्रामुख्याने साठेखत पाहिले असता असे दिसून येते की, अर्जदार व जाबदार यांचेमध्ये फलॅट खरेदीबाबत साठेखत झाले असून त्यानुसार फलॅटची किंमत रु.1,90,000/- इतकी ठरली होती. सदरची रक्कम अर्जदार यांनी जाबदार यांना अदा केली असून ते जाबदार यांनी कैफियतीमध्ये मान्य केले आहे. साठेखतातील अटींचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, आयकर प्रमाणपत्र प्राप्त केलेनंतर दोन महिन्याचे आत जाबदार यांनी अर्जदार यांना खरेदीपत्र करुन देणेचे जाबदार यांनी मान्य केले आहे. तसेच जाबदार यांनी कैफियतीमध्ये असेही कथन केले आहे की, ते अर्जदार यांना खरेदीपत्र व डीड ऑफ डिक्लेरेशन करुन देणेस तयार आहेत. परंतु अर्जदार यांना जाबदार यांनी वारंवार कळवूनही ते खरेदीपत्र करुन घेणेसाठी आले नाहीत. जाबदार यांचे सदरचे कथन पाहता जाबदार हे खरेदीपत्र व डीड ऑफ डिक्लेरेशन करुन देणेस तयार आहे ही बाब दिसून येते. सबब जाबदार यांनी अर्जदार यांना फलॅटचे खरेदीपत्र व डीड ऑफ डिक्लेरेशन तीस दिवसांचे आत करुन द्यावे असा आदेश याकामी करणे योग्य व संयुक्तिक ठरणारे आहे. 7. अर्जदार यांनी शारिरिक, मानसिक आणि आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.1,50,000/- ची मागणी केली आहे. परंतु त्याचे पृष्ठयर्थ कोणताही ठोस पुरावा अर्जदार यांनी दाखल केलेला नाही. सबब अर्जदार हे मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.2,000/- मिळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. 8. जाबदार क्र.2 यांनी कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, अर्जदार व जाबदार क्र.1 यांचेमध्ये झालेल्या साठेखतावर त्यांची साक्षीदार म्हणून सही आहे. त्यांचा सदरचे व्यवहाराशी काहीही संबंध नाही. सदरची बाब विचारात घेतली असता जाबदार क्र.2 यांचा या व्यवहाराशी काहीही संबंध असल्याचे दिसून येत नाही. सबब जाबदार क्र.2 यांचेविरुध्द प्रस्तुतची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. 9. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र.1 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र.2 यांचेविरुध्द नामंजूर करणेत येत आहे. 3. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र.1 यांनी अर्जदार यांना फलॅटचे खरेदीपत्र व डीड ऑफ डिक्लेरेशन करुन द्यावे. 4. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र.1 यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- द्यावेत. ब. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- द्यावेत. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 20/4/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |