- आदेश निशाणी क्र.1 वरील -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 22 डिसेंबर 2014)
1. फिर्यादी यांनी, सदर अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 27 अन्वये कारवाई होण्याकरीता दाखल केला.
2. सदर चौकशी अर्ज नोंदणी करुन, गैरअर्जदार/आरोपी विरुध्द समन्स काढण्यात आले. अर्ज मंचात न्यायप्रविष्ठ असतांना, फिर्यादी व आरोपी यांनी दि.9.12.2014 रोजी मंचाबाहेर आपसी समझोता झाल्याने, सदर तक्रर पुढे चालवायची नाही त्यामुळे सदर दरखास्त निकाली काढण्यात यावी, अशी संयुक्त पुरसीस नि.क्र.6 नुसार दाखल केली. तसेच अर्जदारास मंचासमोर नि.क्र.6 चे पुरसीस बाबत विचारणा केली असता, प्रकरणात गैरअर्जदार यांचेशी मंचाबाहेर समझोता झालेला असल्याने प्रकरण पुढे चालवायचे नाही असे सांगीतले.
3. अर्ज नि.क्र.6 मधील पुरसीस नुसार फिर्यादी व आरोपी यांच्यात मंचा बाहेर आपसात समझोता झालेला असून व फिर्यादी यांना सदर चौकशी अर्ज यापुढे चालवायचा नसल्याने, सदर चौकशी अर्ज निकाली करणे योग्य होईल, असे आमचे मत आहे. सबब, पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
// अंतिम आंदेश //
फिर्यादीचा चौकशी अर्ज परत घेतल्यामुळे निकाली.
( Complaint disposed by way of withdraw)