तक्रारदारातर्फे :- वकील -अँड. एस. व्ही. सुलाखे.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हे सामनेवाले नं. 2 यांनी सामनेवाले नं. 1 बँकेकडून घेतलेल्या कर्जास जामीनदार आहेत. सामनेवाले नं. 1 ने सामनेवाले नं. 2 कडून कर्जाची वसूली न करता ते तक्रारदाराकडून सदर कर्जाची रक्कम वसूल करीत आहे, याबाबत तक्रारदाराची तक्रार आहे.
यासंदर्भात तक्रारदार हे ग्राहक कसे असा मुदा तक्रार दाखल करते वेळी उपस्थित झाला होता. त्यासाठी व युक्तिवादासाठी म्हणून तक्रार तारीख 29/3/2011 रोजी ठेवण्यात आली. त्यानंतर तारीख 02/4/2011, 03/5/2011, 0 09/5/2011 या तारखा झाल्या. तक्रारदार गैरहजर, युक्तिवाद नाही. तक्रारीचे स्वरुप पाहता तक्रारदार हे सामनेवाले नं. 2 ने सामनेवाले नं. 1 कडून घेतलेल्या कर्जास जामीनदार आहेत. त्यांनी संबंधीत बँकेकडून कोणतीही सेवा विकत घेतलेली नाही, त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक होत नाहीत, असे न्याय मंचाचे मत आहे. त्यामुळे सदरची तक्रार काढून टाकणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रार काढून टाकण्यात येत आहे.
(सौ. एम. एस. विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, बीड
चुनडे/लघुलेखक