(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 28 मार्च 2014)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्ता यांनी एस.बी.आय. लाईफ इन्शुरंस कंपनी लि, शाखा गडचिरोली येथे SBI Life – Smart ULIP Life Cover नावाची पॉलिसी क्र.33016691607 पॉलिसी दि.5.10.2009 काढली होती. सदर पॉलिसी काढतांना तक्रारकर्त्याला इन्शुरंस अॅडव्हायजर यांनी तीन वर्षानंतर रुपये 3,00,000/- परत मिळतील असे सांगीतले होते. तक्रारकर्ता यांनी दि.5.10.2009 ते पॉलिसी सरेन्डर होण्यापर्यंत रुपये 15,000/- चा तीन महिन्याचे अंतराने कंपनीकडे भरणा केला. तक्रारकर्त्याने कंपनीकडे एकूण रुपये 1,05,000/- चा भरणा केला आहे. तक्रारकर्त्याने दि.5.9.2012 ला पॉलिसी सरेन्डर करण्याचे पञ दिले असता, पॉलिसी सरेन्डरची एकूण रक्कम रुपये 78,660/- एस.बी.आय.खाते क्र.32549469194 मध्ये दि.11.10.2012 ला दाखविण्यात आले. सदर कंपनीचे पञ क्र.UIN No.111L053V01 दि.2.11.2012 अन्वये अर्जदाराचे खाते क्र. 32549469194 मध्ये एकूण रुपये 1,89,775/- जमा केल्याचे नमूद आहे. कंपनीचे प्राप्त पञानुसार व प्रत्यक्षात खात्यावर जमा केलेल्या रकमेची तफावत रुपये 1,11,115/- फरक आहे. सदरच्या फरकाबाबत एस.बी.आय.कंपनीकडे दि.15.12.2012 ला लेखी पञ पाठवून फरकाची रक्कम मिळण्याबाबत मागणी केली. परंतु, कंपनीकडून कुठलेही उत्तर प्राप्त झाले नाही. त्यामुळे तक्रार न्यायमंचात दाखल करण्यात आली. त्यामुळे फरकाची रक्कम रुपये 1,11,115/- व्याजासह परत मिळावी, तसेच मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 5,000/- मिळावे अशी प्रार्थना केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.3 नुसार 8 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.11 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.6 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ला नि.क्र.4 प्रमाणे नोटीस तामील होऊनही वारंवार गैरहजर राहीला, त्यामुळे नि.क्र.1 वर गैरअर्जदार क्र.2 विरुध्द एकतर्फा आदेश दि.29.8.2013 ला पारीत करण्यात आला.
3. गैरअर्जदार क्र.1 यांनी नि.क्र.11 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरातील प्राथमिक आक्षेपात नमूद केले की, गैरअर्जदार क्र.1 ची पॉलिसी क्र.33016691607 च्या सर्व देणी कराराप्रमाणे पार पाडल्या आहेत व ते सर्व विमा पॉलिसी ही परत करण्यात आल्यास त्यामधील सर्व फायदे व हित हे त्याबरोबर समाप्त होतात, म्हणून सदर तक्रार करण्याचे कोणतेही कारण घडले नाही. सदर विमा पॉलिसी ऑक्टोंबर 2009 मध्ये निर्गमित केली होती. तक्रार ही कालमर्यादेत सादर न केल्यामुळे ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 24 प्रमाणे मुदतबाह्य आहे. गैरअर्जदार क्र.3 यांनी ज्या काही चुका केल्या असल्यास त्यास गैरअर्जदार क्र.1 जबाबदार नाही. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्तरात पुढे नमूद केले की, सदर विमा पॉलिसी क्र.33016691607 ही 10 वर्षा करीता असून प्रिमियमचा तिमाही हप्ता रुपये 15,000/- आहे. सदर विमा पॉलिसी ही युनिटसह पॉलिसी आहे त्यामधील किंमत वाढू अथवा घटु शकते व हे आर्थिक बाजाराच्या घडामोडीवर अवलंबून असते. पॉलिसी निवेशातील जबाबदारी ही विमा धारकाची आहे. गैरअर्जदाराने परत केलेले रुपये 78,659.54/- हे शर्तीस आधीन राहून दिले. तक्रार दाखल करण्यास कोणतेही कायदेशिर कारण नाही व गैरअर्जदार क्र.1 ला विनाकारण पक्ष बनविले आहे. विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार विमा सरेंडर केल्यावर भुगतान केले व त्या संबंधाने तक्रारकर्त्यास दि.2.11.2012 ला पञ पाठविले त्यात काही तांञीक अडचणीमुळे चुकीने किंमत रुपये 1,89,775/- लिहीण्यात आली, परंतु प्रत्यक्षात सरेंडर किंमत फक्त रुपये 78,660/- एवढीच होती. नंतर ती चुक दुरुस्त केली म्हणून सदरची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. तक्रारकर्त्याने दावा केलेली रक्कम मिळण्यास पाञ नाही, तसेच शारिरीक ञासापोटी रुपये 30,000/- चा मोबदला मिळण्यास पाञ नाही. त्यास तक्रार करण्याचा कोणताच अधिकार नाही. करीता तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
4. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.6 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात तक्रारकर्त्याची बहूतांश तक्रार अमान्य केली. गैरअर्जदार क्र.3 ने लेखी बयाणातील विशेष कथनात नमूद केले की, गैरअर्जदार क्र.3 कडून एसबीआय. इन्शुरन्स पॉलिसी काढली त्याचवेळेस इन्शुरन्स कंपनीच्या प्रचलित ध्येयधोरणानुसार पॉलिसी सरेंडर केल्यानंतर पॉलिसीची रक्कम परत मिळतील असे सांगीतले. वाद हा इंशुरन्स कंपनी व अर्जदार यांच्यातील आहे. गैरअर्जदार क्र.3 ला सदर मामल्यात विनाकारण गोवण्यात आले. इन्शुरन्स कंपनीच्या निर्धारीत धोरणानुसार देय रक्कम अर्जदारास देण्यात आलेली आहे. अर्जदारास पॉलिसी सरेंडर ध्येयधोरणाची पूर्ण कल्पना असतांना देखील विनाकारण अर्ज दाखल केला. पॉलिसी सरेंडर देय रक्कम देण्याची जबाबदारी ही इन्शुरन्स कंपनीवर असल्याने गैरअर्जदार क्र.3 विरुध्द दाखल केलेली तक्रार दि.प्र.सं.कलम 35(अ) अन्वये रुपये 10,000/- दंडासह खारीज करावा.
5. अर्जदाराने नि.क्र.20 नुसार दाखल केलेले लेखीउत्तर व दस्ताऐवज हाच पुराव्याचा भाग समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.19 नुसार पुरावा शपथपञ, नि.क्र.22 नुसार 6 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.3 नि.क्र.23 नुसार लेखी पुरावा दाखल केला. अर्जदाराने नि.क्र.24 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज पुरावा/शपथपञ व अर्जदाराचा लेखी युक्तीवाद, तसेच दोन्ही पक्षाचे तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) अर्जदाराचा अर्ज कारण घडल्यानंतर मुदतीत दाखल केला : होय.
आहे काय ?
3) गैरअर्जदार क्र.1 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय.
व्यवहार केला आहे काय ?
4) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडून तक्रारीप्रमाणे मागणीस : अंतिम आदेशाप्रमाणे
पाञ आहे काय ?
5) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. अर्जदाराने दि.5.10.2009 ला गैरअर्जदार क्र.2 चे मार्फत गैरअर्जदार क्र.1 कडून SBI Life Smart ULIP Life Cover नावाची पॉलिसी क्र.33016691607 पॉलिसी काढलेली होती. अर्जदाराने दि.5.10.2009 ते 5.9.2012 पर्यंत रुपये 15,000/- (तीन महिन्याचे अंतराने) गैरअर्जदार क्र.1 च्या कंपनीकडे भरलेले होते. यासंदर्भात अर्जदार व गैरअर्जदारांचा कोणताही वाद नाही, म्हणून अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक आहे असे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्र.1 होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
7. अर्जदाराने दि.15.9.2012 ला वरील पॉलिसी सरेंडर करण्यासंबंधीत पञ गैरअर्जदार क्र.1 च्या कंपनीकडे लिहिलेले होते व त्यावर गैरअर्जदार क्र.1 ने दि.2.11.2012 रोजी (अर्जदाराचा पॉलिसी सरेंडरबाबत) अर्जदाराला उत्तर दिले, ही बाब अर्जदाराने दाखल केलेले दस्तावेज नि.क्र.3 खालील दस्त क्र.9 वर दर्शविलेले आहे. तसेच, गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराला पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यु रुपये 1,89775/- अशी असतांना फक्त रुपये 78660/- अर्जदाराचे खात्यात जमा केले, त्यासंदर्भात अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 ला दि.15.12.2012 रोजी पञ लिहिले होते सदर पञ नि.क्र.3 दस्त क्र.8 वर दाखल केलेला आहे. सदर पञावरुन असे निष्पन्न होते की, अर्जदाराला रुपये 1,11,115/- पॉलिसीची सरेंडर व्हॅल्युमधून कमी मिळाले, यासंदर्भात दि.15.12.2012 रोजी अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 मध्ये वाद निर्माण झाला आणि सदर तक्रार दाखल करण्याचे कारणही दि.15.12.2012 रोजी निर्माण झाले. सदर तक्रार मंचासमक्ष दि.15.1.2013 ला दाखल झाली म्हणून सदर तक्रार कारण घडल्यापासून 2 वर्षाचे मुदतीत असल्यामुळे मुद्दा क्र.2 हा होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 व 4 बाबत :-
8. अर्जदाराने दाखल नि.क्र.3 खालील दस्त क्र.9 दि.2.11..2012 चा पञावरुन असे दिसून येते की, गैरअर्जदार क्र.1 नी अर्जदाराला सदर पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यु रुपये 1,89,775/- असे सांगितले होते आणि त्यावरुन रुपये 78,660/- अर्जदाराच्या खात्यामध्ये जमा केलेले होते. गैरअर्जदार क्र.1 च्या लेखीउत्तरात असे सांगितले की, सदर पञामध्ये गैरअर्जदार क्र.1 ची टंकलिखीत चुक झाली असल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 नी दि.1.12.2012 ला पञामार्फत अर्जदाराला कळविलेले होते व सदर पञ त्यांनी गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.22 दस्त क्र.5 वर त्याची सत्यप्रत दाखल केलेली आहे. सदर पञाची पडताळणी करतांना असे दिसले की, गैरअर्जदार क्र.1 ने लिहिलेल्या सदर पञावर कोणताही जावक क्रमांक नव्हता आणि सदर पञ अर्जदाराला पाठविले होते किंवा अर्जदाराला मिळाले होते, याबाबत गैरअर्जदार क्र.1 नी कोणताही पुरावा सदर तक्रारीत दाखल केलेला नाही, म्हणून गैरअर्जदार क्र.1 नी दि.1.12.2012 ला पञाव्दारे अर्जदाराला कळविलेले होते की, सदर पॉलिसी सरेंडर व्हॅल्यु रुपये 1,89,775/- ही दि.2.11.2012 च्या पञामध्ये टंकलिखीत चुक होती ही बाब ग्राह्य धरण्यासारखी नाही. अर्जदाराने दाखल केलेला नि.क्र.3 वर दस्त क्र.8 चे पञावरुन असे दिसून येतो की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 ला सदर पॉलिसीचे सरेंडर व्हॅल्युमध्ये रुपये 1,11,115/- अर्जदाराला कमी मिळाले या संदर्भांत अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडे दखल घेतली होती आणि त्या पञाचा गैरअर्जदार क्र.1 नी कोणतेही उत्तर दिले नाही किंवा सदर तक्रारीत याबाबत कोणताही जबाब दाखल केला नाही. यावरुन असे सिध्द होते की, गैरअर्जदार क्र.1 नी अर्जदाराचे पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यु रुपये 1,89,775/- असून सुध्दा रुपये रुपये 78,660/- दिले म्हणून गैरअर्जदार क्र.1 नी अर्जदाराच्या प्रती गैरवापर पध्दती व न्युनतम सेवेत ञुटी केलेली आहे. म्हणून मुद्दा क्र.3 हा होकारार्थी नोंदविण्यात येत आहे. गैरअर्जदार क्र.1 नी अर्जदाराच्या प्रती गैरवापर पध्दती व न्युनतम सेवेत ञुटी केली असल्यामुळे अर्जदार हा तक्रारीत मागणीप्रमाणे खालील आदेशाप्रमाणे पाञ आहे. म्हणून मुद्दा क्र.4 सुध्दा होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
9. गैरअर्जदार क्र.2 हे गैरअर्जदार क्र.1 कंपनीची शाखा आहे. गैरअर्जदार क्र.1 3 यांनी अर्जदाराला सदर पॉलिसी काढण्याबाबत सल्ला दिला होता आणि त्यासंदर्भात गैरअर्जदार क्र.3 नी अर्जदाराकडून कोणताही मोबदला घेतला नव्हता म्हणून गैरअर्जदार क्र.2 व 3 चे विरोधात कोणताही आदेश नाही.
मुद्दा क्रमांक 5 बाबत :-
10. मुद्दा क्र.1 ते 4 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर.
(2) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराला उरलेली पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यु रुपये 1,11,115/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत द्यावी. गैरअर्जदार क्र.1 ने मुदतीचे आंत रक्कम देण्यास कसूर केल्यास मुदतीनंतर वरील देय रकमेवर द.सा.द.शे.9 % प्रमाणे व्याज देण्यास पाञ राहील.
(3) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत द्यावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :-28.03.2014