Maharashtra

Nagpur

CC/793/2022

SMT. VAISHALI PRAKASH DAS - Complainant(s)

Versus

S.B.I. GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH CEO - Opp.Party(s)

ADV. UDAY P. KSHIRSAGAR

18 Sep 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/793/2022
( Date of Filing : 23 Nov 2022 )
 
1. SMT. VAISHALI PRAKASH DAS
R/O. PLOT NO.39, AMRAVATI ROAD, NEAR DARGA, TAKIA, WADDHAMNA, NAGPUR-400023
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. S.B.I. GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH CEO
REG. ADD. 9TH FLOOR, A&B WING, FALKRAM BUILDING, SAHARA ROAD, ANDHERI (EAST), MUMBAI 400099
MUMBAI
MAHARASHTRA
2. S.B.I. GENERAL INSURANCE CO. LTD., THROUGH BRANCH MANAGER
THAPAR ENCLAVE, 148, 3RD FLOOR, MAHARAJBAG ROAD, RAMDASPETH, NAGPUR 440010
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI PRESIDENT
 HON'BLE MR. B.B. CHAUDHARI MEMBER
 
PRESENT:ADV. UDAY P. KSHIRSAGAR, Advocate for the Complainant 1
 ADV. RENUKA NALAMWAR, Advocate for the Opp. Party 1
Dated : 18 Sep 2024
Final Order / Judgement

.आदेश

 

मा. अध्यक्ष, श्री. सचिन शिंपी यांच्या आदेशान्‍वये-

 

  1.      तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्तीचे पती प्रकाश गणेशचंद्र दास यांनी  विरुध्‍द पक्षाकडून  वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी क्रं. 114391532 ही दि. 31.07.2021 ते 30.07.2022 या कालावधीकरिता विमामुल्‍य रक्‍कम रुपये 10,00,000/- करिता विमाकृत केली होती  व  त्‍यात  तक्रारकर्तीचे  नांव नॉमिनी म्‍हणून नमूद होते. तक्रारकर्तीच्‍या पतीचे  दि. 15.10.2021 रोजी अपघाती निधन झाले. त्‍यामुळे तक्रारकर्तीने  लाभार्थी या नात्‍याने  विमा दावा मिळण्‍याकरिता सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन विरुध्‍द पक्षाकडे दि. 04.02.2022 रोजी विमा दावा प्रस्‍ताव दाखल केला असता विरुध्‍द पक्षाने कोणताही सबळ कागदोपत्री पुरावा नसतांना,  तक्रारकर्तीचे  पती हे अपघाता वेळी अल्‍कोहलच्‍या प्रभावा खाली होते असे कारण नमूद करुन दि. 31.03.2022 रोजी  विमा दावा नाकारला ही बाब दोषपूर्ण सेवा दर्शविते. म्‍हणून तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 10,00,000/- व्‍याजासह मिळण्‍याची,  तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्‍याची मागणी केली आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्तीने विमा दावा प्रस्‍ताव सोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांची पाहणी केली असता तक्रारकर्तीचे पती प्रकाश दास हे दि. 15.10.2021 रोजी  दारुच्‍या अंमला खाली असतांना त्‍यांचा अपघाती मृत्‍यु झाला त्‍यामुळे विमा पॉलिसीतील शर्ती व अटीचा भंग झाल्‍यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा योग्‍य कारणाने नाकारला आहे. म्‍हणून तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केली आहे. विरुध्‍द पक्षाने त्‍यांच्‍या जबाबा सोबत शासकीय महाविद्यालय व रुग्‍णालय नागपूर यांचे केस पेपर, डेथ समरी रिपोर्ट व क्‍लेम नाकारल्‍याचे पत्र जोडले आहे.

 

  1.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता  व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

         

  1. तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची  ग्राहक आहे काय ?                  होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय?             होय.

 

  1. काय आदेश ?                                  अंतिम आदेशानुसार

 

  • निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्तीच्‍या पतीने प्रिमियम रक्‍कम अदा करुन  विरुध्‍द पक्षाकडून  वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेतली असून त्‍यात तक्रारकर्तीचे नांव नॉमिनी म्‍हणून नमूद असल्‍याची बाब नि.क्रं. 2(1) वर दाखल पॉलिसी सर्टिफिकेटवरुन स्‍पष्‍ट होते. परिणामी तक्रारकर्ती ही बेनिफिशरी या नात्‍याने विरुध्‍द पक्षाची ग्राहक ठरते.  विमा कालावधीमध्‍ये अपघात झाल्‍याची  बाब विवादित  नाही.
  2.     तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु झाला त्‍यावेळी ते दारुच्‍या अंमलाखाली ( under the influence of alcohol ) होते, असा विरुध्‍द पक्षाच्‍या वकिलांचा युक्तिवाद असून त्‍यांनी शासकीय महाविद्यालय व रुग्‍णालय नागपूर यांचे केस पेपर, डेथ समरी रिपोर्ट या कागदपत्रांचा आधार घेतलेला आहे. विरुध्‍द पक्षाने आपल्‍या कथनाच्‍या समर्थनार्थ  मा. राज्‍य आयोग खंडपीठ नागपूर यांच्‍या IFFCO- TOKIO GENERAL INSURANCE CO. LTD. VS. MR. MEDSINGH FATTU CHAVAN AND OTHER    First Appeal No. A/18/447 तसेच मा. राष्‍ट्रीय आयोग यांनी ROYAL SUNDARAM GENERAL INSURANCE CO. LTD. VS. DAVUBHAI BABUBHAI RAVALIYA  REVISION ETITION NO. 1296 OF 2018   या प्रकरणातील न्‍यायनिवाडयाचा आधार घेतलेला आहे.  
  3.      तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु ट्रकने धडक दिल्‍यामुळे झाला असून विरुध्‍द पक्षाने दाखल केलेल्‍या कागदपत्रांमध्‍ये मयताच्‍या रक्‍तामध्‍ये अल्‍कोहलचे प्रमाण किती होते याबाबत रक्‍त तपासणी अहवाल अथवा व्हिसेरा रिपोर्ट दाखल केलेला नाही. परिणामी तक्रारकर्तीचे पती हे अपघाता वेळी दारुच्‍या अंमलाखाली होते हे विरुध्‍द पक्षाचे कथन ग्राहय धरण्‍या योग्‍य नाही. तक्रारकर्तीच्‍या वकिलांनी आपल्‍या कथनाच्‍या समर्थनार्थ युक्तिवाद करतांना मा. सर्वोच्‍च न्‍यायलयाने ANIL CHAUDHRY VS NATIONAL INSURANCE CO. LTD. CIVIL APPEAL NO. (S) 2531 OF 2020  या प्रकरणात पारित केलेल्‍या न्‍यायनिर्णयाचा आधार घेतला आहे. 
  4.      विरुध्‍द पक्षाने आपल्‍या जबाबासोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे व केस पेपरचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये मयत प्रकाश दास हे found fall on road  Under the effect of alcohol  असे नमूद असून विरुध्‍द पक्षाने मयताचा रक्‍त तपासणी अथवा व्हिसेरा रिपोर्ट दाखल केलेला नाही. परिणामी मयताच्‍या रक्‍तामध्‍ये नेमके अल्‍कोहोलचे प्रमाण किती होते याचा कोणताही सबळ पुरावा विरुध्‍द पक्षाने दाखल  केला नाही. तक्रारकर्तीचे पती दुचाकी वाहनाने जात असतांना ट्रक क्रं.  TN-60 J-7481  या वाहनाने धडक दिल्‍यामुळे अपघात झाल्‍याचे नि.क्रं. 2 वर दाखल F.I.R. या दस्‍तावेजावरुन दिसून येते.  

 

  1.      तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या न्‍यायनिर्णयानुसार कोणत्‍याही विमा कंपनीला,  विमाधारकाने केवळ अल्‍कोहोलचे सेवन केले या कारणास्‍तव विमा दावा नाकारता येणार नाही. एखादा व्‍यक्‍ती ज्‍या वेळेस दारुच्‍या अंमलाखाली     (under the influence of alcohol ) होता व त्‍यामुळे अपघात झाला, ही बाब सिध्‍द करण्‍याकरिता रक्‍तामध्‍ये अल्‍कोहोलचे प्रमाण,  हे प्रमाणित मर्यादे पेक्षा जास्‍त असणे गरजेचे आहे. परिणामी विरुध्‍द पक्षाने मयत प्रकाश दास यांच्‍या रक्‍तामध्‍ये अथवा शरीरामध्‍ये अल्‍कोहलचे प्रमाण किती होते ही बाब दर्शविण्‍याकरिता कोणताही  रक्‍त तपासणी अथवा व्हिसेरा रिपोर्ट दाखल केलेला नाही. परिणामी तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा दारुच्‍या अंमलाखाली under the influence of alcohol असल्‍यामुळे झाला याबाबतचा कोणताही वैद्यकीय /कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही.  नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजांवरुन तक्रारकर्तीच्‍या पतीचा अपघाती मृत्‍यु झाल्‍याचे स्‍पष्‍टपणे सिध्‍द होत असतांना सुध्‍दा  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचा  योग्‍य असलेला विमा दावा नाकारुन दोषपूर्ण सेवा दिली असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

 

  1. मुद्दा क्रमांक 3 बाबत – मुद्दा क्रमांक 1 व 2 चा निष्‍कर्ष स्‍पष्‍ट करतो की, तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे व विरुध्‍द पक्षाने वर नमूद केल्‍याप्रमाणे दोषपूर्ण सेवा दिली आहे. तक्रारकर्तीच्‍या पतीला  रक्‍कम रुपये 10,00,000/-  चे विमा संरक्षण होते ही बाब नि.क्रं. 2(1) वरील पॉलिसीवरुन स्‍पष्‍ट होते. परिणामी तक्रारकर्ती  विरुध्‍द पक्षाकडून रक्‍कम रुपये 10,00,000/-  विमा दावा नाकारल्‍याची तारीख 31.03.2022 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह  मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारकर्तीला  झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला विमा दावा रक्‍कम रुपये 10,00,000/-  व त्‍यावर विमा दावा नाकारल्‍याची तारीख 31.03.2022 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्तीला अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- अदा करावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्तीला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. B.B. CHAUDHARI]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.