::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 16/12/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 व 5 यांनी अर्जदाराला हैदाराबाद येथे चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नौकरी मिळून देण्याची हमी दिली त्याकरीता अर्जदाराकडून रक्कम रु. 25,902/- ऑनलाईन क्रेडीट कार्ड वरुन गैरअर्जदार क्रं. 4 (बॅंक) चे माध्यमातुन घेतले. अर्जदाराचे ई-मेल व्दारा बायोडाटा गैरअर्जदाराच्या वेबसाईट मध्ये नोंदवून सुध्दा गैरअर्जदार क्रं. 1 ते व 5 कडून अर्जदाराच्या नौकरी संबंधीत कोणतीही माहीती न दिल्यामुळे अर्जदाराने सदर रक्कम गैरअर्जदार क्रं. 1 कडून परत मिळावी याबाबत गैरअर्जदार क्रं. 1 ला ई-मेल व्दारे पञ पाठवून मागणी केली. त्या ई-मेलच्या उत्तराला गैरअर्जदार क्रं. 1 ची कंपनीचे दिपक रावत यांनी पैसे मिळण्याची खाञी केली व 42 तासाच्या आत सदर रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले. परंतु गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदारास रक्कम परत केली नाही. म्हणून अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 5 ला ई-मेल व्दारे रक्कम परत करण्याबाबत नोटीस पाठविले परंतु गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 व 5 यांनी त्यावर कोणतीही प्रतिसाद दिला नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 4 बॅंकेच्या माध्यमातून गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 व 5 सोबत पैशांचे व्यवहार केले. गैरअर्जदार क्रं. 1 ते 5 यांनी अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे म्हणून सदर तक्रार अर्जदाराने मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदाराची तक्रार दाखल होवून अर्जदाराच्या वकीलातर्फे प्राथमिक युक्तीवाद ऐकण्यात आला. अर्जदाराच्या प्राथमिक युक्तीवादात व तक्रार व दस्ताऐवजाची पडताळणी करुन सदर मंच खालील असलेले कारणे व निष्कर्षानुसार खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
कारणे व निष्कर्ष
3. सदर तक्रार गैरअर्जदार क्रं. 1 यांचे कार्यालय गाझियाबाद, उत्तरप्रदेश येथे आहे. गैरअर्जदार क्रं. 2, 3 व 5 यांचे कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. तसेच गैरअर्जदार क्रं. 4 बॅकेने अर्जदाराकडून या व्यवहाराकरीता कोणताही मोबदला न घेता अर्जदाराला गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 व 5 यांना रक्कम देण्यासाठी सुविधा दिली म्हणून अर्जदार वादातील व्यवहारामध्ये गैरअर्जदार क्रं. 4 चे ग्राहक नाही असे सिध्द होते.
मा. राज्य ग्राहक तक्रार आयोग, मुंबई यांनी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार.
BEFORE THE HON'BLE STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL | COMMISSION, MAHARASHTRA, MUMBAI |
|
|
Complaint Case No. CC/12/83 |
| |
|
MR SADANAND H MHATRE VS. MR DAMODARAN
Pronounced on 20th April, 2012.
Under section 11 of Consumer Protection Act, 1986 complaint is required to be filed in a forum within the local limits of whose jurisdiction, the opponent at the time of institution of the complaint, actually and voluntarily resides, or carries on business or has a branch office or personally works for gain. So basically, consumer complaint is required to be filed at a place where the opponent resides or carries on business or has a branch office or personally works for gain. He is not having office or branch office in the local jurisdiction of this Commission in which complaint is sought to be filed. Counsel for the complainant has not given any local branch office of the opponent operating in Maharashtra. Address of the opponent clearly mentioned in the complaint is that he is resident of P.O.Pudhukkara, Thrissure, KeralaState. Cause of action in our opinion also primarily arose at KeralaState, because he had made online booking of the machines and those machines after payment made online were delivered at Baramati. Basically, cause of action occurred at Kerala and, therefore, we are not having territorial jurisdiction to entertain and try this consumer complaint.
सदर प्रकरणात सुध्दा अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांना ऑनलाईन रक्कम दिली आहे व गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 व 5 यांचे कोणतेही कार्यालय चंद्रपूर येथे नसल्यामुळे सदर ग्राहक तक्रार कलम 11 (2) ग्राहक सरंक्षण कायदा 1986 प्रमाणे या मंचाच्या कार्यक्षेञात येत नाही सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
//अंतीम आदेश//
(1) अर्जदाराची तक्रार अस्विकृत करण्यात येत आहे.
(2) अर्जदाराला तक्रारीतील मूळ प्रत सोडून उर्वरित प्रति परत देण्यात याव्या.
(3) अर्जदाराला आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 16/12/2014