::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्रीमती सुरेखा टेवरे-बिरादार, मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 21.07.2012) अर्जदाराने प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 व 14 अन्वये दाखल केलेली आहे. या तक्रारीचा आशय थोडक्यात खालिलप्रमाणे. अर्जदार हा चंद्रपूर स्थित रहिवासी असुन स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी अर्जदाराने दिनांक 15.10.2010 रोजी एक टाटा कंपनीचा 2518 अश्या मॉडेल चा टिप्पर ट्रक खरेदी केला होता. अर्जदाराने सदर ट्रक विकत घेण्याकरीता सुंदरम फायनांस लिमिटेड या वित्तीय संस्थेमार्फत रुपये 16,44,000/- चे वित्तीय सहाय(कर्ज) घेतलेले होते. सदर वाहनासाठी कर्ज घेतेवेळी अर्जदाराने गैरअर्जदारामार्फत रुपये 37115/- भरुन वाहनाचा पूर्ण कॉंप्रेहेंसिव विमा काढलेला होता सदर विमा पॉलिसीचा नंबर वि.जी.सी. 0146720001000 असा असुन तो दिनांक 15.10.2010 पासुन 14.10.2011 पर्यंत वैध होता. दिनांक 31.5.2011 रोजी वरोरा स्थित जि.एम.आर. प्लांट येथे अर्जदाराच्या या वाहनास अपघात घडला. अपघाताच्या वेळी अर्जदाराचे वाहन पुर्णपणे विमांकीत होते. त्यामुळे अर्जदाराने संबंधीत विमा क्लेम ची पूर्ण नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत नि. 4 नुसार एकूण 12 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले आहेत. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गै.अ. कंपनी विरुद्ध नोटीस काढण्यात आले. गै. अ. क्र. 1 व 2 च्या कंपनीच्या अधिका-यांनी उपस्थीत होऊन नि. 7 नुसार आपले लेखीबयाण दाखल केले. गैरअर्जदार क्र. 3 हे नोटीस मिळूनसुद्धा हजर झाले नसल्यामुळे गै.अ. क्र. 3 विरुद्ध दिनांक 22/2/2012 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले. गै.अ. यांनी आपल्या लेखीबयाणात असे म्हटले की, अर्जदाराचे सगळे कथन व आरोप खोटे असून नाकबुल आहे तसेच कुठल्याही प्रकारची न्युनतापूर्ण सेवा दिलेली नसून कुठलीही मनमानी केली नाही. गै.अ. कंपनीस अर्जदारासोबत कुठलाही आकस नसल्याने त्यांना आर्थिक व मासिक ञास देण्याचा प्रश्न सुध्दा उदभवत नाही. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्या कथनापृष्ठार्थ नि. 13 नुसार एकुण 5 दस्ताऐवज दाखल केले आहे. // कारण मिमांसा // उपरोक्त दोन्ही पक्षातर्फे दाखल करण्यात आलेले संपूर्ण दस्तऐवज आणि प्रतिज्ञालेखावरील पुरावा बारकाईने अवलोकन करण्यात आले यावर असे स्पष्ट दिसुन येते की अर्जदार यांच्या मालकीचे टाटा कंपनी 2518 या मॉडेलचा टिप्पर ट्रक एम.एच. 29, टी- 486, चेसीस क्र. एम. 80, 448091, एच.एच. 07954 या वाहनाचा गै.अ. क्रमांक 1 ते 3 यांनी विमा पॉलिसी क्र. वि.जे.सी. 014 672000100 नुसार दिनांक 15/10/2010 ते 14/10/2011 पर्यंत कॉम्प्रेहेन्सिव विमा काढलेला आहे या बद्दल वाद नाही. अर्जदाराच्या कथनानुसार तसेच दाखल पुरावा वरुन अर्जदाराच्या उपरोक्त वाहनास दि. 31.5.2011 रोजी वरोरा स्थित जी.एम.आर. प्लांट येथे सदर वाहनाद्वारे माती उचलने व उतरविण्याचे काम सुरु असतांना टिप्पर ट्रक चा डाव्या बाजुस उलटुन अपघात झाला असे स्पष्ट दिसुन येते. सदर अपघाताविषयी अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांना ताबडतोब माहिती दिली त्याचप्रमाणे विमा पॉलिसी नुसार नुकसान भरपाईची मागणी केली तसेच या संदर्भातील दस्तऐवज दिलेत. दोन्ही पक्षाच्या पुराव्यावरुन स्पष्ट दिसुन येते की, गै.अ. यांना विमाकृत वाहनास अपघात झाल्याबद्दल माहिती प्राप्त झाल्यानंतर गै.अ. तर्फे त्यांचे अधिकृत सर्वेअर मार्फत अपघातग्रस्त विमाकृत वाहनाचे दिनांक 2.6.2011 रोजी जायका मोटर्स लिमीटेड चे व्यवस्थापक व गै.अ. तसेच अर्जदारासमक्ष निरीक्षण करण्यात आले. दिनांक 31.5.2011 रोजी अर्जदाराच्या वाहनास अपघात झाल्यानंतर अर्जदाराने टाटा कंपनीचे अधिकृत कार्यशाळा जायका मोटर्स लिमिटेड, चंद्रपूर येथे अपघातग्रस्त वाहनाची दुरुस्ती केली असे दिसुन येते. गै.अ. तर्फे त्यांनी नेमलेल्या अधिकृत सर्वेअर मार्फत दिनांक 2.6.2011 रोजी प्रत्यक्षरित्या वाहनाचे निरीक्षण करण्यात आले व या अनुषंगाने निशानी ब 4 नुसार शिवशंकर आकारे यांचा सर्वे रिपोर्ट दाखल करण्यात आला. सदर सर्वे रिपोर्ट चे बारकाईने अवलोकन करण्यात आले असता असे स्पष्ट दिसुन येते की, सर्वे रिपोर्ट मधील पान नं. 2 वर Cause of Loss या रकान्यात (As stated by an insured in the claim form while at the time of unloading soil, suddenly on the captioned spot of an accident an IV was toppied to its left due to poor & uneven ground surface sustained damages to an IV thus loss occurs.) नुसार असे नमुद करण्यात आले. वास्तविक अर्जदार यांनी गै.अर्जदारकडे क्लेम फॉर्म भरुन देतांना अशा पदधतीचे कारण नमुद केलेले नाही. यावरुन असे दिसुन येते की, गै.अ. यांनी जाणुनबुजुण अर्जदाराच्या वाहनास अपघातातुन झालेल्या नुकसान संदर्भातील घटना चुकीच्या पदधतीने सर्वे रिपोर्ट मध्ये नमुद केले त्याचप्रमाणे चुकीचे व बिनबुडाचे कारण अर्जदाराच्या वाहनासंदर्भात दर्शवुन अपघाताचा विमा क्लेम ( External Impact) दवारे अपघात झालेला नाही अशा प्रकारे कारण दर्शवुन अर्जदाराचा विमा क्लेम नाकारण्यात आला. प्रस्तुत प्रकरणात गै.अ. तर्फे निशानी ब 4 नुसार सदर विमा पॉलिसी संदर्भातील नियम व अटी दाखल करण्यात आले. यानुसार गै.अ. विमा कंपनीने अर्जदाराच्या वाहनास Section I, Loss or damage to the vehicle insured या सदरानुसार 1 ते 10 संदर्भातील परिस्थिती नमुद केली आहे जी गै.अ. त्याच्या निशानी 7 वरील लेखी जबाबात नमुद केली आहे तसेच सदर पॉलिसीतील अट क्र. 2 नुसार गै.अ. कुठल्या परिस्थितीत अर्जदाराच्या वाहनास नुकसान झाले असल्यास नुकसान भरपाई देऊ शकत नाही असे निशानी ब 4 अनु क्र. 2 मध्ये (a),(b) व (c) नुसार या संदर्भात नियम देण्यात आले आहे. उपरोक्त सर्व पुरावे विमा पॉलिसी च्या नियम व अटी नुसार तसेच सर्वे रिपोर्ट च्या आधारे आम्ही या मतास आलो आहोत की वाद विषय अपघात हा विमा पॉलिसीतील नियम अनु. क्र.1 (9) मध्ये अंर्तभुत होत असल्या कारणाने गै.अ. अर्जदारास विमा योजनेतील लाभ व नुकसान भरपाई देण्यास बांधील आहेत परंतु गै.अ. यांनी अर्जदारास दिनांक 3.10.11 रोजी चुकीचे कारण दर्शवुन नुकसान भरपाई देण्याचे नाकारल्यामुळे गै.अ. क्र. 1 ते 3 च्या सेवेत ञुटी आले. प्रस्तुत प्रकरणात अर्जदाराने दिनांक 31.5.11 रोजी अपघात झाल्यानंतर टाटा कंपनीच्या अधिकृत कार्यशाळेत वाहन दुरुस्ती केले व त्या करीता आलेल्या खर्चाची मागणी केलेली आहे. गै.अ. तर्फे सर्वे रिपोर्ट दाखल करण्यात आलेला आहे. सदर सर्वे रिपोर्ट नुसार सर्वेअर यांनी अर्जदाराच्या वाहनास झालेले नुकसान रुपये 1,00,000/- असे नमुद केलेले आहे अपघातातुन वाहनास झालेल्या नुकसाना संदर्भात मा. राष्ट्रीय आयोग यांनी बरीच विमाकृत कंपनीमार्फत नेमलेल्या सर्वेअर नुसार नुकसान भरपाईची रक्कम निश्चीत करण्यात यावी असे बरेच निकाल दिलेले आहेत. म्हणुन उपरोक्त सर्व पुरावा ग्राहय धरुन तसेच सर्वेअर रिपोर्ट च्या आधारे आम्ही या निर्णयास आलो की अर्जदार गै.अ. क्र. 1 ते 3 कडुन रु 1,00,000/- रुपये मिळण्यास पाञ आहे परंतु संपूर्ण रक्कम अर्जदारास वेळेत प्राप्त न झाल्यामुळे अर्जदार गै.अ. कडुन दि. 3/10/2011 पासुन ते पूर्ण रक्कम प्राप्त होईपर्यंत द.शा.द.शे 6 टक्के दराने व्यास मिळण्यास पाञ आहे तसेच नुकसानापोटी रुपये 5,000/- व तक्रार खर्च रुपये 1000/- मिळण्यास पाञ आहे. उपरोक्त विवेचनावरुन आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अशंतः मंजुर करण्यात येते. (2) गै.अ. कंपनी 1 ते 3 यांनी एकञीत व वैयक्तीकरित्या अर्जदारास सदर निकाल प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत नुकसान भरपाई म्हणुन रु 1,00,000/- व त्यावर दि. 3.10.2011 पासुन ते पूर्ण रक्कम प्राप्त होईपर्यंत द.शा.द.शे. 6 टक्के दराने व्याजासह रक्कम दयावी अन्यथा गै.अ. कंपनी 1 ते 3 उपरोक्त रकमेवर दि. 3.10.2011 पासुन ते पूर्ण रक्कम प्राप्त होईपर्यंत द.शा.द.शे. 9 टक्के दराने व्याज देण्यास जबाबदार राहील तसेच मानसिक व शारीरीक ञासापोटी रुपये 5000/- व तक्रार खर्च रुपये 1000/- दयावे. (3) अर्जदार व गै.अ. यांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 21/07/2012 |