तक्रार क्र. CC/ 13/ 14 दाखल दि. 02.04.2013
आदेश दि. 08.08.2014
तक्रारकर्ता :- श्री जयदेव वल्द श्रीराम आकरे
वय – 40 वर्षे, धंदा—व्यापार
रा.चिखली, पो. धानला,
ता.जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. रॉयल सुन्दरम अलायन्स इन्शुरन्स कंपनी लिमी.
सकाळ 2रा मजला अॅक्सीस बँकेच्या वर
अदालत रोड, औरगांबाद
ता.जि.औरंगाबाद
2. रॉयल सुन्दरम अलायन्स इन्शुरन्स कंपनी लिमी. मार्फत शाखा व्यस्थापक, शाखा कार्यालय
शंकर नगर,नागुपर ता.जि.नागपुर
3. श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमी.
मार्फत व्यवस्थपक,
कॅनरा बँक जवळ,स्टेशन रोड,
प्रेम सेवा गॅरेज बिल्डींगचे वर,भंडारा
ता.जि.भंडारा
4. महिन्द्रा अॅड महिन्द्रा
अधिकृत विक्रेता
नागपुर नाका जवळ,राष्ट्रीय महामार्ग क्र.6
भंडारा,ता.जि.भंडारा
5. प्रोव्हेन्शियल ऑटोमोबाईल कंपनी लिमी.
प्रायव्हेट लिमी. (सर्वीस सेंटर)
अधिकृत प्रतिनीधी (महिन्द्रा अॅन्ड महिन्द्रा)
17-18, सेंट्रल एम.आय..डी.सी.
हिंगणा रोड,नागपुर
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.रामटेके
वि.प.तर्फे अॅड.वर्मा
.
(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 08 ऑगस्ट 2014)
1. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.3 जे फायनान्स कंपनी आहे त्यांचेकडून Maximo Mini Van क्र. MH-36 H 1924 ही गाडी 13/8/2011 ला विरुध्द पक्ष क्र.4 जे अधिकृत विक्रेता आहेत त्यांच्याकडून खरेदी केली. तक्रारकर्त्याच्या गाडीला अपघात झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्त्याने विमा दावा मिळण्यासाठी अर्ज केला असता व तो विमा दावा फेटाळल्यामुळे तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्ता हा भंडारा येथील रहिवासी असून त्याने MH-36 H 1924 ही गाडी फायनान्स रुपये 3,33,500/- चे कर्ज घेवून विकत घेतली. विरध्द पक्ष क्र.1 व 2 हे विमा कंपनी असून त्यांनी सदरहू गाडीचा विमा दिनांक 13/8/2011 ते 12/8/2012 पर्यंत काढला होता.
3. तक्रारकर्त्याचा वाहनचालक दिनांक 13/11/2011 ला सायंकाळी मौजे मोहेखेडी येथे शेतावर जाण्यासाठी डबे घेवून गेला असता सायंकाळी 4 ते 4.30 च्या दरम्यान गाडीने मागचे बाजुला पेट घेतल्यामुळे गाडीचे नुकसान झाले. गाडीचे नुकसान हे गाडीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे झाले. सदरहू अपघाताची तक्रार पोलीस स्टेशन मौदा येथे दिनांक 14/11/2011 ला देण्यात आली.
4. तक्रारकर्त्याने अपघाताची माहिती विरुध्द पक्ष क्र. 3 यांना दिली. गाडीचा विमा हा विरुध्द पक्ष क्र.3 यांनी काढला होता. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनी pचे नांव विचारले तसेच विरुध्द पक्ष क्र.3 यांनी गाडी विरुध्द पक्ष क्र.5 यांच्याकडे दुरुस्ती करण्यासाठी पाठविली असे सांगितले. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी अपघाताची माहिती विमा कंपनीला दिली व त्यांचे एजंट हयांनी गाडीची तपासणी व Survey केला. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.3 यांना विमा कंपनी बद्दल वारंवार विचारपुस केली. परंतु विरुध्द पक्ष क्र.3 यांनी कुठलेही समाधानकारक उत्तर दिले नाही.
5. मार्च 2012 ला विरुध्द पक्ष क्र.3 यांनी विमा पॉलीसीची प्रत तक्रारकर्त्यास दिली. तसेच तक्रारकर्त्याची गाडी दुरुस्त करुन परस्पर विरुध्द पक्ष क्र.3 च्या प्रतिनीधींना दिली. तक्रारकर्त्याला गाडी दुरुस्ती बददल विरुध्द पक्ष क्र.3 यांनी कुठलीही माहिती दिली नाही. विरुध्द पक्ष क्र.1 ते 5 यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारकर्ता हा गाडी चालविण्यापासून जवळपास 9 महिने वंचीत राहिला त्यामुळे त्याला आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला.
6. तक्रारकर्त्याने वारंवार विनंती करुन सुध्दा विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्याची दुरुस्त केलेली गाडी त्याला दिलेली नाही. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्याची विमा कागदपत्रे मार्च 2012 ला विरुध्द पक्ष क्र.5 यांच्याकडे नेवून दिली व विरुध्द पक्ष क्र.5 यांनी तक्रारकर्त्याच्या को-या कागदावर सहया घेतल्या. तसेच तक्रारकर्त्याची गाडी ही 8 ते 10 दिवसांत दुरुस्त केल्या जाईल असे सांगितले. तक्रारकर्ता गाडी घेण्यासाठी गेला असता तक्रारकर्त्याची गाडी विरुध्द पक्ष क्र.3 यांनी विरुध्द पक्ष क्र.5 यांच्याकडून तक्रारकर्ता जाण्यापुर्वीच नेली होती व गाडी नेल्याची माहिती विरुध्द पक्ष क्र.3 व 5 यांनी तक्रारकर्त्यास दिलेली नव्हती.
7. तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष क्र.1 ते 5 यांच्या निष्काळजीपणामुळे 8 ते 9 महिने गाडी न मिळाल्यामुळे तक्रारकर्त्याला त्याचा वापर न करता आल्यामुळे त्याला 1,50,000/- रुपयाचे नुकसान झाले व मानसिक त्रास सुध्दा सहन करावा लागला.
8. तक्रारकर्त्याने दिनांक 14/11/2011 व ऑक्टो.2012 ला विरुध्द पक्षास नोटीस पाठविल्यामुळे सदरहू तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले. तक्रारकर्त्याने सदरहू तक्रारीमध्ये गाडी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्या कडे विमाकृत असल्यामुळे जळालेल्या गाडीचा विमा मिळण्याकरीता सदरहू तक्रार दाखल केली आहे.
9. तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्षास दिनांक 2/4/2013 ला नोटीस काढण्यात आल्या.
10. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी आपला जबाब दिनांक 5/6/2013 ला दाखल केला. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले. तक्रारकर्त्याच्या गाडीच्या अपघाता बद्दलच्या intimation नुसार IRDA Licence Holder शरबजित सिंग तुली यांना नियुक्त केले व त्यांनी सर्व्हेअर रिपोर्ट मध्ये 29,992/- रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले. तसेच तक्रारकर्त्याला सदरहू रक्कम त्याने संपुर्ण कागदपत्रांची पुर्तता केल्यास तो ती रक्कम मिळण्यास पात्र राहील असे म्हटले. तक्रारकर्त्याने तक्रारकर्त्याचे वाहन हे Commercial Purpose साठी वापरल्यामुळे व तक्रारकर्त्याची पॉलीसी ही Private Car Package Policy असल्यामुळे तक्रारकर्ता विम्याचे पैसे मिळण्यास पात्र नाही. तक्रारकर्त्याने वाहनाची पॉलीसी ज्या कारणासाठी घेतली होती त्याच्या व्यतिरिक्त इतर कारणासाठी वापरल्यामुळे तक्रारकर्त्याने पॉलीसीच्या Terms and Condition चे उल्लंघन केले आहे. तक्रारकर्त्याच्या गाडीचा अपघात हा Electrical Short Circuit मुळे झाल्यामुळे व पॉलीसी मध्ये Electrical Break down & Failure करीता तरतुद नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी, असे जबाबात म्हटले आहे.
11. तक्रारकर्त्याचे गाडीचा अपघात झाल्यानंतर लगेचच लेखी intimation न दिल्यामुळे व गाडीची तसेच विम्याची महत्त्वपुर्ण कागदपत्रे सादर न केल्यामुळे तक्रारकर्ता विम्याची रक्कम मिळण्यास पात्र नाही. तक्रारकर्त्याची ही तक्रार मंचास चालविण्याचा अधिकार नसून तक्रारकर्त्याने 1,97,663/- रुपयाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी केलेल्या Claim बद्दल कुठलाही लेखी पुरावा दाखल न केल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी असेही जबाबात म्हटले आहे.
12. तक्रारकर्त्याने 71,921/- रुपयाचे Down Payment दिनांक 12/8/2011 ला महिन्द्रा मॅक्सीमो मिनी व्हॅन 6 सीटर घेण्यासाठी दिले व उर्वरित रक्कम 3,14,000/-रुपये चे फायनान्स विरुध्द पक्ष क्र.3 यांनी केले व त्यावेळी तक्रारकर्त्याने रुपये 10,310/- प्रति महिना 47 हप्त्यांमध्ये रक्कम विरुध्द पक्ष क्र.3 यांना परतफेड म्हणून देण्याचे कबुल केले. त्याप्रमाणे संबंधित कागदपत्रांवर सही सुध्दा केली होती. तक्रारकर्त्याने गाडी कर्जावर घेतली असून 01 हप्ता सुध्दा व्यवस्थित त्याने परतफेड केलेला नाही.
13. विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी आपल्या जबाबात/युक्तीवादात असे म्हटले आहे की विरुध्द पक्षाने वारंवार परतफेडी बद्दल तक्रारकर्त्यास विचारणा केली परंतु तक्रारकर्त्याने रक्कम देण्यास असमर्थता दाखविली. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 31/7/2012 ला गाडी Surrender केली. तक्रारकर्त्याने कर्जाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे व तक्रारकर्त्याने स्वतःहून विरुध्द पक्ष क्र.3 यांना गाडीच्या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे व गाडी Surrender केल्यामुळे तक्रारकर्त्याने खोटी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे.
14. विरुध्द पक्ष क्र.4 यांच्या विरुध्द एकतर्फी प्रकरण चालविण्याचा आदेश दिनांक 7/2/2014 ला पारित करण्यात आला.
15. विरुध्द पक्ष क्र.5 यांनी आपला जबाब दाखल केलेला दिसत नाही.
16. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत विमा पॉलीसी पान नं.15 वर, ड्रायव्हरचे ड्रायव्हिंग लायसन्स पान नं.19 वर, पोलीस स्टेशन मौदा येथील तोंडी रिपोर्ट पान नं.21, घटनास्थळ पंचनामा पान नं. 22 वर, तक्रारकर्त्याच्या गाडीचे बील पान नं.25 वर दाखल केले आहे. गाडीचे वर्कशॉप मधील दुरुस्तीकरीता टाकलेले Vechicle inventory पान नं. 28 वर, वकिलामार्फत पाठविलेली नोटीस पान नं. 30 वर, तक्रारकर्त्याच्या नोटीसला उत्तर पान नं. 37 वर दाखल केले आहे.
17. तक्रारकर्त्याच्या वकिलांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडून व विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या मार्फत विमा काढला होता. तक्रारकर्त्याचा गाडीचा अपघात हा शॉर्ट सर्किट मुळे झाला त्यामुळे तक्रारकर्त्याच्या गाडीला नुकसान झाले. तसेच तक्रारकर्त्याच्या गाडीचे वायरिंग जळून गाडीचे टायर सुध्दा जळाले. तक्रारकर्त्याने सदरहू अपघाताचा रिपोर्ट हा पोलीस स्टेशन मौदा जि.भंडारा येथे दिला. तसेच तक्रारकर्त्याने अपघाताची माहिती विरुध्द पक्ष क्र.3 यांना दिली. तक्रारकर्त्याच्या गाडीचे नुकसान होवून विरुध्द पक्ष क्र.3 यांनी तक्रारकर्त्याची गाडी परस्पर शोरुम मधून नेवून तक्रारकर्त्याला म्हणजेच गाडी मालकाला गाडी चालविण्यास न दिल्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारर्त्याला विम्याचे पैसे विमा दावा करुनही विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी न दिल्यामुळे तक्रारकर्ता हा 1,97,663/- रुपये नुकसान भरपाई मिळण्यास पात्र असल्यामुळे त्याला नुकसान भरपाई मिळण्याचा आदेश पारीत करण्यात यावा.
18. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चे वकील अॅड.हितेश वर्मा यांनी युक्तीवाद केला की इन्शुरन्स पॉलीसी प्रमाणे कंपनी, पॉलीसी मधील Section 1 मधील ABC प्रमाणे खालील बाबतीत विम्याची रक्कम देण्यास बाध्य नाही. पॉलीसी मध्ये असे म्हटले आहे की The company shall not be liable to make any payment in respect of
a) consequential loss, depreciation, wear and tear, mechanical or electrical breakdown, failure or breakages,
b) Damage to tyres and tubes unless the Private Car is damaged at the same time in which case the liability of the Company shall be limited to 50% of the cost of replacement and
c) Any accidental loss or damage suffered whilst the insured or any person driving the Private Car with the knowledge and consent of the insured is under the influence of intoxicating liquor or drugs.
तसेच पॉलीसी मधील अट क्र.1 नुसार Notice shall be given in writing to the company immediately upon the occurrence of any accidental loss or damage in the event of any claim and thereafter the insured shall give all such information and assistance as the company shall require, Every letter claim writ summons and or on receipt by the insured. Notice shall also be given in writing to the company immediately the insured shall have knowledge of any impending prosecution, inquest or fatal inquiry in respect of any occurrence which may give rise to a claim under this policy. In case of theft or criminal act which may be the subject of a claim under this policy the insured shall give immediate notice to the Police and cooperate with the company in securing the conviction of the offender.
तसेच अट क्र. 8 नुसार The due observance and fulfillment of the terms, conditions and endorsements of this policy in so far as they relate to anything to be done or complied with by the insured and the truth of the statements and answers in the said proposal shall be conditions precedent to any liability of the company to make any payment under this policy.
19. तक्रारकर्त्याने वरील अटींचे पालन न केल्यामुळे तक्रारकर्ता हा विम्याची रक्कम मिळण्यास पात्र नाही. तक्रारकर्त्याने गाडीचा विमा हा प्रायव्हेट कार साठी घेतला असून गाडी ही Commercial purpose साठी वापरण्यात येत होती हे संबंधित पोलीस स्टेशन च्या कागदपत्रांवरुन निदर्शनास येत असल्यामुळे तक्रारकर्ता हा विम्याचे पैसे मिळण्यास पात्र नाही.
20. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे Electrical break down संबंधी झालेले नुकसान देण्यास पॉलीसी मधील अटी व शर्ती नुसार बाध्य नाहीत. तक्रारकर्त्याने ड्रायव्हिंग लायसन्स, R.C.Book व इतर संबंधित कागदपत्रे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना न दिल्यामुळे, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे Investigation Claim न करु शकल्यामुळे, या तक्रारकर्त्याच्या चुकीस विरुध्द पक्ष हे जबाबदार ठरु शकत नाही. तसेच तक्रारकर्त्याने नुकसान भरपाई बद्दल Indpendent Private Survey न केल्यामुळे व त्यास लेखी पुरावा दाखल न केल्यामुळे तक्रारकर्ता कुठलीही विम्याची रक्कम मिळण्यास पात्र नाही. विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याने दिलेले नुकसान भरपाईचे Estimate हे त्यांच्या तज्ञ Surveyor कडून प्रमाणित करुन व सर्वे रिपोर्ट तयार करुन घेतले, ते सदरहू तक्रारीमध्ये दाखल केले आहे. त्या सर्वे रिपोर्ट प्रमाणे तक्रारकर्त्याला गाडीच्या स्पेअर पार्टस साठी लागणारा खर्च फक्त 29,992/-रुपये एवढा देता येवू शकतो असे Survey Report रिपोर्ट मध्ये शरबजित सिंग तुली यांनी म्हटलेले आहे.
21. तक्रारकर्त्याचा तक्रार अर्ज, विरुध्द पक्ष यांचे जबाब व दोन्ही पक्षाच्या वकीलांचा युक्तीवाद यावरुन खालील मुद्दा उपस्थित होतो.
- तक्रारकर्ता हा त्याच्या गाडीला झालेल्या नुकसानी बद्दल नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे का? – होय
कारणमिमांसा
22. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये Maximo Mini Van क्र. MH-36 H 1924 चे विकत घेतल्याचे दिनांक 20/8/2011 चे बील पान नं.25 वर दाखल केले आहे. त्यावरुन सिध्द् होते की त्याने विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून गाडी विकत घेतली. तक्रारकर्त्याच्या गाडीला अपघात झाला हे पोलीस स्टेशन घटनास्थळ पंचनामा यावरुन सिध्द् होते. तक्रारकर्त्याने गाडीचा विमा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्यातर्फे विरुध्द पक्ष क्र.3 यांनी काढला हे सिध्द् होते. तक्रारकर्त्याच्या गाडीच्या अपघाताची माहिती विरुध्द पक्ष क्र.3 यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना दिली होती. तक्रारकर्त्याला गाडी घेण्यासाठी विरुध्द पक्ष क्र.3 यांनी कर्ज दिले होते, परंतु तक्रारकर्त्याने गाडीच्या हप्त्यांची नियमित व वेळोवेळी परतफेड न केल्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 3 हे तक्रारकर्त्याची गाडी विरुध्द पक्ष क्र. 5 यांच्याकडून परस्पर घेवून गेले. तक्रारकर्त्याच्या गाडीला अपघात झाल्यामुळे दुरुस्तीसाठी लागणारा खर्च रुपये 1,97,000/- हा तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडून विमा दाव्यापोटी मागितला होता. तक्रारकर्त्याने गाडीच्या दुरुस्ती साठी लागणारा रुपये 1,97,000/- हा खर्च Independent पुराव्याद्वारे किंवा लेखी पुराव्याद्वारेसिध्द् केलेला नाही. तक्रारकर्त्याने स्वतः प्रायव्हेट सर्वेअर कडून सर्वे सुध्दा केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला गाडी दुरुस्तीसाठी 1,97,000/ - खर्च आला हे म्हणणे सिध्द होत नाही.
23. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी Independent व Qualified Surveyor सरबजतसिंग तुली यांच्या तर्फे सर्वे करुन तक्रारकर्त्याच्या गाडीचा सर्वे रिपोर्ट दाखल केला. विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या सर्वे रिपोर्ट नुसार तक्रारकर्त्याच्या गाडीला एकुण दुरुस्ती खर्च हा 29,992/- रुपये येतो असे रिपोर्ट मध्ये लिहीले आहे.
24. विरुध्द पक्षाचे सर्वेअर यांनी तक्रारकर्त्याची गाडी तपासून व Price-list प्रमाणे येणारा खर्च हा Calculate केलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या गाडी दुरुस्तीसाठी लागणारा खर्च हा 29,992/-रुपये आहे, हे सिध्द् होते.
25. त्यामुळे तक्रारकर्ता हा Labour charges वगळता 29,992/- रुपये इतके मिळण्यास पात्र आहे.
26. तक्रारकर्त्याने कर्ज परतफेडी बद्दल कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.3 यांचे विरुध्द प्रार्थनेत म्हटल्याप्रमाणे कुठलाही आदेश पारीत करण्यात येत नाही. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी आपले जबाबात परिच्छेद 5 मध्ये म्हटले आहे की Licence Holder Surveyor सरबजितसिंग तुली हे Section 64 UM Insurance Act 1938 नुसार गाडीला झालेल्या नुकसानीबद्दल नियुक्त होते व त्यांनी सर्वे रिपोर्ट मध्ये गाडीला फक्त 36,000/- रुपयाचे नुकसान झाले व तक्रारकर्त्यास ही नुकसान भरपाई तक्रारकर्त्याने Claim संबंधी संपुर्ण Original कागदपत्रे, दुरुस्तीचे बील व पावती दिल्यानंतर तक्रारकर्त्यास ही रक्कम Labour Charges रुपये 6,507 वजा करुन 29,992/- ही रक्कम दिली जावू शकते असे म्हटले आहे.
27. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये गाडी दुरुस्ती केल्याचे विरुध्द पक्ष क्र.5 यांचे बील व योग्य पुराव्याद्वारे गाडी दुरुस्तीसाठी 1,97,663/- रुपये खर्च आला हे सिध्द् न करु शकल्यामुळे तक्रारकर्ता हा केवळ 29,992/- रुपये मिळण्यास पात्र आहे. करीता खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास 29,992/- रुपये हे द.शा.द.शे.7
टक्के दराने व्याजासह तक्रार दाखल झाल्या पासून म्हणजेच दिनांक
2/4/2013 पासून ते संपुर्ण पैसे मिळेपर्यंत तक्रारकर्त्यास दयावे.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास मानसिक त्रासापोटी रुपये
3,000/- (तीन हजार) दयावे तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/-
(दोन हजार) दयावे.
4. विरुध्द पक्ष क्र. 3, 4 व 5 विरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
4. विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत
प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
5. प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी सदर आदेशाची प्रत
नियमानुसार तक्रारकर्त्यास विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.
श्रीमती गीता रा.बडवाईक श्री अतुल दि. आळशी
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,
भंडारा