Maharashtra

Nagpur

CC/758/2021

SHRI. PARVEJ JIBRAIL KHAN PATHAN - Complainant(s)

Versus

ROYAL SUNDARAM GENERAL INSURANCE CO. LTD. (FORMERLY KNOWN AS ROYAL SUNDARAM ALLIANCE INSURANCE CO. L - Opp.Party(s)

ADV. ROHIT PRALHAD MASURKAR

24 Nov 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/758/2021
( Date of Filing : 08 Dec 2021 )
 
1. SHRI. PARVEJ JIBRAIL KHAN PATHAN
R/O. DR. ZAKIR HUSSAIN WARD, TIRORA, GONDIA-441911
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ROYAL SUNDARAM GENERAL INSURANCE CO. LTD. (FORMERLY KNOWN AS ROYAL SUNDARAM ALLIANCE INSURANCE CO. LTD.)
CORP. OFFI.AT, VISHRANTI MELARAM TOWER, NO.2/319, RAJIV GANDHI, SALAI(OMR), KARAPAKKAM, CHENNAI-600097
CHENNAI
TAMILNADU
2. ROYAL SUNDARAM GENERAL INSURANCE CO. LTD., MOTOR OWN DAMAGE CLAIM DEPARTMENT
SERVICE BRANCH AT, MANIK PLOT NO.7, 2ND FLOOR, TATYA TOPE NAGAR, WEST HIGH COURT ROAD, NAGPUR-440001
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. ROHIT PRALHAD MASURKAR, Advocate for the Complainant 1
 
Dated : 24 Nov 2022
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून MH35AH1410 या वाहनाची दि. 06.01.2021 ते 05.01.2022 या कालावधीकरिता विमा पॉलिसी क्रं. VGC0695305000100 अन्‍वये विमाकृत केली होती. तक्रारकर्त्‍याने दि. 06.01.2021  ला विमा हप्‍ता रुपये 63,514/- धनादेश क्रं. 42195 अन्‍वये जमा केले. परंतु सदरचा धनादेश वटविण्‍याकरिता जमा केला असता अपु-या रक्‍कमे अभावी या शे-यासह वटविण्‍यात आला नाही, त्‍यामुळे सदरची विमा पॉलिसी रद्द बादल ठरविण्‍यात आल्‍याबाबत तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाने दि. 20.01.2021 ला ई-मेल पाठवून धनादेश अनादरित झाल्‍याचे कळविले होते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विमा पॉलिसीचे नुतनीकरण करण्‍याकरिता रक्‍कम जमा करण्‍याकरिता लिंक पाठविली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे विमा हप्‍ता जमा केला व त्‍याबाबतची पावती पाठविली .
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे विमा हप्‍ता जमा न झाल्‍यामुळे त्‍याची काढलेली पहिली विमा पॉलिसी कालावधी दि. 06.01.2021 ते 05.01.2022 ही पॉलिसी रद्दबादल ठरविण्‍यात आली.  त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने  MH35AH1410 या वाहनाकरिता विमा हप्‍ता रक्‍कम रुपये 63,514/- जमा करुन दि. 25.01.2021 ते 24.01.2022 या कालावधीकरिता विमा मुल्‍य रक्‍कम रुपये 40,74,610/- एवढया रक्‍कमेची दुसरी विमा पॉलिसी क्रं. VGC0704094000100 काढली.
  3.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, दि. 29.01.2021 ला त्‍याच्‍या वाहनाची   अपघात झाल्‍याबाबतची माहिती विरुध्‍द पक्षाला दिली. तसेच तक्रारकर्त्‍याने अपघातग्रस्‍त वाहन आर्या अॅटोव्‍हील प्रा.लि. यांच्‍याकडे दुरुस्‍ती‍करिता दिले. तक्रारकर्त्‍याचे वाहन दुरुस्‍त झाल्‍यानंतर त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे इन्‍श्‍युरन्‍स  इनव्‍हाईस  दि. 20.05.2021 अन्‍वये रुपये 10,54,844/- इतक्‍या रक्‍कमेचा विमा दावा प्रस्‍ताव दाखल केला. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि. 27.05.2021 ला पत्र पाठवून कळविले की, तक्रारकर्त्‍याने दुसरी विमा पॉलिसी क्रं. VGC0704094000100   दि. 25.02.2021 ते 24.01.2022 या कालावधीकरिता काढण्‍यापूर्वी तक्रारकर्त्‍याचा धनादेश अनादरित झाल्‍याबाबतची बाब उघड न केल्‍यामुळे सदरचा विमा दावा प्रस्‍ताव रद्द केल्‍याचे कळविले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 27.05.2021 ला कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या नोटीसची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.
  4.       विरुध्‍द पक्ष 1 व 2 ला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते आयोगासमक्ष हजर न झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 1 व 2 विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि.04.03.2022 रोजी पारित करण्‍यात आला.
  5.      तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

         

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?            होय

 

  1. काय आदेश ?                                  अंतिम आदेशानुसार

 

  • निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून MH35AH1410 या वाहनाचा दि. 25.01.2021 ते 24.01.2022 या कालावधीकरिता विमा हप्‍ता रक्‍कम रुपये 63,514/- जमा करुन विमा मुल्‍य रक्‍कम रुपये 40,74,610/- एवढया रक्‍कमेची विमा पॉलिसी क्रं. VGC0704094000100 काढली होती हे नि.क्रं. 2 (3 व 5 ) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचा दि. 29.01.2021 ला अपघात झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा प्रस्‍ताव दाखल केला होता, परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा तक्रारकर्त्‍याचा धनादेश अनादरित झाल्‍याबाबतची बाब उघड न केल्‍यामुळे सदरचा विमा दावा प्रस्‍ताव रद्द केल्‍याचे दि.27.05.2021 रोजीच्‍या पत्रान्‍वये कळविले होते हे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते.
  2.      तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसी क्रं. VGC0695305000100 ही दि. 06.01.2021 ते 05.01.2022 या कालावधीकरिता काढली होती व त्‍याकरिता विमा हप्‍ता म्‍हणून दि. 06.01.2021 ला रुपये 63,514/- चा धनादेश क्रं. 42195 दिला होता, परंतु सदरचा धनादेश वटविण्‍याकरिता जमा केला असता अपु-या रक्‍कमे अभावी वटविण्‍यात आला नाही, त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने  तक्रारकर्त्‍याची दि. 06.01.2021 ते 05.01.2022 या कालावधी‍करिता काढलेली विमा पॉलिसी रद्द बादल ठरविल्‍याचे  दि. 20.01.2021 ला ई-मेल पाठवून कळविले होते.
  3.      त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा रुपये 63,514/- जमा करुन दि. 25.01.2021 ते 24.01.2022 या कालावधीकरिता विमामुल्‍य रक्‍कम रुपये 40,74,610/- एवढया रक्‍कमेची विमा पॉलिसी क्रं. VGC0704094000100 काढली होती व तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचा दि. 29.01.2021 रोजी अपघात झाला होता, त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने चुकिचे कारण दाखवून तक्रारकर्त्‍याचा योग्‍य व वैध असलेला विमा दावा नाकारुन दोषपूर्ण सेवा दिली असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.

     करिता खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा रक्‍कम रुपये 10,54,844/- व त्‍यावर दिनांक 27.05.2021 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्के दराने व्‍याजासह रक्‍कम  द्यावी.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब  व  क फाईल परत करावी. 

 

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.