Maharashtra

Kolhapur

CC/20/493

Suresh Ganpati Hodage - Complainant(s)

Versus

Royal Sundaram Gen Insu. Co. Ltd - Opp.Party(s)

U.S.Mangave

17 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/20/493
( Date of Filing : 29 Dec 2020 )
 
1. Suresh Ganpati Hodage
At.Masoli, Tal.Ajara
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Royal Sundaram Gen Insu. Co. Ltd
Shahupuri, kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 17 Jan 2023
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा 

 

1.     तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील  कथन थोडक्‍यात पुढीलप्रमाणे—

      

      तक्रारदार यांनी बी.एम.डब्‍ल्‍यू. वाहन खरेदी केले असून त्‍याचा नं. एमएच 09/डीएक्‍स 7676 असा आहे.  सदर वाहनाचा विमा तक्रारदाराने वि.प. यांचेकडे उतरविला असून त्‍याचा पॉलिसी नं. VPC1276792000100  असा आहे.  पॉलिसी कालावधी दि. 15/01/2020 ते 15/01/2021 असा आहे.  तक्रारदार यांचे गाडीचे इंजिन जुलै 2020 चे पहिल्‍या आठवडयात अचानक सिझ झालेने तक्रारदारांनी सदरची गाडी अधिकृत शोरुममध्‍ये सोडली.  त्‍यांनी दुरुस्‍तीचा खर्चाचे एस्टिमेट रक्‍कम रु. 12,31,865.72 पैसे इतक्‍या रकमेचे दिले.  म्‍हणून तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे क्‍लेम दाखल केला असता वि.प. यांनी दि. 7/10/2020 रोजी तक्रारदाराचा गाडीमध्‍ये इन्‍शुरेबल इंटरेस्‍ट नाही या कारणास्‍तव विमादावा नाकारला आहे.  वास्‍तविक वाहनाची नोंदणी तक्रारदाराचे नावे असून विमाही तक्रारदाराचे नावे आहे.  मोटर वाहन कायद्यातील कलम 50(2) अन्‍वये तक्रारदाराचे वाहनाचे हस्‍तांतरण झाले नसल्‍याने तक्रारदाराचा क्‍लेम मंजूर होणे आवश्‍यक आहे.  तथापि वि.प. यांनी तक्रारदाराचा विमाक्‍लेम नाकारुन सेवात्रुटी केली आहे.  म्‍हणून, तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.    

 

2.    प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून विमाक्‍लेमपोटी रक्‍कम रु. 12,31,865.72 पैसे, सदर रकमेवर 18 टक्‍के दराने व्‍याज, भाडयाची गाडी वापरावी लागलेने त्‍याची रक्‍कम रु.50,000/- मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.25,000/- वि.प. कडून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

 

3.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 2 कडे अनुक्रमे पॉलिसी शेडयुल, क्‍लेम नामंजूरीचे पत्र वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

4.    वि.प. यांनी सदरकामी म्‍हणणे/कैफियत व अॅफिडेव्‍हीट, कागदयादीसोबत क्‍लेम फॉर्म, कोटेशन, तक्रारदारांचा जबाब, संग्राम चौगुले यांचा जबाब, तपास अहवाल, सर्व्‍हे रिपोर्ट, क्‍लेम नाकारलेचे पत्र तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.  वि.प. ने त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  वि.प. ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.

 

i)          तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्‍यातील सर्व मजकूर मान्‍य व कबूल नाही.

 

ii)    वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. 

 

iii)    तक्रारदाराने वादातील वाहन श्री संग्राम बाबर चौगुले रा. चिंचवड, पुणे यांना सन 2017 मध्‍ये विक्री करुन ताबा दिलेला आहे.  वि.प. कडून घेतलेली विमा पॉलिसी ही दि. 17/01/2020 पासून आहे.  सबब, वाहन विक्री केलेने विमा घेताना तक्रारदाराचा सदरच्‍या वाहनात विमायोग्‍य हितसंबंध नव्‍हता.  संबंधीतांनी पॉलिसी दि. 17/01/2020 पासून तक्रारदाराचे नांवे वि.प. विमा कंपनीपासून सदरच्‍या महत्‍वाच्‍या बाबी लपवून ठेवून घेतलेली आहे. 

 

iv)        सदरची पॉलिसी ही पुणे शाखेकडून घेतली आहे. तक्रारदार हे कोल्‍हापूर येथील रहिवासी आहेत. सबब, तक्रारदाराने सदर पॉलिसी घेतलेली नाही. 

 

v)         वाहनाचे रजिस्‍ट्रेशन तक्रारदाराचे नावे दिसत असलेने वि.प. यांनी मोटर वाहन कायद्याप्रमाणे विमा उतरविला आहे.  जुन्‍या मालकाच्‍या बाबतील क्‍लेम नसलेस प्रिमियममध्‍ये नो क्‍लेम बोनस मिळत असल्‍याने सदरचा विमा हा तक्रारदाराचे नावे उतरविण्‍यात आला आहे.  याकामी विम्‍याच्‍या महत्‍वाच्‍या अशा Utmost good faith या तत्‍वाचा भंग झालेला आहे. 

 

vi)        सदरची विमा पॉलिसी ही Own damage कव्‍हरबाबतीत वैध पॉलिसी करार नाही.  म्‍हणून तक्रारदार अथवा सध्‍याचे मालक यांना सदरच्‍या पॉलिसी अंतर्गत Own damage चा क्‍लेम करता येत नाही.  सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

      अशा स्‍वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.

 

5.   वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

­अ. क्र.

                मुद्दे

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे वि.प. यांचेकडून विमाक्‍लेमची रक्‍कम व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.  

4

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

 

 

 

वि वे च न

 

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्‍तरे आम्‍ही होकारार्थी दिली आहेत कारण वादातील वाहन नं. एमएच 09/डीएक्‍स 7676 चा विमा वि.प. यांचेकडे उतरविला असून त्‍याचा पॉलिसी नं. VPC1276792000100  असा आहे.  पॉलिसी कालावधी दि. 15/01/2020 ते 15/01/2021 असा आहे.  वि.प. यांनी वाहनाची नोंदणी ही तक्रारदाराचे नावे असून वाहनाचा विमाही तक्रारदाराचे नांवे उतरविलेला आहे ही बाब मान्‍य केली आहे.  तक्रारदाराचे नावे आर.सी.टी.सी. असून सदरचे आर.टी.सी.टी. याकामी दाखल आहे.  विमा पॉलिसीवर देखील तक्रारदाराचेच नांव आहे. सदरचे वाहनाची विक्री व  हस्‍तांतरण अन्‍य त्रयस्‍थ व्‍यक्‍तीकडे झालेबाबत वि.प. यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.  सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्‍पष्‍ट व सिध्‍द झालेली आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

7.    प्रस्‍तुतकामी वि.प. यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये, तक्रारदाराने वादातील वाहन श्री संग्राम बाबर चौगुले रा. चिंचवड, पुणे यांना सन 2017 मध्‍ये विक्री करुन ताबा दिलेला आहे.  वि.प. कडून घेतलेली विमा पॉलिसी ही दि. 17/01/2020 पासून आहे.  सबब, वाहन विक्री केलेने विमा घेताना तक्रारदाराचा सदरच्‍या वाहनात विमायोग्‍य हितसंबंध नव्‍हता.  संबंधीतांनी पॉलिसी दि. 17/01/2020 पासून तक्रारदाराचे नांवे वि.प. विमा कंपनीपासून सदरच्‍या महत्‍वाच्‍या बाबी लपवून ठेवून घेतलेली आहे. याकामी विम्‍याच्‍या महत्‍वाच्‍या अशा Utmost good faith या तत्‍वाचा भंग झालेला आहे.  सदरची विमा पॉलिसी ही Own damage कव्‍हरबाबतीत वैध पॉलिसी करार नाही.  म्‍हणून तक्रारदार अथवा सध्‍याचे मालक यांना सदरच्‍या पॉलिसी अंतर्गत Own damage चा क्‍लेम करता येत नाही असे कथन वि.प. विमा कंपनीने केले आहे.  वि.प. यांनी आपले कथनाचे पुष्‍ठयर्थ इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांचा अहवाल दाखल केला आहे.  सदरचे इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांनी तक्रारदाराचा जबाब याकामी दाखल केला आहे.  सदर जबाबामध्‍ये तक्रारदाराने सदर वाहनाशी माझा काही संबंध नाही असा जबाब दिलाअसल्‍याचे दिसून येते.   परंतु सदरकामी विप यांनी सदर इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांचे शपथपत्रदाखल कलेले नाही.  त्‍यामुळे सदरचा जबाब हा तक्रारदाराने इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांचेकडे दिला ही बाब याकामी शाबीत होत नाही असे या आयोगाचे मत आहे.  सबब, वि.प. यांनी आपले म्‍हणणेमध्‍ये घेतलेला बचाव याकामी शाबीत झालेला नाही. 

 

8.    विप यांनी याकामी वरिष्‍ठ न्‍यायालयांचे खालील निवाडे दाखल केले आहेत.

 

  1. Revision petition No. 3216/2015 decided on 16/08/2016 by National Commission

Future Generali Insurance Co.Ltd.

  1.  

Sombir

 

  1. Revision Petition No. 3727/2014 decided on 23/05/2016 by National Commission.

Bajaj Allianz General Insurance Co.Ltd.

  1.  

Anita Mahajan & Ors.

 

  1. Revision Petition No. 1060/2016 decided on 31/05/2016 by National Commission.

ICICI Lombard General Insurance Co.Ltd.

  1.  

Yogesh Yadav

 

  1. (1996) 2 ACC 536 Hon’ble Supreme Court

M/s Complete Insulation Pvt.Ltd.

  1.  

New India Assurance Co.Ltd.

 

 

9.         तक्रारदारांनी याकामी खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचा निवाडा दाखल केला आहे.

 

      2020 STPL 5355 SC

            Surendra Kumar Bhilawe

                               Vs.

            The New India Assurance Co.Ltd.

 

National Commission erred in law in reversing the concurrent factual findings of the District Forum and the National Commission ignoring vital admitted facts, including registration of the said truck being in the name of the Appellant, even as on the date of the accident, over three years and seven months, absence of No objection from the financier bank etc. and also overlooking the definition of owner in section 2(3) of the Motor Vehicles Act, as also other relevant provisions of the Motor Vehicles Act and the Rules framed thereunder, including in particular the transferability of a policy of insurance under Section 147 - In view of the definition of owner in Section 2(30) of the Motor Vehicles Act, the Appellant remained the owner of the said truck on the date of the accident and the insurer could not have avoided its liability for the losses suffered by the owner on the ground of transfer of ownership to ‘M’ -  Judgment and order of the National Commission held unsustainable and liable to be set aside and the order of the District Forum restored. 

 

      तक्रारदाराने दाखल केलेला सदरचा निवाडा सन 2020 मधील असून तो मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निवाडा आहे.  सबब, सदर निवाडयात मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने घालून दिलेला दंडक हा याकामी तंतोतंत लागू होतो असे या आयोगाचे मत आहे.  सबब, वि.प. यांनी तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य विमाक्‍लेम नाकारुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. 

 

10.   वि.प. यांनी याकामी सर्व्‍हे रिपोर्ट दाखल केला असून सदरचे रिपोर्टप्रमाणे असेसमेंट व्‍हॅल्‍यू ही रक्‍कम रु. 12,00,208/- इतकी आहे. सबब, सर्व्‍हेअर यांचे सर्व्‍हे रिपोर्टचा विचार करता तक्रारदार हे विमा पॉलिसीअंतर्गत रु. 12,00,208/- इतकी रक्‍कम विमाक्‍लेमपोटी वि.प. यांचेकडून मिळण्‍यास पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच सदरचे रकमेवर तक्रारदार हे विमा क्‍लेम नाकारलेचे तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजदराने वसूल होवून मिळणेस पात्र आहेत.  तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.15,000/- व अर्जाचा खर्च रक्‍कम रु.5,000/- वि.प. यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, प्रस्‍तुतकामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.

 

 

आदेश

 

1)     तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2)    वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा क्‍लेमपोटी रु. 12,00,208/- अदा करावी व सदर रकमेवर विमा क्‍लेम नाकारले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.

 

3)    मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 15,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.

 

4)    वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

5)    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींन्‍वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

 

6)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.