Maharashtra

Nanded

CC/09/73

Prahlad Namdev Lokharde - Complainant(s)

Versus

Royal Sundaram Aloyans Insurance - Opp.Party(s)

17 Aug 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/73
1. Prahlad Namdev Lokharde R/o Tarodo Bk.NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Royal Sundaram Aloyans Insurance Comp.46 White Road Channaiee 5th Floor NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 17 Aug 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
प्रकरण क्र. 2009/73
                                                     प्रकरण दाखल दिनांक  23/03/2009.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 17/08/2009.
                                                   
समक्ष         -    मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील           अध्‍यक्ष.
                       मा.श्रीमती सुजाता पाटणकर,          सदस्‍या.
                       मा.श्री.सतीश सामते,                 सदस्‍य.
 
प्रल्‍हाद नामदेव लोखंडे
वय, 42 वर्षे, धंदा व्‍यापार
रा.सोनाई नगर, तरोडा (बु.) नांदेड
ता.जि.नांदेड.                                           अर्जदार
विरुध्‍द
1.   रायल सुंदरम अलायंस इन्‍शुरन्‍स कं.लि.
306, देवराटा प्‍लॉट नं.83, यु.टी.आय.कॅपील
      मार्केट जवळ, सेक्‍टर 17, वाशी, नवि मुंबई
400705 मार्फत प्राधिकृत अधिकारी.                 गैरअर्जदार
2.   इंडुसइंड बँक लि.                                 
     कन्‍झूमर फायनांस डिव्‍हीजन परमान कॉम्‍प्‍लेक्‍स जवळ,
रेल्‍वे ओव्‍हर ब्रिज रोड (बाफना पेट्रोज) नांदेड.
    
अर्जदारा तर्फे.               - अड.एस.जी.कोलते
गैरअर्जदार क्र.1 तर्फे          - अड.पी.एस. भक्‍कड
गैरअर्जदार क्र.  2 तर्फे        - अड.गजानन खनगुंडे
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्‍या)
 
              गैरअर्जदार यांनी विमा दाव्‍याची रक्‍कम न देऊन सेवेत ञूटी केली म्‍हणून ही तक्रार अर्जदार यांनी दाखल केली आहे.
              अर्जदाराने त्‍यांचे वाहन नंबर एम.एच-26-एच-5970 चा गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे हप्‍ता भरुन विमा पॉलिसी नंबर 29033000100 घेतली. सदर पॉलिसीचा कालावधी दि.14.4.2008 ते 13.04.2009 असा होता. सदर वाहन हे गैरअर्जदार क्र.2 कडून कर्ज घेऊन घेतले होते त्‍यामूळे पॉलिसी ही त्‍यांचे मार्फत घेतली होती. अर्जदाराच्‍या वाहनाचा दि.3.9.2008 रोजी अपघात होऊन वाहनाचे मोठे नूकसान झाले. अपघाताची कल्‍पना गैरअर्जदार क्र.2 यांना देण्‍यात आली. अर्जदाराने गूडगिला आटोमोबाईल यांचेकडून वाहन दूरुस्‍त करुन घेतले त्‍यासाठी सामान रु.32742/- आणि दूरुस्‍ती खर्च रु.84,300/- असे एकूण रु.1,17,042/- खर्च येईल असे सांगितले व त्‍यांनी तसे कोटेशन दिले. गैरअर्जदार क्र.1 यांचे सर्व्‍हेअरनी वाहनाची पाहणी केली व सर्व्‍हे रिपोर्ट दिला. अर्जदारास नूकसान भरपाईचा अर्ज करण्‍यास सांगितले. त्‍याप्रमाणे अर्जदाराने अर्ज केला व एकूण रु.1,19,542/- एवढी मागणी केली त्‍यापैकी गैरअर्जदार क्र.1 यांनी रु.33,549/- दिले आहेत व रु.85,993/- गैरअर्जदाराकडून येणे बाकी आहेत. गैरअर्जदार क्र.1 यांनी नूकसान भरपाई रक्‍कम मंजूर करताना चूकीचे निकष लावले व चूकीच्‍या गृहीतावार दिली त्‍यामूळे कमी रक्‍कम मंजूर केली.   अर्जदारानी सदरील रक्‍कम योग्‍य नाही असे कळविले पण गैरअर्जदार क्र.1 यांनी तो चेक गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठविला व त्‍यांनी वठवून घेतला व अधिकची रक्‍कम मंजूर करण्‍यास नकार दिला, असे करुन गैरअर्जदारानी ञूटीची सेवा दिली आहे म्‍हणून अर्जदाराची मागणी आहे की, क्‍लेमची रक्‍कम रु.85,993/- व त्‍यावर 18 टक्‍के प्रमाणे व्‍याज आणि  मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
 
              गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांना क्‍लेमची रक्‍कम रु.33,549/- देण्‍यात आलेली आहे. करार हा अर्जदार व गैरअर्जदार क्र.2 यांचेमध्‍ये झालेला आहे. सदर तक्रार ही अरबीट्रेशनच्‍या नियमानुसार अरबीट्रेटर कडे चालवीण्‍यात यावी, या मंचात चालू शकत नाही.अर्जदार यांनी केलेले सर्व आरोप त्‍यांना मान्‍य नाहीत.सदर तक्रारीतील म्‍हणण्‍याप्रमाणे ही तक्रार दिवाणी न्‍यायालयात चालू शकते, या मंचात नाही. अर्जदार यांनी फूल अन्‍ड फायनल सेंटलमेंट म्‍हणून रु.33,549/- स्विकारले आहेत. त्‍यामूळे अर्जदार हे स्‍वच्‍छ हाताने समोर आलेले नाहीत व त्‍यांना आता परत त्‍यांच कारणासाठी दावा दाखल करता येणार नाही.     गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही, त्‍यामूळे त्‍यांची तक्रार खर्चासहीत फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
              गैरअर्जदार क्र.2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराने केलेला अर्ज हा निरर्थक असून तो कलम 2 ग्राहक संरक्षण कायदा प्रमाणे ग्राहक या संज्ञेत मोडत नाही. गैरअर्जदार क्र.2 व 1 यांचा काहीही संबंध येत नाही.करार हा गैरअर्जदार क्र.1 व अर्जदार यांचे मध्‍ये आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचा काही संबंध नाही त्‍यामूळे सदर तक्रार खारीज करण्‍यात यावी.अर्जदाराने स्‍वतः कर्जाची रक्‍कम म्‍हणून नाहरकत प्रमाणपञ दिल्‍यामूळे गैरअर्जदार क्र.1 ने गैरअर्जदार क्र.2 कडे सदर चेक पाठविला.अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 कडून कर्ज घेतले आहे. सदर कर्ज परतफेड न करण्‍याच्‍या उददेशाने गैरअर्जदार क्र.2 विरुध्‍द तक्रार केली आहे. त्‍यामूळे गैरअर्जदार क्र.2 यांना मानसिक व
 
आर्थिक व शारीरिक ञास झालेला आहे त्‍यामूळे अर्जदाराचा अर्ज गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्‍द खारीज करावा व नूकसान भरपाई पोटी रु.10,000/- दयावेत असे म्‍हटले आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ  दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व दोघानीही केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
     मूददे                                       उत्‍तर
 
 1.   अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय?                   होय.              
2.   गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता
     केली आहे काय?                                     नाही.                                                                       
3.   काय आदेश                       अंतीम आदेशा प्रमाणे.
                             कारणे
मूददा क्र.1   -
         
                     अर्जदार यांचे वाहन एम.एच.-26-एच-5970 यांचा विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे उतरवलेला आहे. सदरची बाब गैरअर्जदार क्र.1 यांनी त्‍यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये व शपथपञामध्‍ये नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज शपथपञ गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेली पॉलिसी यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
मूददा क्र.2 ः-
 
              अर्जदार यांचे वाहनाचा  दि.03.09.2008 रोजी अपघात होऊन त्‍यांचे वाहनाचे नूकसान झालेले आहे. सदर वाहन दूरुस्‍तीसाठी अर्जदार यांना रक्‍कम रु.1,17,042/- एवढा खर्च येईल या बददल गूडगिला अटोमोबाईल्‍स यांनी सांगितले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 विमा कंपनीकडे अपघात झालेल्‍या वाहनाचा सर्व्‍हे करुन त्‍यांचा अहवाल दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी त्‍यांचे तर्फे श्री. वैभव पाटील यांचे सर्व्‍हे रिपोर्ट प्रमाणे रक्‍कम रु.37,650/- एवढी दूरुस्‍तीसाठी दाखवण्‍यात आलेले आहे. सदरची सर्व्‍हे  रिपोर्टची कॉपी गैरअर्जदार यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यासोबत दाखल केलेली आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांचे मध्‍ये तडजोड झाल्‍याप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.06.01.2009 रोजीचे गैरअर्जदार क्र.2 बँकेला दिलेले पञ दाखल केलेले आहे. सदर पञामधील संदर्भानुसार
This was reference to the above mentioned claim. We wish to inform you that the incashment of the enclosed cheque /D.D. No.974743 dated 06.01.2009 for Rs.33,549/- drawn on HDFC Bank would be treated as full and final settlement of the above claim.  गैरअर्जदार क्र.1 यांनी रक्‍कम  रु.33,549/- फूल अन्‍ड फायनल सेंटलमेंट म्‍हणून गैरअर्जदार  क्र.2 बँक ज्‍यामध्‍ये अर्जदार यांचे कर्ज खाते आहे तेथे जमा केलेली आहे. सदरची रक्‍कम गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून जमा झाल्‍यानंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार कंपनीला सदरची रक्‍कम मान्‍य नाही अगर सदरची रक्‍कम आम्‍ही अंडरप्रोटेस्‍ट स्विकारत आहोत अशा प्रकारची कोणतीही नोटीस/पञ देऊन गैरअर्जदार क्र.1 यांना कळविलेले नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे फूल अन्‍ड फायनल सेटलमेंट म्‍हणून रक्‍कम स्विकारल्‍यानंतर  त्‍यांना पून्‍हा त्‍याच विमा क्‍लेमसाठी या मंचात दाद मागता येणार नाही. गैरअर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी 2005 सीपीजे पान 403 राज्‍य आयोग चेन्‍नई यांचे यूनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी विरुध्‍द थीरु आर कानंन यांचे निकालपञ दाखल केलेले आहेत. तसेच 2001 (1) सीपीजे पान 158 राज्‍य आयोग पटना यांचे ओरिएन्‍टल इन्‍शूरन्‍स लि व इतर विरुध्‍द शशीमोहनसिंग, 2008 (3) सीपीजे पान 93 राष्‍ट्रीय आयोग दिल्‍ली, चंपालाल वर्मा विरुध्‍द ओरिएन्‍टल इन्‍शूरन्‍स कंपनी  आणि ऐआयआर 1999 सूप्रिम कोर्ट पान नंबर 3027 यूनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स विरुध्‍द अजमेरसिंग कॉटन आणि जनरल मिल्‍स व इतर.  यूनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी लि.विरुध्‍द मे.असासिंग कॉटन फ्रक्‍टरी व इतर   यामधील निकालपञ दाखल केलेले आहेत यामध्‍ये Consumer Protection Act (68 of 1986), S.14 - Deficiency in service - Complaint by insured who had executed discharge voucher in full satisfaction of his claim - Tenable only if he proves that discharge voucher was obtained by fraud, coercion etc. - Tribunal/Commission can grant appropriate relief - Delay in settlement of claim under policy - Cannot be ground for Tribunal to grant interest.  याप्रमाणे सर्वोच्‍च न्‍यायालयाने नमूद केलेले आहे. प्रस्‍तूत अर्जाचे कामी प्रस्‍तूत अर्जदार यांनी सदरचे फूल अन्‍ड फायनल सेंटलमेंटचे व्‍यवहार अर्जदार यांचेकडून जबरदस्‍तीने धोक्‍याने करुन घेतलेले आहे हे अर्जदार शाबीत करु शकलेले नाही अगर सदरची रक्‍कम स्विकारल्‍यानंतर त्‍यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना नोटीस देऊन सदरची रक्‍कम मान्‍य नसल्‍याबाबत कळविले नाही किंवा सदरची रक्‍कम आम्‍ही अंडरप्रोटेस्‍ट स्विकारीत आहोत असे दर्शवीणारा कोणताही कागदोपञी पूरावा या मंचामध्‍ये याअर्जाचे कामी दाखल केलेला नाही.   अर्जदाराचा अर्ज शपथपञ त्‍यांनी दाखल केलेले कागदपञ व वरील सर्व विवेचनाचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे.
 
              गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून अर्जदार यांनी वाहन खरेदीसाठी कर्ज घेतलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कोणतीही कमतरता झालेली नाही.
              अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व दाखल कागदपञ तसेच वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे शपथपञ व दाखल कागदपञ तसेच वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद व वरिष्‍ठ कोर्टाचे निकालपञ यांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.
                         आदेश
1.                                         अर्जदार यांचा अर्ज खारीज करण्‍यात येत आहे.
 
2.                                         पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
 
3.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)     (श्रीमती सुजाता पाटणकर)   (श्री.सतीश सामते)
        अध्यक्ष.                                    सदस्‍या                      सदस्‍य
 
 
 
जे.यू.पारवेकर,
लघूलेखक.