जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/74. प्रकरण दाखल तारीख - 04/03/2010 प्रकरण निकाल तारीख – 28/07/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते, - सदस्य. मोहम्मद मझर पि. अब्दूल वाहीद वय 45 वर्षे, धंदा व्यापार अर्जदार रा.वामन नगर, पूर्णा रोड, नांदेड विरुध्द. 1. रॉयल सुंदरम अलाएन्स इन्शुरन्स कंपनी लि. पश्चिम वीभागीय कार्यालय, डेलफी सी-विंग 201-204, दुसरा मजला, हिराचंदानी बिझनेस पार्क, मंबई 400 076. गैरअर्जदार 2. रॉयल सुंदरम अलाएन्स इन्शुरन्स कंपनी लि. परीमल कॉम्प्लेक्स, बाफना रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.सी.डी. इंगळे गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड. पी.एस. भक्कड निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, सदस्या) गैरअर्जदार रॉयल सूंदरम अलाएन्स इन्शूरन्स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की अर्जदार हा गैरअर्जदार कंपनीचा ग्राहक आहे. अर्जदार हा टाटा एलपीटी 2515 इएक्स ट्रकचा चा मालक आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून सदरील ट्रकचा विमा दि.27.09.2008 रोजी उतरविला होता व विम्याचा कालावधी हा दि.27.09.2008 ते 26.09.2009 च्या मध्यराञी पर्यत होता. अर्जदाराच्या ड्रायव्हरचे लायसन्स हे दि.08.12.2011 पर्यत वैध होते. दि.28.02.2009 रोजी अर्जदाराचा ट्रक हा हैद्राबादहून त्यांचे ट्रक मध्ये प्लॉस्टीक बनविण्याचे यंञ घेऊन येत असताना ट्रक पिटलम (आंध्रप्रदेश) जवळा आला असता रोड खराब असल्यामूळे ट्रक स्लीप होऊन रोडच्या बाजूला पडला त्यामूळे ट्रकचे नूकसान झाले. अपघातात अर्जदाराच्या ट्रकची किंग पीन मेजन पिट, बॅटरी, डॅश बोर्ड फाऊन्डेशन उजव्या बाजूचे, समोरचा मुख्य भाग, डिझेल टँक, व पाईप लाईन, समोरचे काचा, रबर बिडींग, इंजिन फाऊडेंशन, लोड बॉडी, यू कल्यॉमप, रॅडीऐटर फाऊडेशन, इंटर कूलर असेम्बली, स्प्रिंग, व्हील डिस्क, एअर पाईपलाईन सेट, ब्रेक बुस्टर व इतर बरेच गाडीचे भाग निकामी झाले आहेत. त्यांचे सविस्तर वर्णन सर्व्हेअर यांनी दिलेल्या तपासणी अहवालामध्ये दिलेला आहे. अपघातानंतर गैरअर्जदार यांचे सव्हेअर यांनी येऊन दि.09.03.2009 रोजी गाडीची पाहणी केली व त्यांचा अहवाल दि.27.03.2009 रोजी दिला. अर्जदाराने गाडी दूरुस्त केली किंवा नाही म्हणून परत गैरअर्जदार यांनी सव्हेअर यांना दि.19.04.2009 रोजी यांनी पून्हा गाडीची तपासणी केली व परत पूर्नतपासणी अहवाल दि.20.04.2009 रोजी दिला. अनेक वेळा चकरा मारुन देखील गैरअर्जदार यांनी नूकसान भरपाई दिली नाही. शेवटी दि.19.5.2009 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारास कळविले की, विमा कंपनी अर्जदारास क्लेमची रक्कम देण्यास असमर्थ आहेत. अर्जदाराने दि.02.02.2010 रोजी गैरअर्जदार यांचे मूंबई येथील कार्यालयात जाऊन विम्याची रक्कम मागितली पंरतु गैरअर्जदाराने विमा रक्कम देण्यास नकार दिला. त्यामूळे अर्जदाराने ही तक्रार दाखल केली असून अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदार कंपनीने अर्जदारास नूकसान भरपाई रु.4,00,000/- तसेच मानसिक व शारीरिक ञासाबददबददल रु.50,000/- दयावेत. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे.अर्जदाराची तक्रार त्यांना मान्य नाही. त्यामूळे ती खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदार यांच्या म्हणण्याप्रमाणे अर्जदाराचे ट्रकचे समोरच्या भागाचे नूकसान झाले परंतु ट्रक हा उजव्या बाजूला पडला त्यामूळे समोरील भागाचे नूकसान होण्याचे प्रश्न येत नाही.अर्जदार यांना पॉलिसी दिली हे त्यांना मान्य आहे परंतु पॉलिसी ही अटी व शर्तीवर दिलेली होती. अपघाताबददल त्यांना माहीती नाही. गैरअर्जदार यांनी सर्व्हे केल्यानंतर त्यांना अपघातामध्ये नूकसान झाले हे टॅली झाले नाही. सदर तक्रार ही अपघात बघीतला असता दिवाणी न्यायालयात दाखल करण्या सारखी आहे या मंचास तो अधिकार नाही. त्याबाबत त्यांनी National Commission in Champalal Verma Vs. Oriental Insurance Com. Ltd. (III 2008 CPJ 93 NC ) has held that the consumer Forums can not go into quantum disputes and such disputes has to be referred to Civil Court or to Arbitration. सर्व्हेअर यांनी सर्व्हे करुन जी नूकसान भरपाई ठरविली त्याप्रमाणे रु.98,490/- ठरविली होती पण ती घेण्यास अर्जदार यांनी दि.17.12.2009 रोजी नकार दिला ते पञ गैरअर्जदार यांनी दाखल केलेले आहे.असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही म्हणून अर्जदाराची तक्रार ही फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. मूददा क्र. 1 ः- अर्जदाराच्या ट्रकचा अपघात हा दि.28.02.2009 रोजी आंध्र प्रदेशचे पिटलम या गांवा जवळ रोड खराब असल्यामूळे ट्रक स्लिप होऊन रोडच्या बाजूला पडला व अपघात झाला. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे ट्रकचा विमा काढलेला होता. ती त्यांनी दाखल केलेली आहे. सदरील अपघात पॉलिसी कालावधीमध्ये झालेला आहे. या बददल अर्जदार व गैरअर्जदार यांचेमध्ये कोणताही वाद नाही. म्हणून अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत व झालेल्या अपघाता बददल झालेली नूकसान भरपाई मागण्याचा त्यांना अधिकार प्राप्त होतो. अपघातात अर्जदाराच्या ट्रकचे किंग पीन मेजन पिट, बॅटरी, डॅश बोर्ड फाऊन्डेशन उजव्या बाजूचे, समोरचा मुख्य भाग, डिझेल टँक, व पाईप लाईन, समोरचे काचा, रबर बिडींग, इंजिन फाऊडेंशन, लोड बॉडी, यू कल्यॉमप, रॅडीऐटर फाऊडेशन, इंटर कूलर असेम्बली, स्प्रिंग, व्हील डिस्क, एअर पाईपलाईन सेट, ब्रेक बुस्टर व इतर बरेच गाडीचे भाग निकामी झाले आहेत. सर्व्हेअर श्री. बस्वराज बरबडे यांनी सर्व्हे रिपोर्ट दिलेला आहे. तो मंचासमोर दाखल केला. सदरचा अहवाल दि.27.3.2009 रोजी म्हणजे अपघातानंतर जवळपास एक महिन्याने तो गैरअर्जदाराकडे दिला. अर्जदाराने अपघातात नूकसान झालेली गाडी धनेगांव येथील आर.एन.बॉडी बिल्डर यांच्याकडून दूरुस्त करुन घेतली, यानंतर दि.19.04.2009 रोजी गैरअर्जदार यांचे तपासणीक अधिकारी श्री. बस्वराज बरबडे हे पून्हा तपासणी साठी आले व बदललेल्या पार्टचे फोटो काढले व पूर्ण दूरुस्त गाडीचे फोटो काढले व त्यांची पूर्ण तपासणी अहवाल दि.20.04.2009 रोजी दिला. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे नूकसान भरपाईचा क्लेम केलेला होता. संपूर्ण कार्यवाही होऊन देखील गैरअर्जदार यांनी अर्जदारास त्यांनी दाखल केल्याप्रमाणे नूकसान भरपाई दिली नाही. याबददल अर्जदारास मानसिक व शारीरिक ञास झाला त्याबददल अर्जदारांना रु.50,000/- नूकसान भरपाई गैरअर्जदार यांचेकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. दि.19.05.2009 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारास एक पञ पाठविले व त्यामध्ये अर्जदाराने दाखल केलेल्या दाव्याप्रमाणे गाडीचे नूकसान झालेले नाही असे स्पष्ट केले. गैरअर्जदाराच्या या कृतीमूळे अर्जदाराने दि.2.2.2010 रोजी गैरअर्जदार यांचे मुंबई येथील कार्यालयात जाऊन विमा रक्कम मागितली. आजपर्यत कोणतीही विमा रककम त्यांना देण्यात आलेली नाही. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यात असे म्हटले आहे की, ज्यामध्ये त्यांनी असे निवेदन केले आहे की, त्यांनी केलेल्या तपासणी नुसार अर्जदाराने दाखल केलेले अपघातग्रस्त पार्टस (डॅमेजेस) हे त्यांनी वर्णन केलेल्या अपघाताशी जूळत नव्हते. अपघात ज्या प्रकारे झाला त्यामध्ये सदरील पार्टचे नूकसान होण्यासारखे नव्हते. ट्रक स्लीप होऊन उजव्या बाजूला पडला तर ट्रकचे नूकसान फक्त उजव्या भागाचे अभीप्रेत होते. पण ट्रकचे समोरचे भागालाही बरेच डॅमेज आढळले. त्यामूळे ट्रकच्या अपघाता बददल त्यांना शंका वाटते. अर्जदाराने कोणतेही बिल दाखल केलेले नाही, तरी देखील सर्व्हेअरने व्यवस्थीत तपासणी करुन त्यांचा रिपोर्ट दिलेला आहे. त्यात रु.98,490/- एवढा लॉस ट्रकचा अपघातामध्ये झालेला आहे. याठिकाणी अर्जदाराने बदल केलेले पार्टस त्यांचे बिल व त्यांला लागलेला खर्च या बददल कोणताही ताळमेळ दाखवलेला नाही. गाडीचा अपघात झाला व त्यांस रु.4,00,000/- खर्च आला एवढेच अर्जदाराचे म्हणणे समोर येते. अपघाताबददल यापेक्षा अधिक कोणतेही कागदपञ अर्जदाराने दाखल केलेले नाहीत. अपघात झाल्यानंतर गाडी दूरुस्त करण्यासाठी लागलेला खर्च हे अर्जदाराने मंचासमोर सिध्द करणे आवश्यक होते. पण तसे कोणत्याही प्रकारची सिध्दता अर्जदाराने केलेली नाही. म्हणून अर्जदार यांनी दाखल केलेले पूनर्तपासणी सर्व्हे रिपोर्ट मध्ये रु.85,295/- एवढी रक्कम गैरअर्जदार यांनी अर्जदारास व्याजासहीत दयावी या नीर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. दि.20.04.2009 रोजी पासून 9 टक्के व्याज दराने रु.85,295/- ही रक्कम गैरअर्जदार यांनी अर्जदारास एक महिन्याचे आंत दयावेत, पूनर्तपासणी अहवालानंतर गैरअर्जदार यांनी ताबडतोब सदरची रक्कम अर्जदारास देणे आवश्यक होते ती आजपर्यत दिलेली नाही हीच गैरअर्जदार यांची सेवेतील ञूटी सिध्द होते. म्हणून अर्जदारास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.2000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास एक महिन्याचे आंत दयावेत. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल लागल्यापासून एक महिन्याचे आंत अर्जदार यांना रु.85,295/- व त्यावर दि.20.04.2009 पासून 9 टक्के व्याज रक्कम मिळेपर्यत दयावे. 3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास एक महिन्याचे आंत मानसिक व शारीरिक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- दयावेत. 4. उभयपक्षाना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री. सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जयंत पारवेकर लघूलेखक. |