Maharashtra

Nanded

CC/10/75

Harjitsingh Gurudipsingh Ray - Complainant(s)

Versus

Royal Sundaram Alliance Insurance Com. Ltd. - Opp.Party(s)

Adv. Agrawal

27 Jul 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/75
1. Harjitsingh Gurudipsingh Ray Govind Bag, Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Royal Sundaram Alliance Insurance Com. Ltd. Bafna Road, Nanded.NandedMaharastra2. Royal Sundaram Alliance Insurance Com. Ltd.Sundram Towers, Channi,ChanniTamilnadu. ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 27 Jul 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/75.
                          प्रकरण दाखल तारीख - 04/03/2010
                          प्रकरण निकाल तारीख 27/07/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
       मा.श्री.सतीश सामते,                 -   सदस्‍य.
 
हरजीतसिंघ पि. गुरुदिपसींघ राय
वय 45 वर्षे, धंदा व्‍यापार                                   अर्जदार
रा.बसवकल्‍याण जि. बिदर
हल्‍ली मूक्‍काम गोविंद बाग, नांदेड
     विरुध्‍द.
1. रॉयल सुंदरम अलाएन्‍स इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
सूंदरम टॉवर्स, 45 व 46 व्‍हाईट रोडस, चेन्‍नई
पिन 600 014                                    गैरअर्जदार 
2.   रॉयल सुंदरम अलाएन्‍स इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
     परमान कॉम्‍प्‍लेक्‍स, बाफना रोड, नांदेड.
                 
      
अर्जदारा तर्फे वकील             - अड.एस.आर.अग्रवाल
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील     -  अड. पी.एस. भक्‍कड
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, सदस्‍या)
 
              गैरअर्जदार रॉयल सूंदरम अलाएन्‍स इन्‍शूरन्‍स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
                             अर्जदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा ट्रान्‍सपोर्ट चा व्‍यवसाय करतो व त्‍यावर त्‍यांचे कूटूंब अवलंबून आहे. अर्जदार हा गैरअर्जदार कंपनीचा ग्राहक आहे. अर्जदार हा ट्रक के.ए.-39-4763 चा मालक आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून सदरील ट्रकचा विमा दि.01.06.2008 ते 31.05.2009 या कालावधीसाठी उतरविला होता व त्‍यापोटी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे रु.23,391/- भरले होते.दि.17.03.2009 रोजी अर्जदाराचा ट्रक हा नांदेडहून अंबूजा सिमेंट  फॅक्‍टरीकडे जात असताना
 
 
सदरील ट्रकला बायपास रोड नांदेड येथे अपघात झाला. अपघातात ट्रकचा समोरील भाग म्‍हणजेच केबीन व इतर भागांचे नूकसान झाले. अर्जदाराने त्‍वरीत गैरअर्जदार कंपनीकडे अपघाताबददल कळविले. गैरअर्जदार कंपनी सर्व्‍हेअर श्री. बस्‍वराज यांची सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केली. अर्जदाराने ट्रक शौकत अटो रिपेरिंग सेंटर नांदेड व श्री. भवानी मोटार बॉडी बिल्‍डर अन्‍ड कॅबीन रिपेअरिंग नांदेड यांच्‍याकडे दूरुस्‍तीसाठी नेलो असता ट्रक दूरुस्‍त करण्‍यासाठी रु.1,55,534/- लागत असल्‍याबाबतचे इस्‍टीमेट दिले. सर्व्‍हेअरने ट्रकचे नूकसान हे रु.78,533/- झाला असा अभिप्राय दिला. अर्जदाराने सर्व्‍हे रिपोर्ट वेळेस केलेल्‍या रक्‍कम रु.1,55,534/- ची मागणी गैरअर्जदार यांचेकडे केली. अनेक वेळा चकरा मारुन देखील गैरअर्जदार यांनी नूकसान भरपाई दिली नाही. शेवटी कदि.25.4.2009 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारास कळविले की, विमा कंपनी अर्जदारास क्‍लेमची रक्‍कम असमर्थ आहेत. अर्जदाराने दि.27.11.2009 रोजी विमा कंपनीला त्‍यांच्‍या वकिलामार्फत नोटीस पाठविली परंतु गैरअर्जदार यांनी नोटीसचे उत्‍तर दिले नाही व क्‍लेमची रक्‍कम ही दिली नाही. त्‍यामूळे अर्जदाराने ही तक्रार दाखल केली असून अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदार कंपनीने अर्जदारास नूकसान भरपाई रु.1,55,534/- दि.17.3.2009 पासून 18 टक्‍के व्‍याजाने दयावेत तसेच मानसिक ञासापोटी व सेवेतील ञूटी बददल रु.1,00,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.10,000/- दयावेत.
              गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे.अर्जदाराची तक्रार त्‍यांना मान्‍य नाही. त्‍यामूळे ती खारीज करावी असे म्‍हटले आहे. अर्जदार यांना पॉलिसी दिली हे त्‍यांना मान्‍य आहे परंतु पॉलिसी ही अटी व शर्तीवर दिलेली होती. अपघाताबददल त्‍यांना माहीती नाही. गैरअर्जदार यांनी सर्व्‍हे केल्‍यानंतर त्‍यांना अपघातामध्‍ये नूकसान झाले हे टॅली झाले नाही. सदर तक्रार ही अपघात बघीतला असता दिवाणी न्‍यायालयात दाखल करण्‍यासाठी सारखी आहे या मंचास तो अधिकार नाही. त्‍याबाबत त्‍यांनी National Commission in Champalal Verma Vs. Oriental Insurance Com. Ltd. (III 2008 CPJ 93 NC ) has held that the consumer Forums can not go into quantum disputes and such disputes has to be referred to Civil Court or to Arbitration.   सर्व्‍हेअर यांनी सर्व्‍हे करुन जी नूकसान भरपाई ठरविली त्‍याप्रमाणे रु.78,533/- ठरविली त्‍यापैकी अर्जदार यांनी रु.78,000/- मान्‍य करुन फूल अन्‍ड फायनल सेंटलमेंट म्‍हणून दि.02.04.2009 रोजी स्विकारले आहेत.अर्जदार यांनी नूकसान भरपाईचा चेक घेतलेला असल्‍यामूळे सदर तक्रार फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
 
 
 
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                                       उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?         होय.
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
 
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
                   अर्जदार हा ट्रक के.ए.-39-4763 चा मालक आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून सदरील ट्रकचा विमा दि.01.06.2008 ते 31.05.2009 या कालावधीसाठी उतरविला होता व त्‍यापोटी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे रु.23,391/- भरले होते.दि.17.03.2009 रोजी अर्जदाराचा ट्रक हा नांदेडहून अंबूजा सिमेंट फॅक्‍टरीकडे जात असताना सदरील ट्रकला बायपास रोड नांदेड येथे अपघात झाला. अपघातात ट्रकचा समोरील भाग म्‍हणजेच केबीन व इतर भागांचे नूकसान झाले. अर्जदाराने त्‍यांचे मिञाकडून व इतर नातेवाईकाकडून उसणे पैसे घेऊन रु.1,66,689/- एवढा खर्च करुन ट्रक दूरुस्‍त केला कारण तो त्‍यांचे उप‍जिविकेचे एकमेव साधन आहे. अर्जदाराने सर्व्‍हे रिपोर्टच्‍या वेळी रु.1,55,534/- ची मागणी गैरअर्जदार यांना केलेली होती परंतु प्रत्‍यक्षात रु.166,683/- एवढा खर्च अर्जदारास झालेला आहे. दि.25.04.2009 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारास असे कळविले की,  अर्जदार यांनी मागणी केलेली क्‍लेमची रक्‍कम देण्‍यास ते असमर्थ आहेत. आजपर्यत त्‍यांनी क्‍लेमची रक्‍कम  रु.78,000/- दिलेली आहे.असे जरी प्रतीपादन कले असले तरी प्रत्‍यक्षात कूठलीही रक्‍कम गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिलेली नाही. गैरअर्जदारां यांनी दिलेल्‍या लेखी उत्‍तरास अर्जदाराने दिलेल्‍या प्रतिउत्‍तरात ही बाब स्‍पष्‍ट लिहीली आहे व ती गैरअर्जदार यांना मान्‍य आहे. या गोष्‍टी गृहीत धरल्‍या असता झालेला अपघात व त्‍यांचे सर्व्‍हेअरने केलेले निरीक्षण यामध्‍ये सर्व्‍हेअरच्‍या तपासणी मध्‍ये अपघात झाला व त्‍यात झालेले नूकसान हे योग्‍य होते तसेच त्‍यांनी तपासलेली किंमतही मार्केट नुसार होती. या सर्व गोष्‍टीचा उल्‍लेख करण्‍यात आलेला आहे. त्‍यानंतर सर्व्‍हेअरने पास केलेले शौकत अटो रिपेअरिंग सेंटर नांदेड यांचे
 
 
 
रु.99,034/- व श्री भवानी मोटार बॉडी बिल्‍डर अन्‍ड कॅबीन रिपेअर यांची
रक्‍कम रु.56,500/- या दोन्‍ही रक्‍कमेचा उल्‍लेख आहे. पण सर्व्‍हेअर यांनी केलेल्‍या असेसमेंट नुसार गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.78,533/- रक्‍कम देणे योग्‍य आहे या नीर्णयास्‍तव हे मंच आहे आहे. गैरअर्जदार यांनी रु.78,533/- अर्जदारास मंजूर कले पण आजपर्यत कूठलीही रक्‍कम अर्जदारास दिली नाही.  ही गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी वाटते. अर्जदारास झालेल्‍या मानसिक व शारीरिक ञासाबददल व दावा खर्च म्‍हणून रु,2,000/- एक महिन्‍याचे आंत दयावेत.
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                          आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
 
2.                                          गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल लागल्‍यापासून एक महिन्‍याचे आंत अर्जदार यांना रु.78,533/- व त्‍यावर दि.25.4.2009 पासून 9 टक्‍के व्‍याज दराने रक्‍कम दयावी.
 
3.                                          गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी हा निकाल लागल्‍यापासून एक महिन्‍याचे आंत अर्जदारास मानसिक व शारीरिक ञासाबददल व दावा खर्चाबददल रु.5,000/- दयावेत.
 
4.                                          उभयपक्षांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                              श्रीमती सुवर्णा देशमूख                               श्री. सतीश सामते   
   अध्‍यक्ष                                                                  सदस्‍या                                                         सदस्‍य
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक.