Maharashtra

Nagpur

CC/144/2021

VIMAL DHYANEHWAR WAKADE THROUGH POWER OF ATTORNEY MUKESH WAKADE - Complainant(s)

Versus

ROYAL LAND DEVELOPER & BUILDERS, THROUGH MANAGING DIRECTOR MR. MUKESH SHENDE - Opp.Party(s)

ADV. SHREY RAVI DAMBHARE

12 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/144/2021
( Date of Filing : 18 Feb 2021 )
 
1. VIMAL DHYANEHWAR WAKADE THROUGH POWER OF ATTORNEY MUKESH WAKADE
R/O. BHANDE PLOT, SEVADAL NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. MUKESH DHYANESHWAR WAKADE
R/O. BHANDE PLOT, SEVADAL NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ROYAL LAND DEVELOPER & BUILDERS, THROUGH MANAGING DIRECTOR MR. MUKESH SHENDE
OFF.AT, 3RD FLOOR, NEXT TO BENDE PUSHPAM APARTMENT, BANERJEE LAYOUT, BHAGWAN NAGAR, NAGPUR-440027
NAGPUR
MAHARASHTRA
2. ROYAL LAND DEVELOPER & BUILDERS, THROUGH ADDITIONAL MANAGING DIRECTOR MR. SUDHIR RANGARI
R/O. PLOT NO.287, KUKADE LAYOUT, RAMESHWARI ROAD, NAGPUR-440027
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. SHREY RAVI DAMBHARE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 12 Jul 2022
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस, यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.             तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35 (1) (a) अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,   त्‍याने वि.प. 1 व 2 यांच्‍या मौजा- बोरी, प.ह.नं. 76, ग्रामपंचायत –बोरी, खसरा क्रं. 291, तह.जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 155, एकूण क्षेत्रफळ 1250 चौ.फु. (116.129 चौ.मी.) हा एकूण रक्‍कम रुपये 2,00,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचे ठरविले व दि.16.10.2015 रोजी रुपये 20,000/- देऊन नोटरी करारनामा केला होता व दि. 18.05.2015 ते 18.07.2017 पर्यंत विरुध्‍द पक्षाकडे रुपये 64,000/- अदा केले होते. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी त्‍यांचे वृंदावन अपार्टमेंट, शताब्‍दी चौक, जयवंत नगर, नागपूर येथील कार्यालय बंद केले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे जमा असलेली रक्‍कम परत करण्‍याची विनंती केली असता विरुध्‍द पक्ष क्रं. 2 ने युनियन बॅंक ऑफ इंडिया, नरेन्‍द्र नगर, नागपूर येथील शाखेचा धनादेश क्रं. 029770  दिला. परंतु विरुध्‍द पक्षाच्‍या खात्‍यात अपु-या रक्‍कमे अभावी सदरचा धनादेश अना‍दरित झाला. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1  व 2 विरुध्‍द वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाकडे जमा केलेली रक्‍कम 12 टक्‍के दराने व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासा‍करिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.
  2.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांना आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाव्‍दारे दि. 09.08.2021 रोजी पारित करण्‍यात आला.
  3.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तऐवजाचे काळजीपूर्वक अवलोकन केले. तसेच त्‍यांच्‍या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतले असता मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविला.

 

  1.  

 

1 तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षांचा ग्राहक आहे काय ?होय

  1.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन 

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय? होय

  1. काय आदेश ?          अंतिम आदेशानुसार

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून  मौजा- बोरी, प.ह.नं. 76, ग्रामपंचायत –बोरी, खसरा क्रं. 291, तह.जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 126, एकूण क्षेत्रफळ 1250 चौ.फु. (116.129 चौ.मी.) हा एकूण रक्‍कम रुपये 2,00,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचा दि. 16.10.2015 रोजी नोटरी करारपत्र केला होता व त्‍याकरिता रुपये 20,000/- अदा केले असल्‍याचे दाखल करारनामापत्रा वरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे दि. 18.05.2015 ते 18.07.2017 पर्यंत विरुध्‍द पक्षाकडे रुपये 64,000/- जमा केले असल्‍याचे दाखल पावत्‍यांवरुन दिसून  येते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे एवढी रक्‍कम जमा करुन सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने  तक्रारकर्त्‍याला भूखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही अथवा भूखंडाचा ताबा सुध्‍दा दिला नाही. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे जमा केलेली रक्‍कम परत करण्‍याची विनंती केली असता विरुध्‍द पक्ष क्रं. 2 ने युनियन बॅंक ऑफ इंडिया, नरेन्‍द्र नगर,

नागपूर येथील शाखेचा दि. 05.10.2020 रोजीचा रक्‍कम रुपये 64,000/- चा धनादेश क्रं. 029770  दिला होता, परंतु सदरचा धनादेश हा अपु-या रक्‍कमे अभावी अना‍दरित झाला असल्‍याचे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते, अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असल्‍याचे स्‍पष्‍टपणे  दिसून येते.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

                         अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याकडून भूखंडा पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 64,000/-  व त्‍यावर वि.प.कडे जमा केलेली रक्‍कमेची शेवटची तिथी म्‍हणजेच दि. 18.07.2017  पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍के दराने व्‍याजसह रक्‍कम विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.
  2. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आंत करावी.
  3. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.