न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे उपजिविकेकरिता गाडीतून माल पोहोच करणेचा व्यवसाय आहे. वि.प. क्र.1 ही विमा कंपनी असून वि.प. क्र.2 ही वि.प. क्र.1 ची कोल्हापूर येथील शाखा आहे. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून वाहन क्र.एमएच 09-सीयू-8384 या वाहनाचा अपघाती विमा वि.प. कंपनीकडे उतरविलेला होता. सदरच्या विम्याचा पॉलिसी नं. VGC0548428000100 असून कालावधी दि. 17/3/2019 ते 16/03/20 इतका होता. तक्रारदार यांच्या वादातील वाहनाचा ता. 3/7/2019 रजी अपघात झाला. सदर अपघातावेळी तक्रारदार यांचे ड्रायव्हर करीम खान हे गाडी चालवित असताना सदरचे वाहन ड्रायव्हर साईडला पलटी होवून वाहनात असलेली मालाची पोती रस्त्यावर विखुरली गेली. तसेच ड्रायव्हर करीम खान गाडीतून फेकला गेला होता व क्लिनर आनंद नलवडे हा ड्रायव्हींग सीटमध्ये अडकला होता. सदर अपघातामध्ये तक्रारदार यांचे ड्रायव्हर व क्लिनर यांना मार लागून ते जखमी झालेने त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. तक्रारदार यांनी सदर अपघातामध्ये झालेल्या वाहन नुकसानीकरिता वि.प. यांचेकडे क्लेम दाखल केलेनंतर वि.प. यांनी तक्रारदार यांनी सदर वाहनाच्या ड्रायव्हर यांचे लायसेन्स योग्य नसलेने तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर केला. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांच्याकडून अपघातग्रस्त वाहनाचा विमाहप्ता स्वीकारुन देखील सदर वाहनाचा विमा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली असलेने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, वि.प. यांचेकडून विमा क्लेमची रक्कम रु. 18,00,000/-, सदर रकमेवर 18 टक्केप्रमाणे व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,50,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु. 50,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वि.प. यांचे क्लेम नामंजूरीचे पत्र, पॉलिसी सर्टिफिकेटख् चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना, रजि.नंबर, वाहनाचे परमिट, भारत बेंझ कंपनीने वाहनाचु नुकसानीचे दिलेले इस्टिमेट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प. यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. वि.प. यांचे कथनानुसार, सदर क्लेमची चौकशी करता अपघातात वाहनाच्या ड्रायव्हर बाजूचे नुकसान झालेचे दिसत होते. अपघातावेळेस वाहन करीम खान चालवित होता, हे चुकीचे व खोटे आहे. कारण वाहन ड्रायव्हर बाजूला कलंडले होते. तरीही सदर करीम खानला जखमा झाल्या नव्हत्या. याउलट वाहनात आनंद नलवडे हे ड्रायव्हर सीटवर असलेने पायास जखमा झालेल्या होत्या. तक्रारदार यांनी पश्चातबुध्दीने व पोलिसांशी संगनमत करुन चुकीच्या मजकुराने गुन्हा नोंद केला आहे खेाटे जबाब दिले आहेत. पोलिसांनी योग्य तपास न करता गुन्हा नोंदविलेला आहे. कथित अपघातवेळी वाहन आनंद नलवडे हे चालवित होते. त्यांचेकडे लायसेन्स नसलेने पश्चात बुध्दीने वाहन करीम खान हा चालवित होता असे पोलिसांत व वि.प. कडे सांगितले होते. तक्रारदार यांनी सांगितलेली अपघाताची माहिती व प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत आहे. अपघातावेळी वाहन चालवित असलेल्या ड्रायव्हरने कार चालविण्याचे वैध लायसेन्स नसलेने पॉलिसीचे ड्रायव्हर क्लॉजचे उल्लंघन झाले आहे. सबब, वि.प. हे कायद्याने नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत असे वि.प. यांनी म्हणणे दाखल केले आहे. सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
4. वि.प. यांनी याकामी कागदयादीसोबत पॉलिसी अटी व शर्ती, क्लेम फॉर्म, चौकशी रिपोर्ट, आनंद नलवडे यांचे मेडीकल पेपर्स, क्लेम नाकारलेचे पत्र, सर्व्हे रिपोर्ट तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
6. तक्रारदार यांचे स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे उपजिविकेकरिता गाडीतून माल पोहोच करणेचा व्यवसाय आहे. वि.प. क्र.1 ही विमा कंपनी असून वि.प. क्र.2 ही वि.प. क्र.1 ची कोल्हापूर येथील शाखा आहे. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून वाहन क्र.एमएच 09-सीयू-8384 या वाहनाचा अपघाती विमा वि.प. कंपनीकडे उतरविलेला होता. सदरच्या विम्याचा पॉलिसी नं. VGC0548428000100 असून कालावधी दि. 17/3/2019 ते 16/03/20 इतका होता. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सदर पॉलिसीचे सर्टिफिकेट ऑफ इन्शुरनस अॅण्ड पॉलिसी शेडयुल दाखल केलेले आहे. सदरची पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांच्या वादातील वाहनाचा ता. 3/7/2019 रजी अपघात झाला. सदर अपघातावेळी तक्रारदार यांचे ड्रायव्हर करीम खान हे गाडी चालवित असताना सदरचे वाहन ड्रायव्हर साईडला पलटी होवून वाहनात असलेली मालाची पोती रस्त्यावर विखुरली गेली. तसेच ड्रायव्हर करीम खान गाडीतून फेकला गेला होता व क्लिनर आनंद नलवडे हा ड्रायव्हींग सीटमध्ये अडकला होता. सदर अपघातामध्ये तक्रारदार यांचे ड्रायव्हर व क्लिनर यांना मार लागून ते जखमी झालेने त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. तक्रारदार यांनी सदर अपघातामध्ये झालेल्या वाहन नुकसानीकरिता वि.प. यांचेकडे क्लेम दाखल केलेनंतर वि.प. यांनी तक्रारदार यांनी सदर वाहनाच्या ड्रायव्हर यांचे लायसेन्स योग्य नसलेने तक्रारदार यांचा क्लेम नामंजूर केला. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांच्याकडून अपघातग्रस्त वाहनाचा विमाहप्ता स्वीकारुन देखील सदर वाहनाचा विमा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्या अनुषंगाने प्रस्तुतकामी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. यांचे ता 12/12/2019 रोजी तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारल्याचे पत्र दाखल केलेले आहे. सदरच्या पत्राचे अवलोकन करता,
There has been a misrepresentation of facts with regard to the driver details and the driver of the vehicle does not possess a valid driving licence to drive the vehicle thereby violating driver’s clause of the policy.
असे नमूद आहे. सबब, सदरच्या पत्रावरुन तक्रारदार यांनी वि.प. यांना सदर वाहनाची अपघातसमयीची माहिती चुकीची दिलेली असून सदर अपघातावेळी ड्रायव्हरकडे वैध ड्रायव्हींग लायसेन्स नव्हते या कारणास्तव तक्रारदार यांचा क्लेम नाकारलेचे दिसून येते.
8. प्रस्तुतकामी वि.प. क्र.1 व 2 यांनी म्हणणे दाखल केलेले असून सदर म्हणण्याचे अवलोकन करता वि.प. यांनी तक्रारदार यांची पॉलिसी नाकारलेली नाही. सदर क्लेमची चौकशी करता अपघातात वाहनाच्या ड्रायव्हर बाजूचे नुकसान झालेचे दिसत होते. अपघातावेळेस वाहन करीम खान चालवित होता, हे चुकीचे व खोटे आहे. कारण वाहन ड्रायव्हर बाजूला कलंडले होते. तरीही सदर करीम खानला जखमा झाल्या नव्हत्या. याउलट वाहनात आनंद नलवडे हे ड्रायव्हर सीटवर असलेने पायास जखमा झालेल्या होत्या. तक्रारदार यांनी पश्चातबुध्दीने व पोलिसांशी संगनमत करुन चुकीच्या मजकुराने गुन्हा नोंद केला आहे खेाटे जबाब दिले आहेत. पोलिसांनी योग्य तपास न करता गुन्हा नोंदविलेला आहे. कथित अपघातवेळी वाहन आनंद नलवडे हे चालवित होते. त्यांचेकडे लायसेन्स नसलेने पश्चात बुध्दीने वाहन करीम खान हा चालवित होता असे पोलिसांत व वि.प. कडे सांगितले होते. तक्रारदार यांनी सांगितलेली अपघाताची माहिती व प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये तफावत आहे. अपघातावेळी वाहन चालवित असलेल्या ड्रायव्हरने कार चालविण्याचे वैध लायसेन्स नसलेने पॉलिसीचे ड्रायव्हर क्लॉजचे उल्लंघन झाले आहे. सबब, वि.प. हे कायद्याने नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत असे वि.प. यांनी म्हणणे दाखल केले आहे. त्याअनुषंगाने वि.प. यांनी आयोगामध्ये ता.18/5/22 रोजी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता वि.प. यांनी पॉलिसीतील अटी व शर्तींची प्रत, क्लेम फॉर्म, आनंद नलवडे यांचे मेडिकल पेपर्स आणि क्लेम नाकारलेचे पत्र इ. कागद दाखल केलेले आहेत. तसेच वि.प. यांनी सदरकामी ता. 18/11/2019 रोजीचा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट दाखल केलेला आहे. सदर रिपोर्टमधील Observation चे अवलोकन करता
5) At the time of accident insured driver Mr. Karim khan and insured cleaner Anand Nalawade were present in IV.
6) As per insured and his driver Karim, Karim Khan was driving IV at the time of accident but when IV dashed to driver side IV, it toppled and he was thrown out of IV due to which he was not having single injury as per narrated statement of driver. It is not possible as if he was thrown out of IV which is toppled on driver side. He must be stuck in IV and must have some injury.
7) As per insured and his driver insured cleaner got stuck in IV and was injured. We have obtained medical papers of cleaner. Cleaner’s legs have injury and still he is under treatment.
9) As per cleaner injury details, it can be confirmed that he was driving IV at the time of accident and he is not having valid driving license Insured had submitted his driver Karim Khan DL for claim papers.
10) As per survey photos, IV damage are found on right side and if driver Karim was thrown out of IV, he must have get stuck in IV and he must be injured but he is not having single injury.
सबब वि.प. यांच्या सदरच्या इन्वहेस्टीगेशन रिपोर्टवरुन वि.प. यांचेकडे उपलब्ध असलेल्या मेडीकल पेपर्सवरुन अपघातसमयी सदर वाहनामध्ये असणा-या क्लिनरच्या पायांना जखमा झालेल्या असलेने व सदरचे अपघाती वाहनास नुकसान हे उजव्या बाजूला झालेले असल्यामुळे सदरचे वाहन हे क्लिनर हा चालवित होता या निष्कर्षास आलेचे दिसून येते. तसेच करीम खान हा सदरच्या वाहनातून बाहेर फेकला गेला असला तरीही त्यांना सदर अपघातसमयी कोणतीही जखम झालेली नसल्यामुळे सदरचे वाहन हे क्लिनर आनंद नलवडे हाच चालवत होता या निष्कर्षास आलेले दिसून येते. तथापि वि.प. यांनी सदरच्या इन्व्हेस्टीगेशन रिपोर्टखेरीज आयोगामध्ये अन्य कोणताही परिस्थितीजन्य पुरावा दाखल केलेला नाही अथवा सदरच्या अपघाताच्या अनुषंगाने कोणत्याही इसमाचे पुरावा शपथपत्र दाखल केलेले नाही. परंतु सदरकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या ता.4/7/2019 रोजीच्या एफ.आय.आर. रिपोर्टचे अवलोकन करता
भारत बेंज कंपनीची गाडी क्र.एमएच 09-सीयू-8384 सकाळी 6.30 चे सुमारास पुलावर अचानक ड्रायव्हर साईडला पलटी झाली व त्यात असलेल्या सर्व मालाची पोती रस्त्यावर विखुरली म्हणून मी व आमिन पठाण अशा दोघांनीही आमच्या गाडया पुढे रस्त्याच्या कडेला लावून आमच्या बरोबर गाडीत असलेल्या क्लिनरसह पलटी झालेल्या गाडीजवळ आलो तेव्हा चालक करीम खान हा गाडीतून बाहेर फेकला गेला होता व त्याच्या बरोबर असलेला क्लिनर आनंद नलवडे हा ड्रायव्हींग सीटमध्ये अडकलेला होता. त्याला आम्ही सर्वांनी तसेच इतर गाडयातील लोकांनी मिळून बाहेर काढला.
असे नमूद असून सदरच्या एफ.आय.आर.च्या अनुषंगाने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुरावा शपथपत्राचे अवलोकन करता तक्रारदार यांनी सदरच्या अपघाताची नोंद भुईंज पोलिस स्टेशन येथे नोंदणी क्र.0118/2019 ने केली आहे असे पुरावा शपथपत्रावर कथन केले आहे. सबब, सदरच्या कागदपत्रांचा बारकाईने विचार करता तक्रारदार यांचे अपघातग्रस्त वाहन हे ड्रायव्हर करीम खान हेच चालवित होते व सदरचे वाहन चालवत असताना ड्रायव्हर करीम खान गाडीतून फेकले गेले ही बाब नाकारता येत नाही. केवळ क्लिनर आनंद नलवडे यांना मेडीकल पेपर्सवरुन सदर अपघातामध्ये मार लागून झालेल्या जखमांमुळे सदरचे वाहन हे आनंद नलवडे हे चालवित होते ही बाब पुराव्याअभावी वि.प. यांनी सिध्द केलेली नाही. वि.प. यांनी त्यांची कथने शाबीत केलेली नाहीत. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सदर अपघातग्रस्त वाहन चालक करीम खान याचे लायसेन्स, वाहनाचे आर.सी., वाहनाचे परमिट इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदरची कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाहीत. सबब, वरील सर्व बाबींचा बारकाईने विचार करता वि.प. यांनी पॉलिसीचा मूळ हेतू विचारात न घेता तक्रारदार यांचा अपघातग्रस्त वाहनाचा विमा क्लेम चुकीच्या कारणास्तव नाकारुन व पॉलिसीचा मूळ हेतू विचारात न घेता तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
9. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. प्रस्तुकामी तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून विमाक्लेमची रक्कम रु. 18 लाखची मागणी केली आहे. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी भारत बेंझ कंपनीचे वाहनाचे नुकसानीचे झालेल्या एस्टिमेट दाखल केलेले आहे. तथापि तक्रारदारांनी अपघातग्रस्त वाहनाची रिपेअरिंगची (दुरुस्ती) बिले दाखल केलेली नाहीत. त्यावरुन सदर वाहनाचे प्रत्यक्षरित्या किती नुकसान झाले ही बाब सिध्द होत नाही. परंतु सदर नुकसानग्रस्त रकमेच्या अनुषंगाने वि.प. यांनी दाखल केलेल्या ता. 25/11/2019 च्या सर्व्हे रिपोर्टचे अवलोकन करता सदर अपघातग्रस्त वाहनाचा रिपेअरिंग खर्च 75 टक्केपेक्षा जास्त असलेने सदर वाहन Constructive total loss आहे. सबब, आय.डी.व्ही. रु.18 लाख पैकी सॅल्वेज (Wreck value) रक्कम रु.4 लाख वजा करुन व पॉलिसी एक्सेस क्लॉजप्रमाणे रक्कम रु. 1,500/- वजा करुन अपघातग्रस्त वाहनाचे नुकसानीची असेसमेंट रक्कम रु.13,98,500/- इतकी केलेली आहे. त्याअनुषंगाने वि.प. यांनी त्यांचे लेखी युक्तिवादामध्ये रेक व्हॅल्यू ही वाहनाची आहे, त्या परिस्थितीत किंमत ही जी टोटल लॉस असेल तर आय.डी.व्ही. मधून वजा करणे योग्य आहे असा खुलासा दिलेला आहे. त्याअनुषंगाने
Shriram General Insurance Co.Ltd. Vs. Jamshed
National Commission
As truck was totally burnt, the claim can be settled on the basis of “Net Salvage basis” by deducting wreck value of Rs.3,50,000/- for IDV of Rs.14,20,000/- which comes to Rs.10,70,000/-.
या न्यायनिवाडयाचा आधार घेतलेला आहे. तसेच वि.प. यांनी प्रस्तुतकामी खालील न्यायनिवाडयांचा आधार घेतलेला आहे.
(2000) 10 SCC 19 (Hon’ble Supreme Court)
United India Insurance Co.Ltd. & Ors.
-
Roshan Lal Oil Mills Ltd. & Ors
The appellant had appointed joint surveyors in terms of Section 64-UM(2) of the Insurance Act, 1938 – This is an important document which was placed before the Commission but the Commission, curiously, has not considered the report – In our opinion, non-consideration of this important document has resulted in serious miscarriage of justice and vitiates the judgment passed by the Commission.
- (2006) 4 CPJ 84 (Hon’ble National Commission)
New India Assurance Co.Ltd.
-
Kamal Nayan
The Supreme Court in catena of judgments has taken pains to emphasize that report of Surveyor is an important piece of document and evidence which cannot be brushed aside without sufficient reasoning.
- (2012) 1 CPJ 272 (Hon’ble National Commission)
D.N. Badoni
Oriental Insurance Co.Ltd.
We see no reason to disbelieve the report of the Surveyor particularly since the petitioner has not been able to produce any credible evidence to contradict the same – The District Forum erred in not taking this important evidence into consideration and relied only on the petitioners version of the loss suffered based on some bills produced by him which have not been proved.It is well settled law that a Surveyors report has significant evidentiary value unless it is proved otherwise which petitioner has failed to do so the instant case.
सबब, वि.प. यांनी दाखल केलेल्या वरील निवाडयांचे अवलोकन करता वि.प. यांना इन्शुरन्स अॅक्टचे कलम 64 प्रमाणे सर्व्हेअर नेमणे बंधनकारक आहे. त्यानुसार वि.प. यांनी सदर नियमाप्रमाणे असेसमेंट केलेली असून तांत्रिक बाबीसाठी सर्व्हेअरचा पुरावा हा विश्वसनीय व महत्वाचा आहे ही बाब सिध्द होते. सबब, तक्रारदार हे सदर सर्व्हे रिपोर्टप्रमाणे अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसान भरपाईपोटी विमाक्लेमची रक्कम रु. 13,98,500/- इतकी मिळणेस पात्र आहेत तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 04/03/2020 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4
10. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.8,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. विमा कंपनीने तक्रारदार यांना पॉलिसी क्र. VGC0548428000100 अंतर्गत रक्कम रु.13,98,500/- अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 04/03/2020 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प.विमा कंपनी यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.8,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|