जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/135 प्रकरण दाखल दिनांक – 12/06/2009. प्रकरण निकाल दिनांक –05/09/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. दिपक पि. विठठलराव मराठे वय, 26 वर्षे, धंदा शेती रा. नांदेड हौसिंग सोसायटी, विजय नगर, नांदेड. अर्जदार विरुध्द राईडवेल मोटर्स, प्रो.प्रा.कमल कोठारी, जिल्हा परीषद, गैरअर्जदार स्टेशन रोड, नांदेड अर्जदारा तर्फे. - अड.एस.व्ही. मगरे गैरअर्जदारा तर्फे - अड.जे.एस.पांडे. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली म्हणून अर्जदार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दि.27.04.2009 रोजी रु.80,952/- चा धनादेश देऊन करिज्मा हिरोहोंडा मोटार सायकल ज्यांचा रंग पिवळा पाहिजे. यावीशेष रंगासाठी गैरअर्जदाराकडे बूक केली. सात दिवसांत मोटार सायकल देतो म्हणून जवळपास एक महिना गैरअर्जदारांनी मोटार सायकल दिली नाही.त्यामूळे अर्जदार यांना शेतीवर जाण्यासाठी ञास झाला व त्यामूळे नूकसानही झाले. गैरअर्जदारांनी सेवेत ञूटी केली म्हणून मानसिक ञासासाठी रु.50,000/- नूकसान भरपाई व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मंजूर करावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे अर्जदाराने दि.24.07.2009 रोजी हिरोहोंडा या पिवळया रंगाच्या मोटार सायकलसाठी रु.80,952/- चा ड्राफट दिला हे त्यांना कबूल आहे. तसेव धनादेश घेत असताना अर्जदाराने गैरअर्जदारास अटीची पूर्तता केल्यानंतर चेक घेतला व चेकची रक्कम पूर्ण मिळाल्यानंतर अर्जदाराच्या मागणीप्रमाणे कंपनीस ऑर्डर दिली. गैरअर्जदार यांचेकडे अर्जदाराने ज्या दिवशी डि.डि. दिला त्या दिवशी अर्जदाराच्या मागणीप्रमाणे मोटार सायकल उपलब्ध नव्हती व तूमची वीशेष मागणी असल्याकारणाने आम्ही ती कंपनीकडून मोटार सायकल मागवून देऊ असे सांगितले. सात दिवसांतच किंवा इतक्याच वेळेत तूम्हाला मोटार सायकल देण्यात येईल असे कधीही सांगितलेले नाही. असे असतानाही अर्जदाराने दि.27.05.2009 रोजी खोडसाळपणाने नोटीस पाठविली परंतु यानंतर गैरअर्जदारांनी दि.2.6.2009 रोजी अर्जदारास त्यांचे मागणीप्रमाणे मोटार सायकलचा ताबा दिला. एवढेच नाही तर अर्जदार हा गैरअर्जदारावर नाराज होऊ नये म्हणून 22 दिवसांचे एकूण व्याज रु.732/- अर्जदारास दिले व त्यांने त्या बाबत सही करुन ती रक्कम उचलली. त्यामूळे आता दोघामध्ये कोणताही वाद शिल्लक राहीला नाही. चार दिवसांतच गैरअर्जदाराने अर्जदारास मोटार सायकल दिली व त्या दिवशी कोणताही वाद शिल्लक नव्हता म्हणून अर्जदाराच्या नोटीसीस उत्तर दिले नाही. अर्जदाराने फक्त ञास देण्याचे उददेशाने ही तक्रार दाखल केली आहे. यानंतरही अर्जदाराने गैरअर्जदारास अनेक वेळा पैशासाठी धमक्या दिल्या होत्या. गैरअर्जदाराने अर्जदाराची कोणतीही रक्कम गैरमार्गाने वापरलेली नाही. त्यामूळे गैरअर्जदार यांचे सेवेत कोणतीही ञूटी नाही. त्यामूळे अर्जदाराचा अर्ज बिनाखर्च खारीज करावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व दोघानीही केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी किंवा अनूचित व्यापार पध्दती अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदारांनी गैरअर्जदार यांचेकडे पिवळया रंगाची करिज्मा हिरोहोंडा मोटार सायकल दि.27.04.2009 रोजी रु.80,952/- चा धनादेश देऊन बूक केली होती हे त्यांना मान्य आहे. त्यांचा पावती नंबर 1018 अर्जदाराने दाखल केलेला आहे. या पावतीवर दि.23.04.2009 रोजी गोदावरी अर्बन बॅंकेचा काढलेला धनादेश हा गैरअर्जदार यांचेकडे दि.27.04.2009 रोजी दिलेला आहे म्हणजे अर्जदाराने चार दिवस उशिराने हा धनादेश गैरअर्जदाराकडे दिला. यावरुन अर्जदार यांना कोणतीही घाई नव्हती म्हणून आरामात डि.डि. त्यांनी गैरअर्जदार यांचेकडे दिला. अर्जदार असे म्हणतात की, त्यांची विशेष मागणीप्रमाणे त्यांच वेळेस गैरअर्जदाराकडे त्या रंगाचे वाहन उपलब्ध नसल्याकारणाने त्यांनी कंपनीकडून ते वाहन सात दिवसांत देतो असे म्हटले आहे.सात दिवसांतच वाहन देतो असे म्हणणारा असा कोणताही लेखी पूरावा अर्जदाराने सादर केलेला नाही व गैरअर्जदाराने यावर आक्षेप घेऊन शक्य तो लवकर वाहन उपलब्ध करुन देऊ असे म्हटले आहे. यात धनादेश गैरअर्जदाराकडे देण्यास चार दिवस व तो वटविण्यास 2 ते 3 दिवसाचा अवधी लागला असेल या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन गैरअर्जदारांनी वाहन अर्जदारास 22 दिवसात दिले. म्हणजे दि.02.06.2009 रोजी दिले हे त्यांचे बिलावरुन व डिलेव्हरी चॅलनवरुन दिसून येते. एखादया रंगाचे वीशेष वाहन पाहिजे असेल तर एवढा अवधी लागतो. कंपनीमधून त्यांचे मागणीप्रमाणे ते वाहन उपलब्ध करुन देऊन पून्हा त्यासाठी ट्रान्सपोर्टची व्यवस्था होणे व एकच गाडी ही ट्रक मधून पाठविण्यात येत नाही. त्यासाठी ट्रक लोड पूर्ण होणे आवश्यक आहे इत्यादी बाबी लक्षात घेतल्या तर एवढा अवधी लागू शकतो व या उपरही अर्जदाराने गैरअर्जदारास सारखी धमकी देणे असे प्रकार केल्याचे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. अर्जदाराची तक्रार शिल्लक राहू नये म्हणून गैरअर्जदारांनी दि.2.6.2009 रोजी गाडीचा ताबा देताना 22 दिवसांचे 15 टक्के प्रमणे रु.732/- व्याज अर्जदारास दिले आहे व यासाठी पूरावा म्हणून त्यांनी दि.2.6.2009 रोजीचे रोकड उतारा दाखल केलेला आहे. यात रु.732/- अर्जदाराने सही करुन उचलले आहेत. म्हणून आमच्या मते दि.2.6.2009 रोजी जेव्हा अर्जदाराने व्याज स्विकारले आहे व गाडीही घेतली आहे म्हणजे त्याच दिवशी अर्जदाराची कोणतीही तक्रार शिल्लक राहीली नाही. परंतु तोच मूददा परत उकरुन काढून तक्रार दाखल करणे हे योग्य नाही. दूसरे अर्जदाराने आपलया तक्रारीत शेतीस जाण्यासाठी ञास झाला व त्यामूळे रु.50,000/- चे नूकसान झाले असे म्हटले आहे. त्यासाठी या प्रकरणात 7/12 दाखल आहे. 7/12 पाहिला असता अर्जदाराच्या नांवे एक एकर 27 गूंठठे (67 आर) एवढीच जमिन आहे. म्हणजे एवढया शेतीसाठी गाडीवरुन शेती करणे व एवढे नूकसान होणे हे विश्वासठेवण्याजोगे नाही.खरे तर अर्जदारास खर्च लावला पाहिजे पण गैरअर्जदार यांची तशी मागणी नाही. सदर वरील बाबीचा विचार केला असता गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करु शकलेले नाहीत. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्य जे.यू.पारवेकर लघूलेखक |