निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 23/09/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 03/10/2011
तक्रार निकाल दिनांकः- 10/06/2013
कालावधी 01 वर्ष 08 महिना 07 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
इरफान खान पिता शबीर खान पठाण. अर्जदार
वय 24 वर्षे. धंदा.व्यापार. अड.एस.एन.वेलणकर.
रा.पलटन मोहल्ला.हिंगोली.
विरुध्द
1 प्राधिकृत अधिकारी. गैरअर्जदार.
इफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कं., अड.ए.जी.व्यास.
पहिला मजला,इनानी बिल्डींग.
लातूर साडी सेंटरच्या वर.जुना कपडा लाईन लातूर. 413 512
2 श्री.शैलेश पिता जयकिशोर दोडिया
वय 30 वर्षे धंदा नोकरी.
रिलेशनशिप एक्सीकेटिव्ह,इफको टोकियो जनरल इन्शुरंस कं.लि.
दुकान नं.33 स्टेडियम कोम्प्लेक्स, परभणी- 431 401
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
अर्जदाराची तक्रार अपघातग्रस्त ऑटोचा विमा दावा नुकसान भरपाई नाकारुन सेवेत त्रुटी दिल्या बद्दल गैरअर्जदार विमा कंपनी यांच्या विरुध्द आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, अर्जदार हा हिंगोली येथील कायमचा रहिवाशी असून त्याने स्वतःच्या खाजगी वापरासाठी बजाज कंपनीचा ऑटो आनंद मोटर्स हिंगोली येथून दिनांक 27/08/2010 रोजी खरेदी केला सदरल ऑटो खरेदीसाठी अर्जदाराने इंडियन कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.हिंगोली या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेवुन खरेदी केला. अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 हे इन्शुरंस कंपनीचे प्राधिकृत अधिकारी आहे व गैरअर्जदार क्रमांक 2 हे सदरील इंशुरन्स कंपनीचे परभणी येथील शाखेचे रिलेशनशिप एक्झीकेटिव्ह आहे.अर्जदाराने त्याचा ऑटो विमा गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडून खरेदीच्या दिवशी म्हणजे 27 ऑगस्ट 2010 रोजी 2,524/- रुपये भरुन उतरविला व त्यानंतर सदरील आटो उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हिंगोली यांच्या कार्यालयात दिनांक 06/09/2010 रोजी एम.एच.38/2794 अन्वये नोंदणी केली अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, दिनांक 26 मार्च 2011 रोजी अर्जदार टायर रिमोल्डच्या दुकानात जात असतांना वाशिम रस्त्यावर एक टॅम्पो उभा होता रात्रीची वेळ होती व समोरुन एका पाठोपाठ वाहन येत असल्यामुळे अर्जदाराने त्याचा ऑटो क्रमांक एम.एच.38/2794 हा सदरील टॅम्पोच्या मागे उभा केला, परंतु टॅम्पो चालकाने त्याचा टॅम्पो अचानकपणे निष्काळजीपणे मागे घेतल्यामुळे ऑटोचा समोरील संपूर्ण भाग दबला गेला व ऑटोचे कॅबीनचे पूर्ण नुकसान होवुन टफही तुटले गेले तसेच हँडल आणि चेचिस वाकला, सदरच्या अपघातामुळे ऑटोचे जवळ पास 30 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाले एवढेच नव्हेतर अर्जदारास देखील डोक्याला, पायाला पाठीवर आणि छातीला मार लागला जखमा झाल्यामुळे टॅम्पो चालकास आवाज देवुनही तो थांबला नाही अर्जदाराने सदरील अज्ञात टॅम्पो चालका विरुध्द हिंगोली पोलीस स्टेशश्न येथे तकार देवुन एफ.आय.आर. नोंदविली त्याचा क्रमांक 52/11 असा आहे अर्जदराचे हे म्हणणे आहे की, अपघाताची घटना घडल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना ताबडतोब घटनेसंबंधी माहिती कळविली गैरअर्जदाराने श्री. मनोहर तोतला यांची सर्व्हेअर म्हणून नियुक्ती केली, व त्यांनी ऑटोचा फायनल सर्व्हे केला. अर्जदाराने त्याचा ऑटो उज्वल इंटरनॅशनल नांदेड येथील गॅरेज वर जवळ पास 40,000/- रुपये खर्च देवुन दुरुस्त केला.व ऑटोची दुरुस्ती झाल्यानंतर अर्जदाराने सर्व बिलांसह व कागदपत्रां समवेत त्याचा विमादावा अपघात घटने पासून एका महिन्याच्या आत गैरअर्जदाराकडे दाखल केला सदरील विमा दावा दाखल केल्यानंतर गैरअर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे वेळोवेळी त्याच्या ऑटोचे अपघाता मध्ये जे नुकसान झाले होते, त्याच्या बद्दल विमा रक्कम मिळण्यासाठी विचारणा केली, परंतु लवकरच चेक मिळेल थोडे दिवस थांबा असे कारणे सांगितले गेले. व त्यानंतर दिनांक 27/05/2011 रोजी अर्जदाराच्या नावे गैरअर्जदार क्रमांक 1 ने जे पत्र पाठविले ते अर्जदारास धक्का दायक होते कारण त्यामध्ये गैरअर्जदार क्रमांक 1 ने असे म्हंटले होते की, “ वाहन हे खाजगी म्हणून नोंदणीकृत केलेले आहे व त्याचा काळा पिवळा रंग खाजगी वाहनासाठी मंजूर नाही व तसेच नोंदणी प्रमाणपत्रान्वये वाहनाचा रंग पांढरा आहे तो रंग का बदलला व त्यामुळे असे दिसते की, वाहन बेकायदेशिररित्या किरायाणे देवुन वापरले ” व सदर बाबतचा खुलासा 15 दिवसाच्या आत करावा अन्यथा आपला विमादावा बंद असे समजण्यात येईल, व त्यानंतर कुठलाही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही, असे कळविले पुढे अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, सदरचा ऑटो हा खाजगी कामासाठीच घेतलेला होता व त्याचा रंग त्यांने कधीही बदलला नाही व ते कधीही बेकायदेशिर किरायाणे देवुन वापरले नाही. विमा काढते वेळी जो रंग दिला आहे तोच रंग आहे. याबाबतचा सर्व खुलासा अर्जदाराने गैरअर्जदार क्रमाक 2 यांच्याकडे जावून केला, परंतु अर्जदाराने कितीही विनंती केली असता, गैरअर्जदाराने केवळ वेळ काढू धोरण अवलंबविले व पाहू व बघु असे उडवा उडवीची उत्तरे दिली. अर्जदार हे म्हणणे आहे की,दिनांक 10/09/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास मागील पत्राच्या संदर्भाने अजून एक पत्र पाठवुन त्याने मागीतलेल्या बाबींचा खुलासा केला नसल्यामुळे विमा दावा बंद केल्याचे कळविले, म्हणून अर्जदारास आर्थिक व मानसिकत्रास झाल्यामुळे सदरची तक्रार ही गैरअर्जदारा विरुध्द दाखल करण्यास भाग पडले, म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारा विरुध्द असा आदेश देण्यात यावा की, अर्जदाराच्या झालेल्या ऑटोच्या नुकसान भरपाईची रक्कम रु. 40,000/- 12 टक्के व्याजाने मानसिकत्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे व तसेच नि.क्रमांक 4 वर 6 कागदपत्रांच्या यादीसह कागदपत्रांचे झेरॉक्स दाखल केले आहे.ज्यामध्ये नि.क्रमांक 4/1 वर विमा पॉलिसी, नि.क्रमांक 4/2 वर सदरच्या ऑटोचे आर.सी.बुक, नि.क्रमांक 4/3 वर एफ.आय.आर.ची प्रत, नि.क्रमांक 4/4 वर घटनास्थळ पंचनामाची प्रत, नि.क्रमांक 4/5 वर 27/05/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास पाठविलेले रेप्युडेशन लेटर, नि.क्रमांक 4/6 वर 10/09/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास पाठविलेले पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
मंचातर्फे गैरअर्जदारांना नोटीस पाठवल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 त्यांचे वकिला मार्फत हजर व नि.क्रमांक 14 वर आपला लेखी जबाब दाखल केला.त्यात त्याचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी असून ती रद्द होण्यायोग्य आहे व तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने सदरचे ऑटो घेतांना विमा कंपनी कडून प्रायव्हेट कार पॅकेज पॉलिसी घेतली होती, परंतु अर्जदाराने सदरील ऑटोचा व्यावसायिक तत्वावर करुन विमा कंपनीचे नियम व अटींचे उल्लंघन केले आहे व तसेच त्याचे हे म्हणणे आहे की, सदरच्या अर्जदाराचा ऑटोचा दिनांक 26 मार्च 2011 रोजी अपघात झालेला नाही व ऑटोचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही, म्हणून तक्रार ही खारीज होण्यायोग्य आहे व तसेच त्याचे हे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 याने दिनांक 27/05/2011 रोजी अर्जदारास पत्र पाठवून कळविले होते की, अर्जदाराने प्रायव्हेट कार पॅकेज पॉलिसी घेतली होती, परंतु ऑटो व्यावसायिक तत्तवावर चालविल्यामुळे पॉलिसीच्या अटीचे व नियमांचे उल्लंघन केले असल्यामुळे याबाबत 15 दिवसांच्या आत खुलासा न केल्यास त्याचा नो क्लेम म्हणून धरण्यात येईल. असे कळविले होते, परंतु अर्जदाराने याबाबतचा कोणताही खुलासा कंपनीकडे केलेला नाही व तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की, सर्व्हेअरच्या अहवाला प्रमाणे अपघातग्रस्त वाहनाचे नुकसान फक्त 5,570/- एवढे झाले होते.व सर्व्हेअरने काढलेले फोटो मंचासमोर दाखल केले आहे, त्यामुळे अर्जदार हा 40,000/- रुपयांची मागणी करण्यासाठी पात्र नाही व तसेच त्याचे हे म्हणणे की, पॉलिसीच्या अटीचे नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सदरची तक्रार फेटाळण्यात यावी.अशी मंचास विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे व तसेच नि.क्रमांक 16 वर मनोहर रामनारायणजी तोतला सर्व्हेअरचे शपथपत्र दाखल केले आहे व तसेच नि.क्रमांक 18 वर 4 कागदपत्रांच्या यादीसह कागदपत्रे दाखल केली आहेत.ज्यामध्ये नि.क्रमांक 18/1 वर सर्व्हेअरचा रिपोर्ट, नि.क्रमांक 18/2 व 18/3 वर अपघातग्रस्त ऑटोचे फोटो, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांस मंचातर्फे जारी केलेली नोटीस तामिल, परंतु गैरअर्जदार क्रमांक 2 हा मंचासमोर हजर नाही,त्यामुळे 03/01/2012 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा नाकारुन
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
गैरअर्जदार व अर्जदार यांच्यात वादाचा मुद्दा फक्त गाडीचा खाजगी वापर अथवा भाडयासाठी झालेला वापर एवढाच मर्यादित आहे.इतर कोठल्याही मुद्यावर फारसा वाद नाही.अर्जदाराने हे सिध्द केले आहे की, ऑटो क्रमांक एम.एच.38/2794 चा मालक होता ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/2 या कागदपत्रावरुन सिध्द होते.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्याने सदरच्या ऑटोचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी केलेला नाही सदर ऑटोचा रंग हा कंपनीतून विकत घेतांनाच काळा पिवळा होता व तसेच सदरच्या ऑटोचा विमा काढते वेळी ऑटोचा रंग हा काळा पिवळा होता अर्जदाराचे सदरचे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण जेव्हा ऑटोचा अपघात झाला त्यावेळी अर्जदाराचे म्हणणे प्रमाणे ऑटोचे फोटो काढलेले होते, आणि त्यात ऑटोचा कलर काळा पिवळा होता, सदर अर्जदाराचे म्हणणे हे मंचास खोटे वाटते, कारण अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/2 वरुन आर.सी. बुक वरुन हे सिध्द होते की, अर्जदाराचा ऑटो क्रमांक एम.एच.38/2794 हा नोंदणीकृत करते वेळी सदरच्या ऑटोचा कलर हा पांढरा होता व तसेच गैरअर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 18/2 व 18/3 फोटो वरुन हे सिध्द होते की, सदरच्या ऑटोचा अपघातावेळी ऑटोचा रंग हा काळा पिवळा होता.याचाच अर्थ असा होतो की, अर्जदाराने ऑटो खरेदी केल्यानंतर परत काळा पिवळा रंग देवुन तो सदरचा ऑटो प्रवासी वाहतुकीसाठी वापरला हे सिध्द होते.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने ऑटोचा विमा प्रायव्हेट कार पॅकेज पॉलिसी अंतर्गत काढली होती त्याचा पुरावा म्हणून नि.क्रमांक 4/1 वर पॉलिसीची प्रत दाखल केलेली आहे ज्यावर प्रायव्हेट कार सर्टिफिकेट ऑफ इन्शुरंस कम डिक्लीयरेशन असे स्पष्ट लिहिलेले आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, सदरची विमा पॉलिसी ही खाजगी वाहन वापरा करीताच होती व त्या पॉलिसीचे टर्म्स अँड कंडिशन मधील लिमिटेशन अज टु युज या क्लॉज मध्ये हायर रिवार्डसाठी वापरु नये, असे स्पष्ट उल्लेख केला आहे. जो पुढील प्रमाणे आहे. Limitation as to use : The Policy covers use of vehicle for any purpose other than hire or reward, carriage of goods, organized racing, pace making, speed testing, reliability trails, use in connection with motor trade. यावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराने पॉलिसीत दिलेल्या अटींचा Flagrant उल्लंघन करुन खाजगी वापरावयाचा ऑटो हा प्रवासी वाहतुकीसाठी केला जे की,मंचास बेकायदेशिर वाटते, व अर्जदार हा त्याची तक्रार सिध्द करण्यास असमर्थ ठरला आहे. व तसेच गैरअर्जदार क्रमाक 1 ने त्याचा विमा प्रस्ताव बंद करुन कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही हे सिध्द होते म्हणून वरील मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा अर्ज नामंजूर करण्यात येते.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष