Exh.No.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र.16/2012
श्री राजाराम पांडूरंग गव्हाणकर
मु.पो.ता.कुडाळ (माठेवाडा),
जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
मॅनेजर,
भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गारगोटी
(अवसायानात) ता.भुदरगड, जि. कोल्हापूर.
प्रशासकीय कार्यालय – 1105 ई,
साईक्स एक्सटेंशन, शाहूपरी,
कोल्हापूर. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. एम.डी. देशमुख, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
तक्रारदारातर्फेः- व्यक्तीशः
विरुद्ध पक्षातर्फे- गैरहजर.
(मंचाच्या निर्णयाद्वारे श्री एम्.डी. देशमुख, अध्यक्ष)
निकालपत्र
(दि.24/05/2012)
1) प्रस्तुत प्रकरणात तक्रारदाराने स्वतः युक्तीवाद केला आहे. तक्रारदाराच्या तक्रारीचे अवलोकन केले असता, तक्रारदार सामनेवाला संस्थेकडे सेवेत होते व तक्रारदार सेवेत असतांना त्यांनी सामनेवाला संस्थेकडून घर बांधणी कर्ज रक्कम रु.5,00,000/- (रुपये पाच लाख) घेतले होते. तक्रारदार हे दि.30/09/2002 रोजी राजीनामा देऊन सेवामुक्त झाले आहेत. सामनेवाला संस्थेने तक्रारदाराच्या कर्जावरती दि.27/03/1999 पासून दि.30/09/2000 पर्यंत व्याज आकारणी 10 % दराने केली परंतु दि.01/04/2000 ते 21/03/2003 (01/04/2000 ते 30/09/2000 फरक व्याज 17/01/2001 रोजी खर्च टाकले व व्याज आकारणी 17% दराने केली. त्यामुळे व्याजाच्या फरकाची रक्कम व त्यावरील होणारे व्याज 12% दराने परत मिळावे तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी व प्रवास खर्चापोटी रु.12,000/- मिळावेत व तक्रारीचा खर्च रु.4,000/- परत मिळण्याबाबत विनंती केलेली आहे.
2) तक्रारदाराच्या तक्रारीतील संपूर्ण कथन विचारात घेता तक्रारीस कारण हे दि.01/04/2000 ते 21/03/2003 या कालावधीत घडलेले आहे. ग्राहक संरक्षण कायदा कलम 24(अ) मधील तरतुदी विचारात घेता सदरच्या तक्रारीस मुदतीची बाधा येते या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब आदेश -
- आदेश -
प्रस्तुतची तक्रार अस्वीकृत करण्यात येते.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 24/05/2012
sd/- sd/- sd/-
(वफा खान) (एम.डी. देशमुख) (उल्का गावकर)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.