Maharashtra

Nagpur

CC/14/475

Mahendra A. Mahurkar - Complainant(s)

Versus

Repro Graphics Pvt Ltd - Opp.Party(s)

Keshav R. Kakpure

21 Jan 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/14/475
 
1. Mahendra A. Mahurkar
Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Repro Graphics Pvt Ltd
IIO Unit No 19 3rt Floor Mahalaxmi Industrial Estate Gandhi Nagar Lower Parel Mumbai 400013
Mumbai
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Complainant:Keshav R. Kakpure, Advocate
For the Opp. Party:
ORDER

श्री. मनोहर चिलबुले, मा. अध्‍यक्ष यांचे आदेशानुसार.

 

 

- आ दे श -

(पारीत दिनांक – 21 जानेवारी, 2016)

 

 

1.                तक्रारकर्त्‍याने  प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्‍वये दाखल केली  आहे. तक्रारकर्ता महेंद्र माहूरकर यांनी स्‍वयंरोजगारासाठी वि.प. रेप्रो ग्राफीक्‍स प्रायव्‍हेट लिमिटेड यांचेकडून “Digital Printer (Eco Solvent) Sino Color Strom SJ740 width 74” Color CMYK Print Head EPSON DX7 (Single Head) (DP SINO SJ-740 1.8 with DX7)  रु.6,00,000/- किंमतीचा खरेदी करण्‍याचा करार केला. त्‍यापैकी 50 टक्‍के रक्‍कम रु.3,00,000/- मशिन खरेदी करतेवेळी वि.प.ला दिली. उर्वरित रक्‍कम कराराप्रमाणे टप्‍या-टप्‍याने द्यावयाचे असल्‍याने वि.प.ने सदर मशिन तक्रारकर्त्‍यास 15.10.2013 रोजी पाठविले. सदर मशिनमध्‍ये कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाल्‍यास त्‍याचे त्‍वरित निराकरण करुन देण्‍याबाबत वि.प.ने लेखी हमी दिली.

 

                  मशिन तक्रारकर्त्‍याचे येथे बसविल्‍यानंतर सुरुवातीपासूनसच तांत्रिक अडचणींना सुरुवात झाली. तक्रारकर्त्‍याने त्‍याबाबत वि.प.ला कळविल्‍यावर त्‍याने आपल्‍या सर्विस इंजिनियरला पाठवून पाहणी केली. परंतू मशिनमधील तांत्रिक बिघाड सर्विस इंजिनियरला पूर्णपणे काढता आला नसल्‍याने त्‍याने मशिन तात्‍पुरती चालू करुन दिली. परंतू त्‍यानंतरही मशिन मध्‍ये बिघाड येणे सुरु राहिल्‍याने तक्रारकर्त्‍याला सदर मशिनवर पूर्णतः काम करता आले नाही व त्‍यामुळे त्‍याचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच शारिरीक व मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागत आहे. वि.प.ने तक्रारकर्त्‍याकडून तक्रारी प्राप्‍त झाल्‍यानंतर मशिन दुरुस्‍तीसाठी वेळोवेळी सर्विस इंजिनियरला पाठविले, परंतू आजपर्यंत सर्विस इंजिनियर येऊनही मशिन पूर्णपणे दुरुस्‍त झाले नाही. याचाच अर्थ वि.प.ने तक्रारकर्त्‍यास विकलेली मशिन सदोष आहे.

 

                  तक्रारकर्त्‍याने 30.06.2014 रोजी वि.प.ला नोटीस वजा ई-मेलद्वारे तक्रारी पाठविल्‍या. सदर पत्र प्राप्‍त होताच वि.प.ने मशिनमधील दोष दुरुस्‍त करण्‍याऐवजी तक्रारकर्त्‍यास मशिन परत घेऊन जाण्‍याचे व उर्वरित रक्‍कम वसुलीबाबत कारवाई करण्‍याची धमकी दिली. कराराचेवेळी वि.प.ने तक्रारकर्त्‍याकडून युको बँक लिमि. शाखा ईतवारी, नागपूर 379711 ते 379719 असे नऊ धनादेश सिक्‍युरीटी म्‍हणून घेतले आहे आणि ते अद्यापही वि.प.कडे आहे. वि.प. सदर धनादेशाचा गैरवापर करण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

 

                  तक्रारकर्त्‍याने 25.08.2014 रोजी आपल्‍या अधिवक्‍त्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून सदोष मशिन बदलवून देण्‍याचे अथवा तक्रारकर्त्‍याकडून घेतलेले पैसे आणि झालेला खर्च परत करुन सदोष मशिन परत नेण्‍याबाबत वि.प.ला कळविले. परंतू नोटीस मिळूनही वि.प.ने नोटीसची पूर्तता केली नाही, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

1)    वि.प.ने “Digital Printer (Eco Solvent) Sino Color Strom SJ740 width 74” Color CMYK Print Head EPSON DX7 (Single Head) (DP SINO SJ-740 1.8 with DX7) मशिन पूर्णतः    बदलवून द्यावे. किंवा

      वि.प.ने स्विकारलेली रक्‍कम रु.4,50,000/- व उपरोक्‍त मशिनवर झालेला खर्च   रु.25,000/- परत करावी व वि.प.ने मशिन परत न्‍यावी.

2)    मानसिक त्रासाबाबत व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.25,000/- मिळावे.

 

तक्रारीसोबत कराराची प्रत, ईनव्‍हाईस क्र. 704, 827 व 1052 ची प्रत, ई-मेलच्‍या प्रती, नोटीस व तिला आलेले उत्‍तर दस्‍तऐव दाखल केलेले आहेत.

 

2.                मंचाकडून वि.प.ला पाठविलेल्‍या तक्रारीचा नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर अधिवक्‍ता सौमित्र पालीवाल यांचेमार्फत 24.03.2014 रोजी हजर झाले आणि लेखी उत्‍तरास वेळ मिळावा म्‍हणून विनंती केली. परंतू त्‍यानंतर सतत गैरहजर राहिले आणि लेखी उत्‍तर दाखल केले नाही व उर्वरित कार्यवाहीत भाग घेतला नाही, म्‍हणून वि.प.विरुध्‍द प्रकरण लेखी उत्‍तराशिवाय चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.

 

3.                तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांच्‍या परस्‍पर विरोधी विधानांवरुन खालिल मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.

 

            मुद्दे                                             निष्‍कर्ष

 

1विरुध्‍द पक्षाने सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार किंवा अनुचित व्‍यापार

 पध्‍दतीचा अवलंब केला आहे काय ?                           होय.       

          

2.  तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यांस पात्र आहे काय ?          होय.

 

3.  आदेश काय ?                                         अंतिम आदेशाप्रमाणे      .

 

  • कारणमिमांसा  -

 

 

4.                मुद्दा क्र.1 ते 3 बाबत -  सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्त्‍याने वि.प.कडून तक्रारीत नमूद केलेल्‍या डिजीटल प्रीटींग मशिन खरेदी करण्‍याबात वि.प.बरोबर केलेला 14.10.2013 च्‍या करारनाम्‍याची प्रत दस्‍तऐवज क्र. 1 वर दाखल केली आहे. तसेच सदर मशिन रु.5,90,625/- ला खरेदी केल्‍याबाबतचे बिल दस्‍तऐवज क्र. 2 वर दाखल केले आहे. याशिवाय, सदर मशिनरी चालविण्‍यासाठी वेळोवेळी खरेदी केलेल्‍या साहित्‍याची बिलेदेखील दाखल केलेली आहे. तसेच मशिनरीमध्‍ये बिघाड झाल्‍यामुळे ते दुरुस्‍तीकरीता सर्विस इंजिनियरला पाठवावे म्‍हणून तक्रारकर्त्‍याने वि.प.सोबत वेळोवेळी 21.12.2013 पासून ई-मेलद्वारे केलेला पत्रव्‍यवहार तक्रारकर्त्‍याने दस्‍तऐवज क्र. 5 वर दाखल केला आहे. तसेच अधिवक्‍ता काकपूरे यांचेमार्फत 25.08.2014 रोजी वि.प.ला दिलेल्‍या नोटीसची प्रत दस्‍तऐवज क्र. 6 वर व सदर नोटीसला वि.प.कडून प्राप्‍त झालेले उत्‍तर दस्‍तऐवज क्र. 7 वर दाखल केले आहे. वरील सर्व दस्‍तऐवजांचा विचार करता तक्रारकर्त्‍याने 14.10.2013 च्‍या करारनाम्‍यांन्‍वये वि.प.कडून रु.5,90,625/- ची डिजीटल प्रींटींग मशिन खरेदी केल्‍याचे आणि त्‍यापोटी रु.3,00,000/- मशिन खरेदीचेवेळी दिल्‍याचे स्‍पष्‍ट होते. याशिवाय, मशिन खरेदी केल्‍यानंतर ताबडतोब 21.12.2013 पासूनच सदर मशिन तांत्रिक बिघाड निर्माण झाल्‍याने व सर्विस इंजिनियरने प्रयत्‍य करुनही सदर दोष पूर्ण निवारण झाला नसल्‍याचे तक्रारकर्त्‍याने वि.प.बरोबर ई-मेलद्वारे केलेला पत्रव्‍यवहारातून स्‍पष्‍ट होते. तसेच सिक्‍युरीटी म्‍हणून वि.प.ने तक्रारकर्त्‍याकडून तक्रारीत नमूद केलेले 9 धनादेश स्विकारल्‍याचे देखल वि.प.ने तक्रारकर्त्‍यास दस्‍तऐवज क्र. 7 प्रमाणे जे उत्‍तर पाठविले आहे, यावरुन स्‍पष्‍ट होते. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍यास विकलेली डिजीटल प्रींटींग मशिनमध्‍ये कोणताही दोष नाही हे वि.प.ने मंचासमोर हजर होऊन आणि लेखी उत्‍तर दाखल करुन नाकारलेले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने वि.प.कडून खरेदी केलेले डिजीटल प्रींटींग मशिनमध्‍ये तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे निर्मिती दोष असल्‍याने त्‍यात वारंवार बिघाड होता आणि त्‍यातून तक्रारकर्त्‍याच्‍या व्‍यवसायावर विपरित परिणाम झालेला आहे हे तक्रारकर्त्‍याचे खोटे ठरविण्‍यासाठी कोणतेही कारण दिसून नाही.

 

                  रु.6,00,000/- किमतीची डिजीटल प्रींटींग मशिन तक्रारकर्त्‍यास विकली आणि त्‍या मशिनमध्‍ये एक वर्षाच्‍या वारंटी काळात निर्माण झालेला बिघाड वारंटीच्‍या अटी व शर्तीप्रमाणे निवारण न करणे ही निश्चितच वि.प.ने तक्रारकर्त्‍या ग्राहकाप्रती अवलंबिलेली सेवेतील न्‍यूनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे. म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.

 

                  वि.प.ने तक्रारकर्त्‍यास विकलेले डिजीटल प्रींटींग मशिनमध्‍ये एक वर्षाच्‍या वारंटी काळात बिघाड निर्माण झाला आणि ते तक्रारकर्त्‍याने वारंवार विनंती करुनही वि.प.ने दुरुस्‍त करुन दिलेली नसल्‍यामुळे तक्रारकर्ता तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे सदोष डिजीटल प्रींटींग मशिन बदलवून नविन मशिन मिळण्‍यास अथवा तक्रारकर्त्‍याने सदर मशिन खरेदीपासून वि.प.ला आतापर्यंत दिलेली रक्‍कम रु.4,50,000/- दि.15.10.2013 पासून पूर्ण अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहे. याशिवाय, वि.प.ने तक्रारकर्त्‍याकडून सिक्‍युरीटी म्‍हणून स्विकारलेले धनादेश क्र. 379711 ते 379719 असे नऊ धनादेश तक्रारकर्ता परत मिळण्‍यास पात्र आहे. शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाईदाखल रु.15,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळण्‍यासदेखील तक्रारकर्ता पात्र आहे. म्‍हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहेत.

 

                  वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

  • आ दे श

 

      तक्रारकर्त्‍याची ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 12 खालील तक्रार वि.प.विरुध्‍द      खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.    

1)    वि.प.ला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला डिजीटल प्रींटींग मशिन बदलवून नविन मशिन द्यावी किंवा वि.प.ने तक्रारकर्त्‍याने सदर मशिन खरेदी करतांना वि.प.ला दिलेली रक्‍कम रु.4,50,000/- दि.15.10.2013 पासून पूर्ण अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याजासह परत करावी. (वि.प.कडून आदेशाप्रमाणे  पूर्तता झाल्‍यावर तक्रारकर्त्‍याने      वि.प.चे सदोष डिजीटल प्रींटींग मशिन त्‍यास परत करावे.)

2)    वि.प.ने तक्रारकर्त्‍यास शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाईबाबत    रु.15,000/- आणि तक्रार खर्चाबाबत रु.5,000/- द्यावे.

3)    वि.प.ने आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून एक महिन्‍याचे आत करावी.

4)    सदर आदेशाची  प्रमाणित प्रत उभय पक्षांना  विनामुल्‍य द्यावी.

5)    प्रकरणाची फाईल तक्रारकर्त्‍यास परत करावी.

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.