Maharashtra

Satara

CC/11/35

Shri.Manik Annasoo Shinde - Complainant(s)

Versus

Renukamata Gramin Bigar sheti Sah . Pat - Opp.Party(s)

Jagadale

20 May 2011

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 11 of 35
1. Shri.Manik Annasoo ShindeRamacha Got satarasatara ...........Appellant(s)

Vs.
1. Renukamata Gramin Bigar sheti Sah . Pat Shhunagar Godoli Satarasatara2. Sanchalk . S.R. KulkarniShahunagar Godoli Satara3. Sou. V.S. BhatA/p Asale Tal Wai Dist satara4. S.R. Kulkrni SanchalkShhunagar Godoli Satara5. Shri .S.P. DeshapandeShniwar Peth Satara6. Shri. S.R. Padaval SanchalkBhartvawadi Tal Dist Satara7. Shri . S.Y.BhandareGodoli satara8. Shri. G.B. KulkarniM. I.D.C. satara9. Shri . P.J. KulkarniShhunagar Godoli Satara10. Shri . N. B. Phadanis Shhunagar Godoli Satarasatara11. Sou. M. S. Kulakrni SanchalkShhunagar Godoli Satara12. Shri J. N. PawarParsanis Co. Satara13. Shri. M. y. GadhaveShhunagar Godoli Satara ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 20 May 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.22
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 35/2011
                                          नोंदणी तारीख – 28/2/2011
                                          निकाल तारीख – 20/5/2011
                                          निकाल कालावधी – 82 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 
(श्री सुनिल कापसे, सदस्‍य यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
1. श्री माणिक आण्‍णासो शिंदे
   रा. 18, गणेश कॉलनी, शाहूनगर
   सातारा
2. श्री शंकर रामचंद्र देशपांडे
   रा.212, रामाचा गोट, सातारा                      ----- अर्जदार
                                          (अभियोक्‍ता श्री.विकास जगदाळे)
 
      विरुध्‍द
1. रेणुकामाता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍था
   मर्या. शाहूनगर, गोडोली, सातारा
   शाहूनगर, गोडोली, सातारा तर्फे
   संचालक सतिश रंगनाथ कुलकर्णी
2. श्री सतिश रंगनाथ कुलकर्णी, संचालक
   रा. बंधुप्रेम, शाहूनगर, गोडोली, सातारा
3. सौ वैशाली सुर्यकांत भट, संचालक
   मु.पो. आसले (पाचवड), हॉटेल विरंगुळाजवळ,
   ता.वाई जि. सातारा
 
 
 
4. श्री शशिकांत रंगनाथ कुलकर्णी, संचालक
   श्रीनिवास, विशाल सहयाद्री हौसिंग सोसायटी,
   शाहुनगर, गोडोली, सातारा
5. श्री सुधीर पांडुरंग जगताप, संचालक
   108, शनिवार पेठ, सातारा
6. श्री शंकर राजाराम पडवळ, संचालक
   मु.पो.भरतगाववाडी, ता.जि.सातारा
7. श्री सदाशिव यशवंत भंडारे, संचालक
   26, समाधान, शिवनेरी हौसिंग सोसायटी,
   गोडोली, सातारा
8. श्री गिरीश भगवान कुलकर्णी, संचालक
   रा.110, बारावकरनगर, छ.प्रतापसिंह गृहनिर्माण
   संस्‍था, एम.आय.डी.सी. सातारा
9. श्री परिक्षीत जयंत कुलकर्णी, संचालक
   विद्युत, विशाल सहयाद्री हौसिंग सोसायटी,
   शाहूनगर, गोडोली, सातारा
10. श्री नंदकुमार बाळकृष्‍ण फडणीस, संचालक
    रा.18, आझाद कॉलनी, शाहूनगर, गोडोली,
    सातारा
11. सौ मेधा सुभाष कुलकर्णी, संचालक
   प्‍लॉट नं.5, रुक्मिणी हौसिंग सोसायटी,
   शाहूनगर, गोडोली, सातारा
12. श्री जितेंद्र नथू पवार, संचालक
   रा.बी/1/3, गजवदन गार्डन, पारसनीस कॉलनी,
   सातारा
13. मारुतराव यादवराव गाढवे, संचालक
   51, गुरुकृपा हौसिंग सोसायटी,
   शाहूनगर, गोडोली, सातारा                        ----- जाबदार
                                        (अभियोक्‍ता श्री एस.व्‍ही.कुलकर्णी)
 
 
 
 
 
न्‍यायनिर्णय
 
अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे -
1.     अर्जदार यांनी जाबदार संस्‍थेमध्‍ये जाबदार संस्‍थेचे संस्‍थापक व सर्वेसर्वा श्री सतिश रंगनाथ कुलकर्णी यांचे नावे संयुक्‍त खाते उघडले असून त्‍यातील दि.31/5/2008 रोजीची जमा रक्‍कम रु.2,14,600/- वगळता सर्व रकमा अर्जदार क्र.1 व 2 यांच्‍या आहेत. परंतु हे खाते संयुक्‍त असलेने त्‍यातील रक्‍कम अर्जदार यांना काढता येत नाही. सदरच्‍या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार क्र.2 यांचेकडे केली असता जाबदार यांनी रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली आहे. या खात्‍यातील रकमा काही व्‍यक्‍तींना जाबदार यांनी प्रदान केलेल्‍या आहेत. तसेच अर्जदार क्र.1 यांचे बचत खाते क्र.149 मधील रक्‍कम देण्‍यासही जाबदार यांनी नकार दिलेला आहे. तसेच अर्जदार क्र.2 यांचे नावे असणा-या मुदत ठेवीवरील रक्‍कम देण्‍यासही जाबदार यांनी नकार दिलेला आहे.  थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्‍यात यावयाची रक्‍कम न दिल्‍यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे ग्राहक आहेत. त्‍यामुळे जाबदार संस्‍थेकडून बचत खात्‍यांतील व मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्‍कम वसूल होऊन मिळण्‍यासाठी अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्‍ये  अर्जदार यांनी बचत खाते व मुदत ठेवींची व्‍याजासह होणारी एकूण रक्‍कम तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.10,000/- ची मागणी केलेली आहे.
 
2.    प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे कामी नि.20 ला कैफियत दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. अर्जदार क्र.1 हे जाबदार संस्‍थेचे उपाध्‍यक्ष म्‍हणून बराच काळ काम पहात होते. जाबदार क्र.2 हे संस्‍थेत बराच काळ सरव्‍यवस्‍थापक म्‍हणून काम पहात होते. अर्जदार यांनी मे. मंचाचे कार्यक्षेत्रात नसणारा वाद मांडला आहे. अर्जदार खाते क्र.862 बाबत केलेल्‍या नोंदी खोटया आहेत. यासंदर्भातील काही कागदपत्रे अर्जदार यांनी लंपास केली आहेत. दोन्‍ही अर्जदार, अॅड अरुण काटकर, सुधाकर बोबडे व जाबदार क्र.2 यांच्‍या पत्‍नी सौ शीतल कुलकर्णी यांनी कास येथे जमीन खरेदी केली. खाते क्र.862 चा व्‍यवहार या सदरचे व्‍यवहाराशी संबंधीत आहे. अर्जदार यांनी जाबदार क्र.2 यांना दिलेली रक्‍कम रु.1,50,000/- ही या जमीनीचे खरेदीपोटी दिलेली आहे. अर्जदार यांनी नमूद केलेल्‍या दुस-या बचत खात्‍यातील रक्‍कम तसेच मुदत ठेवीवरील रक्‍कम देण्‍यास जाबदार यांनी नकार दिलेला नाही. अर्जदार यांनी नियमानुसार मागणी केल्‍याशिवाय त्‍यांना रक्‍कम देता येणार नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा.
 
3.    अर्जदार यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद नि.25 पाहिला. जाबदार यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद नि.32 पाहिला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 
 
4.    अर्जदार यांचा तक्रारअर्ज व त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे व साक्षीदाराचे शपथपत्र तसेच जाबदार यांची कैफियत व त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे व साक्षीदाराचे शपथपत्र पाहिले असता असे स्‍पष्‍ट दिसून येते की, अर्जदार व जाबदार क्र.2 यांचे नावे असलेल्‍या संयुक्‍त खाते क्र.862 शी जमीन खरेदी व्‍यवहाराचा संबंध आहे. महत्‍वाची बाब म्‍हणजे सदरचे खाते हे अर्जदार क्र.1 व जाबदार क्र.2 यांचे संयुक्‍त नावे आहे व सदरच्‍या खात्‍यातील रक्‍कम ही अर्जदार यांचेच मालकीची आहे ही बाब अर्जदार यांनी ठोस पुराव्‍यानिशी सिध्‍द केलेली नाही.   तसेच सदरच्‍या खात्‍यातील रकमांबाबत अर्जदार व जाबदार यांची कथने तसेच साक्षीदारांच्‍या शपथपत्रातील कथने पाहता सदरच्‍या खात्‍यातील रकमांचे वादावर निर्णय देणेसाठी अर्जदार व जाबदार यांचे जबाब, उलटतपास, कागदपत्रांची पडताळणी, साक्षीदारांचे व इतर संबंधीतांचे जबाब या बाबींची आवश्‍यकता आहे. सदरच्‍या बाबींचा या मंचास कायद्यानुसार ठरवून दिलेल्‍या कार्यकक्षेमध्‍ये समावेश होत नाही. सबब सदरचे खात्‍यातील रकमांबाबत आदेश करण्‍याचे अधिकारक्षेत्र या मंचास नाहीत असे या मंचाचे मत आहे. जरुर तर अर्जदार यांनी याबाबत योग्‍य त्‍या न्‍यायालयात दाद मागावी.
5.    अर्जदार क्र.1 यांनी त्‍यांचे बचत खाते क्र.149 मधील शिल्‍लक रकमेची मागणी केली आहे. तसेच जाबदार क्र. 2 यांनी त्‍यांची मुदत ठेव पावती क्र. 302 वरील रकमेची मागणी केली आहे. बचत खाते क्र.149 चे अवलोकन केले असता सदरचे खाते हे फक्‍त अर्जदार यांचे नावे आहे व त्‍यामध्‍ये काही रक्‍कम शिल्‍लक आहे. तसेच ठेवपावती क्र.302 चे अवलोकन केले असता सदरच्‍या पावतीची मुदत संपलेली आहे व सदरची पावती ही कोणत्‍याही कर्जास गहाण नाही ही बाब दिसून येते. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेल्‍या सदरच्‍या दोन्‍ही रकमा व्‍याजासह  देण्‍यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्‍या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्‍पष्‍ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्‍हणजे ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या रकमेवर व्‍याजासहित देय झालेली रक्‍कम ठेवींची मुदत संपलेनंतर दिलेली नाही तसेच बचत खात्‍यातील रक्‍कमही दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्‍कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे.
 
6.    या सर्व कारणास्‍तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्‍यात येत आहे.
 
आदेश
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व
    संयुक्‍तरित्‍या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्‍यात.
    अ. अर्जदार क्र.2 यांना ठेवपावती क्र.302 वरील मूळ रक्‍कम ठेवपावतीमध्‍ये
       नमूद केल्‍याप्रमाणे देय होणा-या व्‍याजासह रक्‍कम द्यावी तसेच ठेवीची मुदत
       संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9     
       टक्‍केंप्रमाणे व्‍याजासह द्यावी.
    ब. अर्जदार क्र.1 यांना बचत खाते क्र.149 वरील शिल्‍लक रक्‍कम बचत खात्‍याचे
       नियमाप्रमाणे देय होणा-या व्‍याजासह द्यावी.
    क. मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/- द्यावेत.
    ड. अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 2,000/- द्यावेत.
3. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
दि. 20/5/2011
 
 
 
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)         (विजयसिंह दि. देशमुख)
   सदस्‍य                   सदस्‍या                     अध्‍यक्ष
 
 
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER