मे. जिल्हाग्राहकतक्रारनिवारणमंच, सातारायांचेसमोर तक्रार अर्ज क्र. 72/2011 निकाल तारीख – 05/09/2011 श्री. महेंद्र एम.गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या (श्री. महेंद्र एम.गोस्वामी, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारित केला) --------------------------------------------------------------------------------------- श्री सदाशिव भंडारे ...... तक्रारदार विरूध्द रेणूकामाता सहकारी पतसंस्था सातारा ....... जाबदार नि. 1 खालीलआदेश 1. तक्रारदार यांच्या ठेव व बचत खात्यातील रकमा व्याजासह मिळाव्यात यासाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2. सदरच्या तक्रारीची नोटीस विरुध्द पक्षकार क्र. 1 ते 8 यांना बजावण्यात आले त्यानुसार विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 हे त्यांचे वकिलांमार्फत आमचेसमोर हजर होवून नि.12 वर म्हणणे दाखल केले आहे. तसेच विरुध्द पक्षकार 3 ते 8 यांनी नि. 21 वरील पुरसीसव्दारे विरुध्दपक्षकार 1 व 2 यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे तेच आपले लेखी म्हणणे आहे असे स्पष्ट केले. त्यावर तक्रारदारांनी आपले प्रतिउत्तराचे शपथपत्र नि. 23 ला दाखल केले आहे. 3. दरम्यान तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांचेदरम्यान आपशी तडजोड होवून त्यांनी निशानी 23 वर तडजोडीची पुरसीस दाखल केली आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी निशानी 24 वरील पुरसीसव्दारे विरुध्द पक्षकार क्र. 3 ते 8 यांचेविरुध्द तक्रार चालवावयाची नसल्याने त्यांची नावे वगळावीत अशी विनंती केली. तसेच तडजोड झाल्यामुळे तक्रार प्रकरण निकाली करावी असे निशानी 25 वरील पुरसीसव्दारे केली. 4. तक्रारदार व विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 यांचे दरम्यान झालेल्या आपशी तडजोडी दरम्यान आम्ही सदरचे प्रकरण निकाली करत असून त्यादृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. तक्रारदार व विरुध्द पक्षकार क्र. 1 व 2 यांचे दरम्यान झालेल्या तडजोडीनुसार व त्यांनी दाखल केलेल्या निशानी 22 वरील तडजोड पुरसीसनुसार सदरचे प्रकरण निकाली काढणेत येते. 2. निशानी 22 वरील तडजोड पुरसीस हे निशानी क्र.1 वरील आदेशाचा भाग समजणेत यावा. 3. खर्चाबाबत काही हुकूम नाही. 4. तक्रार प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते. सातारा दि. 05/09/2011 (सुनिल कापसे ) (एम.एम.गोस्वामी) सदस्य अध्यक्ष
| Mr. Sunil K Kapse, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |