Maharashtra

Kolhapur

CC/16/305

Satish Narsu Magdum - Complainant(s)

Versus

Renault Kolhapur Unique Automobiles (Maharashtra) Pvt.Ltd. - Opp.Party(s)

Mangave

27 Dec 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/16/305
( Date of Filing : 04 Oct 2016 )
 
1. Satish Narsu Magdum
106,Mahasatta Chauk,Ichalkaranji,Tal.Hatkangle,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Renault Kolhapur Unique Automobiles (Maharashtra) Pvt.Ltd.
198/A/3/5-k/2,E Ward,Bhagwan Complex,front of Geeta Mandir,Kavala Naka,
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 27 Dec 2018
Final Order / Judgement

 न्‍या य नि र्ण य

 

व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा 

 

1.     तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील  कथन थोडक्‍यात पुढीलप्रमाणे—

  

      तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडून दि. 18/7/16 रोजी रेनॉल्‍ट लॉजी-85 एस.टी.डी. ही गाडी रक्‍कम रु.7,78,000/- या किंमतीस खरेदी केलेली आहे.  सदरचे गाडीचा नोंदणी क्र. एमएच-09-बीएक्‍स-4919 असा आहे.  सदरची गाडी घेतलेनंतर दोन दिवसांनी तक्रारदार हे गाडी घेवून आष्‍टा ता.वाळवा येथे गेले असता गाडी बंद पडली.  सदरची बाब कंपनीला कळविल्‍यानंतर कंपनीचे मेकॅनिकने गाडीच्‍या चाव्‍या ताब्‍यात घेवून गाडी ओढून कंपनीकडे नेली.  तदनंतर तक्रारदाराने चौकशी केली असता तक्रारदार यांच्‍या गाडीच्‍या इंजिनमध्‍ये दोष असलेचे व सदरची गाडी सातारा येथे नेऊन सोडलेचे तक्रारदार यांना समजले.  तदनंतर वि.प. यांनी तक्रारदार यांच्‍या विमाक्‍लेम फॉर्मवर सहया करुन घेतल्‍या.  त्‍यानंतर तक्रारदार हे सातारा येथील वर्कशॉपमध्‍ये गेल्‍यानंतर त्‍यांना त्‍यांचे गाडीचे इंजिन काढून ठेवल्‍याचे व त्‍याचा हेड खराब झालेचे समजले.  मुळातच खराब इंजिन असलेली गाडी तक्रारदार यांचे माथी मारुन वि.प. कंपनीने तक्रारदारांची फसवणूक केली आहे.  तदनंतर तक्रारदारांनी गाडीचे इंजिन काढून ठेवलेचे फोटो काढून घेतले व उत्‍पादित दोष असलेली गाडी मला नको असे सांगून गाडीच पैसे व इतर खर्चाचे रकमेची मागणी केली.  परंतु वि.प. यांनी त्‍यांना उडवाउडवीची उत्‍तरे दिली.  अशा प्रकारे वि.प. ने सेवेत त्रुटी दिली आहे.  म्‍हणून, तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज या मंचात दाखल केला आहे.    

 

2.    प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने गाडी खरेदीची रक्‍कम रु.7,78,000/-, सदर रकमेवर 18 टक्‍के प्रमाणे होणारे व्‍याज रु.1,40,000/-, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

 

3.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत अ.क्र.1 ते 15 कडे अनुक्रमे टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस, तक्रारदार यांना पाठविलेली पत्रे, पॉलिसी पेपर्स, गाडीची कागदपत्रे, पैसे भरलेची पावती, वि.प. यांना पाठविलेली पत्रे, पोस्‍टाची पावती व पोहोचपावती, फोटो, बिल वगैरे कागदपत्रे दाखल केली आहे.  तसेच तक्रारदाराने पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

4.    वि.प. क्र.1 यांनी सदरकामी म्‍हणणे, कैफियत, अॅफिडेव्‍हीट, कागदयादीसोबत वि.प. यांनी तक्रारदार यांना पाठविलेली पत्रे, तक्रारदार यांचे गाडीचे जॉबकार्ड, इन्‍व्‍हॉईस, गाडी डॅमेज झालेचे फोटो वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  वि.प.क्र.1 ने त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारअर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत.  वि.प.क्र.1 ने तक्रारदाराचे तक्रारअर्जावर पुढील आक्षेप घेतलेले आहेत.

 

i)          तक्रारदाराचा तक्रारअर्ज व त्‍यातील सर्व मजकूर मान्‍य व कबूल नाही.

 

ii)    तक्रारअर्ज दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नाही.

 

iii)    तक्रारदाराने वि.प.क्र.1 कंपनीचे नांव चुकीचे नमूद केले आहे. 

 

iv)        तक्रारदार हे वि.प.कंपनीत किती वेळा आले, तक्रारदार यांनी किती किलोमीटर गाडी वापरली, कशामुळे गाडी बंद पडली, गाडी बंद पडणेचे अगोदर काय घटना घडलh होती] याबाबतची कोणतीही माहिती तक्रारअर्जात दिलेली नाही. 

 

v)         वास्‍तविक तक्रारदार यांनी सदरचे गाडीचा व्‍यावसायिक कारणासाठी वापर करताना अपघात झाला आहे.  त्‍यामुळे तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत बसत नाहीत. 

 

vi)        तक्रारदार यांची गाडी सातारा येथे सर्व्हिस स्‍टेशनला नेल्‍यानंतर वि.प. यांना गाडीचे खालचे बाजूस लोअर आर्मचे ठिकाणी व कव्‍हरला गाडी बाहेरुन ठोकर लागल्‍याने डॅमेज झालेचे आढळून आले.  तक्रारदारांनी निष्‍काळजीपणामुळे एखाद्या उंचवटयास गाडी ठोकरली असलेमुळे वाहनाचे नुकसान झाले आहे.  ठोकर लागल्‍यानंतर गाडी तशीच चालू ठेवल्‍याने इंजिनमधील टायमिंग बेल्‍ट तुटून गाडी बंद पडली आहे.  त्‍यामुळे गाडीचे झालेले नुकसान हे तक्रारदाराचे निष्‍काळजीपणामुळे व चुकीमुळे झाले आहे.  त्‍यामुळे तक्रारदारांना सदरची गाडी वॉरंटीमध्‍ये दुरुस्‍त करुन घेता येणार नाही.  त्‍यासाठी पूर्ण रक्‍कम भरुन गाडीची कामे करावी लागतील अथवा विमा रकमेतून करावी लागतील याची कल्‍पना तक्रारदारांना दिली. परंतु त्‍याकडे दुर्लक्ष करुन तक्रारदाराने नवीन गाडी मागणेचा हट्ट धरला.  सदरची तक्रारदारांची मागणी नियमात बसत नसल्‍यामुळे वि.प. यांनी ती नाकारली. 

 

vii)       तक्रारदाराने गाडीचे उत्‍पादक कंपनीस याकामी पक्षकार म्‍हणून सामील केलेले नाही.  वि.प. यांनी तक्रारदारांना गाडी दुरुस्‍त झालेबाबत कळविले परंतु तक्रारदारांनी गाडी घेवून न जाता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.  वि.प यांनी तक्रारदारास कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही.  सबब, तक्रार खर्चासह नामंजूर करावी.

 

 

      अशा स्‍वरुपाचे आक्षेप वि.प. यांनी तक्रारअर्जावर घेतलेले आहेत.

 

5.    वि.प.क्र.2 यांना याकामी नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केले नाही.  सबब, वि.प.क्र.2 यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.

 

6.   वर नमूद तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

­अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

 

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदारास उत्‍पादित दोष असलेले वाहन बदलून न देवून तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ?     

होय

3

तक्रारदार हे वि.प. यांचे गाडीचे खरेदीची किंमत परत मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.  

4

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

वि वे च न

 

7.    वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्‍तरे आम्‍ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदाराने वि.प.क्र.2 यांनी उत्‍पादित केलेली रेनॉल्‍ट लॉजी-85 एस.टी.डी. नोंदणी क्र. एमएच-09-बीएक्‍स-4919 ही गाडी रक्‍कम रु.7,78,000/- या किंमतीस वि.प.क्र.1 यांचेकडून खरेदी केली ही बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही.  तक्रारदारांनी याबाबत कागदयादीसोबत टॅक्‍स इन्‍व्‍हॉईसची प्रत दाखल केली आहे.  सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व विक्रेते आहेत ही बाब निर्विवादपणे स्‍पष्‍ट व सिध्‍द झालेली आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

8.    प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने उत्‍पादित दोष असलेली गाडी तक्रारदारास विकून वि.प. यांनी दूषित सेवा दिली आहे असे कथन केले आहे.  याउलट वि.प. यांनी त्‍यांचे म्‍हणणेमध्‍ये, तक्रारदारांनी निष्‍काळजीपणामुळे एखाद्या उंचवटयास गाडी ठोकरली असलेमुळे वाहनाचे नुकसान झाले व ठोकर लागल्‍यानंतर गाडी तशीच चालू ठेवल्‍याने इंजिनमधील टायमिंग बेल्‍ट तुटून गाडी बंद पडली.  त्‍यामुळे गाडीचे झालेले नुकसान हे तक्रारदाराचे निष्‍काळजीपणामुळे व चुकीमुळे झाले आहे.  त्‍यामुळे तक्रारदारांना सदरची गाडी वॉरंटीमध्‍ये दुरुस्‍त करुन घेता येणार नाही असे कथन वि.प.क्र.1 यांनी केले आहे.  वि.प. यांनी त्यांचे कथनाचे पुष्‍ठयर्थ गाडीचे फोटो व गाडी दुरुस्‍तीच्‍या खर्चाचा तपशील दाखल केला आहे.  परंतु ठोकर लागल्‍यामुळेच गाडीचे इंजिनामध्‍ये दोष निर्माण झाला हे सिध्‍द करण्‍यासाठी वि.प. यांनी कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही.  गाडीस ठोकर लागल्‍यामुळे गाडीचे नुकसान झाले हे केवळ फोटोंवरुन शाबीत होत नाही. गाडीमध्‍ये उत्‍पादित दोष नव्‍हता तर गाडीस ठोकर लागल्‍यामुळे गाडीचे इंजिनाचे नुकसान झाले हे सिध्‍द करण्‍यासाठी वि.प.क्र.1 यांना तज्ञ इसमाचा तपासणी अहवाल किंवा शपथपत्र याकामी दाखल करता आले असते परंतु संधी असूनही वि.प. यांनी तज्ञाचा अहवाल किंवा शपथपत्र दाखल केलेले नाही.  त्‍यामुळे गाडीमध्‍ये निर्माण झालेला दोष हा ठोकर लागल्‍यामुळे निर्माण झाला ही बाब याकामी शाबीत झालेली नाही. 

 

9.    तसेच तक्रारदाराने जेव्‍हा गाडी बदलून मागितली, तेव्‍हा वि.प.क्र.1 यांनी याबाबत वि.प.क्र.2 या उत्‍पादक कंपनीशी संपर्क साधून याबाबत पुढील कार्यवाही करण्‍याबाबत त्‍यांना सूचित करणे आवश्‍यक होते परंतु तसे केल्‍याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत नाही.  वि.प.क्र.1 यांनी स्‍वतःचेच अखत्‍यारीत याबाबत पुढील कार्यवाही केल्‍याचे दिसते.  वास्‍तविक एखादा ग्राहक जेव्‍हा गाडीमध्‍ये उत्‍पादित दोष असल्‍याची तक्रार करतो, तेव्‍हा त्‍याबाबत त्‍वरित उत्‍पादक कंपनीला कळविणे ही विक्रेत्‍याची जबाबदारी असते.  त्‍याबाबत अधिकृत विक्रेता किंवा सर्व्हिस सेंटर हे स्‍वतः निर्णय घेवू शकत नाही.   

 

10.   तक्रारदारांनी वाहन खरेदी केल्‍यानंतर लगेच दोन दिवसांमध्‍ये ते बंद पडले व त्‍याची दुरुस्‍ती करण्‍यासाठी वि.प.क्र.1 यांना सदरचे वाहन हे सातारा येथील सर्व्हिस स्‍टेशनमध्‍ये न्‍यावे लागले व तेथे त्‍यांना वाहनाचे इंजिनची दुरुस्‍ती करावी लागली हे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येते.  सबब, सदरचे वाहनामध्‍ये उत्‍पादित दोष होता असा निष्‍कर्ष याकामी काढणे न्‍यायोचित ठरेल असे या मंचाचे मत आहे. 

 

11.   वि.प.क्र.2 हे याकामी हजर राहिलेले नाहीत व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले नाही.  म्‍हणून, वि.प. नं.2 विरुध्‍द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे.  म्‍हणजेच वि.प.क्र.2 यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.  सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्‍वासार्हता ठेवणे न्‍यायोचित वाटते. 

 

12.   सदरकामी खालील नमूद न्‍यायनिवाडयाचा आधार घेतला आहे.

 

            1)  2006 STPL 4612 NC

                 R. Raja Rao  Vs.  Mysore Auto Agencies &Anr.

 

            Light commercial vehicle – Troubles within a few days of peer chase – No improvement – Notice for replacing – Refusal by O.P. – complaint alleging deficiency in service – Want of refund or replacement – complainant delivered vehicle to dealer with reading 36,777 km  – On date of inspection speedometer showed 3,20,129 reading – No doubt the vehicle used by O.P.No.1 (dealer) by replacing certain parts – Appellant suffered not only monetary loss but mental agony all through out – Appeal allowed with direction that dealer and manufacturer are jointly and severally liable to refund amount deposited with interest @ 12% p.a. – Rs.10,000/- as cost also awarded.

 

            2) 2008 STPL 1596 NC

                 Hyundai Motors India Ltd.    Vs.  Affiliated East West Press (P) Ltd.

 

             Motor vehicle – car – Manufacturing defect – Refund – Deduction – A brand new car was required to be repaired repeatedly – Opposite parties are not in a position to find solution to control emission of white/black smoke – Order of refund amount upheld – Plea that deduction to be made from amount as complainant used it for one year – Not accepted as car was required to be used after its repeated repairs and complainant also invested money for purchase of car and on the same amount he has lost interest.

 

      3) Hindustan Motors Ltd. Vs. Ashok Narayan Pawar (National Commission)

 

            Motor Vehicles Act, 1988 – Section 130(3) – Motor vehicle – Manufacturing defect – Vehicle caught fire in engine and reduced to ashes – Warranty period – Replacement denied – Deficiency in service – Section 130(3) of M.V. Act does not contain any direction that it is mandatory to obtain other hand they did not care a fig for burnt vehicle – No other reason except of manufacturing defect in burning of brand new car – OPs are directed to provide new car to complainant or current price of car alongwith 9% p.a. interest.

 

      वरील न्‍यायदंडकांचा विचार करता तक्रारदार हे वाहनाची किंमत परत मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  सबब, तक्रारदार हे वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या वाहन खरेदीची रक्‍कम रु.7,78,000/- तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्‍कम तक्रारदाराच्‍या हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजदराने वसूल होवून मिळणेस तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व अर्जाचा खर्च रक्‍कम रु.3,000/- वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

 

      सबब, प्रस्‍तुतकामी आम्‍ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.

 

आदेश

 

 

1)     तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2)    वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदाराला वाहन खरेदीची रक्‍कम रु.7,78,000/- अदा करावी  व सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्‍कम तक्रारदाराच्‍या हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.

 

3)    मानसिक  त्रासापोटी रक्‍कम रु. 5,000/- व अर्जाचा खर्च रु.3,000/- वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारास अदा करावी.

 

4)    वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

5)    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 व 27 अन्‍वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

                  

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.