तक्रार क्र. 351/2009 या मंचाने दि.30/12/2009 रोजी निकाली काढली मंचाच्या अंतीम आदेशानुसार रु.500/- न्यायिक खर्च व रु.1,000/- मानसीक त्रासासाठी नुकसान भरपाई असे एकुण रु.1,500/- गैरअर्जदार/मुळ विरुध्द पक्ष यांनी अर्जदाराला देणे आवश्यक होते अंतीम आदेशात अनुच्छेद क्र. 2 खालील प्रमाणे - ‘तक्रारदकर्ता यांनी क्लेम दाखल करतांनाची जरुरीची कागदपत्रे विरुध्द पक्षाकडे दाखल करावी व त्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारदार यांचा क्लेम आदेश प्रत मिळाल्यापासुन 2 महिन्याचे आत सेटल करावा.’ सदर दरखास्त अर्जदारांने ग्राहक कायद्याचे कलम 25 अन्वये दाखल केलेली आहे. कलम 25 अन्वये आदेशान्वीत रक्कमेच्या वसुलीसाठी वसुलीचा दाखला मंचाने जारी करण्याची तरतुद आहे. सदर प्रकरणी आदेशान्वीत रक्कम रु.1,500/-ऐवढी असल्याचे स्पष्ट होते या संदर्भात मंचाने अर्जदाराचा अर्ज प्रतिज्ञापत्र तसेच त्यांनी दाखल केलेल्या मंचाच्या दि.30/12/2009 च्या आदेशाचे अवलोकन केले. या आदेशासोबत स्वतंत्रपणे रु.1,500/-(रु. एक हजार पाचशे) रक्कम वसुली बाबत वसुलीचा दाखला जारी करण्यात येतो व पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत जिल्हाधिकारी मुंबई यांचे कडे अग्रेषित करणेबाबत प्रबंधक, ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांना निर्देश देण्यात येतो. मुळ तक्रार प्रकारणातील अनुच्छेद क्र. 2 च्या पुर्तते संदर्भात कलम 25 अन्वये कोणतीही कार्यवाही करता येणे शक्य नाही. सदर प्रकरणी मंचाची नोटिस प्राप्त होऊनही गैरअर्जदार हजर झाले नाहीत अथवा त्यांनी म्हणणे दाखल केले नाही ही बाब नमुद करणे आवश्यक ठरते. ग्राहक कायद्याच्या कलम 27 अन्वये स्वतंत्र प्रकरण दाखल करणेस अर्जदार स्वतंत्र राहील. सबब दरखास्त क्र.15/2011 निकाली काढण्यात येते.
| [ HON'BLE MRS. JYOTI IYER] MEMBER[ HON'BLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |