Maharashtra

Pune

CC/10/426

Singh Rajbhushan avhadkishor - Complainant(s)

Versus

Relince insurance co ltd - Opp.Party(s)

31 Oct 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/426
 
1. Singh Rajbhushan avhadkishor
Chikhali Haveli pune 14
Pune
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Relince insurance co ltd
Tadiwala road pune 01
Pune
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्‍यक्ष
 
                              :- निकालपत्र :-   
                             दिनांक 31/10/2011
 
 
तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे-
 
1.     तक्रारदारांनी दिनांक 29/3/2010 रोजी महिन्‍द्र झायलो गाडी खरेदी केली होती. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्‍याकडून गाडीसाठी इन्‍श्‍युरन्‍स पॉलिसी घेतलेली होती. त्‍याचा कालावधी दिनांक 30/3/2010 ते 29/3/2011 असा होता. दिनांक 28/5/2010 रोजी बराई खुर्द, फैजाबाद, उत्‍तरप्रदेश येथे समोरुन एक मोटर सायकल आल्‍यामुळे त्‍याला वाचविण्‍यासाठी गाडीवरील नियंत्रण गेल्‍यामुळे तक्रारदारांच्‍या गाडीस अपघात झाला. या अपघाताची माहिती तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिली. सर्व्‍हेअर नेमण्‍यात आला व गाडी दिनांक 2/6/2010 रोजी श्री आर.सी.एंटरप्रायझेस, मोतिहारी, बिहार यांच्‍याकडे दुरुस्‍तीसाठी देण्‍यात आली. तक्रारदारांनी जाबदेणारांकडे क्‍लेम फॉर्म सर्व कागदपत्रांसह दाखल केला. तक्रारदारांना श्री आर.सी.एंटरप्रायझेस यांनी गाडी दुरुस्‍तीचे एस्टिमेट दिले नाही. म्‍हणून तक्रारदारांनी दिनांक 10/7/2010 रोजी नोटीस पाठवून विचारणा केली असता त्‍यावर श्री आर.सी.एंटरप्रायझेस यांचे असे म्‍हणणे पडले की दिनांक 7/6/2010 रोजी त्‍यांचे एस्टिमेट तयार होते परंतू जाबदेणार क्र.3 – सर्व्‍हेअर यांनी ते घेतले नाही म्‍हणून दिनांक 24/6/2010 रोजी ई-मेल द्वारा सर्व्‍हेअर यांना एस्टिमेट पाठविण्‍यात आले. त्‍यानंतर सर्व्‍हेअरनी 16/7/2010 रोजी श्री आर.सी.एंटरप्रायझेस यांना बॉडी शेल दुरुस्‍त करण्‍यास सांगितले. अपघात झाल्‍यानंतर दोन महिन्‍यांपर्यन्‍त गाडी दुरुस्‍तीचे काम करण्‍यात आले नाही, गाडी दुरुस्‍तीबाबत सुचना देण्‍यात आल्‍या नाहीत. म्‍हणून तक्रारदारांनी दिनांक 4/8/2010 रोजी जाबदेणार यांना नोटिस पाठविली. नोटिसीचे उत्‍तर जाबदेणारांनी दिले नाही. दिनांक 7/8/2010 रोजी जाबदेणार क्र.3 यांनी तक्रारदारांना पत्र पाठवून काही आरोप केले. तक्रारदारांनी दिनांक 14/8/2010 रोजी जाबदेणार क्र.3 यांना उत्‍तर देऊन गाडी उघडण्‍यास सांगितले. दरम्‍यानच्‍या काळात दिनांक 21/8/2010 जाबदेणार क्र.3 यांनी फक्‍त बोनेट व दार उघडून दुरुस्‍तीची सुचना देऊन उर्वरित काम थांबविण्‍याची सुचना दिली. त्‍यानुसार बॉडी शेल उघडण्‍याचे काम थांबविले गेले. यावरुन जाबदेणार यांना तक्रारदारांचा क्‍लेम सेटल करण्‍याची इच्‍छा नाही किंवा त्‍यात विलंब करावयाचा आहे हे दिसून येते. म्‍हणून सदरील तक्रार. गाडी नसल्‍यामुळे तक्रारदार व त्‍यांच्‍या कुटूंबियांची गैरसोय झाली. तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून गाडीची टोटल इन्‍श्‍युअर्ड डिक्‍लेअर्ड व्‍हॅल्‍यु रुपये 6,14,040/- व्‍याजासह मागतात. तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 3,00,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी प्रतिज्ञापत्र, मोठया प्रमाणात कागदपत्रे व फोटोग्राफ दाखल केले.
2.          जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी संयुक्‍तपणे लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्‍या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांनी सर्व्‍हेअर - श्री. सत्‍यजित कुमार यांची नियुक्‍ती केली होती. त्‍यांनी दिनांक 2/6/2010 रोजी सर्व्‍हे करुन दिनांक 30/8/2010 रोजी अहवाल दिला. अहवाल देण्‍यापुर्वी सर्व्‍हेअरनी तक्रारदारांशी गाडीच्‍या नुकसानीच्‍या मुल्‍यांकनासंदर्भात, गाडी डिसमेन्‍टल करण्‍यासंदर्भात चर्चा केली होती. तक्रारदारांबरोबर त्‍यांचा पत्र व्‍यवहार सुरु होता. सर्व्‍हेअर यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार गाडी पुर्णपणे खोलण्‍यास तक्रारदारांचा विरोध होता. त्‍यामुळे सर्व्‍हेअर यांनी गाडी पुर्णपणे न खोलताच गाडीची बाहेरुन पहाणी करुन, सर्व्‍हे करुन, अहवाल दिला होता. त्‍यामुळे सर्व्‍हेअर प्रत्‍यक्षात किती नुकसान झाले याबद्यल निश्चितपणे सांगू शकत नाही. जर तक्रारदारांनी गाडी पुर्णपणे खोलण्‍याची परवानगी दिली असती तर गाडीच्‍या नुकसानीचे मुल्‍यांकन बरोबर केले असते. सर्व्‍हेअर यांनी नुकसानीचे मुल्‍यांकन रुपये 1,54,792/- दाखविले आहे. गाडी पुर्णपणे खोलली असती तर नुकसानीच्‍या मुल्‍यांकनात 15 ते 20 टक्‍के वाढ होईल असे अहवालामध्‍ये नमूद केले आहे. तक्रारदारांनी श्री. ग्‍यानरंजन यांचे प्रतिज्ञापत्र देऊन गाडीचे नुकसान रुपये 3,98,600/- इतके होईल असे सांगितले आहे. परंतू ही देखील गाडी पुर्णपणे न खोलताच काढलेली किंमत आहे. तक्रारदारांचे इतर आरोप अमान्‍य करत तक्रारदारांची तक्रार नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली.
 
3.          दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली. तक्रारदारांनी दिनांक 28/5/2010 रोजीच्‍या अपघातानंतर त्‍यांची महिन्‍द्र झायलो गाडी दुरुस्‍तीसाठी अधिकृत सर्व्हिस स्‍टेशन श्री आर.सी.एंटरप्रायझेस, मोतिहारी, बिहार यांना दिल्‍यानंतर त्‍यांनी तक्रारदारांना पत्र दिले. त्‍या पत्रात त्‍यांनी असे नमूद केले की सर्व्‍हेअर यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार गाडीचा प्रत्‍येक भाग कापला गेल्‍यानंतर आणि पुन्‍हा दुरुस्‍त केल्‍यानंतर गाडीचा शेप पुर्वीसारखा म्‍हणजेच नवीन गाडीसारखा दिसणार नाही. परंतू सर्व्‍हेअर यांनी त्‍यांचे म्‍हणणे ऐकले नाही. Collision मुळे बॉडी शेलचे अनेक नाजूक भागांवर परिणाम झालेला आहे. त्‍यामुळे बॉडी शेलचे नुकसान झालेले भाग कापून वेल्‍ड केल्‍यानंतर पुर्वीसारखे होणे शक्‍य नाही. त्‍यामुळे बॉडी शेल दुरुस्‍त करणे या परिस्थितीत शक्‍य होणार नाही. यावरुन गाडीच्‍या बॉडी शेलची इतकी दुरावस्‍था झाली होती की ती अॅथोराईज्‍ड सर्व्हिस स्‍टेशननी दुरुस्‍त करण्‍यास नकार दिला हे दिसून येते. तसेच गाडीचे संपुर्णत: नुकसान झाले या तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यास दुजोरा मिळतो. सर्व्‍हेअर यांच्‍या दिनांक 30/8/2010 च्‍या अहवालावरुन सर्व्‍हेअर यांनी तक्रारदारांची गाडी पूर्णपणे खोलण्‍यास नकार दिल्‍यामुळे फक्‍त बाहय पाहणी करुन नुकसानीचे मुल्‍यांकन रुपये 1,54,792/- एवढे दाखविले व गाडी पुर्णपणे खोलून नुकसानाची मुल्‍यांकन केले असते तर नुकसानीच्‍या मुल्‍यांकनात 15 ते 20 टक्‍के वाढ होऊ शकली असती असे नमूद केलेले आहे. सुनावणी दरम्‍यान मा. मंचाने जाबदेणार यांना प्रश्‍न विचारला की एकदा बॉडी शेल कापल्‍यानंतर दुरुस्‍त केल्‍यानंतर पुन्‍हा पुर्वीसारखाच, गाडी नवीन असल्‍यासारखाच शेप येऊ शकतो का ?   परंतू याबद्यलची माहिती जाबदेणार यांना नव्‍हती. तक्रारदारांनी जाबदेणार यांचे अॅथोराईज्‍ड सर्व्हिस स्‍टेशन श्री आर.सी.एंटरप्रायझेस, मोतिहारी, बिहार यांच्‍याकडे कार्यरत असलेले अॅक्सिडेंट डिपार्टमेंटचे इनचार्ज श्री. ग्‍यानरंजन यांचे दिनांक 23/12/2010 रोजीचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. सदरहू पत्राचे अवलोकन केले असता “8. ) That the alignment of the body shell is totally disturbed and its original position of shape cannot be regained if the repair is performed.”  असे श्री. ग्‍यानरंजन यांनी नमूद केले असल्‍याचे दिसून येते. यावरुन गाडीचे दुरुस्‍ती पलिकडील नुकसान झालेले आहे हे सिध्‍द होते. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या फोटोग्राफ अपघातानंतर तक्रारदारांच्‍या गाडीचे बॉडी शेल दुरुस्‍त करण्‍यापलिकडे गेले असतांना गाडी पुर्वस्थितीत किंवा पुर्वीसारखीच, रस्‍त्‍यावर चालणारी होऊ शकत नाही, त्‍यामुळे तक्रारदारांनी गाडी पूर्णपणे खोलण्‍याची परवानगी दिली नाही हे स्‍पष्‍ट होते.    तक्रारदारांनी गाडी घेऊन फक्‍त दोनच महिने झालेले होते. त्‍यामुळे घसा-याचा प्रश्‍नच उदभवत नाही असे मंचाचे मत आहे. म्‍हणून तक्रारदार जाबदेणारांकडून गाडीची टोटल इन्‍श्‍युअर्ड व्‍हॅल्‍यू मिळण्‍यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. 
 
4.          तक्रारदारांनी मा. पंजाब राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोगाचा निवाडा न्‍यू इंडिया अॅश्‍युअरन्‍स कं. लि. विरुध्‍द परमजितसिहं III (2004) CPJ 308 दाखल केलेला असून त्‍यात मा. पंजाब राज्‍य आयोगाने असे नमूद केलेले आहे की सर्व्‍हेअरनी बॉडी शेल दुरुस्‍त होऊ शकतो असे म्‍हटले आहे परंतू प्रत्‍यक्षात दुरुस्‍ती करणा-या एजन्‍सीने बॉडी शेल दुरुस्‍त होऊ शकत नाही असे स्‍पष्‍ट म्‍हटलेले आहे. त्‍यामुळे “Surveyor not justified in not including cost of body shell” असे मा. पंजाब राज्‍य आयोगाने held केलेले आहे.
 
5.                मा. राष्‍ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाने नॅशनल इन्‍श्‍युरन्‍स कं. लि. विरुध्‍द सी.यु.अहमद शेफी II (2004) CPJ 27 (NC) या निवाडयामध्‍ये अपघातामुळे टोटल लॉस असणारी गाडी दुरुस्‍तीनंतर पुर्वी सारखी होऊ शकत नाही, म्‍हणून गाडीची संपुर्ण किंमत व्‍याजासह देण्‍यास जाबदेणार जबाबदार आहेत असे नमूद केलेले आहे.
6.          मा. दिल्‍ली राज्‍य ग्राहक वाद निवारण आयोगाने मयूर बत्रा विरुध्‍द आय.सी.आय.सी.आय लोम्‍बार्ड जनरल इन्‍श्‍युरन्‍स कं.लि. III (2010) CPJ 32 मध्‍ये दिलेल्‍या निवाडयानुसार सर्व्‍हेअरनी असे नमूद केले आहे की टोटल लॉस असलेली गाडी दुरुस्‍त होऊ शकत नाही परंतू इन्‍श्‍युरन्‍स कंपनीने त्‍यांची जबाबदारी कमी करण्‍यासाठी हा स्‍टॅन्‍ड घेतलेला आहे. अपघातानंतर गाडी पुर्वीसारखी दुरुस्‍त होऊ शकत नाही. “Highly inappropriate that insurance companies opt for repair to curtail its liability, despite fact that accidented vehicle need not restore its original condition”  तसेच   “ Road-worthiness of vehicle after repairs, not guaranteed” असे गृहित धरलेले आहे.
            जाबदेणार क्र. 3 यांच्‍याविरुध्‍द कुठलाही आदेश नाही.
 
            वरील विवेचनावरुन, कागदपत्रांवरुन, फोटोग्राफवरुन व मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांच्‍या निवाडयांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे-
 
 
 
 
                                    :- आदेश :-
[1]    तक्रार जाबदेणार क्र. 1, 1ए व जाबदेणार क्र.2 - रिलायन्‍स जनरल इन्‍श्‍युरन्‍स कंपनी लि. यांच्‍याविरुध्‍द अंशत: मान्‍य करण्‍यात येते. जाबदेणार क्र.3 यांच्‍याविरुध्‍द कुठलाही आदेश नाही.
[2]    जाबदेणार क्र. 1, 1ए  व जाबदेणार क्र.2 - रिलायन्‍स जनरल इन्‍श्‍युरन्‍स कंपनी लि. यांनी तक्रारदारांना रक्‍कम रुपये 6,14,040/- दिनांक 2/6/2010 पासून 9 टक्‍के व्‍याजासह संपुर्ण रक्‍कम अदा होईपर्यन्‍त आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून सहा आठवडयात अदा करावी.
[3]    जाबदेणार रिलायन्‍स जनरल इन्‍श्‍युरन्‍स कंपनी लि. यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रक्‍कम रुपये 1,000/- अदा करावी.
[4]    आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.